Skip to main content

शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.

लेखक गांधीवादी यांनी गुरुवार, 30/09/2010 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला. तर बघूया काय निकाल लागला ते . रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल. ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही. सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन. संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.

वाचने 23701
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by यशवंतकुलकर्णी

मशीद गैर्-इस्लामी आहे असे निष्कर्ष निकालपत्रात नाहीत; तर असे म्हणणे ज्या पक्षकारांकडून मांडले गेले ते या म्हणण्याबाबत कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत असे मा. न्या. सुधीर आगरवाल यांचे निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

In reply to by सुधीर१३७

आहे की. न्या. शर्मा यांनी तसे म्हटले आहे. शिवाय ती जागा (की मूर्ती?) देवतुल्य आहे वगैरेही म्हटले आहे. न्या खान व न्या सुधीर अग्रवाल यांनी तसे काही म्हटलेले नाही.

शांतता पाळा, कुणीही काहीही बोलले काहीही केले तरी शांतता पाळा.... कशाला उगाच त्या संमंची वाट लावता? शेवटी कुणी काहीही केले तरी आपली संस्कृती सहिष्णुवादाची आहे की नाही बाळांनो? भारताची निर्मिती करतांना एकदा सर्वधर्म समावेश केला की मग शांतता पाळलीच पाहिजे! मग कोर्टाचा आदेश असे वा वल्ड व्हिजनने दिलेला प्रभुचा संदेश, सर्व काही स्वीकारले पाहिजे. यातच आपली भलाई आहे. हे सर्व देवाचे संदेश आहेत. मग देव त्यांचा की आपला हा वाद कशाला? त्यांचा तर त्यांचा! काय फरक पडतो बाळांनो? जगातले महान नाटककार, खुद्द प्रेमानंद गज्वी, किरवंत च्या प्रस्तावनेत म्हणतात*, "हा धर्म पृथ्वी वरून नाहीसा झालेलाच बरा" तेथे आपली काय कथा? त्यामुळे शांतता पाळा मग भलेही तुम्ही नाहिसे झालात तरी चालेल, पण शांतता पाळाच असे माझे आवाहन आहे! ----- संमं = संपांदक मंडळ

In reply to by प्रियाली

गुंडो? 'पंत' विसरलात? बाबूराव से बाबू? ग्लेनफिडिश? कार्यबाहुल्य.? कार्यप्रकल्पाचा ताण..? की रक्तवारूणी...? असो, मी शांतीला ठेवण्याचेच आवाहन केले आहे...! आपला साधु ऋतंभरापंत

In reply to by गुंडोपंत

हायकोर्टाच्या निकालाच्य दिवशी मुंबईत कित्ती छान शांतता होती. तशीच शांतता नेहमीच पाळायला हवी. त्यासाठी नेहमी नेहमी कोर्टाच्या निकालाची आणि टिव्हीवरील त्याचे दळण घालण्याची गरज नाही. शांत रहा! म्हणजे स्मशान शांतता पाळायची वेळ येणार नाही हे लक्षात ठेवा . शांतता पाळा !!!!!

ती जागा हिंदुच्या मान्यतेप्रमाणे,तसेच त्याच्या श्रध्देप्रमाणे भगवान रामाचे जन्मस्थळ आहे. कोर्टाने ती जागा रामजन्मभुमी आहे असे सांगितले नाही आहे. निकाल पुर्ण वाचा.भगवान रामाचा जन्म तिथे झाला ह्याला अजुन एक ही पुरावा मिळालेला नाही आहे. तसेच हिंदुना जसा मंदिर बांधण्याचा हक्क मिळाला आहे त्याप्रमाणे मुस्लिमांना मश्चिद बांघण्यास देखिल न्यायालयाने परवानगी दिली आहे्आ निकाल खुपच गुंतागुंतीचा व लबाड आहे.

In reply to by वेताळ

निकाल गुंतागुंतीचा आहे, परंतु
लबाड
मात्र नाही. कृपया संयमित व जबाबदारीने शब्दांचा वापर करावा ही विनंती.

