नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन.
मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच. जसे काही लोकांना आय.आय.एमचे MBA (Finance) हे लोकांना लुबाडायला बसलेले चोर वाटत असले तरीही अशा लोकांना माझ्याविषयी वैयक्तिक पातळीवर हेवादावा असेल असे वाटायचे कारण नाही.तसेच थोडेसे.
अनेक लोक कृतज्ञता व्यक्त करतात आणि मुख्य म्हणजे त्यात कर्मकांडादी फापटपसाऱ्यापासून दूर राहतात हे चांगलेच आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यावर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही.आणि त्यासाठी दर वर्षी एखादा दिवस नेमून ठेवणे याविषयीही कोणाची तक्रार असायचे कारण नाही. पण बहुसंख्य लोक कर्मकांडे करतात याचे मात्र वाईट वाटते.
गोष्टींमध्ये ’एक गरीब ब्राम्हण होता’ असा उल्लेख नक्की असतो.मला वाटते अशाच गरीब ब्राम्हणांनी स्वत:च्या दक्षिणेची सोय व्हावी म्हणून अशा अनेक रूढीपरंपरा घुसडून दिल्या आहेत.माझ्या वडिलांचे दशमीच्या दिवशी निधन झाले.त्यानंतर भटजींनी सांगितले की ’पंचक लागले’. म्हणजे काय तर दशमीच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाल्यामुळे इतर पाच लोकांचा मृत्यू होईल. आणि त्यावर उपाय काय? तर पंचकशांती करा म्हणजे भटजींना दक्षिणा द्या! बरं ही पाच माणसे कोण-- नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे की आणखी कोणी असा प्रश्न मी भटजींना विचारला होता.त्यावर त्यांचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. माझा पुढचा प्रश्न होता की ही पाच माणसे मरायची Timeframe किती? जर पुढच्या ५० वर्षांत पाच माणसे मरतील असे त्यांचे म्हणणे असेल तर ते सांगायला भटजी का हवेत? मी सुध्दा Law of averages वापरून ते सांगू शकतो कारण परक्या माणसांपैकी सोडाच आमच्या जवळच्या नात्यातील ५ पेक्षा जास्त मंडळी त्या वेळी ५० पेक्षा जास्त वयाची होती. त्यावर भटजींचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. एका माणसाचा अमुक एका तिथीवर झालेला मृत्यू आणि त्या कारणाने इतर पाच जणांचा मृत्यू होणे या गोष्टी परस्परावलंबी असतात यावर सुशिक्षित लोकांचा विश्वास बसूच कसा शकतो?मी घरातील सर्वात लहान होतो तरीही मी हे मुद्दे माझे वडिल नुकतेच गेलेले असतानाही मांडून पंचकशांती अजिबात करू नये असे म्हटले. पण आपल्या ’महान’ भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे लहानांनी स्वत:ची मते मांडणे नव्हे स्वत:ची स्वतंत्र मते ठेवणे हेच मोठे पाप असते आणि मोठे लोक जे ठरवतील तेच लहानांनी करणे अपेक्षित असते! तेव्हा ’तू लहान आहेस तुला काही कळत नाही’ असे म्हणून माझी बोळवण करण्यात आली आणि मी मृत व्यक्तीचा मुलगा म्हणून मलाच पंचकशांतीला बसून भटजी सांगतील तेव्हा सव्य-अपसव्य करायची सक्ती केली गेली होती.
माझा प्रश्न: सुशिक्षित लोकसुध्दा अशा भूलथापांना बळी कसे पडतात? याचे कारण म्हणजे ’चुकून पाच लोक खरोखरच गेले तर त्याचे बालंट आपल्यावर येईल’ ही भिती. आणि पंचकशांती करूनही असे पाच लोक गेले तर परत हे हात वर करायला मोकळे की बघा आम्ही पंचकशांती केली होती तेव्हा झाले त्यात आमचा काही दोष नाही!
पुढे पंचक या प्रकरणाची माहिती गोळा केली.तेव्हा मला कळले की केवळ दशमीच नाही तर इतर चार तिथ्यांच्या दिवशी (नक्की तिथ्या कोणत्या हे लक्षात नाही) पण एखाद्याचे निधन झाले तरी पंचक लागते. इतकेच काय तर पंचकाप्रमाणेच ’तीन लोक मरतील’ असे त्रिपाद (की तत्सम काहीतरी) आणि ’दोन लोक मरतील’ असे काहीतरी (नक्की शब्द आठवत नाही) असते आणि त्यांचीही ’हक्काची’ पाच नक्षत्रे असतात. म्हणजे २७ पैकी १५ नक्षत्रांवर कोणीही गेले (५५.५५% मृत्यू) तरी त्याची शांत व्हावी आणि म्हणजेच आपली दक्षिणेची सोय व्हावी अशी सोय तत्कालीन ब्राम्हणांनी करून ठेवली आहे.
