अहो खातो माझा नवरा पैसं खातो
जातो जातो माझा नवरा मुन्शिपाल्टीत कामाला जातो ||धृ||
आठवड्याला नवी साडी घेई
पोराबाळांना खावू रोज देई
पण दारू लई जास्त पितो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा पोलीस श्टेशनात कामाला जातो ||१||
रस्त्यावर तो उभा राहतो
शिट्टी मारून लायसन पाहतो
पावतीचं पैसं खिशात टाकतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा ट्रॅफीकच्या कामाला जातो ||२||
आम्ही म्हैन्यात मॉलला जातो
दोन म्हैन्यात मोबाईल बदलतो
पण डॉक्टरचं खिसं आठ दिसात भरतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा सरकारी कचेरीत जातो ||३||
हौसमौज आम्ही न्हेमी करतो
अंडी मटन रोजरोज हाणतो
पण भांडण रात्रंदिस करतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो ||४||
जातो जातो नवरा पी.डब्लू.डी.त कामाला जातो
क्रेडीट कार्ड आम्ही वापरतो
म्हैन्याचा किराणा उधार आणतो
रोज वसूलीवाला दारी तगादा लावतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा फुकटपुढारीपणाला जातो ||५||
काय म्हणू मी अशा नशीबाला
रोज विनवीते मी देवाला
पैसं नको पण सुख घरी माझ्या येवो
नको नको फुकटचे पैसे नको
नको नको लाचखोरीचं पैसे नको ||६||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/१०/२०१०
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली.
आवडली.
मस्तच
आवडली कविता.
मस्त.. आवडली कविता..
मस्त..
आवडली कविता..
मस्त!
मस्त!
लै भारी. (नॉन करप्ट) इंट्या.
लै भारी.
(नॉन करप्ट) इंट्या.
पाभे..
छान...भा.पो..
भेदक सत्य.. पण मीटर चे काय?
भेदक सत्य..
पण मीटर चे काय?
पैसे खाणार्यांनी ही कविता
पैसे खाणार्यांनी ही कविता वाचली पाहिजे...अर्थात त्याने काही फरक पडेल असे वाटत नाही !!!
छान कविता...
आवडली कविता
आवडली कविता