आताच ही दिव्य पाटी आमच्या मेल बॉक्स मध्ये ढकलपत्राद्वारे येउन पडली. ती तुम्हा मिपाकरांसमोर ठेवत आहे. धोरणात बसत नसल्यास उडवली तरी चालेल.
अशी ही पाटी--

वाचने
19243
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर आहे! तुमची प्रगती तर
सुंदर आहे! तुमची प्रगती तर भन्नाटच आहे.
नॉण आयटी वाल्यांना पाटी दिसत
नॉण आयटी वाल्यांना पाटी दिसत नाही का ?
पाटी धोरणाबाहेरची असल्यामुळे
पाटी धोरणाबाहेरची असल्यामुळे ऑपॉप* उडली का काय?
*धमुच्या भाच्याच्या कृपेने
पितृपक्ष चालू आहे म्हणून दिसत
पितृपक्ष चालू आहे म्हणून दिसत नसावी.
शांत केल्यावर दिसेल.
ही ती पाटी
काही जणांना का दिसत नाही संपादकांनाच ठाउक.
संपादकांना विनंती, पाटी वर आणावी.
ही बघा-
इतक्या तरुण लोकांच्या
In reply to ही ती पाटी by प्रचेतस
इतक्या तरुण लोकांच्या नावापुढे भाई, जी अन दादा-पादा बघितले की हसावे की रडावे कळत नाही राव. ते सोडा.
चक्क "तरुणी हृदयसम्राट!!" च्यायला!!
हसावे का?
In reply to इतक्या तरुण लोकांच्या by Nile
हसावे का? कळलं असेल तर मलाही अंमळ जोक समजावून दे ना! च्यायला, माझ्या विनोदबुद्धीच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडल्या तरी चालतील पण तरीही यातला विनोद सांगच काय आहे ते!
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना
In reply to हसावे का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना कळायला पाहिजेच असे नाही. पण बड्डे ला गिफ्ट म्हणुन असं एखादं होर्डिंग लावायची भन्नाट आयटीया कशी वाटते तुम्हाला सांगा? तुमच्या बड्डेला गॅगुंगुगेगोगगोगुगु चा फुल्ल फार्म सुद्धा लिहु! कसें?
ते लिहा तुम्ही आमच्या
In reply to ते सोडा, सगळं काय सगळ्यांना by Nile
ते लिहा तुम्ही आमच्या बड्डेला, पण तुम्हालाही जोक समजला नाही हे मान्य करा की आधी!
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे
In reply to हसावे का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे कुच बी जोक बीक नही है, वो नारणमुर्ती कि कोन है ना, उस्के बाद आय टी ईंडस्ट्री मे ईतना भरीव काम अपुनके अंकुर भाय ने ही किया है, बोले तो एकदम 'तरूणीहृदयसम्राट' बनना किसी बच्चे का काम नही है.. ! समझे क्या?
भरिव म्हणजे सोलिड म्हणजे
In reply to अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे by अनिल २७
भरिव म्हणजे सोलिड
म्हणजे आमच्या भाषेत
शॉल्लिट
आजकल अपने भाय शुध हिंदी सिख
In reply to भरिव म्हणजे सोलिड म्हणजे by गांधीवादी
आजकल अपने भाय शुध हिंदी सिख रहेले है ! 'भरीव' ऊसीका नतीजा है, क्या?
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे
In reply to आजकल अपने भाय शुध हिंदी सिख by अनिल २७
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे भी भरीव कामगिरी करेंगे.
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे
In reply to शायद फिर सूद लेखन के शेत्र मे by गांधीवादी
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे भी भरीव कामगिरी करेंगे. >>
और फिर फ्लेक्स लगांयेगे
(युक्रेन गर्ल्स हार्ट थिफ)
>>और फिर फ्लेक्स
In reply to शायद फिर सूद लेखन के शेत्र मे by सुहास..
>>और फिर फ्लेक्स लगांयेगे
बादमे इधरकु पाटि धागा डालेंगे
अंकुरभाय मे दमीच ईतना है के
In reply to >>और फिर फ्लेक्स by गांधीवादी
अंकुरभाय मे दमीच ईतना है के पुरे मिसल्पाव पे उनकेच धागे निकलेंगे !
धागेच धागे निकलेंगे तो हम
In reply to अंकुरभाय मे दमीच ईतना है के by अनिल २७
धागेच धागे निकलेंगे तो हम उस्के कपडे बनयेंगे और पेहेनेंगे.
हे राम
In reply to ही ती पाटी by प्रचेतस
एखाद्या गोष्टीचा आगापिछा माहिती नसला की असे धागे येतात
अहों माझ्या मित्राच्या कंपनितील लोकांनी केलेली मिस्चिफ आहे ती
अंकुरला तिथे ५ वर्ष पूर्ण झालि म्हणून कंपनीने त्याला मोमेंटो दिला,तर आपणही काही द्यावे म्हणून फोटो शॉप वापरून एका बॅनरचे
केलेले रुपांतर आहे हे. ट्रिपला काढलेले फोटो चिकटवून वर पेंटब्रश वापरून केशरी टिळा लावला आहे.
