Skip to main content

कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 28/09/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन. मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच. जसे काही लोकांना आय.आय.एमचे MBA (Finance) हे लोकांना लुबाडायला बसलेले चोर वाटत असले तरीही अशा लोकांना माझ्याविषयी वैयक्तिक पातळीवर हेवादावा असेल असे वाटायचे कारण नाही.तसेच थोडेसे. अनेक लोक कृतज्ञता व्यक्त करतात आणि मुख्य म्हणजे त्यात कर्मकांडादी फापटपसाऱ्यापासून दूर राहतात हे चांगलेच आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यावर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही.आणि त्यासाठी दर वर्षी एखादा दिवस नेमून ठेवणे याविषयीही कोणाची तक्रार असायचे कारण नाही. पण बहुसंख्य लोक कर्मकांडे करतात याचे मात्र वाईट वाटते. गोष्टींमध्ये ’एक गरीब ब्राम्हण होता’ असा उल्लेख नक्की असतो.मला वाटते अशाच गरीब ब्राम्हणांनी स्वत:च्या दक्षिणेची सोय व्हावी म्हणून अशा अनेक रूढीपरंपरा घुसडून दिल्या आहेत.माझ्या वडिलांचे दशमीच्या दिवशी निधन झाले.त्यानंतर भटजींनी सांगितले की ’पंचक लागले’. म्हणजे काय तर दशमीच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाल्यामुळे इतर पाच लोकांचा मृत्यू होईल. आणि त्यावर उपाय काय? तर पंचकशांती करा म्हणजे भटजींना दक्षिणा द्या! बरं ही पाच माणसे कोण-- नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे की आणखी कोणी असा प्रश्न मी भटजींना विचारला होता.त्यावर त्यांचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. माझा पुढचा प्रश्न होता की ही पाच माणसे मरायची Timeframe किती? जर पुढच्या ५० वर्षांत पाच माणसे मरतील असे त्यांचे म्हणणे असेल तर ते सांगायला भटजी का हवेत? मी सुध्दा Law of averages वापरून ते सांगू शकतो कारण परक्या माणसांपैकी सोडाच आमच्या जवळच्या नात्यातील ५ पेक्षा जास्त मंडळी त्या वेळी ५० पेक्षा जास्त वयाची होती. त्यावर भटजींचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. एका माणसाचा अमुक एका तिथीवर झालेला मृत्यू आणि त्या कारणाने इतर पाच जणांचा मृत्यू होणे या गोष्टी परस्परावलंबी असतात यावर सुशिक्षित लोकांचा विश्वास बसूच कसा शकतो?मी घरातील सर्वात लहान होतो तरीही मी हे मुद्दे माझे वडिल नुकतेच गेलेले असतानाही मांडून पंचकशांती अजिबात करू नये असे म्हटले. पण आपल्या ’महान’ भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे लहानांनी स्वत:ची मते मांडणे नव्हे स्वत:ची स्वतंत्र मते ठेवणे हेच मोठे पाप असते आणि मोठे लोक जे ठरवतील तेच लहानांनी करणे अपेक्षित असते! तेव्हा ’तू लहान आहेस तुला काही कळत नाही’ असे म्हणून माझी बोळवण करण्यात आली आणि मी मृत व्यक्तीचा मुलगा म्हणून मलाच पंचकशांतीला बसून भटजी सांगतील तेव्हा सव्य-अपसव्य करायची सक्ती केली गेली होती. माझा प्रश्न: सुशिक्षित लोकसुध्दा अशा भूलथापांना बळी कसे पडतात? याचे कारण म्हणजे ’चुकून पाच लोक खरोखरच गेले तर त्याचे बालंट आपल्यावर येईल’ ही भिती. आणि पंचकशांती करूनही असे पाच लोक गेले तर परत हे हात वर करायला मोकळे की बघा आम्ही पंचकशांती केली होती तेव्हा झाले त्यात आमचा काही दोष नाही! पुढे पंचक या प्रकरणाची माहिती गोळा केली.तेव्हा मला कळले की केवळ दशमीच नाही तर इतर चार तिथ्यांच्या दिवशी (नक्की तिथ्या कोणत्या हे लक्षात नाही) पण एखाद्याचे निधन झाले तरी पंचक लागते. इतकेच काय तर पंचकाप्रमाणेच ’तीन लोक मरतील’ असे त्रिपाद (की तत्सम काहीतरी) आणि ’दोन लोक मरतील’ असे काहीतरी (नक्की शब्द आठवत नाही) असते आणि त्यांचीही ’हक्काची’ पाच नक्षत्रे असतात. म्हणजे २७ पैकी १५ नक्षत्रांवर कोणीही गेले (५५.५५% मृत्यू) तरी त्याची शांत व्हावी आणि म्हणजेच आपली दक्षिणेची सोय व्हावी अशी सोय तत्कालीन ब्राम्हणांनी करून ठेवली आहे. मी स्वत: अगदी ’एकारान्ती’ कोकणस्थ ब्राम्हण आहे आणि माझ्या पूर्वजांनी भिक्षुकीच केली.पण पंचक प्रकरणानंतर भटजी या संस्थेविषयीच एक तिडीक माझ्या डोक्यात गेली आहे. कारण अगदी सुशिक्षित लोकांनाही ’आपण शांत करून घेतली नाही तर आपल्याला पाप लागेल, आपण नरकात जाऊ किंवा पाच लोक मरतील’ असे वाटत असेल तर या भूलथापा दाखवून अशिक्षित लोकांना लुबाडणे खूपच सोपे आहे. आणि असा भितीचा बागुलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे आणि रामलिंग राजूने सत्यममधील शेअरहोल्डर्सचे पैसे ढापणे यात फार फरक आहे असे वाटत नाही. अशा काहीतरी बुध्दीला न पटणाऱ्या गोष्टी घुसडून देणे केवळ पंचकापुरते मर्यादित नाही. मधूनमधून सत्यनारायणासारख्या पुजा, मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाल्यास ’ती घराण्याच्या मुळावर येते’ असे म्हणत शांत करून घेणे, आपल्या हातून मांजर मेल्यास भटजींना दक्षिणा देऊन पापाचे परिमार्जन करणे, पहिली तीन वर्षे करणे अपेक्षित असलेली श्राध्दे, पक्ष, दहावे-तेरावे आणि इतर अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो! जर आपल्या वडिलांविषयी, आजोबा-पणजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यांनी केलेली चांगली कार्ये आणखी पुढे नेणे किंवा सत्पात्री दान देणे यासारख्या गोष्टी केल्या तर त्यातून चांगले घडेल असे वाटते.पुण्यात मी डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी एक अत्यंत किळसवाणा प्रकार बघितला होता.एका टेंपोवर डॉ.आंबेडकरांचा फोटो लावून त्याला हार घातले होते आणि त्याभोवती दोन तास लोक ’झुठ बोले कव्वा काटे’ यासारख्या गाण्यांवर न थांबता नाचत होते.ते बघून आंबेडकरांच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.त्यापेक्षा आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी (शिक्षण घेणे, स्वावलंबी होणे इत्यादी) करणे अधिक योग्य नाही का? तसेच थोडेसे पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल! आणि ब्राम्हण समाज गरीब होता म्हणून अशी दक्षिणेची सोय करून ठेवणे हे अजिबात समर्थनीय नाही असे मला वाटते.ही छुप्या मार्गाने केलेली चोरीच झाली! ब्राम्हणांना intellectual कामांमध्ये (शाळेत शिक्षकाचे काम करणे, आयुर्वेदाचा अभ्यास करून वैद्यकी करणे यासारखी) गती होतीच कारण लहानपणापासून शिक्षणाचे महत्व त्यांच्यावर बिंबवले जायचे ना?मग अशी समाजोपयोगी कामे सोडून लोकांना भिती दाखवून स्वत:चे खिसे भरणे समर्थनीय कसे? आमच्या आय.आय.एम मध्ये दररोज संध्याकाळी इस्त्रीचे कपडे न्यायला आणि इस्त्री करून झालेले कपडे परत द्यायला एक बाई येते. एकंदरीत ती फारशी शिकलेली नाही हे तिच्याकडे बघून लगेच लक्षात येते.आमच्या डॉर्ममध्ये आणि आजूबाजूला काही भटके कुत्रे आहेत.त्या कुत्र्यांनी इस्त्रीचे कपडे फाडू नयेत, घाण करू नयेत म्हणून ती खूपच दक्ष असते. एकदा मी इस्त्रीचे कपडे देत असताना तिने मला सांगितले की जर कुत्र्यांनी कपडे फाडले तर झालेले नुकसान मी माझ्या पैशाने (अर्थातच परवडत नसताना) भरून देईन पण कुत्र्यांना कधीच मारणार नाही. याचे कारण--’कुत्र्यांना मारले तर मला पाप लागेल’. तेव्हा दुसऱ्याचे वाईट केले तर आपल्याला पाप लागेल असे वाटणे ही पापाच्या संकल्पनेची एक चांगली बाजू झाली. आणि कुठल्याकुठल्या पुजा आणि शांत केल्या नाहीत तर तुम्हाला पाप लागेल असे कळत नकळत बिंबवले जाणे ही पापाच्या संकल्पनेची वाईट बाजू झाली. ही अशी भिती दाखवूनच स्वत:च्या दक्षिणेची सोय करणाऱ्यांना आपल्याला पाप लागेल ही भिती वाटत नाही का? क्लिंटन

