Skip to main content

हडळ जागी भूत जागे

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 08/10/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली .. आणि पान जागे फूल जागे च्या ऐवजी भलतेच काही गुणगुणायला लागलो.. हडळ जागी भूत जागे, खविस सुद्धा जागला, प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला लाकडांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला, प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला! कफन हे रेशमी, सुतळकाथ्या बोचतो सूर हा, ताल हा, धूप थोडा लावतो तेरड्यांच्या या फुलांनी, देह आहे झाकिला! कावरा, बावरा, हा कुणाचा आतमा अंग ना सोडिसी, हो जीवाचा खातमा आज मुक्तीच्या भयाने, देह त्याचा कंपिला!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9512
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_

च्यायला... लॉगआऊट व्हावं आता.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नको. आज मंतरलेला ताईत नाहीये सोबत. उगा फटका बसायचा... ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुंजोबाला कसली भिती?
वेताळाची! संदर्भासाठी खरडवह्यांचा अभ्यास करणे

मस्त. हेच राहिले होते. एक सूचना: 'सूर हा ताल हा' ऐवजी 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' कसे वाटते?

In reply to by नितिन थत्ते

थत्तेशेठ, 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' असेच काहीसे अधी सुचले होते.. पण रडण्याचा / भजनांचा सूर ताल आणि धूप असे करावे वाटले.. (पर्यायी)केशवसुमार प्रतिसाद आणि सुचवणी बद्दल धन्यवाद.. (आभारी)केशवसुमार

मस्त.

गुर्जी मस्त जमलयं अवांतरः नशिब या विडंबनात स्वतःची स्वाक्षरी नाही टाकली ;)

'कावरा, बावरा, हा केसुचा आतमा' असेपण चालुन गेले असते ;) अवांतर :- थत्ते चाचांना शेठ म्हणल्याबद्दल ह्या बालदिनी तुम्हाला गुलाबाचे काटे फेकुन मारण्यात येतील.

राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम (रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..)

In reply to by पैसा

रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं.
हो कारण रामरामराम म्हणत राहीलं की मरामरामराही होतं. भुतं शांत होतील नाहीतर काय?

In reply to by प्रियाली

सर्वपित्रीला मरा.. मरा.. हेच बरोबर! शिवाय रामाचं नाव घेतलं तर दुसरीच भुतं मानगुटीला बसतील!

In reply to by पैसा

रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..
तुम्ही लहान असताना , का सांगणारा लहान असताना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवसेला आला परा, वाजवत दात कराकरा || धृ||
खरं तर हे आताच वाचलं होतं त्यामुळे तुमचं नाव बघताच माझी भीतीने गाळण उडाली होती! (घाबरट)

काय भयंकर लोक आहेत एकेक आणि बिचार्‍या भुतांना भयानक म्हणतात.

(नतमस्तक)बेसनलाडू या कवितेला प्रियालीताईंकडून निर्विवाद पहिले पारितोषिक मिळावे. (परीक्षक)बेसनलाडू

०()8= खूप दिवसांनी साष्टांगनमस्काराची स्माईली वापरायला दिल्याबद्दल खूष आहे! ;) भयरंग

मस्त...

भ.. भ.. भ...भयंकर सुंदर रचना !!!!

केसुंचे आजचे विडंबन वाचून त्यांचे एक जुने अमर काव्य आठवले. पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे या काव्यानंतर अनेकजण त्यांचे जबरदस्त फ्यान झाले असे आठवते.

In reply to by प्रियाली

हे विसरलोच होतो..धन्यवाद प्रियालीताई.. (विसराळू)केशवसुमार.. मस्त धमाल आली तेव्हा

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार.