कारने इंटर्व्ह्यु ला निघताना सकाळी ग्लासभर "कारनेशन" घेतलं होतं. इंटरव्ह्युचं टेन्शन, मुख्य ठीकाण तर दूरच पण मधे मैलोनमैल विश्रांती स्थळ देखील येत नव्हतं. अशावेळी भयंकर भीती दाटून आली होती , थरकापच उडाला होता का ते ऐका - :P
मला लागली ग बाई घाईची
जाऊ कुठे जाऊ कुठे
लांब स्थळ विश्रांती
मला लागली ग बाई घाईची
मला लागली ग बाई घाईची
जाऊ कुठे जाऊ कुठे
लांब स्थळ विश्रांती
मला लागली ग बाई घाईची
हाहाहा! चांगलं आहे पण सर्वपित्रीच्या मुहूर्तावर शोभत नाही.
हे काव्य नाही चालणार. ;) भयानक हवं. भुतंखेतं, हडळी, मुंजे, देवचार हवेत. पुन्हा प्रयत्न करा, नाहीतर पिडा बाजी मारतील.
अवसेला आला परा असं गाणं म्हणून पहा एकदा, आपोआप सगळ्याचीच भिती बसेल!
अवसेला आला परा,
वाजवत दात कराकरा || धृ||
म्हटला, बोलावतो नानाला,
आणि बोलावतो डान्याला,
सगळे फेर धरून नाचू आणि ,
मधे उभा करुया धम्याला, उभा करुया धम्याला...
याहून भितीदायक काय असू शकेल प्रियाली तै?
ते अॅवार्ड का काय ते भेजून द्या लवकर!!!
--असुर
धात्मारामा, अरे तू या घोळक्यात 'हत्तीचं तोंड' आणलेला वेताळ रे! तुला हत्ती म्हणायची स्वतः हत्तीचीतरी टाप आहे का?
प्रियालीतै, तुमी ते अॅवार्ड लावून द्या बरं रांगेत. आमाला नाय वो, तर या काव्यातल्या परा, नाना, डान्राव आणि धम्सअप या रंगकर्मींना देण्यात यावे ही विनंती!
--असुर
सिच्युएशन : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे.
पडून आहे गात्र कुजुनि, राजसा खपलास का रे?
सोडुनि मजला वेशिवर एकटा जळलास का रे?
अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?
बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा
गात गाणी ही भुतांची धुंद तू सुटलास का रे
पुढची कडवी सवडीने देतो. :)
१. अवसेच्या या भयाण राती
दे तुझा हाडाळ हात हाती
मिळून दोघं बसू मानगुटी
तुला कसली मरण-भीती?
२. अक्कणमाती चिक्कण्माती खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई मुडदा तो पुरावा
अस्सा मुडदा पुरला बाई माती ती लोटावी
चवथरा केला बाई क्रुस मात्र लावावा
३. काजळी काळोख गडे
जिकडे तिकडे चोहीकडे
चितेचा उज्जेड पडे
नाचती प्रेते सगळीकडे
:P
चैत पुनवेचि रात , पिंड फोडणीचा भात , कड्कड हाडकाना चल चावू या ,
खाऊ गिळु सारं कसं , मान चोच पाय पिसं , रगताच्या खरवसा चल खावू या,
कापली कि मुर्गी तुमच्या जोडीनं मी प्याले,
"पितरी" च्या या राती राया , टुन्न येडी मी झाले ,
राया सोडा आता तरी , काळयेळ न्हाई बरी ,
पुन्हा भेटू कवा तरी मसणा ,
मला जावु द्या ना घरी ..... आता वाजले की बारा
(१)
आवसेच्या रातीला, असाच होतो जात
वेताळाच्या वाटेवर, भूतनाथाचा भाट
व्हाळापाशी होत्या, आसरा साती सात
आवळल्या मुठीत आला, हडळीचा हात
- - -
(२)
उडाला धुराळा भरारा भरारा
पडू लागल्या जोरजोरात गारा
ढगांच्या मध्ये गर्जना हो कडाडा
घरी एकट्याला नि वाटे थरारा
- - -
(३)
सर्वपित्री किर्र रात्री दार माझे वाजले
'तो' असावा वाटले
एक प्याला ना पुरेसा, दोन प्याले ओतले
कोण प्याले ना कळे
१) भूत म्हणे हाडळीला
नाच माझ्या संगं
मसणाच्या दारी लागे
मुडद्यांची रांग !
२) तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू हाडकांच्या माळा
भूत आणखी हडळीला
चल रे घालू वेताळा !
तुज कवटी, मज दिवटी
आणखी पिंड कोणाला
वेड लागले दादाला
मला नव्हे ते मुंज्याला ॥
३) एक कवटी फोडू बाई दोन कवटी फोडू
सर्वपित्री आवसेला चार हाडं तोडू
" एक कवटी फोडू बाई दोन कवटी फोडू
सर्वपित्री आवसेला चार हाडं तोडू...."
~~ गेले दोन दिवस बेल्जियमच्या धवल क्रांतीवर लिहिणारी ती हीच का, किसानकन्या?
