Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by युयुत्सु on Fri, 10/01/2010 - 09:26
आज सगळ्यांची आत्यंतिक गरज बनलेला मोबाईल फोन हा संदेशन आणि करमणुकीचे साधन म्हणून विकसित झाला. अजून ५ वर्षांनी जन्माला येणार्‍या मोबाईल फोन मध्ये काय असायला हवं याचा विचार करत होतो. तेव्हा काही कल्पना डोक्यात आल्या. मोबाईल फोन हे धारकाच्या आरोग्यावर गस्त घालणारे उपकरण बनणं शक्य नाही का? स्मार्ट फोन, बिझनेस फोन याच्या पलिकडे जाउन मोबाईलचे नवं रुप हेल्थफोन म्हणून असित्वात यायला काय हरकत आहे. - रक्तदाब आणि शर्करा मोबाइल फोन वर मोजता यायला हवी - हृदयाच्या गतीवर तसेच रक्तातील प्राणवायुवर मोबाईलने देखरेख ठेवायला हवी - झोपेच्या दर्जावर मोबाईलने देखरेख ठेवता यावी. वर व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अगोदरच तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. या तंत्रज्ञानाचा मोबाईल बरोबर संकर घडवून आणणे का शक्य नसावे?
  • Log in or register to post comments
  • 10918 views

प्रतिक्रिया

Submitted by गुंडोपंत on Fri, 10/01/2010 - 09:47

Permalink

ते सोडा

ते सोडा हो... शुगर वगैरे पाहतील आमचे डॉक्टर. त्यापेक्षा आम्हा म्हाताऱ्यांना वाचता येतील आणि चष्मा न लावता सापडतील अशी बटने बनवली तरी खुप झाले! शिवाय हे बारके फोन कुठे हरवून जातात तेही कळत नाही. तुम्ही कुणाला सांगणार असाल तर चांगले मोठे फोन बनवा म्हणा त्यांना. हातात धरता येतील असे. सारखा फोन हरवणारा
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 10/01/2010 - 15:19

In reply to ते सोडा by गुंडोपंत

Permalink

हॅ हॅ हॅ पंत वॉक्या टॉक्या

हॅ हॅ हॅ पंत वॉक्या टॉक्या वापरा ;) हाकाअनाका.
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 11:27

In reply to हॅ हॅ हॅ पंत वॉक्या टॉक्या by गणपा

Permalink

बरोब्बर

तसाच हवा फोन. शिवाय त्याला गोलसर केला आणि चांगले तगडे व्हायब्रेटर लावले तर निम्म्या समाजात झकास खप होईल त्याचा अशी आम्हाला खात्रीच आहे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 10/02/2010 - 11:30

In reply to बरोब्बर by गुंडोपंत

Permalink

खात्री स्वानुभवाने झालेली

खात्री स्वानुभवाने झालेली दिसते, गुंडो (आता पंत तरी कसे म्हणावे ब्वॉ?)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 11:41

In reply to खात्री स्वानुभवाने झालेली by Nile

Permalink

का?

गुंडोपंत असे संबोधन मला बरे वाटते! तरुण असतांना आमचा भर बोलण्यापेक्षा कृतीवर असे. पण हल्लीचे तुमच्या सारखे तरूण कृती करण्यापेक्षा मिपावरच पडीक दिसतात... राहिला मुद्दा स्वानुभवाचा - अर्थातच स्वानुभव! मी तर नेहमीच वापरतो कारण व्हायब्रेटरने मानदुखी जरा कमी होते. तेव्हा माने जवळ गोलसर आकाराचा व्हायब्रेटर खरोखर बरा पडतो. तुम्ही वापरला नसेल तर वापरून पाहा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 10/02/2010 - 11:46

In reply to का? by गुंडोपंत

Permalink

अर्थातच स्वानुभव! मी तर

अर्थातच स्वानुभव! मी तर नेहमीच वापरतो कारण व्हायब्रेटरने मानदुखी जरा कमी होते.
आधी ठरवा ब्वॉ काय लिहायचे आहे ते. आधी म्हणता म्हातारे आहात, मग म्हणता पडत नाही का काय, मग हे सगळेच संपादित काय करतात. साठी बुद्धी की काय? असो, अश्लिल बोलायचे असाल तर ते बोला की पण मग मान दुखीची फुटकळ सबब कशाला?
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 11:55