कुणाला किती कुठे जागा मिळेल हे नकाशा द्वारे कुणी सांगु शकेल काय>..नुसते १/३ ने खुलासा होत नाहि.. जय श्रीराम..... वारुणी.. प्रमदा प्रिय...असलेल्या मीपा करांनी संयमित प्रतिक्रिया दिल्या बद्दल त्यांचे हि अभिनंदन....

In reply to by अविनाशकुलकर्णी

कुणाला किती जागा आहे ते आता लगेच सांगता येणार नाही.. पण येत्या काही निवडणूकांमध्ये भाजप २/३ च्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.. मायावतीही बाह्या सरसावून (कि पदर खेचून?) पुढे आल्या आहेत व सर्व पक्ष संयमाची भाषा करित असताना त्या मात्र "होणार्‍या परिणामांना केंद्र सरकार जबाबदार असेल" असे काहीतरी बरळत आहेत.. न्यूज चॅनेल्सही टीआर्पीच्या जमान्यात २/३ टीआरपी मिळावा म्हणून "तज्ञ" (?) लोकांना चर्चेसाठी आमंत्रित करून बळेच काहीतरी ब्रेकिंग मिळते का याचा अंदाज घेताना दिसत आहेत.. तसे काही मिळत नाही असे दिसताच स्वतःच काहीतरी ब्रेकिंग विचारून सनसनाटी तयार करून सबसे तेज राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.. त्यातल्या त्यात वृत्तपत्रे मात्र कौतुकास्पद अशी प्रगल्भता दाखवित आहेत.. कोणाची नक्की काय जागा आहे हे येणार्‍या काही दिवसांत कळेलच... तोपर्यंत संयम!

In reply to by अविनाशकुलकर्णी

जे टिव्हीवर ऐकले वाचले त्यानुसार : १.प्रभु रामचंद्रांची मुर्ती ठेवलेला चबुतरा आणि त्याच्या आजुबाजुची जमीन जी एकुण जागेच्या १/३ आहे ती 'रामलल्ला विराजमान' ह्या दावेदारास. २.सीता रसोई आणि त्याआसपासची १/३ जागा निर्मोही आखाड्यास. ३.उर्वरीत बाहेरील जागा जिच्यावर असा हक्क सांगितलेला नाही ती सुन्नी वक्फ बोर्डास.

In reply to by अविनाशकुलकर्णी

दाव्यांमध्ये दाखल नकाशे पाहिल्यास व निकाल नीट वाचल्यास याचे उत्तर मिळेल. सर्व आवश्यक कागदपत्रे निकालासोबत इंटरनेटवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

जागा कशी वाटायची हेच अजुन कुणाला समजले नाही. मायावतीने तर स्पष्ट सांगितले आहे आता अयोध्येतल्या जागेची राखण आम्ही करणार नाही. जे काही राखण व वाटणी करायची आहे ती केंद्रशासनाने करावी.

In reply to by वेताळ

Cake cutting algorithm ने जागेचे तीन 'समान' भाग करता येवू शकतात्.समान म्हणजे प्रत्येकाला १/३ जागा मिळाली आहे(fair division) असे वाटेल.इकडे तीनच players आहेत त्यामुळे सोपे आहे.२/३ methods आहेत. १)divide and conquer 2)moving knife 3)one divides and others choose.