निट पाहिल्यास अंकुरच्या कपाळावरचा टिळाही दिसेल.
' तरूणी हृदय सम्राट " ही मित्रामित्रांतील उगीच गंमत.
काय पण लोक एकेक!:)
हा हा हा. वाटलंच होतं. एक
In reply to हे राम by साती
हा हा हा. वाटलंच होतं.
एक दोन लोक सोडले तर बाकीचे मात्र पक्के राजकारणी (रीड गुंड ;-) ) वाटतात म्हणून लोक फसले असतील. (ही तुमच्या फोटोशॉपींगची स्तुती आहे हे ध्यानात आलेच असेल ;-) )
बाकी तुम्ही कुठले जी यातले? :)
म्हणजे वल्ली अन साती हा
In reply to हे राम by साती
म्हणजे वल्ली अन साती हा एकाचाच आयडी आहे का? की वल्ली अन साती अंकूरदादाच्याच कंपनीत काम करतात?
(विषय दिलेला नाही)
:)
अंकुरxx
अंकुरxx बहुतेक बंदरछाप काळ्या पावडर ने दात घासत असावे? छान
कपाळावर हात मारून घेण्याची
कपाळावर हात मारून घेण्याची स्मायली कोठे मिळेल?
सौजन्य
संजू बाबा कुठे दिसत नाही .
भाईंची अगदी वाट लावलीय
भाईंची अगदी वाट लावलीय की..किती वाइट अवस्था ही, चेल्यांकडून 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी जाहिरपणे लावून घ्यावी लागतेय . ..हहपुवा. नशिब पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो लावले नाहीत अजून काय काय रिटर्न ते सिद्ध करायला .
पाटी भारीच आहे हो . बादवे कोण आहेत हे सगळे भाई, दादा, जी ? काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत .
>काळे चश्मे लावलेले तर कसले
In reply to भाईंची अगदी वाट लावलीय by पुष्करिणी
>काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत.....
सहमत.......
स्वतःला हिरो समजणारे कावळे!!!! :)
कायतरीच हां! खतरनाक कसले?
In reply to भाईंची अगदी वाट लावलीय by पुष्करिणी
कायतरीच हां!
खतरनाक कसले? अगं, त्या सगळ्यांमध्ये लांब केसांपासून ते शुन्य केसांपर्यंत सगळे प्रकार आहेत.
आहाहा..
काय एक एक नमुने दिसतायेत ! 'शाका' ची नाहीतर 'मोगँबो'ची गँग मोकाट सुटलीय असे वाटतेय !
येडपटच हाय च्यायला !! पाच
येडपटच हाय च्यायला !! पाच वर्ष मॅनेजरची चमचा गिरी * करून वरनं पोस्टरबी लावतया!!
* सभ्यतेच्या मर्यादेमुळे 'चमचागिरी' हा शब्द वापरला आहे
जबराटच है!
जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा! :D
तरूणीहृदयसम्राट , इंग्लंड-UK रिटर्न
यावरून आठवले :
एक लग्नपत्रिका पाहिली होती. नवर्यामुलाचा भाऊ इंग्लंडमधल्या कुठल्यातरी कंपनीत मॅनेजर होता. (कसला ते माहिती नाही.) आमंत्रण पत्रिकेत त्याच्या नावाखाली चक्क "Manager, UK" असं छापलं होतं!
ती पत्रिका अजून आहे कदाचित माझ्याकडे. सहसा असल्या आयटम्सची विल्हेवाट लावत नाही! मिळाल्यास फोटू देईनच! :D
हेच..
In reply to जबराटच है! by मेघवेडा
>> जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा!
याच कारणामूळे मीपण ऊघडला नव्हता हा धागा....
हीहीही
In reply to हेच.. by अनिल २७
=)) =)) =))
भाचा
माझ्या भाच्याला एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण सांगुन आली होती.
त्यात लिहीले होते उंची ५ फुट ५ इंच. हाय हील सकट.
नशिब पत्रिका जुळली नाही.
पण आम्ही कमनशिबी, चित्रपट
In reply to भाचा by विनायक प्रभू
पण आम्ही कमनशिबी,
चित्रपट सृष्टीने एक हिरो गमावला ना.
कृपया हलके घ्या.
भाच्याच सोडा मास्तर
In reply to भाचा by विनायक प्रभू
भाच्याच सोडा मास्तर !!
तुम्हाला म्हणे सिंडी सांगुन आलती खरे आहे काय ?