In reply to अर्थातच स्वानुभव! मी तर by Nile

Permalink

पुरे

आता पुरे! कशाला म्हातार्‍याला छ्ळताय?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 10/01/2010 - 18:44

In reply to ते सोडा by गुंडोपंत

Permalink

हाजिर है !

http://www.squidoo.com/mobilephoneforseniors
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 10/01/2010 - 10:01

Permalink

मोबाईल सारखा हरवत असेल तर

मोबाईल गळ्यात अडकवण्यासाठी दोरी मिळते ती वापरा.मोबाईल त्याला बांधुन खिशात ठेवला तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/01/2010 - 10:16

In reply to मोबाईल सारखा हरवत असेल तर by वेताळ

Permalink

त्यापेक्षा मोबाईल फोन

त्यापेक्षा मोबाईल फोन चारजरच्या कनेक्षनलाच अडकवून ठेवावा. म्हणजे फिक्स मोबाइल कनेक्षन मिळेल. मोबाईल जागेवरच सापडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 10/01/2010 - 10:20

In reply to मोबाईल सारखा हरवत असेल तर by वेताळ

Permalink

दोरी

दोरी वापरतोच. पण आंघोळीला जातांना कुठे तर काढून ठेवला तो सापडेचना... त्यातच तो ढिस्चार्ज झाला. म्हंट्लं, मरोत तो मोबाईल. ज्याला असेल गरज तो येईल धडपडत. तेव्हढीच डोक्याला शांतता, आणि लगेच १० मिनिटात सापडला हो! आंघोळीहून आल्यावर चुकून मीच त्याच्यावर अंगपुसायचा टावेल टाकला होता. आमच्या हीने तो वाळत घालायला उचलला तर खाली मोबाईल. चालायचेच!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 10/01/2010 - 10:25

In reply to दोरी by गुंडोपंत

Permalink

आंघोळीच्या वेळी मोबाईल खुंटीवर अडकवुन ठेवत चला.

पण मोबाईल हरवल्यावर खुपच मोकळे मोकळे वाटते.मोबाईल जितका महत्वाचा तितका वैताग आणणारा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on Fri, 10/01/2010 - 11:49

In reply to आंघोळीच्या वेळी मोबाईल खुंटीवर अडकवुन ठेवत चला. by वेताळ

Permalink

आगदी बरोबर! माझा मोबाईल एकदा

आगदी बरोबर! माझा मोबाईल एकदा मुम्बई हुन पुण्याला येताना मझ्या हातातुन सटकुन बस खाली आला. सम्पूर्ण एक आठवदा माझ्याकडे फोन नव्हता. कित्त्त्त्त्ती बर वाटल म्हणुन सान्गु!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 10/02/2010 - 09:52

In reply to दोरी by गुंडोपंत

Permalink

आधी धाग्याचे नाव वाचले अन

आधी धाग्याचे नाव वाचले अन नंतर.... >>>दोरी वापरतोच. हॅ हॅ हॅ >>> पण आंघोळीला जातांना कुठे तर काढून ठेवला तो सापडेचना... हॅ हॅ हॅ... हॅ हॅ हॅ.... >>> त्यातच तो ढिस्चार्ज झाला. हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ... >>> म्हंट्लं, मरोत तो मोबाईल. हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ.... >>> आंघोळीहून आल्यावर चुकून मीच त्याच्यावर अंगपुसायचा टावेल टाकला होता. आमच्या हीने तो वाळत घालायला उचलला तर खाली मोबाईल. हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ.... अवांतर: तुम्हाला लागणार्‍या गोष्टींनीयुक्त मोबाईल (फोन हो) चेनै च्या एका कंपनीने काढलेला आहे. नाव विसर्लो. मार्केटात येईलच. तवा तोच घ्या. तुमचा मोबाईल वाजतोय खनाखना...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/01/2010 - 10:11

