Skip to main content

कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 28/09/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन. मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच. जसे काही लोकांना आय.आय.एमचे MBA (Finance) हे लोकांना लुबाडायला बसलेले चोर वाटत असले तरीही अशा लोकांना माझ्याविषयी वैयक्तिक पातळीवर हेवादावा असेल असे वाटायचे कारण नाही.तसेच थोडेसे. अनेक लोक कृतज्ञता व्यक्त करतात आणि मुख्य म्हणजे त्यात कर्मकांडादी फापटपसाऱ्यापासून दूर राहतात हे चांगलेच आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यावर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही.आणि त्यासाठी दर वर्षी एखादा दिवस नेमून ठेवणे याविषयीही कोणाची तक्रार असायचे कारण नाही. पण बहुसंख्य लोक कर्मकांडे करतात याचे मात्र वाईट वाटते. गोष्टींमध्ये ’एक गरीब ब्राम्हण होता’ असा उल्लेख नक्की असतो.मला वाटते अशाच गरीब ब्राम्हणांनी स्वत:च्या दक्षिणेची सोय व्हावी म्हणून अशा अनेक रूढीपरंपरा घुसडून दिल्या आहेत.माझ्या वडिलांचे दशमीच्या दिवशी निधन झाले.त्यानंतर भटजींनी सांगितले की ’पंचक लागले’. म्हणजे काय तर दशमीच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाल्यामुळे इतर पाच लोकांचा मृत्यू होईल. आणि त्यावर उपाय काय? तर पंचकशांती करा म्हणजे भटजींना दक्षिणा द्या! बरं ही पाच माणसे कोण-- नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे की आणखी कोणी असा प्रश्न मी भटजींना विचारला होता.त्यावर त्यांचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. माझा पुढचा प्रश्न होता की ही पाच माणसे मरायची Timeframe किती? जर पुढच्या ५० वर्षांत पाच माणसे मरतील असे त्यांचे म्हणणे असेल तर ते सांगायला भटजी का हवेत? मी सुध्दा Law of averages वापरून ते सांगू शकतो कारण परक्या माणसांपैकी सोडाच आमच्या जवळच्या नात्यातील ५ पेक्षा जास्त मंडळी त्या वेळी ५० पेक्षा जास्त वयाची होती. त्यावर भटजींचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. एका माणसाचा अमुक एका तिथीवर झालेला मृत्यू आणि त्या कारणाने इतर पाच जणांचा मृत्यू होणे या गोष्टी परस्परावलंबी असतात यावर सुशिक्षित लोकांचा विश्वास बसूच कसा शकतो?मी घरातील सर्वात लहान होतो तरीही मी हे मुद्दे माझे वडिल नुकतेच गेलेले असतानाही मांडून पंचकशांती अजिबात करू नये असे म्हटले. पण आपल्या ’महान’ भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे लहानांनी स्वत:ची मते मांडणे नव्हे स्वत:ची स्वतंत्र मते ठेवणे हेच मोठे पाप असते आणि मोठे लोक जे ठरवतील तेच लहानांनी करणे अपेक्षित असते! तेव्हा ’तू लहान आहेस तुला काही कळत नाही’ असे म्हणून माझी बोळवण करण्यात आली आणि मी मृत व्यक्तीचा मुलगा म्हणून मलाच पंचकशांतीला बसून भटजी सांगतील तेव्हा सव्य-अपसव्य करायची सक्ती केली गेली होती. माझा प्रश्न: सुशिक्षित लोकसुध्दा अशा भूलथापांना बळी कसे पडतात? याचे कारण म्हणजे ’चुकून पाच लोक खरोखरच गेले तर त्याचे बालंट आपल्यावर येईल’ ही भिती. आणि पंचकशांती करूनही असे पाच लोक गेले तर परत हे हात वर करायला मोकळे की बघा आम्ही पंचकशांती केली होती तेव्हा झाले त्यात आमचा काही दोष नाही! पुढे पंचक या प्रकरणाची माहिती गोळा केली.तेव्हा मला कळले की केवळ दशमीच नाही तर इतर चार तिथ्यांच्या दिवशी (नक्की तिथ्या कोणत्या हे लक्षात नाही) पण एखाद्याचे निधन झाले तरी पंचक लागते. इतकेच काय तर पंचकाप्रमाणेच ’तीन लोक मरतील’ असे त्रिपाद (की तत्सम काहीतरी) आणि ’दोन लोक मरतील’ असे काहीतरी (नक्की शब्द आठवत नाही) असते आणि त्यांचीही ’हक्काची’ पाच नक्षत्रे असतात. म्हणजे २७ पैकी १५ नक्षत्रांवर कोणीही गेले (५५.५५% मृत्यू) तरी त्याची शांत व्हावी आणि म्हणजेच आपली दक्षिणेची सोय व्हावी अशी सोय तत्कालीन ब्राम्हणांनी करून ठेवली आहे. मी स्वत: अगदी ’एकारान्ती’ कोकणस्थ ब्राम्हण आहे आणि माझ्या पूर्वजांनी भिक्षुकीच केली.पण पंचक प्रकरणानंतर भटजी या संस्थेविषयीच एक तिडीक माझ्या डोक्यात गेली आहे. कारण अगदी सुशिक्षित लोकांनाही ’आपण शांत करून घेतली नाही तर आपल्याला पाप लागेल, आपण नरकात जाऊ किंवा पाच लोक मरतील’ असे वाटत असेल तर या भूलथापा दाखवून अशिक्षित लोकांना लुबाडणे खूपच सोपे आहे. आणि असा भितीचा बागुलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे आणि रामलिंग राजूने सत्यममधील शेअरहोल्डर्सचे पैसे ढापणे यात फार फरक आहे असे वाटत नाही. अशा काहीतरी बुध्दीला न पटणाऱ्या गोष्टी घुसडून देणे केवळ पंचकापुरते मर्यादित नाही. मधूनमधून सत्यनारायणासारख्या पुजा, मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाल्यास ’ती घराण्याच्या मुळावर येते’ असे म्हणत शांत करून घेणे, आपल्या हातून मांजर मेल्यास भटजींना दक्षिणा देऊन पापाचे परिमार्जन करणे, पहिली तीन वर्षे करणे अपेक्षित असलेली श्राध्दे, पक्ष, दहावे-तेरावे आणि इतर अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो! जर आपल्या वडिलांविषयी, आजोबा-पणजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यांनी केलेली चांगली कार्ये आणखी पुढे नेणे किंवा सत्पात्री दान देणे यासारख्या गोष्टी केल्या तर त्यातून चांगले घडेल असे वाटते.पुण्यात मी डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी एक अत्यंत किळसवाणा प्रकार बघितला होता.एका टेंपोवर डॉ.आंबेडकरांचा फोटो लावून त्याला हार घातले होते आणि त्याभोवती दोन तास लोक ’झुठ बोले कव्वा काटे’ यासारख्या गाण्यांवर न थांबता नाचत होते.ते बघून आंबेडकरांच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.त्यापेक्षा आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी (शिक्षण घेणे, स्वावलंबी होणे इत्यादी) करणे अधिक योग्य नाही का? तसेच थोडेसे पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल! आणि ब्राम्हण समाज गरीब होता म्हणून अशी दक्षिणेची सोय करून ठेवणे हे अजिबात समर्थनीय नाही असे मला वाटते.ही छुप्या मार्गाने केलेली चोरीच झाली! ब्राम्हणांना intellectual कामांमध्ये (शाळेत शिक्षकाचे काम करणे, आयुर्वेदाचा अभ्यास करून वैद्यकी करणे यासारखी) गती होतीच कारण लहानपणापासून शिक्षणाचे महत्व त्यांच्यावर बिंबवले जायचे ना?मग अशी समाजोपयोगी कामे सोडून लोकांना भिती दाखवून स्वत:चे खिसे भरणे समर्थनीय कसे? आमच्या आय.आय.एम मध्ये दररोज संध्याकाळी इस्त्रीचे कपडे न्यायला आणि इस्त्री करून झालेले कपडे परत द्यायला एक बाई येते. एकंदरीत ती फारशी शिकलेली नाही हे तिच्याकडे बघून लगेच लक्षात येते.आमच्या डॉर्ममध्ये आणि आजूबाजूला काही भटके कुत्रे आहेत.त्या कुत्र्यांनी इस्त्रीचे कपडे फाडू नयेत, घाण करू नयेत म्हणून ती खूपच दक्ष असते. एकदा मी इस्त्रीचे कपडे देत असताना तिने मला सांगितले की जर कुत्र्यांनी कपडे फाडले तर झालेले नुकसान मी माझ्या पैशाने (अर्थातच परवडत नसताना) भरून देईन पण कुत्र्यांना कधीच मारणार नाही. याचे कारण--’कुत्र्यांना मारले तर मला पाप लागेल’. तेव्हा दुसऱ्याचे वाईट केले तर आपल्याला पाप लागेल असे वाटणे ही पापाच्या संकल्पनेची एक चांगली बाजू झाली. आणि कुठल्याकुठल्या पुजा आणि शांत केल्या नाहीत तर तुम्हाला पाप लागेल असे कळत नकळत बिंबवले जाणे ही पापाच्या संकल्पनेची वाईट बाजू झाली. ही अशी भिती दाखवूनच स्वत:च्या दक्षिणेची सोय करणाऱ्यांना आपल्याला पाप लागेल ही भिती वाटत नाही का? क्लिंटन

वाचने 46876
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

प्रतिसाद गायछाप + चुनापुडी आणि पार...चालुद्या...