वाचने 46876
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

शतकी वाटचाल झाल्यानंतर प्रतिसाद देत आहे, याला कारण लेख वाचल्याक्षणापासून जे काही प्रतिसाद येत गेले त्याच्यातील विचार मंथन [अधिक धागाकर्ते श्री.क्लिंटन हे देत असलेले सविस्तर आणि अभ्यासू - ज्यावरून त्यांच्या चौफेर व्यासंगाचीही कल्पना येतेच - उत्तरे] वाचताना एक गोष्ट प्रकषाने जाणवत होती की, हा धागा प्रामुख्याने 'ब्राह्मण वर्ग आणि त्यांच्यातील उपशाखा' यांच्यासाठीच आहे व इथे बहुजन समाजातील जे सदस्य आहेत त्यांनी दोन्हीपैकी ['होय रे', 'नाही रे'] कोणत्याही एकाचा खांदा धरला तर दुसरा 'यांना काय माहित आहे आमच्यातील चालिरितीचे महत्व' असा फटका देणार, अशी साधार भीती वाटत असल्याने [जी चुकीची ठरेली तर मला फार आनंद होईल.] एक 'पवार' या नात्याने मी हा धागा ~ निदान या क्षणापर्यंततरी केवळ 'वाचनमात्र' ठेवला होता. तरीही, विशेषतः श्री.योगप्रभु या सदस्याच्या एका प्रतिसादातील त्यांनी दिलेली प्रांजल कबुली भावली; जी दोन्ही प्रवाहातील चांगल्या गोष्टीचे द्योतक मानले जावे. ते म्हणतात : "मी ही माहिती जातीच्या अभिनिवेशापोटी दिली नाही कारण बुद्धिमत्ता हा काही एकाच जातीचा मक्ता नसतो...." श्री.क्लिंटन यांच्या अभ्यासाविषयी वर लिहिले आहेच आणि त्यातूनच त्यांच्या विचाराचा जो एक आरसा तयार झाला आहे त्याच्याशी ते प्रामाणिक राहतील ही गोष्ट फार आश्वासक आहे. "तर लेखाचा उद्देश केवळ आपल्या पायात शतकानुशतके असलेल्या साखळ्या आहेत याची आठवण करून देणे हाच होता. आणि मला साखरेच्या पाकात घोटलेले गोडगोड लिहिता येत नसल्यामुळे रोखठोक भाषेत लिहिले." ~ केवळ गोडगोड लिहिले म्हणजेच लोकांना पटते असे नसून त्यातील भावनेची तीव्रता तितकीच भावणे महत्वाचे असते; ज्यासाठी कित्येक वेळा रोखठोकीचाच मामला उपयोगात येऊ शकतो. एकविसाव्या शतकात संपूर्ण जग (होय अगदी आफ्रिकासारखे मागासलेले समजले जाणारे खंडदेखील...) विज्ञानाची कास धरून मानवी प्रगती चन्द्रापार नेण्याच्या तयारीत असताना [व त्यातही भारतीय संशोधकांचा महत्वाचा तसाच मोठा हिस्सा असताना] आपणास आपल्या गल्लीतून एखादा लगबगीने जाणारा सदगृहस्थ 'मांजर आडवे आले...' म्हणून पुढे जाण्याऐवजी मागून शाळेचा एखादा मुलगा पहिल्यांदा पुढे जातो का याची वाट पाहताना दिसतो, त्यावेळी प्रश्न पडतो, खरंच आपण वैज्ञानिक दृष्टी बाळगून आहोत का? श्री.क्लिंटन यांनी वर अनेक ठिकाणी विज्ञानाचे महत्व आणि इकडे श्रध्दा+परंपरा या नावाने ब्रह्मवृंद जपत असलेली कर्मकांडे (दक्षिणेसाठी असो वा नसो...काही फरक पडत नाही) यावर आपले विश्लेषण वारंवार दिले असल्याने त्यातील उदाहरणाची पुनरुक्ती इथे करत नाही. तरीही त्यांच्या लिखाणाच्या शैलीवरून पं.नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासंदर्भातला हा भाग त्यांना फार भावत असणार असे वाटते. १९५३ सालीच या विषयावर बोलताना पंडितजी म्हणाले होते : "Scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a free man." त्यांच्या मनात विचार होता तो आधुनिक भारताच्या युवकाचा जो देशाला वैज्ञानिक प्रगतीकडे नेण्यास सक्षम आहे. यातील 'इट इज वे ऑफ लाईफ' हे फार काही सांगून जाते. १९५३ साली जन्मलेले बालक आज साठीला आले आहे, यातील किती भद्र पुरूषांनी पंडितजींना अपेक्षित असलेली वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली असे वाटते? आणि २०१० ला जन्मलेल्या बाळाला त्या अनुषंगानेच वाढविण्याची मनोकामना किती पालक करत असतील? हे प्रश्न मनी उदभवतात आणि या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा यथार्थ मार्ग म्हणजे कर्मकांडांना 'अवास्तव' महत्व न देणे. 'अमावस्ये' दिवशी नवीन खरेदी करू नये असे म्हणतात इतपत ठीक आहे, पण त्यादिवशी वाहनांची यथासांग पूजा करून त्याला 'लिबू, बिब्बा, हिरव्या मिरच्या' बांधून तो अवतार दिवसभर लटकावयाचा [हे आमचे फिजिक्सचे "डॉ." पाटी दरवाजावर लावणारे प्रोफेसर करायचे] आणि गाडी मगच रस्त्यावर काढायची....हा अतिप्रकार. ~ बरं याला अडवलं तर करणारा 'होय, मी हे कर्मकांड मानतो, मी बांधणार लिबू-मिरच्या !" असे रोखठोक उत्तर देत नाही, तर 'नाही हो, माझा विश्वास नाही, पण मिसेस जरा....." इ. इ. समजलं ! १ अब्ज आकडा पार केलेल्या या प्रचंड खंडप्राय देशाच्या सर्व धर्मातील चालिरितीचे खरे मूळ आहे त्यांचे त्यांचे आर्थिक प्रश्न. हा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या काही प्रथा (किंवा क्लृप्त्या....) इथल्या मातीत रुजत गेल्या त्याला खतपाणी घालण्यासाठी 'देव' नावाच्या झारीच्या उपयोग केला गेला ज्यातून 'नरकाची भीती आणि स्वर्गाची गती...' हे फळ निघाले. स्वर्ग ही कल्पनाचा मूळी मोहक असल्याने जो तो त्या 'फळ' प्राप्तीसाठी सांगेल ते (प्रसंगी यथाशक्तीच्या पलिकडेदेखील जावून) करण्यास तयार होऊ लागला, मग त्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले तरी बेहत्तर. जीवन अर्थमूलक आहे हेच यातून सिध्द होते. आर्थिक प्रश्नच सामाजिक आणि राजकीय प्रश्नाचे रूप धारण करतात. मग सांस्कृतिक आणि धार्मिक या दोन बंधूंनादेखील "अर्थ" नावाच्या सर्पाने वेटोळे घातले तर आश्चर्य वाटू नये. कर्मकांडांचे एकमेव सत्य हे ब्रह्म नसून अर्थ आहे....आणि अर्थ हाच सर्व चेतनेचा आधार आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

