Skip to main content

तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का? असल्यास किती जण/जणी आवडतात हे पण सांगा..

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1587
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

कृपया मनापासून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कौल संपल्यानंतर आकडेवारीचा आढावा घेणारा एक लेख लिहिण्याची इच्छा आहे. धन्यवाद.

In reply to by केशवसुमार

हा भंपक कौल नाही हा तुमचा प्रतिसाद 'नव्या सिस्टिम प्रमाणे' पहिला असूनही वर राहणार नाही. त्यामुळे या खुलाशाचा काही उपयोग नाही. नव्या सिस्टिममध्ये सुधारणा होईपर्यंत (कौलात मॅटर लिहिण्याची सोय होईपर्यंत किंवा प्रतिसादांचा क्रम जुना सर्वात वर असे होईपर्यंत) वरून फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत.

In reply to by नितिन थत्ते

नव्या सिस्टिमवर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नितिन थत्ते यांचा निषेध.
वरून फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत.
याला काय अर्थ आहे? जर कौल प्रवर्तकाने लिहिलं असेल की हा कौल फुटकळ नाही, तर तुम्हाला त्यावर विश्वास का ठेवता येत नाही?

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवींशी आम्ही ह्या वेळेस मात्र संपुर्ण सहमत आहे.. (सहमत कौलारु)केशवसुमार

In reply to by गणपा

कळला नाही.

In reply to by विनायक प्रभू

आणि बेडुकउडीशी सहमत

In reply to by राजेश घासकडवी

लिहिलं असेल की हा कौल फुटकळ नाही, तर तुम्हाला त्यावर विश्वास का ठेवता येत नाही? और ये लगा सिक्सर!!!!

In reply to by सहज

सहज शेठ, गुर्जी इतक मैलिक ज्ञान देत आहेत आणि तुम्ही आपले क्रिकेट खेळत बसलाय ... आहो गुर्जीनी स्वतः येऊन आम्हाला प्रतिसाद आणि खरडीतून सहजा सहजी समजेल अशी दिक्षा नाना तर्‍हेने दिली आणि जा माझा माझ्या धाग्यावर लिहिलेला पहिला प्रतिसाद वाच अशी अज्ञा दिली.. हाच तो बोधीसत्व प्रतिसाद

In reply to by राजेश घासकडवी

तेच तर माझ्या प्रतिसादात लिहिलं आहे. कौल फुटकळ नाही हे लिहिले असले तरी ते आता पार खाली गेले आहे. मग नव्याने कौल पाहणार्‍याला पटकन दिसणारच नाही. एखादी सूचना ही टोचण्यासाठीच असते; 'सुधारणा व्हावी' म्हणून असूच शकत नाही अशी ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर झाली आहे की काय अलिकडे?

In reply to by नितिन थत्ते

कौल फुटकळ नाही हे लिहिले असले तरी ते आता पार खाली गेले आहे. मग नव्याने कौल पाहणार्‍याला पटकन दिसणारच नाही.
वरकरणी फुटकळ दिसणारे कौल काढून केसुगुर्जींची प्रतिमा खालावू शकत नाही असं माझं मत आहे. दुर्दैवाने ते इथे विचारलेलं नाही. असो, कौलात मत टाकलं आहे.

In reply to by नितिन थत्ते

थत्तेशेठ हे फारच झाले.. फुटकळ वाटण्याची शक्यता असलेले कौल काढू नयेत. अगदी आणिबाणीतला हा फतवाच वाटला अस बरेच काही होऊ नये असं बर्‍याच जणाना वाटतं त्याचा काही उपयोग आहे का..बाकी चालू दे..

In reply to by मिसळभोक्ता

दृष्टीने जी आवडीची व्याख्या आहे ती लिहावी आणि त्या अनुशंगाने आपले मत लिहावे..