फारच लांब लचक आहे . आम्ही धन्द्याची गुपिते अशी चावडीवर फोड़त नाही. हे काम फ़क्त मराठी माणसाला उत्तम जमते शिनच्या (एक कोकणी शब्द )

In reply to by रमताराम

अरे वा. माझ्यासारखाच विचार करणारे लोक भेटले की आनंदच होतो.आपला लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको. मला एक गोष्ट समजत नाही की अशा सगळ्या ’खोबऱ्याच्या गोष्टी’ वरकरणी न समजणाऱ्या प्रकारात का असतात?म्हणजे दुष्काळाच्या वेळी गरजूंना मदत करावी ही भावना चांगलीच आहे.पण म्हणून श्रावण महिन्यात सवाष्ण बोलवा हा ’शास्त्रातील’ (किंवा परंपरेतील) रिवाज का?श्रावण महिन्यात दुष्काळ असतो ही माहिती नवीनच समजली. श्रावण महिन्यातील तथाकथित उनपावसाच्या खेळावर अनेक कविता शाळेत असताना अभ्यासल्या आहेत असे आठवते. समजा श्रावण महिन्यात दुष्काळ असला असे गृहित धरले तरी केवळ सवाष्णांना का बोलवा? विधवांनी काय पाप केले आहे? का सगळ्या विधवा बिचाऱ्या सती गेल्यामुळे समाजात केवळ दोनच प्रकारच्या स्त्रिया होत्या?--- लग्न न झालेल्या लहान मुली (कुमारिका) आणि सवाष्ण? तेव्हा गरजूंना मदत केली जावी या चांगल्या भावनेचे वाटोळे व्हायला सुरवात होते त्या भावनेच्या नावावर काहीतरी रूढीपरंपरा सुरू केल्यामुळे! आणि अशाच गोष्टींमधून आजूबाजूला ’ही सगळी प्रतिके आहेत आणि त्यामागचे गूढ अर्थ वेगळेच आहेत’ असे म्हणणारी मंडळी अनेकदा भेटतात. आणि आजच्या काळात या सगळ्या गोष्टींना हिणकस स्वरूप प्राप्त झाले आहे त्यावर काही बोलले की परत ही मंडळी ’तुम्हाला प्रतिके आणि गूढ अर्थ समजलेलेच नाहीत त्यामुळे दोष धर्मशास्त्रांचा नाही तर तुमचा आहे’ असे म्हणायला मोकळी! मला वाटते की दोष जर कोणाचा असेल तर साधेसरळ संदेश प्रतिकांमध्ये आणि त्यामागच्या गूढ अर्थांमध्ये club करणाऱ्यांचा आहे.कारण ’गरजूंना मदत करा’ असे साध्या भाषेत सांगितले असते (कोणतेही प्रतिक/गूढ अर्थ न ठेवता) तर अशा गोष्टींना आजचे हिणकस स्वरूप यायची शक्यता नक्कीच कमी होती. असो. या अशा प्रवृत्तीविरूध्द मी युध्दच पुकारले आहे आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मिपा किंवा अन्य माध्यमांमधून याविषयावर मी लिहिणार हे नक्की. क्लिंटन

>>>>>>>>>म्हणजेच भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ आचरायचा प्रयत्न न करता केवळ कृष्णाने गीता सांगितली म्हणून त्याचा उदोउदो करणे योग्य नाही असे मला वाटते. हॅहॅहॅहॅहॅ. हे म्हणजे स्वतःला हातात बॅट सुद्धा धरता येत नाही म्हणुन सचिन तेंडुलकरचे कौतुक करायचे नाही त्यातला प्रकार झाला. आपण आचरणात आणु शकत नसु तर तो आपला कर्मदरिद्रीपणा आहे ना. पण शिकवण असामान्य आहे हे मान्य न करण्याचा करंटेपणा का करायचा?>>>>>>>>>>>>> अगदी १००% अनुमोदन.......

एकदाची शांती करुन टाकू. एकदाची पूजा घालून टाकू या प्रकारातील लोकांना डोक्यातील शंकेचा वळवळणारा किडा घालवायचा असतो. भरल्या गाडीला सुपाच काय ओझ? म्हणुन ही कर्मकांड करुन टाकत असतात. भय, उत्सुकता, चिंता, आशा अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ असतो. परमेश्वर नाही . पण आपला नमस्कार केलेला बरा समजा असलाच तर ताप नको. असाही विचार करणारे असतात. "राजेराजवाड्यांच्या काळात दरबारात राजज्योतिषी असे. तो वर्षारंभी पंचांगाची पूजा करुन राजास संवत्सरफल कथन करुन सांगे. राज्यावर काही संकट, पूर, अतिवृष्टी. दुष्काळ, आदि नैसर्गिक संकटांची काय चाहूल लागते आहे? याचा सुगावा पंचांगाद्वारे घेउन ते राजास सांगत असे. राजा त्याला योग्य बिदागी देत असे. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.ज्योतिषाचा सत्कार करुन त्याजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल असे संवत्सरफलातच म्हटले आहे. आता हे संवत्सरफल कोण लिहित असे हे सूज्ञास सांगणे नलगे! आज सुद्धा खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्यामोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे इत्यादि मोबदला देतात. एक प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना.त्यावर त्याची गुजराण चालते.त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले कि कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणी धर्मसंकट आले कि त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे.संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतॊ आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले आणि स्थानिक धर्मपंडितांची तोंडेच बंद केली." ( पंचाग एक अवलोकन वरुन उधृत )

In reply to by प्रकाश घाटपांडे

शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले आणि स्थानिक धर्मपंडितांची तोंडेच बंद केली." पण त्या चलाख स्थानीक धर्मपंडित निश्चलपुरी गोसावी या नी शिवाजी महाराजाना घाबरवलेच राज्याभिषेक दुसर्‍यांदा करायला लावलाच की.

In reply to by प्रकाश घाटपांडे

फलादेश बरोबर न येता देखील दर वर्षी ज्योतिष्याचा सत्कार करून वर त्याला बिदागी देण्याइतके सगळे राजे आणि त्यान्ची प्रजा पिढ्यानपिढ्या बुद्दू होते काय? (आम्ही विन्डोज साइडबार वर हवामान वाले ग्याजेट फुकट आहे म्हणून टाकले आहे, आणि गमतीने कधीमधी बघतो. असो.)