धन्यवाद पवारसाहेब. बाकी व्यासंग वगैरे मोठेमोठे शब्द वापरून मला घाबरवू नका ही विनंती. नेहरूंचे वाक्य दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या राजकारणाविषयी मतेमतांतरे असतील पण त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन कोणी नाकारू नये असे मला वाटते. ते भाक्रा-नांगल धरण, भिलाई स्टील कारखाना यांना आधुनिक भारताची तिर्थक्षेत्रे म्हणाले होते. आजही ते अनेकांना पटले नाही असेच दिसते.पण कधीतरी ते नक्कीच पटेल.असो. धन्यवाद. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

मूळ लेख, चर्चा, इंद्राज यांचा प्रतिसाद आवडला. ज्ञानप्रबोधीनी पद्धतीने हे आवश्यक ते अंतीम संस्कार करताना (दहावा), फक्त एकोद्दिष्ट श्राद्ध की काय इतकेच करतात अशी माझी समजुत आहे. मी विचारले असता त्यांनी पंचक इ.चा विचार करत नाहीत असे सांगीतले. तसेच ते हा विधी करताना, त्या मागची भूमीका सर्व उपस्थितांना सांगतात व त्यांना सामील करुन त्यांच्याकडून तशी प्रार्थना म्हणून घेतात व तसेच ठरलेली रक्कम घेतात (उगाच यजमानाची परिस्थीती बघुन व्हेरीएबल रेट नाही) असो असेच सांगावेसे वाटले. ज्ञानप्रबोधीनी पद्धतीची माहीती असलेल्यांनी आधीक खुलासा करावा ही विनंती.

एक ब्राम्हण एकदा पूजेला बसला होता. समोर दूधाचा नैवेद्य. पण जरा सुरुवात करतो न करतो तोच एक मांजर नैवेद्याच्या आसपास घुटमळायला सुरुवात करतं. एकदा हकलल, दोनदा हकलल, आणि शेवटी ब्राम्हणानी मांजराला दरवाज्याबाहेर बांधून ठेवलं आणि एकदाची पूजा संपवली. पुढे-पुढे हा रोजचाच कार्यक्रम झाला. पूजेला बसण्याआधी मांजराला बांधून ठेवायचं, आणि मगच पूजेला सुरुवात करायची. आता ही गोष्ट रोज त्याची मुल, नातवंड बघत होती. कालांतरानी त्या ब्राम्हणाचा म्रुत्यु झाला, आणि घरातल्या देवघराची जबाबदारी त्याच्या मुलावर येऊन पडली. अर्थात तो सुद्धा मांजराचा जाच टाळण्यासाठी ह्याच पद्धतीने पूजा करू लागला. पण जसजसा काळ पुढे सरकला, तसतसं मांजराला बांधून ठेवण यामागचा मूळ उद्देश मागे पडला, आणि उरलं ते फक्त कर्मकांड. आता ह्यात त्या मूळ ब्राम्हणाला दोष देणार का? दोष द्यायचाच झाला तर, पुढच्या पिढीच्या, मूळ कारण जाणून न घेता, तीच कृती चालू ठेवण्याच्या वृत्तीला द्यावा लागेल. सांगण्याचा मुद्दा हा की, सगळीच कर्मकांड ही काही एका ठोस कारणासाठी चालू झालेली असतात अस नाही, त्या-त्या वेळची तात्कालीक कारणही असू शकतात. फॉलो करण्यारांनी थोडासा डोळसपणा दाखवला की झाल. म्हणूनच, ह्या लेखाच्या संदर्भात बोलायच झाल तर, ही सगळी कर्मकांड ब्राम्हणांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी सुरु केल्येत हे म्हणण थोड आततायीपणाच होईल अस मला वाटत. स्वार्थापेक्षाही, मूळ कारण जाणून न घेतल्यामूळे झालेला हा गोंधळ असतो.