निकालाचा सारांश काही संस्थळावर वाचला. आता हा जुना वाद संपुष्टात यायला काही हरकत नसावी :) दोन्ही बाजूंना थोडी माघार ही घ्यावीच लागणार त्या शिवाय हा वाद संपुष्टात येणार नव्हता/नाही. जर हा वाद सामोपचाराने संपुष्टात आणायचा होता तर त्या करता सुद्धा दोन्ही बाजूंनी थोडी माघार घेणे आवश्यक होतेच, परंतू या करता दोन्ही बाजू अर्थातच तयार नव्हत्या(दोन्ही बाजूंना संपुर्ण जागा हवी होती). त्यामुळे शेवटी न्यायालया कडे जाणे हाच एकमेव मार्ग होता. न्यायालयाने त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कार्य केलं आणि पुढे ठेवण्यात आलेल्या पुराव्यांना अनुसरून, जुना ईतिहास लक्षात घेउन, जुन्या परंपरा लक्षात घेउन, दोन्ही धर्मांच्या भावना लक्षात घेउन, सारासार बुद्धी वापरून हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हा निर्णय मला योग्य वाटतो. (ह्या निर्णयाची तुलना एकाच कुटूंबातील दोन भावांमधील जागेच्या वाटणीवर असलेल्या वादाशी संबंधीत निर्णयाशी करण्यात येउ नये). जर संपुर्ण जागेची मालकी एकाच पक्षाला देण्यात आली तर पुढेही भविष्यात हा वाद सुरूच राहणार कारण ज्या पक्षाला काहीच भाग मिळणार नाही तो पक्ष असंतुष्ट राहणार तसेच त्यामुळे भविष्यात सुद्धा संघर्ष होत राहणार. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हाच निर्णय कायम ठेवावा.

बस्स आता हे ....झाल गेल ते विसरा .... तुम्हाला वाटत का आपलि मुल - नातवन्ड सुधा भाडतच रहावीत ...

हिंदु बाहुल्य असलेल्या हिंदुस्थानात समज आल्यापासुन स्वतःस अभिमानाने " हिंदु"म्हणवुन घेणे हे एखादि शिवी हासडण्यासारखेच आहे अशी भावना मनात घर करु लागली होती...आज या निकालाने स्वत:स गर्वाने हिंदु म्हणावे असे वाटू लागण्यास वाव दिलाय्....निकाल देणार्‍या न्यायाधिशांना या सगळ्या प्रक्रियेत केव्हढा मानसिक तणाव सहन करावा लागला असेल याचा विचार करता त्यांनी दिलेला निर्णय हा अत्यंत संतुलित असाच आहे ............या खंडपिठावर विराजमान असलेल्या सर्व न्यायाधिशांना मनापासुन दंडवत..........

In reply to by अनामिका

>>स्वतःस अभिमानाने " हिंदु"म्हणवुन घेणे हे एखादि शिवी हासडण्यासारखेच आहे अशी भावना मनात घर करु लागली होती अशी परिस्थिती मला कधी जाणवली नाही. तुम्हालाही जाणवली नसेल पण तुम्हाला तशी परिस्थिती आहे असे समज आल्याच्या काळापासून "सांगितले जात असावे". विशेषतः समज येण्याचा काळ १९९० ते २००० या मधला असेल तर तशी बरीच शक्यता आहे. असो आम्हाला अभिमानाने हिंदू म्हणून घेण्याची गरजही कधी भासली नाही.

In reply to by नितिन थत्ते

असो आम्हाला अभिमानाने हिंदू म्हणून घेण्याची गरजही कधी भासली नाही.
माझी तुमच्या अथवा इतर कुणाकडुन तसे वाटून घ्यावे अशी अपेक्षा देखिल नाही.............तसे देखिल अश्या प्रकारच्या निकालाची मला मुळात अपेक्षा नव्हती... प्रामाणिकपणे सांगायचेच तर माझ्यासाठी व इतर अनेकांसाठी हा निर्णय म्हणजे सुखद धक्का आहे ..आता या मागे देखिल काहि राजकारण नक्कीच असु शकत हे ताडण्याइतपत शहाणपण नक्कीच आहे........मला निकाल ऐकल्यावर जे व्यक्तीशः वाटल ते मी इथे नमुद केलय ...........कुणी सांगुन स्वत:चे मत बनविण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण इश्वर कृपेने स्वत:चा विवेक व बुद्धी वापरत मत तयार करण्याइतपत अक्कल बाळगुन आहे. ..सर्वधर्म समभावाच तुणतुण वाजवत बहुसंख्याकांच्या भावनांची, आस्थांची पायमल्ली करत मतांच राजकारण करण्यात धन्यता मानणार्‍यांकडून कसलीच अपेक्षा नाही खर तर्............. लागलेला निकाल हाच अंतिम असेल असा देखिल माझा दावा नाही आणि तसा कोणताही समज करुन घेण्याइतकी मी अल्पमती नक्कीच नाही...... आपल्या सारख्या थोर विचारवंतांशी कुठलाही वाद घालण्याची माझी इच्छा या आधी देखिल कधी नव्हती आणि यापुढे देखिल कधी असणार नाही.....आपण माझ्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिलीत म्हणुन केवळ टंकतेय......तेंव्हा माझ्याकडुन मी याला इथेच पुर्णविराम देते आहे....उगीच कुणाच्या भावना दुखवायला नकोत्.....कसे!