पन काही म्हना
पन काही म्हना विशालदादा पडवळ शोभत्यात.
मी त्यांचा पंखाच झालो डायरेक
त्यांनीही आता 'तरूणांचे /
In reply to पन काही म्हना by नावातकायआहे
त्यांनीही आता 'तरूणांचे / काकांचे हृदयसम्राट' असं काहीसं लावायला हरकत नाही म्हणजे ..:)
वायझेडपणा
निव्वळ वायझेडपणा आहे, कार्टूनच दिसतात सगळे (अरेरे आज रात्री टॉम आणि जेरी, पोकेमॉन, स्कूबीडू काठ्या घेउन स्वप्नात येतात वाटते!!! ;)
आमचे एक जलीय मित्र, स्वप्नांत
In reply to वायझेडपणा by अन्या दातार
आमचे एक जलीय मित्र, स्वप्नांत काहीही आले की आंघोळ करतात, तुम्ही पण प्रयत्न करून बघा.
भन्नाट
भन्नाट फोटो.अंकुरदादा कुठल्या 'प्लॅटफॉर्म' वर आहेत? java/#c/Oracle? बहुतेक क्लाउड कॉम्युटिंग करत असावेत.
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला गरीबांच्या, आपलं आमच्याच, आनंदयात्री साहेबांची आठवण झाली! आमचा हा प्रतिसाद वाचून यात्री, या हो, आपल्या गरीबांच्या मिपावर! ;-)
नावात दादा शेजारच्या कंसात
नावात दादा शेजारच्या कंसात भाइ लिहूनही 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी कशी काय लावू शकतात लोकं..चेल्यांनी मुद्दाम काटा काढला असावा
छे गं, 'दादाभाई'च्या पुढे काय
In reply to नावात दादा शेजारच्या कंसात by पुष्करिणी
छे गं, 'दादाभाई'च्या पुढे काय येतं? ;-)
हो गं, हे एकाच तरूणीविषयी आहे
In reply to छे गं, 'दादाभाई'च्या पुढे काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो गं, हे एकाच तरूणीविषयी आहे होय ..हात्तेचा. कदाचित ते 'तरूणी हृदयसम्राट रिटर्न' असं वगैरेही असेल
हा हा हा ... ब्रेकअप एवढा
In reply to हो गं, हे एकाच तरूणीविषयी आहे by पुष्करिणी
हा हा हा ... ब्रेकअप एवढा सकारात्मक पद्धतीने घेतलेला पहिल्यांदाच पाहिला असेल नाही आपण!
यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे
In reply to हा हा हा ... ब्रेकअप एवढा by ३_१४ विक्षिप्त अदिती
यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे म्हणत असावेत लोकं...दुसरा कोणी असता तर 'जीव देतो' म्हणाला असता :)
एकतर ब्रेअकप शिवाय सगळ्यांचाच दादा आणि भाइ त्यामुळे आता अशा पाट्या टाकण्याशिवाय काय करणार ते .
पाट्या टाकायला काय दादा आणि
In reply to यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे by पुष्करिणी
पाट्या टाकायला काय दादा आणि भाईच असावं लागतं असं नै कै! आता हे काय मी तुला सांगायचं! ;-)
हो, ते तर आहेच. पण अशा करूण
In reply to पाट्या टाकायला काय दादा आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो, ते तर आहेच. पण अशा करूण आणि दारूण परिस्थितीत पाट्या टाकणे ही एकमेव अॅक्टिव्हिटी शिल्लक रहाते :) , समजून घे दादांना जरा, रडतायत ते म्हणून काळा चष्मा घातलाय.
डोळे
In reply to हो, ते तर आहेच. पण अशा करूण by पुष्करिणी
अग त्यांचे डोळे आले नाही ना?
ए, तू का गं मधे घुसतेस? बरं,
In reply to डोळे by पैसा
ए, तू का गं मधे घुसतेस? बरं, ठीक आहे. तूही पाशवी असल्यामुळे तुझी घुसखोरी चालेल! ;-)
पुष्करिणीच्या निरीक्षणाशी सहमत! डोळे मारण्याच्या अतितणावामुळेच डोळे बॅक्टेरियांचे शिकार होऊन डोळे आले असण्याची शक्यता आहे.
हे ही असू शकतं हं ! म्हणजे
In reply to डोळे by पैसा
हे ही असू शकतं हं ! म्हणजे भाइ रडत असताना ( डोळे आलेल्या ) दादांनी डोळे पुसायला रूमाल दिला आणि ४-५ भाइ, जी, दादा बळी पडले.
कुणाला अंकुरभाइ गरीबांचे हृतिक रोशन हरमन बवेजा यांच्या सारखे दिसतायत का , की मलाच भास होतोय? त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर
सांभाळा!