In reply to by सुमीत भातखंडे

गोष्टीबद्दल धन्यवाद भातखंडे साहेब.या रूढीपरंपरा खिसे भरायला घुसडल्या आहेत की इतर कशासाठी याविषयी मतेमतांतरे असू शकतात. काहीही असले तरी त्या कारणावरून सद्यकालीन वैर वाढायला नको.आणि त्या रूढी आपल्याला अयोग्य वाटत असतील तर त्यातूनही आपण बाहेर पडायला हवे.असो. क्लिंटन

हा प्रतिसाद विनाकारण चिंचोळ्या जागेत दिसू नये म्हणून स्वतंत्र प्रतिसाद लिहित आहे.
गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो ? सध्याच्या परिस्थितीत कोणतीही आकाशातून सोडली तर पृथ्वीकडे जाणार हे तात्विकदृष्ट्या सहजच आहे ना? मग त्याविरुद्ध विमाने पृथ्वीपासून दूर जाऊन आकाशात उडतात मग त्याविरुद्ध तुम्ही ओरडता का?
विमान उडते याचे कारण त्याच्या इंजिनातून पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सला overcome करून विमान वर उचलून नेणारा फोर्स निर्माण होतो आणि त्या फोर्सचे नाव आहे lift. तेव्हा lift हा फोर्स गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सपेक्षा जास्त असतो त्यामुळेच विमान जमिनीपासून वर उचलले जाते. त्याच धर्तीवर समजा ’त्या’ ५/३/२ लोकांना न्यायला यमदूत येणार असतील (ते ५/३/२ लोक कोण हे माहित नाही आणि यमदूत येणार कधी हे ही माहित नाही) तर त्या यमदूतांना थोपवून धरेल आणि माघारी धाडेल असे सामर्थ्य तुमच्या पंचकशांतीत आहे का आणि कसे? तरच तुमची विमानाची उपमा मान्य. अन्यथा नाही.
मला एक सांगा एखाद्याचा नातेवाईक गेला आहे त्याला जाऊन सांगा की अरे तुझा नातेवाईक वारला नाहीये त्याने कपडे बदलावे तसे शरीर बदलले आहे आहे आणि बघा त्याची प्रतिक्रिया काय येते ते...
अगदी बरोबर. केवळ वाईट एवढेच वाटते की अशा प्रसंगी ’तुझा नातेवाईक’ अमुकएका तिथीवर, अमुकएका नक्षत्रावर गेला म्हणून अजून आणखी ५/३/२ लोक जातील आणि त्यासाठी शांत करायला हवी असे सांगितल्यानंतरही त्याची प्रतिक्रिया अगदी तशीच आली नाही याचेच तर आश्चर्य आणि वाईट वाटते.
तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करता तेव्हा भरभक्कम रक्कम तुमच्याकडून पोलिस का घेतो? कारण दंड करण्यासाठी ज्यायोगे तुम्ही परत त्या नियमाचं उल्लंघन करू धजाल तेव्हा या दंडाची आठवण होईल.
नाही परत उपमा चुकली. दंड घेणारा कोण असतो?पोलिस. आणि पोलिसाला सरकारचे त्याविषयीचे मॅंडेट असते. असा दंड पोलिस सोडून दुसऱ्या कोणी वसूल केला तर तो गुन्हा आहे. भिक्षुक मंडळी सरकारमध्ये होती का की त्यांना सरकारचे मॅंडेट प्राप्त झाले होते?आणि मॅंडेट प्राप्त झाले असेल तर इतर गुन्ह्यांचे दंड राजाने वसूल करावेत आणि केवळ मांजर मारल्याबद्दल भिक्षुकांना दंड गोळा करायचे मॅंडेट द्यावे याची तर्कसंगती लागत नाही. त्याचप्रमाणे पोलिस जो दंड वसूल करतो तो सरकारच्या वतीने वसूल करतो म्हणजे ती रक्कम सरकारी खजिन्यात जाते (जाणे अपेक्षित असते) पोलिसाच्या खिशात नव्हे. आणि ती रक्कम पोलिसाच्या खिशात गेली तर तो भ्रष्टाचार ठरतो. तेव्हा भिक्षुक हे सरकारचे दंड गोळा करायला नेमलेले एजंट होते का?तसे असेल तर काही तक्रार नाही.
तुमच्या दाव्यात तुमच्या पूर्वग्रहाशिवाय काहीही राम दिसत नाही.
असो.मलाही तुमच्या दाव्यात ’आपले ते चांगले’ असे म्हणत वेगवेगळी कारणे देऊन अनिष्ट गोष्टींचे समर्थन करायचाच प्रयत्न दिसतो. त्यामुळे आपल्याला एकमेकांची मते पटणे शक्य दिसत नाही. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