निकाल लागुन फायदा शुन्यच ...वाईट याचे वाटते की, निकाल लागलाय निर्णय नाही. परत सुप्रिम कोर्ट.. पर लढाई.. पैशाचा \ वेळेचा अपव्यय, पुन्हा तेच! मंदीर \ मशीद काही होणार नाही कारण सुप्रिम कोर्टातुन स्टे आणला जाईल. अजुन ३ महिने जैसे थै असे असेल. त्यामुळे रामाचा वनवास चालु आहे आणि राहिल... आम्ही म्हणणार || जय श्रीराम ||

कुठल्याही वादाचा शेवट हा त्यागाने झाला तर उत्तम. मी स्वतः निधर्मी आहे आणि जेव्हा ह्या मुद्द्याकडे त्रयस्त नजरेने पाहतो तेव्हा हिंदूंना ती जमीन मिळणे हे न्याय्य आहे असे समजतो. "अल्पसंख्याकांना न दुखावणे" म्हणजे सहिष्णुता नव्हे. सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात न जाता हा वाद इथेच संपवावा. वास्तविक पाहता न्यायमूर्ती खान यांचे मत (जे थोडे वेगळे असले तरी इतर न्यायमूर्तींपासून फारच वेगळे नाही), पुरावे आणि संशोधन लक्षात घेता सुन्नी वक्फ बोर्डाने १/३ जमीनही हिंदूंना देऊन आपल्या ज्ञातीला एका वेगळ्या उंचीवर न्यावे. इतर जण जे राष्ट्रीय स्मारकाची भाषा करतात, त्यांनीही राम मंदिराला आ़क्षेप घेऊ नये. त्यामुळे हिंदूंवर अन्यायही होणार नाही आणि रामापेक्षा त्याग, प्रेम, शौर्य ह्याच प्रतीक काय होऊ शकतं?

हा निकाल फारच मोठा आहे. त्याबद्दल नीट समजावून घेऊन भाष्य करावे. निकाल खोलात जाऊन पाहता 'अयोध्या तो अभी बहोत दूर है'.

In reply to by विसुनाना

>>>निकाल फारच मोठा आहे. त्याबद्दल नीट समजावून घेऊन भाष्य करावे. सहमत आहे....! जन्मस्थानासाठी 'श्रद्धा आणि विश्वास’ हा पुरावा मानल्यामुळे भविष्यकाळ कठीण दिसतो. मात्र पुरातत्त्व विभाग म्हणते की, मशिदीपूर्वी मंदिर होते, हेच या निकालाचे यश म्हणावे लागेल. बाकी, रामलल्लाला मा. न्यायालयाने एका जागेचे मालक बनविणे. इस्लाम नुसार ती 'मशीदच’ नाही म्हणने. वक्फबोर्डाला जागा देणे. हे आणि अशा बर्‍याच प्रश्न आणि उत्तरांची गुंतागुंत आहे खरी. मा.न्यायालयाचा निकाल कमी आणि तडजोडच जास्त वाटते...! -दिलीप बिरुटे

रथयात्रा आणि तदनंतरचे बाबरी-पतन ह्यामुळे निकालात काय फरक पडला? जर ते झाले नसते तर निकाल वेगळा लागला असता काय? सदर दावा हा दिवाणी स्वरूपाचा होता तर बाबरी-पतनासंबंधीचा दावा हा फौजदारी स्वरूपाचा आहे. ह्या निकालानंतर तोही निकालात निघाला आहे किंवा कसे? जाणकारांनी खुलासा करावा.

