प्रेरणा - काही धागे व एक कौल यांना फुटकळ जाहीर करून त्यांच्यावर हल्ला-बोल करणारी विडंबनं व तथाकथित फुटकळ कौल आल्यावर फुटकळतेविरुद्ध युद्ध चांगलंच पेटलेलं आहे हे दिसलं. असं युद्ध करणाऱ्यांना स्फुरण चढावं यासाठी हे विरश्रीपूर्ण गीत लिहावंसं वाटलं.
फुटकळ गळक्या कौलांसंगे युद्ध आमुचे सुरू
अम्हिही कौलारू, अम्हिही कौलारू
युद्ध आवश्यक शांतीसाठी
बलात्कार कौमार्यासाठी
अम्हि बिन्धास करू, अम्हिही कौलारू
अमुच्या गळक्या कौलांखालुन
देवाघरि जी गेलो घेउन,
तीच चाळणी भरू, अम्हिही कौलारू
एक हतोडा अम्हास ठावे
जरी खिळा ना अम्हास गावे
ठोकाठोक करू, अम्हिही कौलारू
साप म्हणोनी भुई धोपटू
काठी तुटली मूठ आपटू
हातही फ्रॅक्चरू, अम्हिही कौलारू
मारूती-शेपूट पेटवा
जळो लंका, दाढि-केश वा
अम्हि मागे न सरू, अम्हिही कौलारू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2839
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालू द्या
इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे.
यशोशी शंभर टक्के सहमत. कुठे
In reply to इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे. by यशोधरा
प्रश्न
In reply to यशोशी शंभर टक्के सहमत. कुठे by विजुभाऊ
मारूती-शेपूट पेटवा जळो लंका,
वा.. वा..! युध्द चालू ठेवा
Keep it on.
चालू द्या
इन्टलेक्च्युअल भांडणे
In reply to चालू द्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
खि खि खि
बास्स की आता लै कट्टाळा !