१०/१०/१० हा जगाच्या द्रुश्टिने आगळा वेगळा दिवस होताच तसेच माझ्याही साठी होता.
ह्या दिवशीही दर्-वर्शाप्रमाणेच मला १८ वे लागले ;).
आदल्या दिवशी आई मुंबईला परत गेली. ति होती तेव्हा मला आराम होता.
नेमके नवर्याला अशी साइट दिलि गेलि की त्याला टिफिन द्यावा लागु लागला.
आई होती तेव्हा काहिच प्र्श्न नव्हता, आई सकाळी उठुन स्वयंपाक करीत असे.
१०/१०/१० ह्या दिवसापासुन लवकर उठण्याचा सकंल्प करायचा असे आधीपासुन माझ्या मनात होतेच.
आईला मुंबईला जाण्यासाठी लाल ड्ब्यात बसवुन आले व सकाळी ५ चा गजर लावला.
आणी खरच उठले की!!! गेल्या अनेक वर्षात जे मला जमले नव्हते ते मी आज केले.
पोळी भाजी केली, देवांची पुजा केली नाहितर आमच्या देवांना फक्त शुक्रवारीच अन्घोळ घातली जात असे.
शान्तपणे आवरले, मधे मधे शुभेछ्हाचे फोन येत होतेच पण वेळ खुप असल्याने आरामात बोलता आले.
ऑफिसला आले.
परत शुभेछ्हाचे फोन सुरु झाले. तिकडे रविवारची सुट्ती अस्ल्याने माझ्या नंणदेला असे वाटले की आरामात फोन केलेला बरा उगाच झोपेतुन मला उठवायला नको. पण मग मी ओफिसात आलेय हे कळल्यावर तिच्या लक्शात आले की मला शुक्रवारी सुट्ती असते. तिला मी म्हणाले की आजपासुन लवकर उठायचा संकल्प केलाय. ति म्हणाली अग गजर झाल्यानंतरची मोहाची ५ मिनिटे टाळलिस तर आयुश्य सुखकर बनेल व कसे ते तु अनुभवशिलच.
माझा हा संन्कल्प गेले ३ दिवस सुरु आहे व अनुभव खालीलप्रमाणे :-
१. पोळी भाजी सकाळीच होत असल्याने दुपारचे लंच होतेच तसेच रात्री घरी गेल्यावर ताण येत नाही, कुकर एकिकडे लावुन कोशिम्बिर केली की लगेच आमटी/वरण करता येते व पोळ्या सकाळीच केल्याने लगेच ८ पर्यत जेवायला बसता येते. कुकर होता होता २र्या दिवसाच्या भाजिची तयारी करता येते.
२. २हि वेळचे जेवण असल्याने बाहेरचे मागविले जात नाही. आरोग्य व पैसे २ही फायद्यात.
३. स्वःतला वेळ देता येतो. नाहीतर इतर दिवशी कसेबसे अंघोळ करुन बाहेर पडायला लागायचे (वय वाढल्याने आता चेहर्याला मॉइशरायझर लावायला लागतेय व त्यासाठी वेळ मिळतोय.)
४. कामे वेळेत उरकली गेल्याने मनःशांती मिळते, गिल्ट येत नाही. घरात भांडणे होत नाहीत. तु हे कर तु ते कर हि वा़क्ये आयुश्यातुन निघुन जातात व घरात शातंता प्रस्थापित होते.
असे अनेक फायदे होतात.
तुम्हीही लवकर उठत नसाल तर ऊठुन बघा व आयुश्य बदलणारा अनुभव घ्या तसेच माझा संकल्प असाच कायम चालु दे ह्या साठी मलाही शुभेछ्हा द्या!!!
मिसळपाव
प्रतिक्रिया
Belated birthday
Belated birthday wishes...>!
तुझा संकल्प असाच यशस्वी होवो...
हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन
हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परिवर्तीत केलेला असावा.
असो..
लेख छान आहे आणि चुचुनी लिहिलेला असल्याने चान चान असा प्रतिसाद देत आहे. चुचु माझ्या धाग्यांवर मुद्दामुन प्रतिसाद देत नाही हा भाग वेगळा.
चुचुचे वय वाढल्याचे कळाल्याने अंमळ दु:ख झाले.
चुचुचे वय वाढल्याचे कळाल्याने
In reply to हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन by परिकथेतील राजकुमार
चुचुचे वय वाढल्याचे कळाल्याने अंमळ दु:ख झाले. असेच म्हणतो..
>>हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन
In reply to हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन by परिकथेतील राजकुमार
>>हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन आणुन
म्हणजे चुचुने पण टंकनिका ठेवली की काय?
म्हणजे चुचुने पण टंकनिका
In reply to >>हा लेख बहुदा बाहेरुन टंकुन by नितिन थत्ते
थत्ते चाचा तुम्हाला खरच आंतरजालापासून विश्रांतीची गरज आहे बर का ! तुम्ही जरा 'हज' वगैरे करुन या पाहु :)
अहो टंकनिका (इंद्रानी ठेवली आहे ति टंचनिका) ठेवली असती तर बाहेरुन लेख कशाला टंकुन आणावा लागला असता ?
चुचु काकुंचा आयडी हॅक झाला
चुचु काकुंचा आयडी हॅक झाला का? जोडाक्षरे नसलेले शब्द जोडाक्षरात न लिहल्याने लेख वाचु शकलो नाही!
हॅपीबड्डे!