In reply to by प्रकाश घाटपांडे

एकदाची शांती करुन टाकू. एकदाची पूजा घालून टाकू या प्रकारातील लोकांना डोक्यातील शंकेचा वळवळणारा किडा घालवायचा असतो.
नेमक्या याच प्रकारावर मी एवढे सगळे रामायण लिहिले आहे. मुळात डोक्यात शंकेचा किडा सोडणारे कोण?पंचक लागले, मुलगी मूळ नक्षत्रावर जन्माला आली म्हणून ती घराण्याच्या मुळावर होईल असे सांगणारे हेच भिक्षुक ना? मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे असे ५/३/२ लोक मरतील अशी २७ पैकी १५ नक्षत्रे आहेत.म्हणजे on an average ५५.५५% मृत्यू झाल्यानंतर ५/३/२ लोक मरतील! जगात हिंदू सुमारे १५%. उरलेले ८५% लोक (सुमारे ५०० कोटी) अहिंदू. सर्व हिंदू लोक त्या १५ नक्षत्रांवर शांत करून घेतात असे समजू. ५०० कोटीं अहिंदूंपैकी समजा अजून २०० कोटी लोकही त्या १५ नक्षत्रांवर शांत करून घेतात असे समजू. उरले ३०० कोटी लोक जे कधीच त्या १५ नक्षत्रांवर शांत करून घेत नाहीत. माणसाचे सरासरी आयुष्य ६० वर्षे धरले (आफ्रिकेतील काही मागास भागांमध्ये ३० तर जपानमध्ये ८५ असे मोठे variation आहे.तेव्हा सोयीसाठी सरासरी म्हणून ६० वर्षे धरू. याचा अर्थ दरवर्षी अशा शांत न करणाऱ्यांपैकी on an average ५ कोटी लोक मरतात (३०० कोटी भागिले ६० कोटी). म्हणजे दर महिन्याला ४१.६७ लाख (समजा ४० लाख) लोक मरतात. त्यापैकी ५५.५५% म्हणजे २२.२२ लाख (समजा २० लाख) लोक या १५ नक्षत्रांवर मरतात. २,३ आणि ५ चा average ३.३३ . म्हणजेच ५/३/२ हा प्रकार खरा असेल तर दर महिन्याला मरणाऱ्या २० लाखांमागे २० लाख गुणिले ३.३३ बरोबर सुमारे ६६ लाख लोक मरायला हवेत. या ६६ लाखांमध्ये शांत करण्यावर विश्वास असलेलेही लोक असतीलच! म्हणजे जगाची लोकसंख्या पहिल्यांदा झपाट्याने कमी व्हायला हवी आणि एखाद्या खूपच कमी आकड्यावर स्थिर व्हायला हवी. तसे होताना दिसत आहे का? नक्कीच नाही. असेच statistics मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलीविषयी पण करता येईल. तेव्हा ५/३/२ हा प्रकार म्हणजे शुध्द भंपकपणा, लोकांना फसवून खिसे भरायला मारलेली थाप आहे असे म्हटले तर काय चुकले? तेव्हा असे वळवळणारे किडे लोकांच्या डोक्यात सोडणारे हेच आणि ते किडे जावेत म्हणून लोकांना शांत केलेली बरी असे वाटायला लावणारे पण हेच. आणि असे मत मांडले तर तो संस्कृतीविरोधी/ हिंदूविरोधी ठरतो.नाहीतर ’आपले सगळे वाईट कसे दिसते’ अशा प्रश्नांचा भडिमार केला जातो.यामागे आपले जुने ते सगळे चांगले, perfect, सर्वोत्तम हा dogma आहे.दुसरे काही नाही. (संस्कृतीविरोधी) क्लिंटन

असे ऐकले व वाचले आहे कि... ब्राह्मण वर्णांतर्गत भिक्षुकी हा कमी दर्जाचा व्यवसाय मानला जात असे. ब्राह्मण वर्णाचे मुख्य काम हे अध्यापन व अध्ययन, सल्ला-मसलत, समाजाचे दिशादर्शन हे होते. समाजामधील ज्या व्यक्ती हे काम करु शकत त्याच ब्राह्मण असत. पैशाच्या मोबदल्यात पुण्य मिळवून देण्याचे काम करणे हे ब्राह्मणाचे उद्दिष्ट्य असणे स्मृती काला पर्यन्त अपेक्षित नव्हते. पुढे वर्ण हा जन्माशी निगडित झाला. तेव्हापासून ब्राह्मण जातीत जन्माला येणारे सगळे ह्या उच्च अपेक्षेस उतरतील हे शक्य नाही. त्यामुळे अर्थातच या नंतर वर्ण पद्धतीच्या मूळ हेतूचा र्‍हास झालेला दिसतो व ब्रह्मधर्माचे अधःपतन झालेले दिसते.

In reply to by महानगरी

असे नव्हते. वेदकालापासूनच यज्ञात पौरोहित्य करणे आणि त्याबदल्यात दक्षिणा घेणे कॉमन होते. केवळ अध्ययन व अध्यापन हे कधीच अपेक्षित नव्हते.

In reply to by नितिन थत्ते

चूक... वेदकालापासून ब्राम्हणाने अध्ययन अध्यापनच अपेक्षित होते. पौरोहित्य करून दक्षिणा घेणे हे केवळ चरितार्थ चालवण्यासाठी संचय करण्यासाठी नव्हे. आणि ते तेवढ्यापुरतेच करावे असे मनुस्मृतीही स्पष्ट सांगते. (आयला मनुस्मृतीचं नाव ऐकून अजून फेफ्रं नाही आलं?)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

म्हणजे कोणत्या मनुची स्मृती? मनुस्मृतीच्या नावावर एव्हढे काही खपवले जाते (सगळ्याच बाजुंनी) की मनु ही व्यक्ती आहे की संकल्पना, एकुण मनु किती, एकुण स्मृती किती, धर्मात स्मृती/पुराणांचे अन शास्त्रांचे नक्की स्थान काय अश्या मुलभुत प्रश्नांचा सगळ्यांनाच विसर पडतो.

In reply to by प्रसन्न केसकर

>>म्हणजे कोणत्या मनुची स्मृती? मनुस्मृतीच्या नावावर एव्हढे काही खपवले ........ मनुस्मृती म्हणजे मनूच्या नावावर समाजात प्रचलित असलेल्या तत्कालीन नियमांचे इसवीसनाच्या मागे पुढे २०० वर्षांत केव्हातरी भृगुंच्या कुलाने केलेले संकलन. तेच आज मनुस्मृती म्हणून उपलब्ध आहे. मनुस्मृतीतल्या वचनांविषयी विचार करताना मनू कोण, किती मनू होते, मनुस्मृती लिहिणारा मनू कितवा, तो राजा होता का, तो ब्राह्मण होता की क्षत्रिय या सर्व गोष्टी इर्रिलेव्हंट आहेत.

In reply to by विजुभाऊ

>>मनुस्मृती ही वैवस्वत नामक मनू ने लिहिली असेल. पण मनुस्मृतीत अमुक म्हटले आहे का तमुक म्हटले आहे या चर्चेत irrelevent आहे.

या भारत नामक देशात प्रत्येकाला आपापला धंदा करण्याचा हक्क आहे. जसे, भटजींचा धंदा गणपती व इतर देवतांच्या मूर्ति बनवण्याचा धंदा लग्नाच्या अनुषंगाने, मांडववाल्यांचा, फुलवाल्यांचा, ब्युटिशियन्सचा, केटरर्सचा, सोनारांचा, बँडवाल्यांचा, इत्यादि. मग तो धंदा १ नंबरचा असो वा २ नंबरचा. त्याचा समाजाला काही उपयोग असो वा नसो. सगळ्यांचे पोट हे एकमेकांचा खिसा हलका करण्याच्या अर्थकारणावर अवलंबून आहे. तेंव्हा हे सगळे असेच चालणार, कारण स्वतंत्र विचार करणारे लोक या देशात अत्यल्पसंख्य आहेत.

व्हेलेंदाइन डे..मैत्री दिवस..मदर डे..फादर डे.. यांचे व ग्रीट वेल..आरचिज..पिझा हट कंचुकी व इतर यांचे हितसंबंध तपासायला हवे..... मंदीर समीत्या स्थापुन लुट करणारे हे चालतात......अन ब्राह्मणाला एखादा नारळ जादा मिळाला कि झाला गदारोळ......

In reply to by अविनाशकुलकर्णी

वकील, न्यायाधीश, वैद्यकीय व्यावसायिक, कोचिन्ग क्लासवाले, शिक्षण सम्राट ते भ्रष्टाचार विरोधी समित्या, सी.बी.आय., इ.इ. सगळ्यान्चे हितसम्बन्ध तपासायला हवेत.