Permalink

गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक

गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक मोबाईल फोनचे फॉन्ट्स फारच लहान असतात विषेशतः इन्कमिंग फोन चा नंबर चष्मा लावल्याशिवाय वाचताच येत नाही. मोबाईल फोनमध्ये काय काय हवे. माझ्या मते. १)मोबाईल फोनम्मध्ये रहायला जागा मिळाल्यास मुम्बैतील जागांचे प्रश्न एकदम निकालात येतील. २) माणसाला मोबाईलफोन तर्फे प्रवासाची सोय झाली पाहिजे. ( इकडून फोनमध्ये लॉगिन्न केले की तिकडून बाहेर पडता आले पाहिजे ) ३) एकाच फोनमध्ये नवरा आनि बायको या दोघानाही रहाण्याची सोय असावी. म्हणजे मतभेद झाल्यास कोणालाही सर्रळ डीलीत करता येईल ४) मोबाइल मध्ये बोलणार्‍या माणसाचा चेहेरा दिसायला हवा. म्हणजे तो नक्की कोठून बोलतोय ते कळू शकेल ५) मोबाइल मध्ये बोलणाराभोवतालचे वातावरण बदलायची सोय असायला हवी म्हणजे आपण कुठे आहोत हे ऐकणाराला कळणार नाही ६) मोबाईलवरून थापा मारणाराना मोबाईलने डीटेक्ट करायला हवे. ७) मोबाइल थेट मेंदूशी कनेक्ट करता यायला हवा. म्हणजे हवी ती महिती/पुस्तके वगैरे डायरेक्ट डाऊनलोड /अपलोड करता येतील ( मॅट्रीक्स ष्टाईल) ८) ..... अजून आठवले की साम्गतो
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 10/01/2010 - 20:02

In reply to गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक by विजुभाऊ

Permalink

स्वप्नप्रवास

विजुभाऊ, तुमचा स्वप्नप्रवास चालु झालेला दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Fri, 10/01/2010 - 22:53

In reply to गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक by विजुभाऊ

Permalink

???

४) मोबाइल मध्ये बोलणार्‍या माणसाचा चेहेरा दिसायला हवा. म्हणजे तो नक्की कोठून बोलतोय ते कळू शकेल
अश्लील प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 10/04/2010 - 19:22

In reply to ??? by टिउ

Permalink

अगायायाया

टिऊल्या...मेल्या.... =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Fri, 10/01/2010 - 10:17

Permalink

मला नवीन मोबाईल पाहीजे...

मला नवीन मोबाईल पाहीजे...
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 10/01/2010 - 10:24

In reply to मला नवीन मोबाईल पाहीजे... by अनिल २७

Permalink

कशाला?

मला नवीन मोबाईल पाहीजे... कशाला म्हणे? आहे त्या मोबाईल मधून आवाज जातो - आवाज येतो ना? पाहिजे त्याला (क्रेडिट असेल तर) फोन करता येतो ना? हे महत्त्वाचे आहे. अजून काय हवे? शिवाय एस एम एस करता येतात हेच खूप झाले. किती वाढवायच्या गरजा? आणि कशासाठी?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Fri, 10/01/2010 - 10:33

In reply to कशाला? by गुंडोपंत

Permalink

नाही, मला पाहिजे म्हणजे

नाही, मला पाहिजे म्हणजे पाहीजेच नवीन मोबाईल..
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 10/01/2010 - 10:26

Permalink

फोन

त्यातून फोन करता आला पाहिजे. बाकी काही नसले तरी चालेल. (एच टी सी तल्या ९९% गोष्टींचा वापर न करणारा)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 10/01/2010 - 10:30

In reply to फोन by नितिन थत्ते

Permalink

एच टी सी?

एच टी सी ही काय भानगड काय अस्ते? आम्हाला आपला मोबाईलच माहिती आहे. त्यात कोणत्या १०० गोष्टी असतात? तुम्ही काय वापरता फक्त कॉल घेणे?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Fri, 10/01/2010 - 10:36

In reply to फोन by नितिन थत्ते

Permalink

तुमच्याकडे एचटीसी आहे?