अयोध्येच्या निकालाने मुस्लिम राजनैतिक आणि धार्मिक नेतृत्वाला स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात असलेला व मी लहानपणी/तरुणपणी अनुभवलेला धार्मिक सुसंवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे असे मला वाटते. आज सरहद्दीपलीकडे टपून बसलेल्या आपल्या शत्रूची मुंबई नरसंहार किंवा काश्मीरमधील सतत लुडबूड यासारखी आपल्या देशाला त्रास देणारी व आपल्या प्रगतीत खीळ घालणारी कारस्थाने हाणून पाडायला अशा सुसंवादाची गरज आहे. कोर्टाने ६७ टक्के जमीन हिंदू समाजाला दिली असून ३३ टक्के जमीन मुस्लिम समाजाला दिली आहे. मी सार्‍या मुस्लिम नेतृत्वाला व सार्‍या मुस्लिम समाजाला आवाहन करतो कीं सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पाऊल न उचलता ही ३३ टक्के जमीन त्यांनी हिंदू समाजाला देऊन टाकावी. असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल व केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगात एक संवेदनाशील आणि समजूतदार समाज अशी त्यांची प्रतिमा प्रस्थापित होऊन हा समाज पुन्हा देशाच्या मुख्य प्रवाहात (mainstream) सामील होईल. अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते. आज अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयामुळे ही संधी मुस्लिम समाजाला मिळाली आहे. ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो!

In reply to by सुधीर काळे

१००% सहमती काळेसाहेब! मी सार्‍या मुस्लिम नेतृत्वाला व सार्‍या मुस्लिम समाजाला आवाहन करतो कीं सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पाऊल न उचलता ही ३३ टक्के जमीन त्यांनी हिंदू समाजाला देऊन टाकावी. असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल व केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगात एक संवेदनाशील आणि समजूतदार समाज अशी त्यांची प्रतिमा प्रस्थापित होऊन हा समाज पुन्हा देशाच्या मुख्य प्रवाहात (mainstream) सामील होईल. अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते. आज अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयामुळे ही संधी मुस्लिम समाजाला मिळाली आहे. ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो! साहेब त्या वक्फ बोर्डालाच पत्र लिहा हो!

In reply to by गुंडोपंत

माझे याच मतितार्थाचे पत्र पणजीच्या नवहिंदटाइम्सने आज प्रकाशित केले आहे. वाचा या दुव्यावर! http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-173

In reply to by गुंडोपंत

बाबरी मशीची २/३ जागा (१/३ नव्हे) हिंदू समाजाला देऊन टाकण्याचे महान व पुण्यवान कर्म करण्याची एक सुवर्ण संधी मुस्लीम समाजाल प्राप्त झाली आहे. किती भाग्यवान ? हिंदू समाजाला असे महान पुण्यकर्म करण्याची संधी केव्हा मिळणार ?

In reply to by गुंडोपंत

>>ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो! सांगण्यास वाईट वाटते कि हि सुवर्ण संधी वाया गेली(घालविली).

असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल
कसे काय? माझ्या माहितीप्रमाणे रामजन्म्भूमीचा मुद्दा वि. हिं. प.(जी मुख्यतः उत्तर भारतात कार्यरत आहे)ने १९८४ पासुन चालु केला होता.नंतर तो भाजपाने उचलून धरल्याने हा मुद्दा राजकिय होता. तेव्हा ह्याला विरोध राजकिय पद्धतीनेच होणार हे उघड होते.

सब से बडे बेवकुफ तो हम लोग है ऊई .. और ये राजनेता हमको और उल्लु बना रहे है उई !! क्या मजहब की लडाई लडने का ? आपस मे भाईचारा रखो और खुशी से जियो और जिने दो ! अल्लाह की भी यही इच्छा होगी और राम भगवान की भी ! अगर इन मुद्दो मे आपस मे लडो और भाईयोंका खुन बहाओ तो ये ना अल्लाह को मन्जुर होगा ना राम को.. ये ऐसे दावे लडे जाते है ६०-६० सालो तक इस पे राजनिती होती है येही सब से बडी शर्मनाक बात है उई ! मेरी बात समझे तो सोचो उई..