विमान उडते याचे कारण त्याच्या इंजिनातून पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सला overcome करून विमान वर उचलून नेणारा फोर्स निर्माण होतो आणि त्या फोर्सचे नाव आहे lift. तेव्हा lift हा फोर्स गुरूत्वाकर्षणाच्या फोर्सपेक्षा जास्त असतो त्यामुळेच विमान जमिनीपासून वर उचलले जाते. त्याच धर्तीवर समजा ’त्या’ ५/३/२ लोकांना न्यायला यमदूत येणार असतील (ते ५/३/२ लोक कोण हे माहित नाही आणि यमदूत येणार कधी हे ही माहित नाही) तर त्या यमदूतांना थोपवून धरेल आणि माघारी धाडेल असे सामर्थ्य तुमच्या पंचकशांतीत आहे का आणि कसे? तरच तुमची विमानाची उपमा मान्य. अन्यथा नाही. कदाचित त्या वाक्यांचा भाव तुमच्यापर्यंत पोचलेला दिसत नाही. मुख्य मुद्दा असा की जे तत्व तत्वज्ञानात दिसते त्याविरुद्धच्या अनेक गोष्टी सर्वसामंजस्याने व्यवहारात वापरात आणलेल्या दिसतात.जसे तुम्ही ते इंग्रजीत काहीतरी लिहीले आहे त्यानुसार जर विमान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध वर जाते त्याबद्दल कोण बोंबबोंब करत नाही कारण ते तसे वर उडणे फायद्याचे असते. तसेच ज्याकाळात पंचक नियम सिद्ध होणे सहज शक्य असले तर तेव्हा आलेल्या पंचकशांती वगैरे गोष्टी केवळ स्वार्थीपणाने पैसे काढण्यासाठी आलेल्या वाटत नाहीत. जर त्याकाळात अशी शांत करण्याबद्दल त्या ब्राम्हणाने सांगितले नसते व दुर्दैवाने काही झाले असते तर लोकांनीही या ब्राम्हणाने आम्हाला फसवले असे म्हणायलाही कमी केले नसते. अगदी बरोबर. केवळ वाईट एवढेच वाटते की अशा प्रसंगी ’तुझा नातेवाईक’ अमुकएका तिथीवर, अमुकएका नक्षत्रावर गेला म्हणून अजून आणखी ५/३/२ लोक जातील आणि त्यासाठी शांत करायला हवी असे सांगितल्यानंतरही त्याची प्रतिक्रिया अगदी तशीच आली नाही याचेच तर आश्चर्य आणि वाईट वाटते पुन्हा जसे तुम्ही वागता विचार करता तसाच इतर सगळे करतील असे वाटत नाही. बरेच जण इतरांच्या अनुभवातूनही अ‍ॅनॅलॅटिकली शिकत असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या गुरुजींवर विश्वास ठेवला आणि पंचकशांत केली असेल तर त्यात काहीही गैर वाटत नाही. नाही परत उपमा चुकली. दंड घेणारा कोण असतो?पोलिस. आणि पोलिसाला सरकारचे त्याविषयीचे मॅंडेट असते. असा दंड पोलिस सोडून दुसऱ्या कोणी वसूल केला तर तो गुन्हा आहे. भिक्षुक मंडळी सरकारमध्ये होती का की त्यांना सरकारचे मॅंडेट प्राप्त झाले होते?आणि मॅंडेट प्राप्त झाले असेल तर इतर गुन्ह्यांचे दंड राजाने वसूल करावेत आणि केवळ मांजर मारल्याबद्दल भिक्षुकांना दंड गोळा करायचे मॅंडेट द्यावे याची तर्कसंगती लागत नाही. त्याचप्रमाणे पोलिस जो दंड वसूल करतो तो सरकारच्या वतीने वसूल करतो म्हणजे ती रक्कम सरकारी खजिन्यात जाते (जाणे अपेक्षित असते) पोलिसाच्या खिशात नव्हे. आणि ती रक्कम पोलिसाच्या खिशात गेली तर तो भ्रष्टाचार ठरतो. तेव्हा भिक्षुक हे सरकारचे दंड गोळा करायला नेमलेले एजंट होते का?तसे असेल तर काही तक्रार नाही नाही उपमा चुकली नाही.. दंड घेणारा दंड घेणारा अधिकारी असतो. तुमचे सरकार बिरकार आत्ता आले पूर्वापार धर्मसत्ता आणि राजसत्ता या त्यांच्या त्यांच्या पातळीवर स्वायत्त होत्या. दोन्हींची कार्यक्षेत्रे ठरलेली होती आणि त्यातल्या त्या दंडाधिकारी होते. राजसत्तेचा दंड स्वीकारणे हे त्या त्या गावातील राजकीय प्रतिनिधी (नोकर) यांचे काम होते तसे धर्मसत्तेचे प्रतिनिधी जे क्षेत्रोपाध्ये , ग्रामोपाध्ये असत ते तो दंड स्वीकारीत. त्या ब्राम्हणाला ते दान घेण्याचा अधिकार होता. अशा आणि अनेक इतर बाबतीत ग्रामोपाध्ये प्रायश्चित्त देत व दान स्वीकारत आणि तशा धर्माज्ञा धर्मग्रंथांमधे सापडतात त्यात उल्लेख गरीब ब्राम्हणांना दान करावे असाच उल्लेख सापडतात. . तेव्हा भिक्षुक हे दंड गोळा करणारे अधिकृत लोक होते असे तार्किकदृष्ट्या म्हणावयास हरकत नाही. असो.मलाही तुमच्या दाव्यात ’आपले ते चांगले’ असे म्हणत वेगवेगळी कारणे देऊन अनिष्ट गोष्टींचे समर्थन करायचाच प्रयत्न दिसतो. आमच्या संस्कॄतीकडे आम्ही डोळसपणाने पहायला शिकलो त्यामुळे त्यात आलेल्या गोष्टीमागची भूमिका समजाऊन घेता काहीही आरोप करत असेल तर आम्ही त्याला त्यामागचा अर्थ स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्यामुळे आपल्याला एकमेकांची मते पटणे शक्य दिसत नाही तसे असते तर सदर लेख आणि प्रतिसाद प्रपंच झालाच नसता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जसे तुम्ही ते इंग्रजीत काहीतरी लिहीले आहे त्यानुसार जर विमान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध वर जाते त्याबद्दल कोण बोंबबोंब करत नाही कारण ते तसे वर उडणे फायद्याचे असते
ह्या वाक्याला काही अर्थ नाही. एखादी चुकीची गोष्ट फायद्याची (मग कुणाच्या फायद्याची, माझ्या की तुमच्या? वगैरे) असेल तर त्याविरुद्ध बोंबाबोंब करु नये का? हेच उदाहरण द्यायचे असेल तर विमान उडते ते एका अद्भुत शक्तीमुळे असे कुणी उद्या म्हणाले, (विमान उडण्यातील फायदा त्यासोबत आहेच्) तर बोंबाबोंब करु नये का? विमान का उडते ह्याचे कारण १२वी शिकलेल्यालाही कळु शकते म्हणुन कोणी बोंबाबोंब करत नाही. बाकी चालु द्या.

