Skip to main content

भसभसून उसळे नरड्यामधुनी धार

लेखक शहराजाद यांनी शुक्रवार, 08/10/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची. मूळ प्रेरणा मर्ढेकरांची कविता (खाली उद्धृत केली आहे) भसभसून उसळे नरड्यामधुनि धार हे तुषार केसर रक्तथेंब अलवार चाटीत तयांची खारट मादकता ती कुणी करतो ओले ओठ पुनेच्या राती नाजूक कंठ तो कुमारिकेचा गौर रसरसते यौवन मदिर रुधिर ते और तो दुरून येई सावज-गंधित वारा अन् उडति वाघळे वाड्यामधुनि भरारा परी फटीत दिसता सूर्यकिरण गगनात राहते मनातिल मृगया हाय मनात पेटीत ड्रॅक्युला स्वप्न पाहतो लाल भीती न तयाला वाढे कोलेष्ट्राल मूळ कविता कवी - बा. सी. मर्ढेकर. फसफसून येतो सोड्यावरती गार हा तुषार केसर फेसगेंद अलवार हुंगीत तयाची खारट मादकता ती कुणी करतो ओले ओठ इथे मध्यान्ही घाशीत कंठतो काळ मनातिल खरडे फुंकीत धुराचे एकलकोंडे कोडे तो हळूच येई रांगत फाल्गुन वारा अन् गळती वेफर झाडावरुनि भरारा परी खिशात जाता चवलीसाठी हात राहती मनातिल वेफर हाय मनात गुर्मीत इराणी स्वप्न पाहतो ऐसे स्वप्नातही स्मरतो सोड्याचे पै-पैसे
लेखनविषय:

वाचने 7626
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

कोलेष्ट्राल हा शब्द हृदयाला भिडला! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोलेष्ट्राल हा शब्द हृदयाला भिडला नि धमन्या तडतडल्या! ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोलेष्ट्राल आहे की नाय भरभक्कम शब्द आन लोक म्हन्तात की कोलेती बिघदली म्हणून ;)

शीर्षक वाचून हे 'म्यानातुन उसळे'चे विडंबन आहे असे वाटले होते. पण एकदम भन्नाट विडंबन.

In reply to by नितिन थत्ते

शीर्षक वाचून त्याच अपेक्षेने धागा उघडला. पण हे प्रकर्ण वेगळं निघालं!

एक नंबर. अतिशय दर्जेदार विडंबन केलेत. अभिनंदन.

मस्त!

मस्त जमलय

लै भारी ! भयालीतैंना इनंति की या विडंबनाबद्दल शहराजादभौंचे कवट्यांची माळ घालून मसनातल्या पिंपळाखाली समस्त भूतसमुदायातर्फे सत्कार कर्न्यत येवा !

हाहाहा!!! मस्त जमलंय एकदम. अवांतरः लागण झाली तर विडंबन रोगाची. ;)

'मी हजार चिंतांनी डोके खाजवतो' गाण्याच्या कडव्यांच्या चालीत हे विडंबन परफेक्ट फिट्ट बसतय. ट्राय मारुन बगा...आणि ह्या विडंबनाला फिट्ट अस ||ध्रु|| द्या...

In reply to by नावातकायआहे

हे गाणं कुठलं? लिंक दिली तर वाचायला आवडेल. मूळ कवितेला मर्ढेकरांनी ध्रूपद दिले नसल्यामुळे मीदेखील दिलेले नाही.

In reply to by शहराजाद

संदीप खरेंची कविता, सलील कुलकर्णींचे संगीत. छान म्हणले आहे. माझ्या माहीतीप्रमाणे जालावर उपलब्ध नाही... मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो. मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी, मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, तो लंघुन चौकट पार निघाया बघतो. डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप, तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते, घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो. मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो, मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो. मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर, तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

In reply to by Nile

छान आहे गाणं. माहिती करून तिघांचे दिल्याबद्दल आभार. अशा छानशा गाण्याशी ओळख व्हायला निमित्त मात्र झाले ड्रॅक्युलाचे :)

In reply to by विकास

घामाने डबडबून गेलो आहे!
काळजी करू नका. इथला हैदोस बघून सर्व भुतेच "भीमरूपी महारुद्रा" आळवत असणार. ;)

प्रतिसादांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.