Skip to main content

१०/१०/१०

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
१०/१०/१० हा जगाच्या द्रुश्टिने आगळा वेगळा दिवस होताच तसेच माझ्याही साठी होता. ह्या दिवशीही दर्-वर्शाप्रमाणेच मला १८ वे लागले ;). आदल्या दिवशी आई मुंबईला परत गेली. ति होती तेव्हा मला आराम होता. नेमके नवर्याला अशी साइट दिलि गेलि की त्याला टिफिन द्यावा लागु लागला. आई होती तेव्हा काहिच प्र्श्न नव्हता, आई सकाळी उठुन स्वयंपाक करीत असे. १०/१०/१० ह्या दिवसापासुन लवकर उठण्याचा सकंल्प करायचा असे आधीपासुन माझ्या मनात होतेच. आईला मुंबईला जाण्यासाठी लाल ड्ब्यात बसवुन आले व सकाळी ५ चा गजर लावला. आणी खरच उठले की!!! गेल्या अनेक वर्षात जे मला जमले नव्हते ते मी आज केले. पोळी भाजी केली, देवांची पुजा केली नाहितर आमच्या देवांना फक्त शुक्रवारीच अन्घोळ घातली जात असे. शान्तपणे आवरले, मधे मधे शुभेछ्हाचे फोन येत होतेच पण वेळ खुप असल्याने आरामात बोलता आले. ऑफिसला आले. परत शुभेछ्हाचे फोन सुरु झाले. तिकडे रविवारची सुट्ती अस्ल्याने माझ्या नंणदेला असे वाटले की आरामात फोन केलेला बरा उगाच झोपेतुन मला उठवायला नको. पण मग मी ओफिसात आलेय हे कळल्यावर तिच्या लक्शात आले की मला शुक्रवारी सुट्ती असते. तिला मी म्हणाले की आजपासुन लवकर उठायचा संकल्प केलाय. ति म्हणाली अग गजर झाल्यानंतरची मोहाची ५ मिनिटे टाळलिस तर आयुश्य सुखकर बनेल व कसे ते तु अनुभवशिलच. माझा हा संन्कल्प गेले ३ दिवस सुरु आहे व अनुभव खालीलप्रमाणे :- १. पोळी भाजी सकाळीच होत असल्याने दुपारचे लंच होतेच तसेच रात्री घरी गेल्यावर ताण येत नाही, कुकर एकिकडे लावुन कोशिम्बिर केली की लगेच आमटी/वरण करता येते व पोळ्या सकाळीच केल्याने लगेच ८ पर्यत जेवायला बसता येते. कुकर होता होता २र्या दिवसाच्या भाजिची तयारी करता येते. २. २हि वेळचे जेवण असल्याने बाहेरचे मागविले जात नाही. आरोग्य व पैसे २ही फायद्यात. ३. स्वःतला वेळ देता येतो. नाहीतर इतर दिवशी कसेबसे अंघोळ करुन बाहेर पडायला लागायचे (वय वाढल्याने आता चेहर्याला मॉइशरायझर लावायला लागतेय व त्यासाठी वेळ मिळतोय.) ४. कामे वेळेत उरकली गेल्याने मनःशांती मिळते, गिल्ट येत नाही. घरात भांडणे होत नाहीत. तु हे कर तु ते कर हि वा़क्ये आयुश्यातुन निघुन जातात व घरात शातंता प्रस्थापित होते. असे अनेक फायदे होतात. तुम्हीही लवकर उठत नसाल तर ऊठुन बघा व आयुश्य बदलणारा अनुभव घ्या तसेच माझा संकल्प असाच कायम चालु दे ह्या साठी मलाही शुभेछ्हा द्या!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4195
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

Belated birthday wishes...>! तुझा संकल्प असाच यशस्वी होवो...

हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परिवर्तीत केलेला असावा. असो.. लेख छान आहे आणि चुचुनी लिहिलेला असल्याने चान चान असा प्रतिसाद देत आहे. चुचु माझ्या धाग्यांवर मुद्दामुन प्रतिसाद देत नाही हा भाग वेगळा. चुचुचे वय वाढल्याचे कळाल्याने अंमळ दु:ख झाले.