जसे तुम्ही ते इंग्रजीत काहीतरी लिहीले आहे त्यानुसार जर विमान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध वर जाते त्याबद्दल कोण बोंबबोंब करत नाही कारण ते तसे वर उडणे फायद्याचे असते.
नुसते फायद्याचेच असते असे नाही तर विमान उडते हे निर्विवादपणे सिध्द करता येते (ते समोरच दिसत असते) तसे पंचकशांती केली म्हणून ’त्या’ पाचांना न्यायला आलेले यमदूत मागे फिरले असे निर्विवादपणे सिध्द करता येईल का?आता यावर कोणता टिपीकल प्रश्न मला तुम्ही विचारणार हे मला आधीच माहित आहे म्हणून त्याचे उत्तर आधीच देतो.तुम्ही विचारणार की इलेक्ट्रीसिटी दिसत नाही तरीही त्यावर विश्वास ठेवता ना?याचे कारण ती उर्जा दिसत जरी नसली तरी तिचे परिणाम दिसतात.त्यामुळे इलेक्ट्रीसिटीवर विश्वास ठेवतो.त्याचप्रमाणे जर ’ते’ पाच लोक कोण आणि ते पंचक लागल्यामुळे अमुकएक दिवसात मरणार होते पण पंचकशांती केल्यामुळे त्यांचे मरण पुढे गेले हे सिध्द करून दाखवा. आता ’ते’ पाच लोक कोण हेच मुळात माहित नसेल आणि ते पंचक लागल्यामुळे किती काळात मरणार हे पण माहित नसेल तर कधीही ’पाच जणांना वाचवले’ असे म्हणता येऊ शकते. म्हणजे पंचकशांती करूनही एखादा गेला तर ’अरे तो त्या पाचांमधला नव्हताच’ किंवा अगदी पाच जण जरी महिन्याभरात गेले तरी ’अरे पण पंचकशांती केली नसती तर ते त्याहूनही लवकर गेले असते’ आणि पंचकशांती केली नसेल तर ’पंचकशांती केली नाही म्हणून ते गेले’ यासारख्या पळवाटा काढायला स्कोप राहतो. तेव्हा पंचकशांती केली आणि अमक्याअमक्या पाच जणांचे मृत्यू (जे समजा महिन्याभरात होणार असतील ते) पुढे ढकलले असे दाखवून द्या. कोणत्याही प्रयोगात केवळ दोन गोष्टी एकावेळी घडणे हे दाखवणे पुरेसे नसते तर एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली हे दाखवून द्यायला अ. जेव्हा जेव्हा पहिली गोष्ट होते तेव्हातेव्हा दुसरी गोष्ट होतेच होते ब. आणि जेव्हा जेव्हा पहिली गोष्ट होत नाही तेव्हा तेव्हा दुसरी गोष्ट कधीच होत नाही आणि असे असेल तरच एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडली असे म्हणता येते. आणि त्यातही एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते हे सिध्द करायला अजून काही अटी पूर्ण करायला लागतात पण सध्या ती क्लिष्टता बाजूला ठेऊ. तेव्हा या आधारावर पंचकशांती सिध्द करता येईल का?तशी ती आली तरच मी तुमचा मुद्दा मान्य करेन अन्यथा नाही.
त्या ब्राम्हणाला ते दान घेण्याचा अधिकार होता. अशा आणि अनेक इतर बाबतीत ग्रामोपाध्ये प्रायश्चित्त देत व दान स्वीकारत आणि तशा धर्माज्ञा धर्मग्रंथांमधे सापडतात
अहो हिच तर गोम आहे ना.धर्मग्रंथ लिहिणारे आणि त्यात ज्या लोकांना दान द्यावे असे लिहिले असेल ते लोक एकच असतील तर हा थोडासा nepotism चा प्रकार नाही का? असो. तरी मांजराबद्दलचा मुद्दा तुम्ही म्हणता म्हणून मान्य.