तुमच्याकडे एचटीसी आहे? ग्रेट.. माझ्याकडेही तोच आहे.. त्याचा पुर्ण क्षमतेने वापर करा हो, मग कळेल विंडोज मोबाईल काय चीज आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 10/01/2010 - 10:43

In reply to तुमच्याकडे एचटीसी आहे? by अनिल २७

Permalink

ओहो

अच्छा! तुम्हा दोघांना असे सांगायचे आहे की तुमच्याकडे लई भारीतले मोबाईल आहेत... वोक्के! आत्ता कळले.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Fri, 10/01/2010 - 10:50

In reply to ओहो by गुंडोपंत

Permalink

तुम्हाला कळले हे वाचून

तुम्हाला कळले हे वाचून अत्यानंद झाला... हेतू सफल झाला.. दिवस कारणी लागला.. मन भरून आले.. डोळे पाणावले..
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 10/01/2010 - 10:41

Permalink

१. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि

१. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि त्याप्रमाणे वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे गाडी चालवताना सुखेनैव बोलता येईल. २. मोबाईल वापरणारा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मोठ्याने बोलू लागल्यास त्याचा गळा आवळण्याची यंत्रणा. ३. रिंग वाजण्यापुर्वी वेळ आणि आजूबाजूची शांतता याचा अंदाज घेऊन रिंगचा व्हॉल्युम नियंत्रित करणारी यंत्रणा. ४. अवेळी फोन आल्यावर पलीकडून सेल्समन बोलत असल्यास त्याचे तोंड फोडण्याची यंत्रणा.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 10/02/2010 - 08:48

In reply to १. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि by नगरीनिरंजन

Permalink

>> अवेळी फोन आल्यावर

>> अवेळी फोन आल्यावर >> अश्लील प्रतिसाद ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 11:08

In reply to >> अवेळी फोन आल्यावर by शुचि

Permalink

म्हणजे

म्हणजे 'पॉइंट ऑफ नो रिटर्न' वर असतांना? ;) हल्ली अशी वेळच येत नाही हो काय सांगणार... सगळा व्यायाम वाया जातो! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Mon, 10/04/2010 - 19:01

In reply to १. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि by नगरीनिरंजन

Permalink

+१

>> रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि त्याप्रमाणे वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे गाडी चालवताना सुखेनैव बोलता येईल. << १०००% सहमत. याशिवाय मोबाईल फोन जी.पी.एस. नेविगेटर सारखा वापरता येतो का सध्या? नसेल तर तो नेविगेटर म्हणून वापरता यायला हवा. किमान शहरात तरी जी.पी.एस. नेटवर्क ऐवजी मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करता येईल का? असा विचार येतो डोक्यात जेव्हा रस्ता चुकतो तेव्हा ... (अनेकदा रस्ता चुकणारा) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 10/05/2010 - 12:31

In reply to +१ by sagarparadkar

Permalink

याशिवाय मोबाईल फोन जी.पी.एस.

याशिवाय मोबाईल फोन जी.पी.एस. नेविगेटर सारखा वापरता येतो का सध्या?
अश्या सुविधा असलेले फोन सद्ध्या उपलब्ध आहेत. -स्मार्ट(फोनवाला)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 10/01/2010 - 10:46

Permalink

म्हणजे

हृदयाच्या गतीवर तसेच रक्तातील प्राणवायुवर मोबाईलने देखरेख ठेवायला हवी झोपेच्या दर्जावर मोबाईलने देखरेख ठेवता यावी.
म्हणजे आवडत्या व्यक्तिचा फोन आला की बघता येईल दिल की धडकन कशी आहे ते. विवाहित व्यक्ती तरी हा फोन घेणार नाहीत. न जाणो हापिसातून यायचा कोणाचा तरी फोन कुटुंब बरोबर असताना आणि व्हायचा सत्यानाश. झोपेचा दर्जा मोबाईल कसा चेक करेल माहित नाही.घोरणे रेकॉर्ड केले तर ठीक आहे.पण घोरणे म्हणजे चांगली झोप् हा गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Fri, 10/01/2010 - 10:59

Permalink

हा हा हा ..............लय

हा हा हा ..............लय भारी.............. चालूद्यात..........तुमचे लिहिणे ....आमचे वाचणे........... वेळ उत्तम जातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 10/01/2010 - 11:10

Permalink

सोयी

गुंडोपंत म्हणतात त्या रक्तदाब साखर वगैरे मोजण्याच्या सोयी झाल्या तर चांगलेच आहे. स्वगत : त्या सोयी वापरायची वेळ जवळ येत चाललीच आहे. ;) (प्रौढ)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 10/01/2010 - 11:17