In reply to by मूकवाचक

माणसाला अन्न,वस्त्र आणि निवारा याच मूलभूत गरजा आहेत. त्यातही अन्न वगळता इतर दोन गरजा गुहेत राहणाऱ्या आदिमानवाला नव्हत्या.तरीही तो राहात होताच ना? टूथपेस्टचा शोध लागण्यापूर्वी लोक दात घासायचे नाहीत का? तर तसे नक्कीच नाही. पूर्वी लिंबाच्या काड्या वापरायचे आज पेस्ट वापरतात.तेव्हा सगळे बिझनेस हे कृत्रिम गरज निर्माण करूनच पैसा कमावतात. मग भिक्षुकीवरच आक्षेप का?याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे शास्त्रातील, धर्मातील (खऱ्या किंवा घुसडलेल्या) गोष्टींची भिती दाखवून हा व्यवसाय केला जातो. उदाहरणार्थ पंचकशांती केली नाही तर पाच माणसे मरतील! कच्च्या दिलाच्या लोकांची यामुळे घाबरगुंडी उडाली नाही तरच नवल! एका माणसाचा मृत्यू झाला म्हणून इतर पाच जणांचे मृत्यू होतील ही गोष्ट कशी काय पटते हेच समजत नाही. तसेच मूळ नक्षत्रावर मुलगी जन्माला आली तर ती घराण्याच्या मुळावर येईल म्हणून शांत करून घ्या असे म्हणणेच अयोग्य आहे असे मला वाटते.म्हणजे काय की ’उद्या मुलगी खरोखरच घराण्याच्या मुळावर आली तर काय’ या भितीतून अनेक लोक ती शांत करायला तयार होतात. मला तरी हा शुध्द ब्लॅकमेलचा प्रकार वाटतो. ’कंचुकी’ फ्राईड चिकन काय किंवा मॅकडॉनल्ड काय किंवा इतर कोणतेही बिझनेस ’तुम्ही आमच्याकडे आला नाहीत तर तुम्ही/तुमचे आप्तस्वकिय मरतील ’ अशी जाहिरात करत नाहीत. आम्ही तुमच्या चवीला आवडेल अशा गोष्टी विकतो म्हणजेच तुम्हाला यायचे तर या तुमचे स्वागत आहे असेच त्या जाहिरातींचे स्वरूप असते ना? पण म्हणजे नाही आलात तर तुमचे वाईट होईल असा अर्थ होत नाही. मागे सफोला तेलाच्या जाहिरातीतून सफोला घेतले नाही तर कोलेस्टेरॉल वाढेल असे म्हटले होते ते सरकारने ’सफोला तेल कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करते’ असे बदलायला लावले होते असे वाचल्याचे आठवते. तेव्हा माझा मुख्य आक्षेप भिती दाखविण्यावर आहे. आणि अशी भिती दाखवून कोणत्याही स्वरूपाची जाहिरात केली जात असेल तर त्यावरही माझा तितकाच आक्षेप आहे. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

तुमचं म्हणणं मान्य. हे सगळे पैसे उपटायचे मार्ग आहेत असे काही बाबतीत तरी नक्कीच म्हणू शकतो. अर्थात असं आजकाल बर्‍याच ठिकाणी बघायला मिळतं - विमाकंपन्यांची नफेखोरी, वैद्यकीय गुंताळा, वकिली जाळे.. ही सगळी त्यातलीच. भिती दाखवून बरेच जण गल्ला जमवतात. पण म्हणून सगळ्यांना सरसकट धारेवर धरण्यात अर्थ नाही. माझी आई स्वतः भिक्षुकी करते. तो तिचा छंद आहे, आवड म्हणून करते. त्यात तिला कमीपणा वाटत नाही, न ती कुणाला लुबाडणूक करणारे सल्ले देते. काहीवेळा तर कुणी एखादी पूजा करू का असे विचारायला आला तर गरज नसल्यास स्वच्छपणे तसे सांगते. एखादी पूजा येत नसल्यास तसेही सांगते. लोकांनी स्वत:हून, आधी न विचारता, जी दक्षिणा दिली ते ती कसलेही किल्मिष मनात न बाळगता घेते. जे आधी विचारतात त्यांना सांगते की या पूजेची साधारण एवढी दक्षिणा देतात, तुम्हाला जे वाटेल ते द्या. सांगायचं एवढंच की पैशाचा बाजार सगळीकडेच आहे, पण त्यातही चांगुलपणा असलेली लोकं आहेतच. त्यामुळे सरसकट त्या पेशातील सगळ्यांना धारेवर धरणे योग्य नाही.

In reply to by राघव

डॉ.आंबेडकरांनी म्हटले होते की ’मी ब्राम्हणांचा विरोधक नाही तर ब्राम्हण्याचा विरोधक आहे’ म्हणजेच ’ब्राम्हण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ या प्रवृत्तीला ते विरोध करत होते. त्याचप्रमाणे मी लोकांना खोटी भिती दाखवून लुबाडायच्या प्रवृत्तीचा विरोध करतो. आपल्या मातोश्री कोणालाही लुबाडायचे सल्ले देत नाहीत तसेच ज्यांना केवळ पूजा करून मन:शांती मिळवायची आहे अशांच्या घरी पूजा/शांत करतात. तेव्हा अशा भिक्षुकांना माझा विरोध नक्कीच नाही. आणि खोटी भिती दाखवून लुबाडणाऱ्या भिक्षुकांइतकाच विरोध पावसाळ्यात २-४ दिवसात जाणारी सर्दी झाली (आणि याविषयी स्वत:ची पूर्ण खात्री असेल) तरीही मेंदूच्या एम.आर.आय पासून शंभर टेस्ट करायला लावणाऱ्या डॉक्टरांनाही! याचा अर्थ डॉक्टरकीचे काम हे व्रत मानून रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना नक्कीच विरोध नाही. I hope I have made my point. पैशाचा बाजार सगळीकडे आहे हे मान्य.पण इतर ठिकाणी जाहिरात करताना आपली वस्तू/सेवा कशी चांगली आणि ती वस्तू/सेवा ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण करेल अशीच जाहिरात असते.म्हणजे आमची वस्तू/सेवा घ्या नाहीतर तुमचे वाटोळे होईल/तुम्ही किंवा तुमचे आप्तस्वकिय मरतील/तुमचे पितर नरकात जातील याप्रकारची कोणतीही भिती त्यात नसते.मी काही काळ विमा कंपनीतही काम केले आहे आणि तिथेही ’तुमचा अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या बायकामुलांचे निदान पैशाच्या बाबतीत हाल होऊ नयेत’ असेच म्हणत product push करतात.आमची पॉलिसी घेतली नाहीत तर तुम्ही मराल असे म्हणत नव्हे. हा मूलभूत फरक आहे. क्लिंटन

माझ्या मते अशी शांत करण्यामागे तुम्ही दिलेल्या कारणांबरोबरच तिसरे कारणही असावे, ते म्हणजे "त्या पाच जणांत" आपणही असलो तर !!! नकोच ती रिस्क. शांत करणे सोपे.!! :) बाकी भिक्षुकी हा मी "प्रॉफीटेबल बिजनेस"ह्या सदरात पकडतो. त्यावर सरकारने योग्य तो कर लावावा असेही सुचवतो. त्यामुळे, अर्थात हा प्रॉफीटेबल बिजनेस असल्याने प्रॉफिट वाढवण्यासाठी केल्या गेलेल्या क्लृप्त्या ह्याही 'बिजनेस'मधे दिसल्या तर त्याबद्दल त्रागा होत नाही.

In reply to by ऋषिकेश

माझा आक्षेपाचा मुद्दा कसलातरी बागुलबोवा दाखवून लोकांना ’शांत केली तर बरे’ असे वाटायला लावायचे आणि त्यातून स्वत:चे खिसे भरायचे यालाच आहे. मग ते पाच जण आपल्या जवळचे आप्तस्वकिय असतील ही भिती किंवा आपण स्वत: असू ही भिती! क्लिंटन

क्लिंटन साहेब .. तुम्ही खरेच जबर्या विचार मांडला आहे पहिल्या लेखा मध्ये. अर्थाजनासाठी माणसाने बरेच मार्ग तयार केले आहेत.. त्या बद्दल तुम्ही लिहिलेले आवडले. माणसाने ह्य जगात सगळ्या सोयी .. सगळ्या रुढी -- सगळ्या गोष्टी स्वताच्या/माणसांच्या फायद्या साठीच केल्यात.जात - पात - धर्म सोडुन जर सगळे वाचले तर कळेल .. आंबेडकर , शिवाजी महाराज, गांधीजी , महात्मा फुले .. ह्यांच्या नावाने जे आपण क्रुत्य करतो खरेच त्यांच्या कार्याचे .. कृत्याचे आपण जाणिव पुर्वक विचार तरी कधी करतो का ? हा प्रश्न पडतोच.

पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर "हीलींग" होत असावं, ताणावमुक्ती, चिंतामुक्ती मिळत असावी असं वाटतं. पूजा, धर्म, दान काही न करून मग मानसोपचारतज्ञांकडे रांगा वाढतील असं वाटतं. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे - "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या" कोणी त्या अभांगाचं सार न पहाता - देव कुठे आहे, मग मुक्ती म्हणजे काय वगैरे प्रश्न विचारायला लागला की समोरचा अनुत्तरीतच होतो. लेखातील मुद्दयासंदर्भात - कर्मकांडाचं म्हणाल तर "देण्यात" देखील अतीव आनंद असतो किंबहुना आपण कोणाला काही देऊ शकतो ही भावनाच सुखावणारी असते. दुर्गा सप्तशतीमधील एक श्लोक् आहे - "रोगान्शेषान पहंसि तुष्टा रुष्टा तु कामान सकलानभिष्टान, त्वामाश्रितानाम न विपन्नराणाम त्वामाश्रिता ह्याश्रिता प्रयान्ति||" यातील शेवटच्या ओळीचा अर्थ हा की हे देवी जे तुझ्या आश्रयास आले ते इतरांना आश्रय देण्यास समर्थ होतात. जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून?