मी स्वत: अगदी ’एकारान्ती’ कोकणस्थ ब्राम्हण आहे आणि माझ्या पूर्वजांनी भिक्षुकीच केली.पण पंचक प्रकरणानंतर भटजी या संस्थेविषयीच एक तिडीक माझ्या डोक्यात गेली आहे. कारण अगदी सुशिक्षित लोकांनाही ’आपण शांत करून घेतली नाही तर आपल्याला पाप लागेल, आपण नरकात जाऊ किंवा पाच लोक मरतील’ असे वाटत असेल तर या भूलथापा दाखवून अशिक्षित लोकांना लुबाडणे खूपच सोपे आहे. आणि असा भितीचा बागुलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे आणि रामलिंग राजूने सत्यममधील शेअरहोल्डर्सचे पैसे ढापणे यात फार फरक आहे असे वाटत नाही.
अशा काहीतरी बुध्दीला न पटणाऱ्या गोष्टी घुसडून देणे केवळ पंचकापुरते मर्यादित नाही. मधूनमधून सत्यनारायणासारख्या पुजा, मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाल्यास ’ती घराण्याच्या मुळावर येते’ असे म्हणत शांत करून घेणे, आपल्या हातून मांजर मेल्यास भटजींना दक्षिणा देऊन पापाचे परिमार्जन करणे, पहिली तीन वर्षे करणे अपेक्षित असलेली श्राध्दे, पक्ष, दहावे-तेरावे आणि इतर अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो!
जर आपल्या वडिलांविषयी, आजोबा-पणजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यांनी केलेली चांगली कार्ये आणखी पुढे नेणे किंवा सत्पात्री दान देणे यासारख्या गोष्टी केल्या तर त्यातून चांगले घडेल असे वाटते.पुण्यात मी डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी एक अत्यंत किळसवाणा प्रकार बघितला होता.एका टेंपोवर डॉ.आंबेडकरांचा फोटो लावून त्याला हार घातले होते आणि त्याभोवती दोन तास लोक ’झुठ बोले कव्वा काटे’ यासारख्या गाण्यांवर न थांबता नाचत होते.ते बघून आंबेडकरांच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.त्यापेक्षा आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी (शिक्षण घेणे, स्वावलंबी होणे इत्यादी) करणे अधिक योग्य नाही का? तसेच थोडेसे पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल!
आणि ब्राम्हण समाज गरीब होता म्हणून अशी दक्षिणेची सोय करून ठेवणे हे अजिबात समर्थनीय नाही असे मला वाटते.ही छुप्या मार्गाने केलेली चोरीच झाली! ब्राम्हणांना intellectual कामांमध्ये (शाळेत शिक्षकाचे काम करणे, आयुर्वेदाचा अभ्यास करून वैद्यकी करणे यासारखी) गती होतीच कारण लहानपणापासून शिक्षणाचे महत्व त्यांच्यावर बिंबवले जायचे ना?मग अशी समाजोपयोगी कामे सोडून लोकांना भिती दाखवून स्वत:चे खिसे भरणे समर्थनीय कसे?
आमच्या आय.आय.एम मध्ये दररोज संध्याकाळी इस्त्रीचे कपडे न्यायला आणि इस्त्री करून झालेले कपडे परत द्यायला एक बाई येते. एकंदरीत ती फारशी शिकलेली नाही हे तिच्याकडे बघून लगेच लक्षात येते.आमच्या डॉर्ममध्ये आणि आजूबाजूला काही भटके कुत्रे आहेत.त्या कुत्र्यांनी इस्त्रीचे कपडे फाडू नयेत, घाण करू नयेत म्हणून ती खूपच दक्ष असते. एकदा मी इस्त्रीचे कपडे देत असताना तिने मला सांगितले की जर कुत्र्यांनी कपडे फाडले तर झालेले नुकसान मी माझ्या पैशाने (अर्थातच परवडत नसताना) भरून देईन पण कुत्र्यांना कधीच मारणार नाही. याचे कारण--’कुत्र्यांना मारले तर मला पाप लागेल’. तेव्हा दुसऱ्याचे वाईट केले तर आपल्याला पाप लागेल असे वाटणे ही पापाच्या संकल्पनेची एक चांगली बाजू झाली. आणि कुठल्याकुठल्या पुजा आणि शांत केल्या नाहीत तर तुम्हाला पाप लागेल असे कळत नकळत बिंबवले जाणे ही पापाच्या संकल्पनेची वाईट बाजू झाली. ही अशी भिती दाखवूनच स्वत:च्या दक्षिणेची सोय करणाऱ्यांना आपल्याला पाप लागेल ही भिती वाटत नाही का?
क्लिंटन
वाचने
46876
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
कशाला उगाच तरास घेतला मालक..
In reply to हा अकरावा by मन१
हा तेरावा
हसु आले
नरोटीची उपासना क्लिंटनसाहेब.
धन्यवाद
In reply to नरोटीची उपासना क्लिंटनसाहेब. by रमताराम
>>>>>>>>>म्हणजेच भगवद्गीतेतील
हम तय किया हूं कि हम इस
मैने भी तय कियेला है, मै
In reply to हम तय किया हूं कि हम इस by नितिन थत्ते
एकदाची शांती करुन टाकू.