In reply to सोयी by नितिन थत्ते

Permalink

छे हो

छे हो एच टी सीवाले साहेब. मी तर म्हणालो की, वाचता येतील आणि चष्मा न लावता सापडतील अशी बटने लावा त्या फोनच्या काडेपेटीला. चांगले मोठे फोन बनवा म्हणा त्यांना, हातात धरता येतील असे. शिवाय कानाच्या जागी चांगली मऊ गादी लावून घेता आली तर पाहा, फार वेळ बोलून कानच दुखायला लागतो कधी कधी. त्यामुळे आहेत ते फोन सुधारले की मग त्यात काय घालायचे हे पाहता येईल... असो तुमच्या त्या भारीतल्या फोन मध्ये काय काय गंम्मत जम्मत करता येते ते सांगितले नाही आम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 10/01/2010 - 11:57

In reply to छे हो by गुंडोपंत

Permalink

गंमत

>>असो तुमच्या त्या भारीतल्या फोन मध्ये काय काय गंम्मत जम्मत करता येते ते सांगितले नाही आम्हाला? हे हे हे. ते मला कळले की तुम्हाला पण सांगेन. ;) (मठ्ठ)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 10/01/2010 - 11:53

Permalink

फ्रिक्वेन्शी

जास्त हवी वाय्ब्रेटर मोड वर.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 10/02/2010 - 08:49

In reply to फ्रिक्वेन्शी by विनायक प्रभू

Permalink

खी: खी:

खी: खी:
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 11:11

In reply to फ्रिक्वेन्शी by विनायक प्रभू

Permalink

व्हायब्रेटर?

व्हायब्रेटर चा तुम्हाला काय उपयोग?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 10/01/2010 - 12:31

Permalink

इ. इ. इ.

  • छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम! त्यात कॉल्स, एसेमेस वाचणे, गजर एवढ्याच गोष्टी असल्या तरी चालतील.
  • बर्‍यापैकी आकाराच्या फोनमधे चांगले बँडपास फिल्टर्स हवेत.
  • अनेक भारतीय लोकांच्या अनेक सवयी पहाता मोबाईल फोनमधे लाऊडस्पीकर्स अजिबात नकोत.
  • मोबाईल इंटरनेट संगणकातून वापरण्यासाठी काहीतरी चांगली सोय हवी.
  • इथरनेट कनेक्शन करता आलं पाहिजे.
इ. इ. इ.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 10/01/2010 - 13:07

In reply to इ. इ. इ. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या

>>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम हे हे हे. आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) वयानुरुप वाचता येत नाही. मनगटी घड्याळाच्या आकाराचे मोबाईल म्हणजे त्यात आम्ही लोक काय पाहणार आणि काय वाचणार? (वर्ड फाईल १६०% झूम करून वाचणारा)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 10/01/2010 - 13:13

In reply to >>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या by नितिन थत्ते

Permalink

आम्हाला (मला आणि गुंडोपंताना)

आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) वयानुरुप वाचता येत नाही. मनगटी घड्याळाच्या आकाराचे मोबाईल म्हणजे त्यात आम्ही लोक काय पाहणार आणि काय वाचणार?
आंतरजालावर सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेतच असं नाही तद्वत, फोनची सगळीच मॉडेल्स सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी असली पाहिजेतच असं नव्हे! -- रा.को, चोता दोन बर्‍याचदा मला ऑफिसात फोन हातात ठेऊन फिरावं लागतं जे गैरसोयीचं वाटतं! स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी असा मनगटी घड्याळ्याएवढा फोन आला तर एवढी का हो तुम्हाला जळजळ? -- अदित्सु फोन हा पुस्तकाप्रमाणे वापरू नका, गैरसोय होणार नाही. तुमच्या घरात आलेल्या लँडलाईनवर सुरूवातीला काय वाचता येत होतं? आताही फोन लँडलाईन आहे समजा आणि वापरा. -- आगकथेतील काड्याकुमारी
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Fri, 10/01/2010 - 13:22

In reply to आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

> आगकथेतील काड्याकुमारी

> आगकथेतील काड्याकुमारी Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 10/01/2010 - 13:27

In reply to आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हे नक्की काय?