In reply to by क्लिंटन

तेव्हा या आधारावर पंचकशांती सिध्द करता येईल का?तशी ती आली तरच मी तुमचा मुद्दा मान्य करेन अन्यथा नाही. इथला माझा प्रतिसाद पंचकशांतीची सिद्धता करण्याचा नाही असे माझे वरचे इतर प्रतिसाद वाचले तर सहज लक्षात येईल. मुद्दा त्या गोष्टीवरून माझ्या पूर्वजाना स्वार्थी म्हणून बोल लावण्याचा आहे. म्हणूनच वरच्या इतर प्रतिसादांमधे मी तुम्हाला पंचकशांती वगैरे पटत नाही हे मल मान्य आहे असे म्हटलेच आहे ; आक्षेप आहे ते ब्राम्हणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या गोष्टी जन्माला घातले असे म्हणण्याला. त्यापुढे जाऊन मी असे म्हणलो की त्या गोष्टी जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हा पंचकाची अनुभूती येणे सहज शक्य होते. आताही त्याची अनुभूती कोणाला आल्यामुळे त्या व्यक्तीने त्याच्या अनुभवाची माहीती इतरांना करून दिली आणि त्याच्या मताचा प्रचार केला तर त्यात काही गैर नाही कारण तसा प्रचार तुम्हीही तुमच्या मताचा (प्राणायाम, भगवद्गीता) करत असता. मग त्या माणसाने तो तसा केला तर त्याच्यावर भिती दाखवून पैसे उकळल्याचा आरोप कसा. बरं अनेक भिक्षुकांच्या घरी देखील त्यांनी पंचकशांत करताना मी पाहीले आहे. मग ती गोष्ट ते स्वतःही पाळत असतील आणि इतरांना पाळण्याचा उपदेश करत असतील तर त्यात भिती दाखवून पैसे काढण्याचा आरोप कसा? अहो हिच तर गोम आहे ना.धर्मग्रंथ लिहिणारे आणि त्यात ज्या लोकांना दान द्यावे असे लिहिले असेल ते लोक एकच असतील तर हा थोडासा nepotism चा प्रकार नाही का? असो. तरी मांजराबद्दलचा मुद्दा तुम्ही म्हणता म्हणून मान्य. धर्मग्रंथ लिहीणारे जे काही लोक होते ते सगळे रानावनात राहून उपासना करून कंदमुळे खाऊन जगत असत. कोणतेही ऋषि पूर्वीपासून आश्रमात राहणारे, साधना करणारे विरक्त असे होते; त्यांनी सांगितलेल्या गोष्टीत त्यांचा स्वार्थ नव्हता म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांनी प्रश्न न विचारता पाळल्या. पुराणोपपुराणांमधे आलेली ऋषिमुनिंची वर्णने पाहीली तर सर्व विरक्त लोक होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या दानांचा वगैरे फायदा त्यांना मुळीच नव्हता. त्यामुळे Nepotism वगैरे वाटत नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यापुढे जाऊन मी असे म्हणलो की त्या गोष्टी जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हा पंचकाची अनुभूती येणे सहज शक्य होते. आताही त्याची अनुभूती कोणाला आल्यामुळे त्या व्यक्तीने त्याच्या अनुभवाची माहीती इतरांना करून दिली आणि त्याच्या मताचा प्रचार केला तर त्यात काही गैर नाही
if at all पाच लोक गेल्याची अनुभूती कोणाला आली तरी शांत केल्यामुळे पाच लोकांचे प्राण वाचतील याची अनुभूती कायम येईल अशीच व्यवस्था आहे ही. याचे कारण ते पाच लोक कोण आणि ते कधी जातील याची टाईमफ्रेम सांगितलेली नाही.म्हणजे १. पंचकशांती केली नाही आणि कोणी गेले तर म्हणायचे शांत केली नाही म्हणून ते गेले. २. पंचकशांती केली नाही आणि तरी कोणी गेले नाही तर म्हणायचे की ’थांबा. अजून ’ती’ टाईमफ्रेम उलटलेली नाही आणि त्यापूर्वी कधीही लोक जाऊ शकतात’. ३. पंचकशांती केली आणि कोणी गेले तर म्हणायचे ’अरे तो या पाच जणांमधला नव्हताच’. ४. पंचकशांती केली आणि कोणी गेले नाही तर म्हणायचे ’पंचकशांती केली म्हणून कोणी गेले नाही’ तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ’पाच लोक वाचतील’ ही अनुभूती येणारच आहे. प्रश्न एवढाच की अशी यंत्रणा योग्य आहे का? तसा प्रचार तुम्हीही तुमच्या मताचा (प्राणायाम, भगवद्गीता) करत असता. मग त्या माणसाने तो तसा केला तर त्याच्यावर भिती दाखवून पैसे उकळल्याचा आरोप कसा. याचे कारण परत एकदा सांगतो की प्राणायाम करून तुमचे चांगले होईल असे मी म्हणतो. प्राणायाम केला नाहीत तर तुमचे वाईट होईल असा उलटा प्रचार करत नाही.आणि प्राणायाम करून दिवसभर जास्त energetic वाटते याचे अक्षरश: लाखो अनुभव आहेत आणि त्याचवेळी प्राणायाम करून काही फायदा झाला नाही असे म्हणणारे लोकही सापडतीलच.तेव्हा समोरच्या माणसाला दोन्ही बाजू ऐकून घेऊन योग्य ते मत बनवता येते. पण इथल्या व्यवस्थेत वर म्हटले तरी कोणत्याही परिस्थितीत ’पाच लोकांचा मृत्यू टाळल्याची’ अनुभूती येणारच आहे. उलट शांत केली नाही तर ’ती’ टाईमफ्रेम उलटायच्या आत कोणाचा नंबर लागणार ही भिती असणार आहे. हा बोगस प्रकार नाही का?आणि म्हणूनच तसे करणाऱ्यावर फसवणुकीचा आरोप मी करतो. असो. बाकी पेशवे एक गोष्ट सांगतो की यावर आपले एकमत होणे कठिण दिसते.आणि ही चर्चा indefinitely चालू राहू शकते.तेव्हा आपण ही चर्चा आता इथे थांबविणे इष्ट असे मला वाटते कारण तेच तेच मुद्दे परत परत येणार आणि कोणीच दुसऱ्याचे ऐकणार नाही.तेव्हा let's agree to disagree. थोड्या वेळापूर्वी तात्यांना ऑफर दिलीच आहे हॉटेलात जाऊन सूप प्यायची. नुसते सूपच काय आपण चांगला पुख्खा झोडून येऊ आणि बिल मी भरणार. तेव्हा आपण उरलेली चर्चा तिथे करू. How about that? क्लिंटन

In reply to by क्लिंटन

असो तुमची इच्छा नाही तर इथेच थांबू. बाकी पुख्खा झोडायला झोडायला कुठेही येऊ शकतो पण शुद्ध शाकाहारी असल्याने तशी व्यवस्था व्हावी. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

(दोघांनीही ह. घ्या.) भलतीच अपेक्षा काय करता? तुम्ही पुण्याचे पेशवे. तुम्हाला जेवणावळींची सवय. तो एकारान्त कोकणस्थ. स्वतः पोटभर जेवला तरी खूप झाले म्हणायचे.

In reply to by योगप्रभू

अहो पेशवेही ’एकारान्त’ नसले तरी कोकणस्थच होते की. :) नाही हो पेशवे योगप्रभूंचे एकू नका. मी अगदी पोटाला तडस लागेपर्यंत खातो आणि मी ही शाकाहारीच. ह.घ्या. हे सांगणे न लागे. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

सहमत आहे. मी पण पोटाला तडस लागेपर्यंत शाकाहारी खाणे खातो. अंबळ पुण्यात कधी येताय बोला ;) भेटूच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अरेच्या! शेवटी पुख्खे झोडण्यासाठीच का केला होता दोघांनी हा अट्टाहास? उगाच त्या भटाभिक्षुकांना उचक्या लावून दिल्यात राव! दोघांनीही हलके घेणे :) चर्चा वाचनीय होती हे वेगळे सांगायची गरज नाही :)

@ क्लिन्टन : मला तुमचा अभ्यास आणि हिरिरी याची दाद द्याविशी वाटते. तुम्ही नमूद केलेल्या सर्व मतांशी मी सहमत आहे. काठावर बसुन वाचत होते, पण प्रतिक्रिया दिल्यावाचुन राहावले नाहि. :)

एकुलता एक सम्राट ज्याने पार अफगाणिस्तान पर्यंत एक छत्री भारतीय साम्राज्य तयार केलं होतं आपल्या पराक्रमाने व त्या नन्तर कैक हजार वर्ष कुनी दुश्मन भारता कडे पहायची पन हिम्मत करु शकला नाही. त्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य चा गुरु आर्य चाणक्य हा ब्राह्मण होता हे काय कमी आहे काय? "भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने" बाय वीर सावरकर ( खरे खरे ब्राह्मण)ज्याने वाचले नाही त्याला भारतीय ईतिहासच माहीत नाही. माझ्या मते ते पुस्तक अगदी कम्पलसरी केलं पाहीजे पुर्न भारतातील शिक्शनात सर्व भाषांत ट्रान्सलेट करुन कायद्याने. बाय द वे. जेव्हा अलेक्जान्डर भारतात आला होता तेव्हा त्याच्या लोकांनी भारतीय ब्राह्मणांचे काय वर्णन लिहुन ठेवले आहे ते वाचा. मग कळेल ब्राह्मण काय होते ते? आक्सफर्ड डिक्शनरीत कुठल्याच भारतीय जाती बद्दल माहीती नाही. पन ब्राह्मण हा शब्द व त्याची माहीती आहे. का? त्यांना माहीत आहे व होते की ब्राह्मण काय होते काय आहेत काय असु शकतील? गर्व से कहो हम ब्राह्मण है! हिन्दु कुष पर्वत हे नाव का पडले आहे अफगाणिस्तान मधील पर्वताचे?

