प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची. मूळ प्रेरणा मर्ढेकरांची कविता (खाली उद्धृत केली आहे)
भसभसून उसळे नरड्यामधुनि धार
हे तुषार केसर रक्तथेंब अलवार
चाटीत तयांची खारट मादकता ती
कुणी करतो ओले ओठ पुनेच्या राती
नाजूक कंठ तो कुमारिकेचा गौर
रसरसते यौवन मदिर रुधिर ते और
तो दुरून येई सावज-गंधित वारा
अन् उडति वाघळे वाड्यामधुनि भरारा
परी फटीत दिसता सूर्यकिरण गगनात
राहते मनातिल मृगया हाय मनात
पेटीत ड्रॅक्युला स्वप्न पाहतो लाल
भीती न तयाला वाढे कोलेष्ट्राल
मूळ कविता
कवी - बा. सी. मर्ढेकर.
फसफसून येतो सोड्यावरती गार
हा तुषार केसर फेसगेंद अलवार
हुंगीत तयाची खारट मादकता ती
कुणी करतो ओले ओठ इथे मध्यान्ही
घाशीत कंठतो काळ मनातिल खरडे
फुंकीत धुराचे एकलकोंडे कोडे
तो हळूच येई रांगत फाल्गुन वारा
अन् गळती वेफर झाडावरुनि भरारा
परी खिशात जाता चवलीसाठी हात
राहती मनातिल वेफर हाय मनात
गुर्मीत इराणी स्वप्न पाहतो ऐसे
स्वप्नातही स्मरतो सोड्याचे पै-पैसे
वाचने
7626
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज काही खरं नाही
असेच म्हणतो
In reply to आज काही खरं नाही by श्रावण मोडक
कहर
+ १
In reply to कहर by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोलेष्ट्राल आहे की नाय
In reply to कहर by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेजायला
+१
In reply to तेजायला by नितिन थत्ते
क्या बात है !
+१
In reply to क्या बात है ! by ज्ञानेश...
:-)
मस्त
लै भारी ! भयालीतैंना इनंति की
कवटी माळा गळा
In reply to लै भारी ! भयालीतैंना इनंति की by मितान
हाहाहा!!! मस्त जमलंय
झकास..
ध्रूपद
In reply to झकास.. by नावातकायआहे
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
In reply to ध्रूपद by शहराजाद
(विषय दिलेला नाही)
In reply to मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो by विकास
छान आहे गाणं. माहिती करून
In reply to (विषय दिलेला नाही) by Nile
पेटीत ड्रॅक्युला स्वप्न पाहतो लाल
मस्तच..
कविता एकदम मस्त
भीमरूपी
In reply to कविता एकदम मस्त by विकास
लैच भारी!!!
धन्यवाद
जानव्याच्या गाठीला धरुन हल्ली
जानव्याच्या गाठीला धरुन हल्ली