In reply to by शुचि

जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून? असते हे नक्की! याचे मोठ्ठे स्पष्टीकरण मात्र मला देता येणार नाही. आणि श्रीमंतच कश्याला? आपल्या मिळकतीचा थोडा हिस्सा भक्तिभावाने अर्पण करणे ही गरिबांचीही एक गरज असू शकते. हां, आता कोणाचा कुठे विश्वास असेल हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. कोणी देवळात वगैरे जाइल तर कोणी संस्थेला दान करतील. या निमित्ताने एक आठवण आली. माझ्या मावशीचे घर बांधून पूर्ण झाले तरी आजूबाजूची घरे बांधण्याचे काम चालू होते. तिथे काम करणार्‍या दोनचार धिप्पाड मजुरांनी माझ्या १६ १७ वर्षाच्या मावसभावाला जबरदस्तीने पुजा सांगायला बोलावले होते. त्याने आपल्याला पुजा सांगता येत नसल्याचे सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. मग त्याला येत असलेले सगळे श्लोक, अध्याय, स्तोत्रे म्हणवून घेउन ११ रू दक्षिणा मोठ्या भक्तीभावाने त्याला दिली होती. नंतर आम्ही भरपूर हसलो होतो, मजुरांना नव्हे तर आपला भाऊ पुजा सांगतानाचे चित्र डोळ्यासमोर येउन.;)

In reply to by रेवती

नंतर आम्ही भरपूर हसलो होतो, मजुरांना नव्हे तर आपला भाऊ पुजा सांगतानाचे चित्र डोळ्यासमोर येउन. हल्ली एक असेच भयाण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते. पण त्यात मजुरांनी साड्या नेसल्या होत्या, आणि भटजी तीन-टक्के, तीन-टक्के असा श्लोक म्हणत होता. शांत करून घ्यायला हवी.

In reply to by शुचि

>> >> कर्मकांडाचं म्हणाल तर "देण्यात" देखील अतीव आनंद असतो किंबहुना आपण कोणाला काही देऊ शकतो ही भावनाच सुखावणारी असते. सहमत आहे. त्यामुळेच काही लोक तुम्हाला प्रतिसाद रुपी त्रास देत असावेत. त्यांना हा त्रास देण्यात सुखावणारी भावना लाभत असेल.

In reply to by शेखर

कित्येकांचा त्रागा समजण्यासारखा आहे. त्यांना राजकारण, प्रवासवर्णन, इतिहास, विनोद असे धागे वर हवे आहेत आणि मी बाष्कळ धागे काढते मला मान्य आहे. आय विल कर्ब इट टोटली हेन्स्फोर्थ. पण पितरांचा धागा काढण्यामागे माझी ही इच्छा होती की काहीतरी चांगलं वर यावं मंथनातून जसं क्लिंटन यांचा हा धागा खूप रोचक आहे, घासकडवींच्या धाग्यावरचे लोकांचे अनुभव अतिशय अद्भुत आहेत. पण मला कुणाचा राग नाही इन फॅक्ट मस्त नमुने पहायला मिळतात तेही आपल्या (मराठी) माणसांचे :).

In reply to by शुचि

जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून?
वर म्हटले आहे की पाच लोक मरतील, मुलगी घराण्याच्या मुळावर उठेल अशा प्रकारच्या भिती दाखवून लोकांना ’शांत केली तर बरे’ असे वाटायला लावणे आणि त्यातून आपले खिसे भरणे या प्रकारावर माझा आक्षेप आहे. जर कोणी स्वखुषीने काही करायला तयार झाले तर त्याविषयी माझा आक्षेप तितक्या प्रमाणावर नाही. जर भिक्षुक हा सत्पात्री दान द्यायला योग्य आहे असे वाटत असेल तर जरूर तसे करावे. क्लिंटन

In reply to by शुचि

>>पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर "हीलींग" होत असावं, ताणावमुक्ती, चिंतामुक्ती मिळत असावी असं वाटतं. --म्हणजे नेमके काय होत हे स्पष्ट करुन सांगा जरा. सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर कस जातात? टीप- हा प्रश्न खिल्ली उडवण्यासाठी विचारलेला नाही.

In reply to by शुचि

>>पूजा, धर्म, दान काही न करून मग मानसोपचारतज्ञांकडे रांगा वाढतील असं वाटतं. मानसोपचारतज्ञांकडे जाऊन पद्धतशीर उपचार करुन घेण्यात नक्की काय चुकीचे आहे? पूजा, दान, धर्म यातून मनाला शांती मिळते असे एकवेळ मानले, तरी जी अडचण आहे त्यातून मार्ग काढ्ण्यासाठी मदत कशी होते?

काही ठराविक कर्मकांडे करायला मला तर छान वाटते...जसे की पूजा, सणवार , काही जुन्या चालीरिती.. अगदी ह्या गोष्टींना शास्त्रीय आधार नाहीये हे माहित आणि कळत असूनही. एकतर घरात त्यावेळी छान प्रसन्न वातावरण असते. रोजच्या एकाच रूटीनपेक्षा काहीतरी वेगळी कामे आपण करित असतो..जसे की घर सजावट ,पूजेच्या सामानाचा बाजारहाट , फुलांचे हार करणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य. घरात छानपैकी स्वयंपाक शिजत असतो. काही खास पदार्थ आपण एरवी करू म्हटले तरी केले जात नाहित. पण या निमित्ताने ते केले जातात. आमच्या भावाच्या मुलीची ब्राम्हणाने शांती करायला सांगितली होती. काही गरज आहे , का करायची , नाही केली तर काय होईल वगैरे प्रश्नांनी उचल खाल्ली पण घरातील वडील धार्‍या मंडळींच्या समाधानासाठी ही पूजा घरात केली गेली. काय प्रसन्न वातावरण होते त्यावेळी. सर्व जण सकाळी सकाळी उठून आंघोळया करुन छान छान कपडे घालून तयार झाले. पूजेची सर्व तयारी झाली. मुख्य गुरुजींनी काय सुंदर पूजा मांडली होती. मग अजून गुरूजी आले. बहुतेक ११ असावेत एकूण . त्यांच्या धीरगंभिर आवाजात एका लयित मंत्रपठण सुरू झाले. कानाला ऐकायला ते अतिशय छान वाटत होते. शेजारी डोकावून जात होते. आणी किती छान , प्रसन्न वाटतय आज तुमच्याकडे म्हणून जात होते. किचन मधून नैवेद्याच्या स्वयपाकाचा वास नाकात शिरत होता. पुरणाचा नैवेद्य सुरू होता. मग होम हवन झाले. गुरुजींनी भरपूर दक्षिणा घेतली...त्या पुजेचा जो दर होता त्यावेळी त्याप्रमाणे. पण त्या बदल्यात एक दिवस छान प्रसन्न वातावरणात घालवायला मिळाला. मस्त सकाळच्या अकरा साडे अकरा वाजताच पुरणपोळी , कटाच्या आमटीचे मस्त भरपेट जेवण झाले. दुपारी गप्पा टप्पा करत नंतर सर्वांनी मस्त ताणून दिली, आणि तसेही बाहेर कुठे हॉटेल मध्ये वगैरे जाऊन तेवढे पैसे खर्च झालेच असते. कर्मकांडे केलीत तरी त्याची कसली भिती , दडपण असता कामा नये आणी अतिरेक ही नको. उलट ते करताना मजा यायला हवी. त्यातुन आनंद मिळायला हवा. तेवढ्यापुरते मला तरी काही ठराविक कर्मकांडे करायला आवडतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या एका आंघोळीत अनेक (न केलेल्या) आंघोळ्यांचे समायोजन असते. पुर्वी प्रवासात एखादी नदी दिसली लोक आंघोळ्या करुन घ्यायचे परत करायला भेटन न भेटन या आशंकेनी. (पारोसा)

भरलेल्या गाडीला सुपाचं काय ओझं म्हणत म्हणत बरीच सुपं आपण बाळगतो...

सुंदर विचार व जबरदस्त लेख...पण काही लोकाना दान करायची ** असेल त्यानी काय दान केले तर काय बिघडते. जितकी भिक्षुकांची घेणं ही गरज असते तेवढीच गरज "देणं" ही धनिकांची नसेल हे कशावरून? पण दान नेमके ब्राम्हणालाच का करावे? एकादा गरीबाला दान केले तर त्याने पुण्य मिळणार नाही का? पूजा, कर्मकांड आदिंनी सूक्ष्म जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर "हीलींग" होत असावं, ताणावमुक्ती, चिंतामुक्ती मिळत असावी असं वाटतं. पूजा, धर्म, दान काही न करून मग मानसोपचारतज्ञांकडे रांगा वाढतील असं वाटतं. परत एकदा लोकाना उल्लु बनवायाचा प्रयत्न.म्हणजे हिंदु धर्म संस्कृती मानसोपचारतज्ञांचा धंदा बुडवतात असे ह्याना सांगायचे आहे.