शिवाजी महाराजांची देखील यातून
In reply to एकदाची शांती करुन टाकू. by प्रकाश घाटपांडे
असे कसे?
In reply to एकदाची शांती करुन टाकू. by प्रकाश घाटपांडे
dogma
In reply to एकदाची शांती करुन टाकू. by प्रकाश घाटपांडे
भिक्षुकी हा कमी दर्जाचा व्यवसाय..
असे नव्हते. वेदकालापासूनच
In reply to भिक्षुकी हा कमी दर्जाचा व्यवसाय.. by महानगरी
चूक... वेदकालापासून
In reply to असे नव्हते. वेदकालापासूनच by नितिन थत्ते
कोणती मनुस्मृती?
In reply to चूक... वेदकालापासून by llपुण्याचे पेशवेll
मनुस्मृती
In reply to कोणती मनुस्मृती? by प्रसन्न केसकर
मनुस्मृती ही वैवस्वत नामक मनू
In reply to कोणती मनुस्मृती? by प्रसन्न केसकर
असो
In reply to मनुस्मृती ही वैवस्वत नामक मनू by विजुभाऊ
मनुस्मृती तेवढ्यापुरतेच
In reply to चूक... वेदकालापासून by llपुण्याचे पेशवेll
प्रत्येकाला
व्हेलेंदाइन डे..मैत्री
पिझा हट कंचुकी
In reply to व्हेलेंदाइन डे..मैत्री by अविनाशकुलकर्णी
कंचुकी...
In reply to पिझा हट कंचुकी by शेखर
”कंचुकी फ्राईड टीकन” म्हणायचे
In reply to कंचुकी... by उपेन्द्र
सहमत आहे - मोठी यादी
In reply to व्हेलेंदाइन डे..मैत्री by अविनाशकुलकर्णी
हितसंबंध
In reply to सहमत आहे - मोठी यादी by मूकवाचक
तुमचं म्हणणं मान्य. हे सगळे
In reply to हितसंबंध by क्लिंटन
फरक
In reply to तुमचं म्हणणं मान्य. हे सगळे by राघव
माझ्या मते अशी शांत
भिती
In reply to माझ्या मते अशी शांत by ऋषिकेश
क्लिंटन साहेब .. तुम्ही खरेच
पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म
जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज
In reply to पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म by शुचि
अरेच्चा !
In reply to जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज by रेवती
>> >> कर्मकांडाचं म्हणाल तर
In reply to पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म by शुचि
कित्येकांचा त्रागा
In reply to >> >> कर्मकांडाचं म्हणाल तर by शेखर
देणेघेणे
In reply to पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म by शुचि
स्पष्ट करुन सांगा जरा.
In reply to पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म by शुचि
>>पूजा, धर्म, दान काही न करून
In reply to पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म by शुचि
काही ठराविक कर्मकांडे करायला
आंघोळ्या हा शब्द मनाला
In reply to काही ठराविक कर्मकांडे करायला by पक्या
बहुवचनी
In reply to आंघोळ्या हा शब्द मनाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख आवडला...
क्लिंटन साहेब
धन्यवाद
In reply to क्लिंटन साहेब by वेताळ
लेख आवडला .
लेख आवडला.
आवडला
देवाला भेटायला कुणा मध्यस्थाची गरजच का पडावी?
भजन
In reply to देवाला भेटायला कुणा मध्यस्थाची गरजच का पडावी? by आम्हाघरीधन
माझ्या ब्लॉगवरून......
अनुभवकथन आवडले
क्लिंटन साहेब
क्लिंटन सायबांचे वाचन कमी दिसतंय...
अहो योगप्रभू साहेब, पण
In reply to क्लिंटन सायबांचे वाचन कमी दिसतंय... by योगप्रभू
क्लिंटन साहेब तुमचं जरुर कौतुक आहे...
In reply to अहो योगप्रभू साहेब, पण by क्लिंटन
धन्यवाद
In reply to क्लिंटन साहेब तुमचं जरुर कौतुक आहे... by योगप्रभू
आभार .. आणि अभिनंदन
+१ असेच म्हणतो.
In reply to आभार .. आणि अभिनंदन by गणेशा
क्लिन्टन साहेब
In reply to +१ असेच म्हणतो. by मितभाषी
असल्यास बूड असलेले मजबूत
In reply to क्लिन्टन साहेब by मूकवाचक
नसते फाटे फोडू नका
In reply to क्लिन्टन साहेब by मूकवाचक
मी नसते फाटे फोडले?
In reply to नसते फाटे फोडू नका by क्लिंटन
दिलगिरी
In reply to मी नसते फाटे फोडले? by मूकवाचक
@मूकवाचक, धर्म म्हणजे आपण
In reply to क्लिन्टन साहेब by मूकवाचक
ह्म्म
In reply to @मूकवाचक, धर्म म्हणजे आपण by मितभाषी
क्लिंटन साहेब, आपण जे बोलत
कडू औषध
In reply to क्लिंटन साहेब, आपण जे बोलत by नरेश धाल
९९ % सत्य
In reply to कडू औषध by क्लिंटन