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे चुचुने पण टंकनिका ठेवली की काय?
थत्ते चाचा तुम्हाला खरच आंतरजालापासून विश्रांतीची गरज आहे बर का ! तुम्ही जरा 'हज' वगैरे करुन या पाहु :) अहो टंकनिका (इंद्रानी ठेवली आहे ति टंचनिका) ठेवली असती तर बाहेरुन लेख कशाला टंकुन आणावा लागला असता ?

चुचु काकुंचा आयडी हॅक झाला का? जोडाक्षरे नसलेले शब्द जोडाक्षरात न लिहल्याने लेख वाचु शकलो नाही! हॅपीबड्डे!

चुचुआतेला अठराव्या वर्षी वय वाढल्याने मॉइश्चरायझर लावावा लागतोय तर चाळीसाव्या वर्षी काय होईल? दुबई ते मुंबई लालडब्याची सोय आहे हे वाचून डोळे पाणावले. अवांतर : ज्या अर्थी शुक्रवारी सुट्टी असते त्याअर्थी चुचु अजून दुबईतच असावी. हल्ली काश्मीरात पण शुक्रवारी सुट्टी असते असे वाचले आहे. पूर्वी ठाणे-कोकण परिसरात यमायडीशीत शुक्रवारी सुट्टी असायची.

ओके!

वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू चीनच्या जवळ आहेस ना म्हणून ...१०/१०/१० प्रचंड शुभ दिवस होता चीन्यांसाठी म्हणे. मुहूर्तावर केलेली सगळी कामं तडीस जातात अशी समजूत आहे. तुझ्या संकल्पासाठीही शुभेच्छा! शेती भाती करायलाही बक्कळ वेळ मिळत असेल नाही आता :) देवांनाही आता रोज अंघोळ का? आम्हांला वाढदिवसाची पार्टी कधी देणार?

उतारवयात झोप कमी होते, जाग लवकर येते असे म्हणतात. चुचुआत्येचे आता तसेच काहीसे झाले असावे. बाकी पाशवी शक्तिला केवढी बरे कामे करावी लागत आहेत! चुचुकाका आदिजोशींची लेखमाला वाचतायत वाटतं! चांगले आहे हो. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान,आरोग्य, संपत्ती लाभे!

चुचु आत्तेला वाढदिवसाच्या उशीरा शुभेच्छा!! 'ध्यान'काका कसे आहेत? त्यांनी काय गिफ्ट दिलं तुला?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ध्यानाने हिला नाही तर हिनेच ध्यानाला गिफ्ट दिलेलं दिसतंय. आई गेली ना मुंबैला परत. हल्के गे गं च्चु!

म्हणजे मोडककाका मोठे व्हा असा आशिर्वाद देऊच शकणार नाहीत. अम्मा तुमने पाला पोसा लेकीन बडा नही किया असा डायलॉग उगाचच आठवला.

In reply to by रामदास

अम्मा तुमने पाला पोसा लेकीन बडा नही किया असा डायलॉग उगाचच आठवला.
हाहाहाहाहा... ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे. पण काही जणांच्यात उठवल्याशीवाय न उठण्याची वाईट खोड असते.

आता चुचू रोज लवकर उठणार नानाला एक प्रतिसाद लिहिणार नाना खवळणार आणि पाध्याना काहिबाही बोलणार आवाज ज होता प्रतिसाद उडणार

अय्या, मला पण त्याच दिवशी १६ वे लागले.

चुचुला ब्राह्ममुहुर्तावर जागे होण्याच्या उपक्रमासाठी शुभेच्छा. आणि अठरावे वरीस लागल्याबद्दल अनेकोत्तम शुभाशिर्वाद.

सगळ्यांना धन्यवाद. गिफ्ट काहीही दिले घेतले गेले नाही कारण आता मटेरियलिस्ति़क (Materialistic)जिवनातुन मी बाहेर आलेय. मिनल ताईनाही शुभेच्छा !! आपली नम्र,

ह्या दिवशीही दर्-वर्शाप्रमाणेच मला १८ वे लागले म्हणजे तुम्हाला दर वर्षी १८ वेच वर्ष लागते ??? विचार करुनच भन्नाट हसतोय.

वाढदिवसाच्या अंमळ उशिराने शुभेच्छा!!! चुचुचा संकल्प तडीस जावो.