In reply to by केशवसुमार

मग तुमच्या कौलातून निघणारे निष्कर्ष चुकीचेच असतील. व्याख्या अगदी अचूक हवी: उदा: बघायला आवडते बोलायला आवडते प्रतिसाद द्यायला आवडते चेष्टा करायला आवडते छेडखानी करायला आवडते जवळ जायला आवडते स्पर्श करायला आवडते (ह्यापेक्षाही अचूक व्याख्या करता येईल, पण समाज हळवा वगैरे काहीतरी आहे म्हणतात.) ... बाकी मास्तरांना विचारू. त्यामुळे पास.

In reply to by केशवसुमार

व्यक्ती आवडते म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा दिसत नाही. आवडणे = like & or love & or respect अशी काहीशी सरमिसळ जोडीदार आयुष्यात यायच्या आधीच आई-वडील, आजी-आजोबा, मामा-मावश्या-काका-आत्या-काकू, भावंडे, मित्रपरिवार, मग विश्व विस्तारत गेल्यावर समाजातील इतर व्यक्ती, ओळखीच्या अथवा त्यांच्या कार्यामुळे माहीत असलेल्या इ इ बरेच जण आवडत गेले व आवडतात. प्रत्येक व्यक्तीमधे गुण अवगुण दोन्ही असल्याने एखादी व्यक्ती आवडण्याची इंटेंसिटी कमी जास्त असते.

ही आमची मधुबाला. हिच्यावर आमचा भारी जीव. किती जणी आवडतात यांची मोजदाद चालू आहे म्हणून अजून मत दिलेलं नाही.

मला माझे आणि इतर बरेच जोडीदार आवडतात, त्यांच्या शिवाय माझे पान हलू शकत नाही. सध्याच्या घडीला एकूण ३३५ जोडीदार आहेत. त्यांच्या पुढे पुढे करावे लागते आणि मागे मागे पळावे लागते. त्यांनी सोडून दिले तर मी आपटलोच म्हणून समजा.

कौ.म.टा.आ.

टिंग्याशी सहमत!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

वरती फ्रॅक्चर बंड्या व प्रविन भप्करशी सहमत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मोडक गुर्जी, डान्या आणि मुसुंशी सहमत.

In reply to by Nile

आंद्याशी सहमत

In reply to by मस्त कलंदर

धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी सहमत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमालदादाभाऊ पडवळसाहेबांशी सहमत.
धमालदादाभाऊ पडवळसाहेब(मार्ल्बोरो हृदय सम्राट) (बारामती -BM रिटर्न) असा बदल सुचवु इच्छीतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमालदादाभाऊ पडवळसाहेब(मार्ल्बोरो हृदय सम्राट) (बारामती -BM रिटर्न)
खर्र खर्र मार्ल्बोरो हृदय सम्राट असा आणखी एक बदल सुचवू इच्छिते.

१)मित्रा जिंकलस. २)आजवर इतकी कौलं पाहिली पण 'या सम हाच'! वा वा!! ३)हा कौल पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर असंच एक कौल फोडलं होतं मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे. ४)कौल पाहून अंमळ हळवा झालो. ५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला. यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या. -(पर्यायी) प्रतिक्रियासुमार.

In reply to by धमाल मुलगा

गांधीवादींशी सहमत!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

नान्याशी सहमत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नंदन, विकास काका अन थत्ते काकांशीपण सहमत.

प्राणी, निर्जीव वस्तू चालणार नाहीत का? ;) नाईलाजाने इथे सांगता येणार नाही.. :D :D :D :D :D

तुम्हाला तुमचा जोडीदार सोडून दुसरा/दुसरी कोणी व्यक्ती आवडते का? आम्हाला आमचा जोडीदार धरुन दुसरा/दुसरी सर्व व्यक्ती आवडतात. असल्यास किती जण/जणी आवडतात हे पण सांगा.. किती जण/जणी आवडतात याची मोजदाद आमचे शेजारी करतात. (त्यान्ना विचारुन सान्गतो) (इथे / ही रेष विरुद्ध लिन्गी पर्याया करिता आहे असे ग्रुहीत धरुन उत्तर दिले आहे)

>> कृपया मनापासून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कौल संपल्यानंतर आकडेवारीचा आढावा घेणारा एक लेख लिहिण्याची इच्छा आहे. लेखाची वाट पहात आहे.