पा
चुचुआतेला अठराव्या वर्षी वय वाढल्याने मॉइश्चरायझर लावावा लागतोय तर चाळीसाव्या वर्षी काय होईल?
दुबई ते मुंबई लालडब्याची सोय आहे हे वाचून डोळे पाणावले.
अवांतर : ज्या अर्थी शुक्रवारी सुट्टी असते त्याअर्थी चुचु अजून दुबईतच असावी. हल्ली काश्मीरात पण शुक्रवारी सुट्टी असते असे वाचले आहे. पूर्वी ठाणे-कोकण परिसरात यमायडीशीत शुक्रवारी सुट्टी असायची.
ठाण्यात अजुनहि शुक्रवारीच
In reply to पा by नितिन थत्ते
ठाण्यात अजुनहि शुक्रवारीच सुट्टी असते!
किन्गफिशरने लाल डबा सुरु
In reply to पा by नितिन थत्ते
किन्गफिशरने लाल डबा सुरु केलाय.
ओके!
ओके!
वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तू चीनच्या जवळ आहेस ना म्हणून ...१०/१०/१० प्रचंड शुभ दिवस होता चीन्यांसाठी म्हणे. मुहूर्तावर केलेली सगळी कामं तडीस जातात अशी समजूत आहे. तुझ्या संकल्पासाठीही शुभेच्छा!
शेती भाती करायलाही बक्कळ वेळ मिळत असेल नाही आता :)
देवांनाही आता रोज अंघोळ का?
आम्हांला वाढदिवसाची पार्टी कधी देणार?
चान चान
उतारवयात झोप कमी होते, जाग लवकर येते असे म्हणतात. चुचुआत्येचे आता तसेच काहीसे झाले असावे. बाकी पाशवी शक्तिला केवढी बरे कामे करावी लागत आहेत! चुचुकाका आदिजोशींची लेखमाला वाचतायत वाटतं!
चांगले आहे हो. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान,आरोग्य, संपत्ती लाभे!
चुचु आजींना वाढदिवसाच्या
चुचु आजींना वाढदिवसाच्या उशीरा शुभेच्छा !!
शुभेच्छा
चुचु आत्तेला वाढदिवसाच्या उशीरा शुभेच्छा!! 'ध्यान'काका कसे आहेत? त्यांनी काय गिफ्ट दिलं तुला?
ध्यानाने हिला नाही तर हिनेच
In reply to शुभेच्छा by ३_१४ विक्षिप्त अदिती
ध्यानाने हिला नाही तर हिनेच ध्यानाला गिफ्ट दिलेलं दिसतंय. आई गेली ना मुंबैला परत.
हल्के गे गं च्चु!
नेहेमीच अठरा
म्हणजे मोडककाका मोठे व्हा असा आशिर्वाद देऊच शकणार नाहीत.
अम्मा तुमने पाला पोसा लेकीन बडा नही किया असा डायलॉग उगाचच आठवला.
हाहाहाहा
In reply to नेहेमीच अठरा by रामदास
हाहाहाहाहा... ;)
लवकर उठलेलं चांगलंच असतं.
लवकर उठलेलं चांगलंच असतं. पुढचं सगळं पटकन होऊन जातं.
+१
In reply to लवकर उठलेलं चांगलंच असतं. by बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे.
पण काही जणांच्यात उठवल्याशीवाय न उठण्याची वाईट खोड असते.
म्हणुन तर ते गाणे आहे
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
म्हणुन तर ते गाणे आहे ना..
उठी उठी गोपाळा...
चुचुताईला
चुचुताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आता चुचू रोज लवकर उठणार
आता चुचू रोज लवकर उठणार
नानाला एक प्रतिसाद लिहिणार
नाना खवळणार आणि पाध्याना काहिबाही बोलणार
आवाज ज होता प्रतिसाद उडणार
पाध्ये कुठे आता मधे :-/
In reply to आता चुचू रोज लवकर उठणार by विजुभाऊ
पाध्ये कुठे आता मधे :-/
अय्या
अय्या, मला पण त्याच दिवशी १६ वे लागले.
चान.
चुचुला ब्राह्ममुहुर्तावर जागे होण्याच्या उपक्रमासाठी शुभेच्छा.
आणि अठरावे वरीस लागल्याबद्दल अनेकोत्तम शुभाशिर्वाद.
सगळ्यांना धन्यवाद.गिफ्ट
सगळ्यांना धन्यवाद.
गिफ्ट काहीही दिले घेतले गेले नाही कारण आता मटेरियलिस्ति़क (Materialistic)जिवनातुन मी बाहेर आलेय.
मिनल ताईनाही शुभेच्छा !!
आपली नम्र,
ह्या दिवशीही
ह्या दिवशीही दर्-वर्शाप्रमाणेच मला १८ वे लागले
म्हणजे तुम्हाला दर वर्षी १८ वेच वर्ष लागते ???
विचार करुनच भन्नाट हसतोय.
हसण्यासाठीच लिहिले आहे ते
In reply to ह्या दिवशीही by utkarsh shah
हसण्यासाठीच लिहिले आहे ते ;) भन्नाट हसलात वा वा !!!
शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या अंमळ उशिराने शुभेच्छा!!!
चुचुचा संकल्प तडीस जावो.
चुचुचा संकल्प तडीस जावो.
मी चुकून बेत रडीस जावो असं वाचलं .
चुचु ह्या म्हातार्या डोळ्याला क्षमा कर.