In reply to by वेताळ

धन्यवाद वेताळसाहेब. बाकी असे काही लिहिलेत तर तुम्ही सुध्दा संस्कृतीविरोधी ठराल बरं का! (संस्कृतीविरोधी) क्लिंटन

'पोटापुरता पसा पाहीजे, हवी पिकाया पोळी' एवढाच उद्देश असावा. आणि फसवणूक कोण करंत नाही ? पावसाळ्यात कपड्यांचे ग्रॅण्ड रिडक्शन सेल अगदी ५०% ते ६०% किमती लावून केले जातात. तरीही त्यातून भरगच्च नफा मिळवला जातोच नां ? म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत काय असेल ? लेबल्स लावून विक्री किंमतीची अगोदरच कल्पना दिलेली असते म्हणून आपण समजूत करून घेतो कि आपण फसवले गेलेलो नाही. आणि इथे फक्त लेबल नसते आणि कर्मकांडाच्या खर्चाबरोबर सल्ला फि देखील असते एवढाच काय तो फरक.

लेख आवडला आणि पटला.

देव अशानं भेटायचा नाही रे... देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. दगडाचा देव त्याला वज्राचं भेव लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव सोन्याचांदीचा देव त्याला चोराच भेव... देव अशानं भेटायचा नाही रे... देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. देवाला भेटायला कुणा मध्यस्थाची गरजच का पडावी?

जपाची माळ •जानेवारी 10, 2010 • प्रतिक्रिया नोंदवा (संपादन) खय्यामचा विरोध हा पहिल्यापासून कर्मकांडांना होता. सर्व प्रकारच्या कर्मकांडांना ! प्रामाणिक माणसाला याची गरज काय अशी त्याची प्रामाणिक शंका होती. दररोज परमेश्वराच्या प्रार्थनांचे अवडंबर माजवणे त्याला समजू शकत नव्हते. पण तो स्वत:शी प्रामाणिक होता. परमेश्वर असेल अशी त्याची आशा होती. इच्छा नव्हे. पण सर्वसामान्य समजतात किंवा धर्मगुरू सांगतात असे त्याचे स्वरुप असेल असे त्याला मित्रहो, मुळीच वाटत नव्ह्ते. म्हणून तो परमेश्वरालाच म्हणतो – तुझ्या जपाच्या माळेत नसेल ओवला मी एखादा मोती, पण माझ्या चेहर्‍यावरची पापाची खंत मी अजूनही पुसलेली नाही. मी तुझ्या दयेची आशा सोडलेली नाही, कारण हे परमेश्वरा, मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही. पापे कसली तर शास्त्रीय सत्य सांगण्याची ! दयेची भीक कोणासाठी तर ज्या कर्मठ लोकांनी सत्य स्विकारायला नकार दिला, त्यांच्यासाठी ! आणि सत्य काय तर “मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही.“ शास्त्राची (सायन्सची) पाठराखण करत असताना त्याने बरेच शत्रू जोडलेले होतेच ! मित्रहो, काळ लक्षात घ्या. अरबांनी नुकतेच इराण इस्लाममय केले होते तो काळ ! Posted in Uncategorized लेबले (टॅग्ज): Iran, Marathi, Omar Khayyam, Philosophy. Persia, Poems, Rubayaa

क्लिंटन साहेब (क्लिंटन हे नाव एका गो-याचे आहे हे माहित असल्याने आणि गोरा म्हणल्यावर त्याला "साहेब" म्हणलेच पाहीजे.) का फुकाचा त्रागा करून राहीला?

क्लिंटन साहेब, सगळ्यात पयल्यांदा तुमास्नी येक प्रेमाचा सल्ला देतो, की वाचा. अजून लई वाचा. तुमी लय लवकर रागाला येता दादा, आसं प्रतिक्रियांवरुन तरी दिसतंय. त्यामुळे मी काही फार वाद घालणार नाही. केवळ विचारार्थ काही मुद्दे समोर ठेवतो. पाश्चात्यांच्या ज्ञानाचे आणि तंत्रातील प्रगतीचे कौतुक आहेच, पण तेवढ्यासाठी भारतीयांची आणि विशेषतः ब्राह्मणांची अक्कल काढण्याचा प्रमाद आपल्या हातून होऊ नये, असे वाटते. आपण एखाद्या विशिष्ट काळाचे उदाहरण देतो त्यावेळी त्यातील सगळ्या घडामोडी जुक्स्टापोझ करुन मग निष्कर्ष काढायला हवा, की नको? सनातनी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांचा छळ केला हे सांगताना समकालीन यादवांचा मंत्री असलेल्या हेमाद्रि या ब्राह्मणाने मंदिर स्थापत्याचे एक नवेच तंत्र शोधून काढले होते. दगडांचे चिरे केवळ एकमेकांत बसवून आणि त्याच्या खाचांत कोणतेही बाईंडिंग मटेरियल न भरता देवालये उभारण्याच्या या शैलीला 'हेमाडपंती शैली' म्हणतात. ती देवालये आजही टिकून आहेत आणि पाहायला मिळतात. पेशव्यांच्या काळातील जेवणावळींचा आणि भटशाहीचा संदर्भ आनंदाने दिला जातो, पण शनिवारवाडा आणि पुण्याच्या पेठांना पाणीपुरवठा करण्यासाठीची कल्पक यंत्रणा उभारणारा ब्राह्मण आपल्याला आठवत नाही. इंग्रज डॉक्टरकडून औषधे घेणारे माधवराव पेशवे, मराठ्यांचा तोफांचा कारखाना उभारण्यासाठी जीवाचे रान करणारे नाना फडणीस आणि सरदार पानसे, इंग्रजांकडून चष्मा घेणारे सखारामबापू बोकील आणि इंग्रजांकडून घड्याळे व लांब पल्ल्याच्या दुर्बिणी विकत घेणारा दुसरा बाजीराव आठवत नाही. मराठे आणि निजामाची मदत घेऊन टिपू सुलतानाला मारण्याची घाई इंग्रजांना झाली होती कारण त्याच्या अग्निबाणांचा इंग्रजांनी धसका घेतला होता. भारतातील आणि पहिला स्वदेशी कारखाना नानासाहेब पेशव्यांच्या काळात एका ब्राह्मणाने उभारला होता. (तो आजही पुण्यात स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे). पाश्चिमात्य तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतातील पहिली कापडगिरणी खरे तर गुजरातेतील एका नागर ब्राह्मणाने उभारली, पण भांडवल उभारणीच्या स्पर्धेत ऐनवेळी पारशी उद्योजकाने बाजी मारल्याने हा ब्राह्मण दुसर्‍या क्रमांकावर राहिला. १८८० च्या सुमारास भारतातील पहिला स्वदेशी साबण निर्मितीचा कारखाना एका ब्राह्मणाने काढला, पण स्पर्धेला घाबरुन इंग्रजांनी त्याला तो बंद करायला लावला. त्याच काळात एका ब्राह्मण संशोधकाने एक अभिनव शोध लावला आणि जनरल इलेक्ट्रिक या प्रख्यात अमेरिकन कंपनीने तो विकत घेतला. भारतातील एका संशोधकाला अमेरिकेने अत्यंत आदराने 'हिंदुस्थानचा एडिसन' ही पदवी दिली. आणखी एका ब्राह्मणाने मेक्सिको देशात जाऊन कृषिक्रांती घडवली. (या सगळ्यांची नावे मला ठाऊक आहेत. आपणास ठाऊक आहेत का?) वेदोक्त आणि पुराणोक्ताचा वाद सुरु होता त्याच काळात ठोमरे नावाच्या एका ब्राह्मणाने भारतीय विमानशास्त्रातील संकल्पनांच्या आधारे विमानाचे प्रारुप तयार करुन गिरगाव चौपाटीवर उड्डाणाचा प्रयोग यशस्वी केला होता. त्याला लोकमान्य टिळकही उपस्थित होते. (राईट बंधू विमान ऊडवत होते त्या काळात भारतीय काय करत होते, याचे मला मिळालेले उत्तर) आणखी एक ब्राह्मण चित्रपट या तेव्हाच्या नव्या माध्यमतंत्रात पारंगत होऊन आला आणि त्याने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला. समुद्र उल्लंघन केल्याचे प्रायश्चित्त एकीकडे घेतानाच गणितातील कूटप्रमेये लीलला सोडवणारे रामानुजम ब्राह्मणच होते आणि भारतातील आद्य अभियंता म्हणून ओळखले जाणारे सर विश्वेश्वरय्या हेही ब्राह्मणच होते. विलायतेत हालअपेष्टा सहन करुन पहिली डॉक्टर होणार्‍या आनंदीबाई जोशी या ब्राह्मण होत्या आणि संततिनियमनाचा पुरस्कार करत हयात घालवलेले डॉ. र. धों. कर्वेही ब्राह्मणच होते. भारतात सहकारी चळवळीचा पाया घालणारे डॉ. धनंजयराव गाडगीळ ब्राह्मणच. प्रसूतिकाळात मरणार्‍या जगभरच्या महिलांना जीवनदान ठरणारा गर्भाशयातील टाका शोधून काढणारे डॉ. बी. एन. पुरंदरे हेही ब्राह्मण. भिक्षुकी आणि शिक्षकी यापलिकडेही ब्राह्मण समाज आहे आणि इतिहास असो, राजकारण असो, की विज्ञान असो काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी योगदान दिले आहे. (मी ही माहिती जातीच्या अभिनिवेशापोटी दिली नाही कारण बुद्धिमत्ता हा काही एकाच जातीचा मक्ता नसतो. इतर समाजातील असंख्य कर्तबगार लोकांची उदाहरणेही माझ्याकडे आहेत, पण 'उचल काठी लाग बामणापाठी' असा पवित्रा एकारांत चित्पावनांनी घेतल्यावर मग बोलण्यासारखे काय उरले? आपलेच दात आणि आपलेच ओठ.)