स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते. १२ मधली १ बाई भारतीय असे समजले तरी खिशाचे फायदे अजुन जगाच्या त्या १/१२ जनतेपर्यंत का पोहचले नाही? 'खिसा द्या' आंदोलनाची गरज आहे? आजवर अन्य कोणा पारंपारीक वेशभूषा करणार्‍या खिसा नाही म्हणून गैरसोय म्हणल्याचे आठवत नाही. मिपावर गेल्या तीन वर्षात ह्या प्रश्नाला का बरे पाशवी वाचा फुटली नाही? भारतात महीला फॅशन डिझायनर असुनही आजच्या जगात ही गैरसोय का खपवुन घेतली जात आहे? (लेडीज टेलर सिनेमा पाहीलेला) सहज
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 10/01/2010 - 18:34

In reply to हे नक्की काय? by सहज

Permalink

आयला, तुम्हाला नवीन फोन छोटा

आयला, तुम्हाला नवीन फोन छोटा बनवता येत नाही तर उगाच आमच्या फॅशनच्या आड येऊ नका. हे म्हणजे फालतू कौलांवर क्लीक करून हात दुखतो म्हणून हात कापा असा उपाय सांगताय तुम्ही! उगाच आम्हाला नको ती आंदोलनं आमच्यावर लादू नका. सहजमामांचा नि षे ध. (फॅशनेबल) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/01/2010 - 13:33

In reply to आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

स्त्रियांच्या पारंपारीक

स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते पारंपारीक पोशाखात सुधारणा करा. धम्याची ती खिशाखिशाची प्यान्ट होती तशा खिशाखिशाच्या साड्याची फॅशन शोधून काढा की किंवा चष्याच्या काडीत बसवता येईल असा फोन शोधून काढा. ( माझ्या डोळ्यासमोर बिका च्या चष्म्याला काचांऐवजी दोन एच टी सी मोबाईल बसवलेले आहेत असे आले )
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 10/01/2010 - 18:37

In reply to स्त्रियांच्या पारंपारीक by विजुभाऊ

Permalink

किंवा चष्याच्या काडीत बसवता

किंवा चष्याच्या काडीत बसवता येईल असा फोन शोधून काढा.
चष्म्यातच बसवायचा फोन तर मग रिस्ट वॉच काय वाईट आहे? बांगडी, कडं, ब्रेसलेट, घड्याळ अशा वेगवेगळ्या फॅशनमधे वापरता येईल फोन! आणि ज्यांना चष्मा नाही त्यांनी काय उगाच चष्मा वापरायचा का? चष्मा काढून सनग्लासेस वापरल्या की पुन्हा "काडीमोड" करायचा का? आणि ज्यांना कॉण्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या आहेत त्यांचं काय? मोबाईलमधे व्हायरस घुसला म्हणून मोबाईल डिशवॉशरमधे टाका असले सल्ले देऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Sat, 10/02/2010 - 10:56

In reply to किंवा चष्याच्या काडीत बसवता by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच

बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच ऐकलेच पाहिजे... हेअर्-पिन मध्ये मोबाईलची सुविधा देता येईल का यावर उल्हासनगर ईथे कार्यशाळा आयोजित केली गेली आहे. जगभरातून अनेक तज्ञ लक्ष ठेऊन आहेत.. निकाल लागल्यास सांगतो..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 10/04/2010 - 21:26

In reply to बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच by अनिल २७

Permalink

हेअर पिनमधे मोबाईल लावणारे,

हेअर पिनमधे मोबाईल लावणारे, तुम्हीच ते कॉमनवेल्थवाले सिव्हील इंजिनियर ना?? जगातला एक बारांशपेक्षा जास्त जनतेची (स्त्रियांच्या, अनेक संस्कृतीमधील फॅशनच्या कपड्यांना, खिसे नसतात) सोय पहाणारासुद्धा फोन असावा असं लिहीलं तर एवढा का हो तुमचा पूल मोडतो? ('पापड मोडतो'च्या चालीवर हा वाक्प्रचार वाचणे.)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Tue, 10/05/2010 - 10:55

In reply to हेअर पिनमधे मोबाईल लावणारे, by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

नाय वो आमी ते कॉमनवेल्थवाले

नाय वो आमी ते कॉमनवेल्थवाले नाय, आम्ही त्यानंतर तोच पूल ५ दिवसांत ऊभा करून देणारे (लष्कराचे असले तरी ) "भारतीय" ईंजिनीअर ! बाकी मी तुमच्याच बोलण्याला दुजोरा दिला तर तुमचा का हो पापड मोडतो ? (पूल मोडतोच्या चालीवर हा वाक्प्रचार वाचणे )
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com