रात्र काळी, घागर काळी
आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !
बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ
.
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण ( पाणी भरण्याकरिता अनावष्यक पण शृंगाराला आवष्यक असे अलंकार ) बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,"मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली." मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको ? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" च्या.
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या "कृष्णा"ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ़ सांगतो " माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे. पटत नाही ? पंढरपूरचा विठ्ठल पहा !"
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?
अवांतर १. : विष्णुदास नामा म्हणजे म्हणजे आपले नेहमीचे, विठ्ठलाला खीर पाजणारे, जानेश्वरांचे सांगाती, नामदेव महाराज नव्हेत. हे बरेच नंतरच्रे. पण गाथेत याचे अभंग पहिल्या नामदेवांच्या अभंगातच मिसळून टाकले आहेत. "कॉपी राईट" कायदा नव्हता ना !
अवांतर २. : "अभिसारिका" वरून आठवले, मी तसा मिपावर नवा. पण वरवर चाळून मला मिपावर "अष्टनायिका" यावर काही सापडले नाही. गुणीजनांचे रसग्रहण राहून गेले की काय ?
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचनीय
+१
+२
+३
+३ छानच!
+४
कै श्रावण मोडक आणि राजेश घासकडवी यांच्या लेखनाची आठवण झाली
खुपच सुन्दर....श्रामोंशी
मस्तं मेजवानी.
या पदाचा
कॉलिंग नंदन, मागे नंदनने या
शरदराव ,
हा घ्या दुवा..
अच्छा
श्रामो???
नाही
मस्त कलंदरा...
दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही.
मी
दुव्याबद्दल आभारी......!
सुंदर गाणे!
मस्त! मस्त! अजूनही लिहा.
विष्णुदास नामा यांचाबद्दल
+ १
थोडा वेगळा अर्थ
कधीकधी
मिभो
छानच !!
मिभो आणि घासकडवी दोघांशीही
मि . भो. शी सहमत. ही गवळण आहे
छान
रसग्रहण अप्रतिम.
बुंथ म्हणजे
धन्यवाद
शरदभाऊ सिंप्ली अफलातून!
सुरेख रसग्रहण!
छान पद, गाणे
शरदराव धन्यु
खूप सुंदर ! खूपच सहजपणे
शरदराव धन्यु
हा प्रसंग आणि त्याचे कारण
सुंदर विवेचन. मुशाफिर.
नॉस्टॅल्जिक झालो