In reply to by योगप्रभू

अहो योगप्रभू साहेब,
पण तेवढ्यासाठी भारतीयांची आणि विशेषतः ब्राह्मणांची अक्कल काढण्याचा प्रमाद आपल्या हातून होऊ नये, असे वाटते
मी स्वत: एक भारतीय आहे आणि एक ब्राम्हण आहे हे आतापर्यंत तुम्हाला माहित झाले असावे.सगळे ब्राम्हण बिनडोक होते असे मला म्हणायचे आहे असे कशावरून दिसते?कुणा प्रतिसाद देणाऱ्यांच्या मातोश्री भिक्षुकी करतात आणि त्या लोकांना लुबाडायचे सल्ले देत नाहीत आणि ज्यांना केवळ मन:शांतीसाठी पूजा करायची आहे त्यांच्याच घरी जाऊन पूजा करतात त्यावर ’अशा भिक्षुकांना विरोध नाही’ असे म्हटलेले वाचले नाहीत का?उगीच कशाला खानखोजे,तळपदे (की ठोमरे? असो वाचन कमी असल्याचा परिणाम),फाळके यांची उदाहरणे देत आहात?माझा मुळात विरोध लोकांना भिती दाखवून खिसे भरणाऱ्या भिक्षुकांना आणि उगीचच धर्माचे अवडंबर माजवून अमके झाले की धर्म बुडाला, तमके झाले की ’कलियुग’ असल्याचे आठवणार, जातीपातींचे अवडंबर माजवणाऱ्या इत्यादी इत्यादी सर्वांनाच (केवळ ब्राम्हणांना नव्हे) विरोध आहे.
भिक्षुकी आणि शिक्षकी यापलिकडेही ब्राह्मण समाज आहे आणि इतिहास असो, राजकारण असो, की विज्ञान असो काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी योगदान दिले आहे.
हो लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, महर्षी कर्वे, र.धो.कर्वे,गोखले, रानडे,गाडगीळ ही विविध क्षेत्रांतील मंडळी ब्राम्हणच होती. पण म्हणून तुमचा नक्की मुद्दा काय? मी अशा towering लोकांची अक्कल काढत आहे असा जावईशोध कुठून लावलात? परत एकदा सांगतो की माझा विरोध कर्मकांडे, धर्माचे अवडंबर, जातीपातींचे अवडंबर, बुध्दीला न पटणाऱ्या पूजा-शांती, वेदकालीन जंगलात भटकणे आणि वर्तमानाकडे पूर्ण दुर्लक्ष, ऐतिहासिक व्यक्तीमत्वांचा मूळ संदेश काय हे लक्षात न घेता नुसते व्यक्तीपुजेचे स्तोम माजवायचे या प्रवृत्तींना आहे. (आंबेडकरांच्या फोटोभोवती झुठ बोले कव्वा काटेवर नाचणाऱ्या लोकांविषयी मी काय लिहिले आहे ते वाचले नाहीत का? बहुदा नाचणाऱ्यांमध्ये कोणी ब्राम्हण नसावे.) अहो लोकांना भिती न दाखवणाऱ्या भिक्षुकांनाही माझा विरोध नाही हे लिहिले असतानाही मी ब्राम्हणांची अक्कल काढत आहे असे म्हणणे म्हणजे फारच extrapolation झाले की. अति वाचनाचा परिणाम का तो? असो. आपण दिलेली सगळी उदाहरणे रास्त आहेत.पण त्यात प्रॅंटलच्या Boundary Layer Theory किंवा १८-१९व्या शतकात calculus चे extension म्हणून अनेक वेगवेगळी समीकरणे शोधून काढली गेली आणि त्यावर शास्त्राच्या विविध disciplines चा डोलारा उभा राहिला असे मूलभूत दुर्दैवाने काही नाही. फार पूर्वी आयुर्वेद किंवा रसायनशास्त्रासाठीचा ’रसरत्नसमुच्चय’ हा ग्रंथ अशा स्वरूपात बरेच pathbreaking काम झाले.पण नंतर आपण फार मोठ्या प्रमाणात मागे पडलो.आणि त्यामागे परकिय आक्रमणे हे कारण आहेच त्याचबरोबर जातीपातींची अवडंबरे,फुकाची कर्मकांडे या गोष्टींचाही वाटा आहे असे मला वाटते.आणि मी या गोष्टींवर जोरदार कोरडे ओढतो आणि ओढणार. आणि असे मूलभूत काम आपल्याकडे व्हावे हे तुमच्याइतकेच मलाही वाटते. कारण मी अमेरिकेत एक PhD विद्यार्थी म्हणून होतो.ते काही कारणाने सोडून मला परत यावे लागले. पण माझ्याच नाही तर इतर अनेक क्षेत्रांत पूर्वीपासूनची प्रगती बघताना त्यात भारतीय नावे कमी दिसतात (जी काही भारतीय नावे होती ती एक तर अमेरिकेतील किंवा इंग्लंडमधील होती) याची मला विलक्षण टोचणी लागली होती.आणि आपल्याकडे तसे होऊ शकलेले नाही याचे कारण आपल्या चुकलेल्या priorities. आपण शास्त्रीय प्रगतीपेक्षा कर्मकांडांना महत्व दिले आणि याच साखळ्या आपल्या पायात यापुढेही राहू नयेत असे तर कळकळीने वाटते. तेव्हा कर्मकांडांना विरोध म्हणजे ब्राम्हणांची अक्कल काढणे किंवा ब्राम्हणांनाच विरोध असा अर्थ घेऊ नये ही विनंती.
पण 'उचल काठी लाग बामणापाठी'
सॉरी.माझा पवित्रा "उचल काठी लाग अनिष्ट प्रथांपाठी" असा आहे मग त्या प्रथा रूजवणारे ब्राम्हण असोत की आणखी कोणी.
अजून लई वाचा. तुमी लय लवकर रागाला येता दादा, आसं प्रतिक्रियांवरुन तरी दिसतंय.
सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' असा सुधारकी आगरकरी बाणा दाखवून रोखठोक मते व्यक्त केल्याबद्दल तुमचे कौतुक आहेच हो क्लिंटनसाहेब. कधी काळी माझीही मते अशीच होती. पण आज वाटते, 'जाऊ दे. कशाला कुठल्या एका जाती/वर्गावर खापर फोडा. ज्याला सुधारायचे तो सुधारेल. नाही तो मागे पडेल.' आणि त्यातून सर्व समाज एकाएकी उत्क्रांत होत नसतो. त्याला वेळ लागतोच परवा माझ्या मित्राकडून एक सुंदर वाक्य ऐकले. 'ज्यांना भविष्यकाळाची दारे बंद झालेली असतात ते भूतकाळात चाचपडत हिंडत राहातात.' खरं सांगू का. ज्ञानेश्वरांचा छळ कुणी केला, दादोजी-रामदास गुरु होते का नव्हते, भिक्षुकांनी समाजाचे नुकसान केले की नाही, या व अशाच या काथ्याकुटाने काय साधणार हो? चार घटकांची गंमत आणि वादातून वाढणारा द्वेष. त्यापेक्षा आजूबाजूला काय आश्वासक घडतंय त्याच्याकडे बघूया. ते बघा. कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी स्टेम सेलच्या वापराने आधुनिक वैद्यकीय उपचारांचा पाया घातला आहे. यंदाच्या शांतिस्वरुप भटनागर पुरस्कारांत चक्क ३ मराठी शास्त्रज्ञ आहेत. आणखी कुणी न बोलता आपापली कामे करत असतील. चांगले आहे. (माझी पिंपळावर लटकण्याची वेळ झाली. मी आता जातो. सर्वपित्री अमावस्येला पुन्हा आमचा राजा वेताळ याची परवानगी काढून येण्याची इच्छा आहे. :))