आणि बाई....दोनच का चांगल्या डझनभर फोड......चार नाही चाळीस हाडे तोड....पण ती सेन की झेन नदीकाठी बसून, इकडे कृष्णा-गोदावरी काठंची नको.
इन्द्रा
अरेरे इंद्रा, किती रे तू संकुचित !
पंछी नदिया पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हे रोके
सरहदे इन्सानोंके लिये है। बोलो तुमने क्या पाया ! इन्सां होके !
हे गाणं एका पिशाच्चाने म्हटलेलं आहे. तुझ्यासाठी खास ;)
मस्त मस्त. काय भयानक माणसे आणि काय भयानक डोकी, भयंकर कल्पनाशक्ती बघा एकेकाची आणि उगीच बिच्चार्या भुतांना नावं ठेवतात.
धनंजय,अडगळ आणि मितान पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत. येऊ द्या आणखी. ;)
धनंजयचे नं१ आणि नं३ क्लास. भारी आवडले.
ही स्पर्धेतली वेण्ट्री नाही! ;) असंच सुचलं नि र ला ट जोडण्याचा एक प्रयत्न आहे.
** पिपळावरचा भस्म्या **
वाखरावरचा पिपळ तो बदनाम पंचक्रोशीत
तिथे म्हणे भस्म्याची, अख्खी फ्यामिली आहे
सरपंचाचा बैल खाल्ला, उभा चिरून खुषीत
कालपासून कुलकर्ण्याची गाय हरवली आहे
शेळ्या, बकर्या, कोंबड्या वरचेवर गायब होती
भस्म्याच्या पिपळाखाली पडती हाडांच्या राशी
प्राणिच नाही माणसेही खातो की काय तो?
दिसल्या व्हाळामध्ये होत्या कवट्या खडकाशी
दिवसाढवळ्या सुद्धा तेथे जात नाही कोणि
नाही शाश्वती गेलेल्याची परतुन येण्याची
चुकूनमाकुन कुणि पोचला जरी वाखरापाशी
हिम्मत नाही होत तयाची रिस्कं घेण्याची
एकदा परशा गेला होता मुद्दाम धाडस करून
आठ दिवस कोणाशी काहीच बोलला नव्हता
आमोशेच्या रात्री तो गायबला घरामधून
पडला मुडदा भल्या पहाटे, अखा सोलला होता
मांत्रिक केले तांत्रिक केले भस्म्या काही हालेना
वाखरावरला पिपळ अजुनहि जनपरित्यक्त आहे
सरपंचाला खाईन ऐसी केली तयाने घोषणा
पंचायतिचि खुर्ची तेव्हापासुनि रिक्त आहे!
हा हा हा. नको. "प्रियाली - बस्स नाम ही काफी है" वगैरेतला प्रकार दिसतो एकूण तुमचा. तुम्ही लाख म्हणाल जारण मारण नाही केलेलं, पण उगाच आम्हाला भूतबाधा व्हायची. रिस्क कशाला घ्या! :P
आमच्या कंपूविषयी आम्ही काहीही कविता वगैरे करीत नाही.
(बाकी, खरडवह्यांतून बक्षीस वगैरे ही ऐड्या कुठून तरी चोरलेली वाटते. उद्गात्याला क्रेडिट द्यायला हवे.)
माळावरचा पिंपळ झाला रक्त साकळुन काळा
कुण्या कपीवर भूतनखांचा निर्घृण हल्ला झाला
भुका भडकती, जिभा लपकती, नजर वळे वखवखती
ऋषीमुनींवर, फाडुन खाया हिंस्र नखे पारजती
हे घ्या!!!
कारने इंटर्व्ह्यु ला निघताना
हेहेहे!
जर
गाडीत
बघा बघा फांद्या दिसला का रे
आला आला वारा
आला आला वारा???
खपलो !!
काय पुरुषांची मंगळागौर बसवली
अरे एऽऽ
धमु हत्ती वाटणे
धात्मारामा...
चितेवर जळतय मढं, वाजती कड्कड
अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला.
अर्धाच
चाललंच आहे तर आणखी एक..
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा........
साष्टांग...
अवसेच्या या भयाण राती दे तुझा
हाडाळ हात
धन्स...
लाजवाब!
ही हा हा
शुची, पुढचं कडवं - खाऊ दे
हाहा!
भारी
..... आता वाजले की बारा
लै लै भारी वाटलं चालीत
लै भारी!
>>आता वाजले की बारा आता वाजले
रंगाशेठच्या सुचवणीसह भारी!!!
हाहाहा!
आवसेच्या रातीला
१) भूत म्हणे हाडळीला
मितान सही!!!
सहमतीचे राजकारण
तुज कवटी, मज दिवटी!!!!!
कवटीचा दंगा...
मितान तू ये गं इथे! आपण
अरेरे इंद्रा, किती रे तू
मस्त मस्त
हे असंच. र ला ट जोडणे!
वेगळी प्रकाशित करा की
हा हा हा. नको. "प्रियाली -
पास
पुन्हा पुन्हा काय
माळावरचा पिंपळ झाला
मस्त!
अमूशेचा पार उठे मुडद्यांचे