Skip to main content

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 08/10/2010 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
...
लेखनविषय:

वाचने 26987
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी मी "प्रेरणा" दिली तरी आमचा बेड ओ'क्लॉक झाल्यानंतर धागा टाकणार्‍या भयालीदेवींचा "खतरनाक" निषेध!
मुहूर्त पाळावा लागतो. अन्यथा, सर्वपित्रीचा मुहूर्त चुकला असता. ;) बाकी, तुमची प्रतिभाही फुलून आली आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विक्षिप्तमॅडमचे काव्य आम्हाला आमच्या दिवसाकाठी वाचायला मिळाले आणि त्यांच्या मुळे दिवसा आकाशदर्शन अर्थात दिवसा तारे देखील दिसले. :-)

प्रियाली, भुतांबद्दलच्या तुझ्या क्रेझला नमस्कार आहे! :) उत्तम काव्य..! तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

आवरा !!

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते... मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
सगळ्या पैशाचिक कविना साष्टांग नमस्कार!

काल स्मशानातल्या वर्तमानपत्रात मोठ्ठी हेडलाईन होती. समस्त मिपाकरांनी सर्वपित्री अमावास्या भेसूर काव्याने जागवल्यानिमित्त समस्त अतृप्त भूतपरिवारातर्फे अनेक धन्यवाद.

काव्यरक्ताचे पाट असे ओसंडून वाहत असताना भयानक रसात लडबडलेल्या नेमक्या कोणत्या प्रतिभेला बक्षिस द्यावे हे न कळल्याने या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना एक सामायिक बक्षिस दिले जात आहे. आपापल्या आवडीनुसार त्याचे लचके तोडून घ्यावेत. ही आमच्या घरातली वरिजनल पैदास ;) बक्षिसाच्या रूपाने सर्वांनी भयंकर मानून घ्यावी. trial

अरे काल कोणीतरी धागा काढला होता ना भुतं आहेत का नाही ते आणि कुठे?? इथे येऊन बघा म्हणावं .. सगळेच प्रकार सापडतील ;) ह.घ्या.

इतके चांगले 'मिसळपाव' संस्थळ.....पण विक्रमादित्यदेखील घाबरून जाईल इथल्या हडळीं, खविस, वेताळ, रक्तपिपासू भुतांची दंगल पाहुन.....संपादक मंडळ, मला वाटते, दुलया रजई घेऊन घाबरून झोपी गेले आहे, असले सदस्य पाहून. असो....गोविंदाग्रजांनी श्रीमहाराष्ट्र गीत लिहिले होते, एक स्वप्न नजरेसमोर ठेवून. पण त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राचे भूतराष्ट्र झाले आहे जणू..... धागाकर्ती 'प्रियाली' यांनी एकच कडव्याचे बंधन घातले आहे, म्हणून 'हडळगीत' तितकेच. स्मशान देशा ! खविस देशा ! हडळींच्या देशा कवटी घ्यावी माझी ही श्रीमहाराष्ट्र देशा || नैवेद्याच्या देशा, कटकट देशा, रक्ताळलेल्या देशा भस्म्या देशा, वेताळी देशा, रुंडमाळाच्या देशा || ठाण्यावर ती विक्राळी एक पसरी झिंज्या बिनधोक डंकर्की ती दुसरी नाव ठेवुनी कवटी खाई रोखठोक मितानी पसरूनी नख्या शोषिते 'श्याम' प्राणाचा पिंड ज्योती तर रक्त पिते गटाटा वर काढूनी भटिंडा धिंड (~~ रक्तास सोकावलेल्या चौघींची मनी भीती बाळगणारा ~ इन्द्रा)

बाब्ब्बो !! डेंजार हाये ब्वा ..