In reply to by योगप्रभू

धन्यवाद योगप्रभू.
'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' असा सुधारकी आगरकरी बाणा दाखवून रोखठोक मते व्यक्त केल्याबद्दल तुमचे कौतुक आहेच हो क्लिंटनसाहेब.
बापरे मी अशा मोठ्या माणसाचा बाणा दाखविला असे म्हणू नका हो.कुठे तो देशसेवेसाठी दारिद्र्याचे व्रत घेतलेला महापुरूष आणि कुठे आय.आय.एम मध्ये जाऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळावी आणि माझे स्वत:चे गाडीबंगले असावेत, जगभर पर्यटनाला कुठेही जाता यावे अशी पूर्णपणे materialistic आशा-आकांक्षा असलेला मी! त्यांच्या बाण्यातील ’बा’ म्हणायची तरी योग्यता आहे का माझ्यासारख्यांची? असो. बाकी माझ्या लेखाचा उद्देश म्हणजे अनिष्ट प्रथांच्या साखळ्यांकडे वाचकांचे लक्ष वेधून घेणे हा होता.कोणताही द्वेषभाव वाढावा असा मुळातच लेखाचा उद्देश नव्हता. लेखात सुरवातीलाच डिस्क्लेमर टाकायला हवे होते. तेव्हा छत्रपतींचे गुरू कोण यासारख्या आताच्या काळाशी संबंध नसलेला हा विषय नाही कारण या प्रथा गेल्या अनेक वर्षांप्रमाणे आजही आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण ते नाकारू शकत नाही.तेव्हा दोन विषयांची तुलना करू नका ही विनंती.
कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी स्टेम सेलच्या वापराने आधुनिक वैद्यकीय उपचारांचा पाया घातला आहे. यंदाच्या शांतिस्वरुप भटनागर पुरस्कारांत चक्क ३ मराठी शास्त्रज्ञ आहेत.
ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि असे विविध क्षेत्रात शेकड्यांनी नव्हे हजारोंच्या संख्येने लोक आपल्याकडे व्हावेत हीच सदिच्छा.
ज्यांना भविष्यकाळाची दारे बंद झालेली असतात ते भूतकाळात चाचपडत हिंडत राहातात.
अरे वा. हे वाक्य दिल्याबद्दल धन्यवाद.माझा ’वेदकालीन जंगलात भटकणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ पण तोच. असो. या चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. परत एकदा सांगतो की कोणताही वैरभाव वाढावा यासाठी हा लेख लिहिलेला नव्हता.तर लेखाचा उद्देश केवळ आपल्या पायात शतकानुशतके असलेल्या साखळ्या आहेत याची आठवण करून देणे हाच होता. आणि मला साखरेच्या पाकात घोटलेले गोडगोड लिहिता येत नसल्यामुळे रोखठोक भाषेत लिहिले.असो. क.लो.अ क्लिंटन

किंटन साहेब. तुमचे सगळे मुद्दे आणि रिप्लाय वाचले. तुम्ही जबरदस्त पणे सगळे लिहिले आहेच. तुमचा त्यामागचा उद्देश, मनाची तळमळ स्पष्ट जाणवते. लिहित रहा ... एक सुंदर धागा वाचल्याचा आनंद मिळाला --

In reply to by गणेशा

क्लिंटनसाहेबान्च्या शब्दाशब्दाशी सहमत. हिन्दू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे. हिन्दू धर्म म्हणजे एक भटी गौडबंगाल आहे. हे पुनः एकवार सिध्द झाले. बाकी चालु द्या.

In reply to by मितभाषी

हिन्दू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे. हिन्दू धर्म म्हणजे एक भटी गौडबंगाल आहे. ... सहमत आहात का? नसल्यास खरा हिन्दू धर्म काय हे समजाउन घेण्याची/ देण्याची तसदी घेणार का? असल्यास बूड असलेले मजबूत गाडगे हुडकून धर्मान्तर करणार का?

In reply to by मूकवाचक

असल्यास बूड असलेले मजबूत गाडगे हुडकून धर्मान्तर करणार का? मजबूत बूड असा कोणताही धर्म ह्या भूतलावर अस्तित्वात नाही. आज प्रत्येक धर्माची चाळण झालेली आहे. आहे त्यातच राहून सुधारणा व्हावी.

In reply to by मूकवाचक

हिंदू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे वगैरे मला अजिबात मान्य नाही.जर त्यात भगवद्गीतेसारखी उच्च philosophy असेल आणि त्यातही knowledge मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात ’परिप्रश्नेन’ म्हणजे गुरूला एकामादोमाग एक प्रश्न विचारून knowledge मिळवावे असे म्हटले आहे. म्हणजे मी knowledge analytical approach वर जो भर देत आहे तोच त्यातही सांगितला आहे. माझे म्हणणे एकच की कर्मकांडांना जे आजचे ओंगळ स्वरूप आले आहे ते घालवावे आणि शास्त्रीय दृष्टीकोन अवलंबावा. म्हणजे जमिनीतून सोने काढताना एक ग्रॅम सोने मिळविण्यासाठी अनेक किलो माती काढावी लागते पण आपण सोन्यात इंटरेस्टेड असतो मातीत नाही हे लक्षात घेऊन फक्त माती टाकावी आणि सोने मिळवावे असे मला वाटते. आणि हे सगळे करायचे स्वातंत्र्य हिंदू समाजच देईल. इतर धर्मियांमध्ये असे उघडपणे बोलायची हिंमत कोणी दाखवू शकणार नाही हे पण मला मान्य आहे.तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा चांगल्या कामासाठी (सोने मिळविण्यासाठी) वापर करावा असेच मला वाटते. इथे धर्मांतराचा प्रश्न आलाच कुठे? उगीच नसते फाटे फोडू नका ही विनंती. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

मूळ प्रतिक्रिया भावश्या यान्ची आहे हे आपणही विसरू नका. आणि थोडेफार रोकठोक लिहिले त्याचा इतका रागही मानू नका. उत्तराबद्दल धन्यवाद.

In reply to by मूकवाचक

माझे उत्तर भावश्यांच्या प्रतिसादाला दिले जाणे अपेक्षित होते. ते चुकून तुमच्या प्रतिसादाला दिले. त्याबद्दल दिलगिरी. क्लिंटन

In reply to by मूकवाचक

@मूकवाचक, धर्म म्हणजे आपण धारण करतो तो. खरा धर्म सार्वजनिक आहे. तो कुठल्याही संप्रदायात अडकुशकत नाही. मग कुणी शिख, इसाइ, मुस्लीम हिन्दू म्हणुन फिरत असतील. पण प्रत्येकाचा धर्म एकच आहे. जसे सबका मालिक एक. त्यामुळे धर्मांतर करण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला अभिप्रेत असलेल्या हिन्दू धर्माबद्दल मी लिहिले होते. हिन्दू धर्मात घुसदवलेल्या कुप्रथांकडे माझा निर्देश होता. त्याबाबद क्लिंटनसाहेबांनी सविस्तर विवेचन केलेच आहे. एवढे लिहुन माझे दोन शब्द संपवतो.

In reply to by मितभाषी

हिन्दू धर्म हे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे. हिन्दू धर्म म्हणजे एक भटी गौडबंगाल आहे. ... यापेक्षा बरेच बरे आहे. हे लिहून मी माझे चार शब्द सम्पवतो. धन्यवाद.

क्लिंटन साहेब, आपण जे बोलत आहात ते कटू आहे. आम्हाला कटू ऐकायची सवय नाही. भले विष द्या, पण ते जर का मधात टाकून दिले कि आम्ही ते गपगुमान पिऊ. पण कडू औषधाचा काढा आमच्या नरडी उतरणे शक्य नाही.

In reply to by नरेश धाल

कटू आहे पण सत्य आहे हे तर मान्य आहे का?तसे असेल तरी कधीतरी कडू औषध प्यायची पण सवय होईल आणि ते मधातून द्यावे लागणार नाही.