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

जरा हा लेख आणि त्यावर झालेल्या चर्चेत मी लिहिलेले प्रतिसाद वेळ काढून वाचा म्हणजे सगळ्या ब्राम्हणांना दोष दिलेला नाही तर कर्मकांडांचे स्तोम माजविणाऱ्यांना दोष दिला आहे हे आपल्या लक्षात येईल.
त्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य चा गुरु आर्य चाणक्य हा ब्राह्मण होता हे काय कमी आहे काय?
नाही ना. पण चाणक्याने अतिशय सेन्सिबल असे अर्थशास्त्र लिहिले आणि आदर्श राज्यकारभार कसा करावा ते सांगून ठेवले ते आजच्या काळातही लागू होते. तेव्हा ती गोष्ट जरूर घेण्यासारखी आहे.चाणक्याने कर्मकांडाचे स्तोम माजविले का? नाही ना? असे स्तोम न माजविणाऱ्यांविषयी माझे काहीही म्हणणे नाही.
"भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने" बाय वीर सावरकर ( खरे खरे ब्राह्मण)ज्याने वाचले नाही त्याला भारतीय ईतिहासच माहीत नाही.
होय मी ते पुस्तक वाचले आहे. मूळ मराठी नाही पण त्याचे इंग्लिश भाषांतर. आणि वीर सावरकर हे खरे खरे ब्राम्हण हे १००% मान्य. कारण त्यांनी हिंदूंनी विज्ञान हाच धर्म पाळावा असे सांगितले आणि कोणत्याही कर्मकांडांना थारा दिला नाही. अवांतर: सावरकरांचे हिंदुत्व पटलेल्यांना त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन पटला नाही आणि त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन पटलेल्यांना त्यांचे हिंदुत्व पटले नाही.त्यामुळे सावरकरांना इतर नेत्यांप्रमाणे अनुयायी मिळाले नाहीत.तरीही ’मी आज जी गोष्ट सांगतो ती लोकांना अनेक वर्षांनी पटते आणि त्यासाठी माझी अनेक वर्षे थांबायची तयारी आहे’ असे म्हणायचे conviction केवळ सावरकरांकडेच होते. आणि आजनाउद्या सगळ्यांना त्यांचे विचार पटतील याविषयी कोणतीही शंका नाही. क्लिंटन

FACTS TO MAKE EVERY Indian PROUD Q. Who is the GM of Hewlett Packard (hp) ? A. Rajiv Gupta Q. Who is the creator of Pentium chip (needs no introduction as 90% of the today's computers run on it)? A. Vinod Dahm Q. Who is the third richest man on the world? A. According to the latest report on Fortune Magazine, it is Azim Premji, who is the CEO of Wipro Industries. The Sultan of Brunei is at 6 th position now. Q. Who is the founder and creator of Hotmail (Hotmail is world's No.1 web based email program)? A. Sabeer Bhatia Q. Who is the president of AT & T-Bell Labs (AT & T-Bell Labs is the creator of program languages such as C, C++, Unix to name a few)? A. Arun Netravalli Q. Who is the new MTD (Microsoft Testing Director) of Windows 2000, responsible to iron out all initial problems? A. Sanjay Tejwrika Q. Who are the Chief Executives of CitiBank, Mckensey & Stanchart? A. Victor Menezes, Rajat Gupta, and Rana Talwar. Q. We Indians are the wealthiest among all ethnic groups in America , even faring better than the whites and the natives. There are 3.22 millions of Indians in USA (1.5% of population). YET, 38% of doctors in USA are Indians. 12% scientists in USA are Indians. 36% of NASA scientists are Indians. 34% of Microsoft employees are Indians. 28% of IBM employees are Indians. 17% of INTEL scientists are Indians. 13% of XEROX employees are! Indians. Some of the following facts may be known to you. These facts were recently published in a German magazine, which deals with WORLD HISTORY FACTS ABOUT INDIA . 1. India never invaded any country in her last 1000 years of history. 2. India invented the Number system. Zero was invented by Aryabhatta. 3. The world's first University was established in Takshila in 700BC. More than 10,500 students from all over the world studied more than 60 subjects. The University of Nalanda built in the 4 th century BC was one of the greatest achievements of ancient India in the field of education. 4. According to the Forbes magazine, Sanskrit is the most suitable language for computer software. 5. Ayurveda is the earliest school of medicine known to humans. 6. Although western media portray modern images of India as poverty striken and underdeveloped through political corruption, India was once the richest empire on earth. 7. The art of navigation was born in the river Sindh 5000 years ago. The very word "Navigation" is derived from the Sanskrit word NAVGATIH. 8. The value of pi was first calculated by Budhayana, and he explained the concept of what is now k! nown as the Pythagorean Theorem. British scholars have last year (1999) officially published that Budhayan's works dates to the 6 th Century which is long before the European mathematicians. 9. Algebra, trigonometry and calculus came from India . Quadratic equations were by Sridharacharya in the 11 th Century; the largest numbers the Greeks and the Romans used were 106 whereas Indians used numbers as big as 10 53. 10. According to the Gemmological Institute of America, up until 1896, India was the only source of diamonds to the world. 11. USA based IEEE has proved what has been a century-old suspicion amongst academics that the pioneer of wireless communication was Professor Jagdeesh Bose and not Marconi. 12. The earliest reservoir and dam for irrigation was built in Saurashtra. 13. Chess was invented in India . 14. Sushruta is the father of surgery. 2600 years ago he and health scientists of his time conducted surgeries like cesareans, cataract, fractures and urinary stones. Usage of anaesthesia was well known in ancient India . 15. When many cultures in the world were only nomadic forest dwellers over 5000 years ago, Indians established Harappan culture in Sindhu Valley ( Indus Valley Civilisation). 16. The place value system, the decimal system was developed in India in 100 BC. Quotes about India . We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. Albert Einstein. India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend and the great grand mother of tradition. Mark Twain. If there is one place on the face of earth where all dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India . French scholar Romain Rolland. India conquered and dominated China culturally for 20 centuries without ever having to send a single soldier across her border. Hu Shih (former Chinese ambassador to USA ) ALL OF THE ABOVE IS JUST THE TIP OF THE ICEBERG, THE LIST COULD BE ENDLESS. BUT, if we don't see even a glimpse of that great India in the India that we see today, it clearly means that we are not working up to our potential; and that if we do, we could once again be an evershining and inspiring country setting a bright path for rest of the world to follow. I hope you enjoyed it and work towards the welfare of INDIA . Say proudly, I AM AN INDIAN. Please forward this email to all known INDIANS................