In reply to हे ही असू शकतं हं ! म्हणजे by पुष्करिणी
इथे मिपावर पण साथ येईल!
ह ह पु वा!
तर काय, मी तर गॉगल घालूनच
In reply to सांभाळा! by पैसा
तर काय, मी तर गॉगल घालूनच बसलेय दुपारपासून ,कुठे रिस्क घ्या .
मलाही असंच वाटतंय गं! आणि एक
In reply to हे ही असू शकतं हं ! म्हणजे by पुष्करिणी
मलाही असंच वाटतंय गं! आणि एक गॉगलधारी संजय मोनेंचा (अंमळ "हडकुळा") तोतया वाटतोय!
कित्ती कित्ती ते बघावं ह्या
In reply to मलाही असंच वाटतंय गं! आणि एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
कित्ती कित्ती ते बघावं ह्या दादा आणि भाईंकडे? उगाच नाही ते तरुणी हृदयसम्राट होत. ;)
पाशवी असं विशेषण लागल्यावर मग
In reply to कित्ती कित्ती ते बघावं ह्या by अनामिक
पाशवी असं विशेषण लागल्यावर मग पाशवीपणा करूनच घ्यायचा. ;-)
बाकी आम्हां सगळ्यांना तरूणी म्हटल्याबद्दल तुझे खास आभार रे!
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून
In reply to पाशवी असं विशेषण लागल्यावर मग by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून दम घेउ द्या!
किती फिदा व्हाल त्या एकट्यावर?
डोळ्याचे साथ आलिये म्हणे!
आधी ती पाशवीपणाची साथ आवरा!;)
मला तर तो माणूस गरिब आणि पाशवी तरुणींचा हिरो वाट्तोय!
दादा गरीब तर आहेतच, त्याच्याच
In reply to अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून by रेवती
दादा गरीब तर आहेतच, त्याच्याच गुंड मित्रांनी त्याची अशी जाहिर बिनपाण्यानं केलीयं..
पण अगं तरूणी तू असा पाशवीपणा मधेच सोडू नकोस
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून
In reply to अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून by रेवती
ऑ ? ह्या पुष्करिणी काकु, जोजो काकु तरुणी कधी पासुन झाल्या ?
जळजळ पोहोचली; इनो घ्या मालक!
In reply to अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून by परिकथेतील राजकुमार
जळजळ पोहोचली; इनो घ्या मालक!
हो हो, सापडला
In reply to मलाही असंच वाटतंय गं! आणि एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो हो, सापडला लब्बाड.
अंकुरभाइ अगदीच धर्मबुडवे आहेत्, युके रिटर्न असल्यानं त्यांनी एकट्यानं गंध लावलेलं नाहीये, बाकी सगळ्या दादा आणि जींनी कसं एकसारखं गंध लावलय कपाळाला
ए, तो हिरो आहे ना! मग गंध कसा
In reply to हो हो, सापडला by पुष्करिणी
ए, तो हिरो आहे ना!
मग गंध कसा लावेल? आणि पाशवीपणाचा अंश तरी दिसतोय का चेहेर्यावर?
ओ हो, हे बाकी विसरलेच हं !
In reply to ए, तो हिरो आहे ना! मग गंध कसा by रेवती
ओ हो, हे बाकी विसरलेच हं ! हिरो एकदम न कापलेले केस, गॉगल अशा स्टॅंडर्ड युनिफॉर्मात आहेत
त्यांचंही असंच झालय ना त्या
In reply to हे ही असू शकतं हं ! म्हणजे by पुष्करिणी
त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर
नाही नाही... त्याचे आता होर्डिंग्जही लागत नाहीत!
अरेरे.. इतका पाशवीपणा
In reply to त्यांचंही असंच झालय ना त्या by अनामिक
अरेरे.. इतका पाशवीपणा
पाशवी
In reply to अरेरे.. इतका पाशवीपणा by पुष्करिणी
तो दुसरा पाशवी धागा सगळ्यांच्या नजरेतून सुटला की काय? :-?
कोणता कोणता ?
In reply to पाशवी by पैसा
कोणता कोणता ?
तो ग तो!
In reply to कोणता कोणता ? by पुष्करिणी
त्याची कॉपीराईट फक्त एकाच लेखकाकडे आहे! बिच्चारे पुरुष कसे आत्महत्या करताहेत आणि तुम्ही इकडे दादा भाईची चर्चा करताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?
जीवंत माणसाला किंमत द्यायची
In reply to तो ग तो! by पैसा
जीवंत माणसाला किंमत द्यायची नाही आणि मेल्यावर दु:ख करायचं काय हे ...
मग काय? दादा-भाई नंतर आता
In reply to तो ग तो! by पैसा
मग काय? दादा-भाई नंतर आता नौरोजींची चर्चा करायला तिकडे चला!
हे पहा अनामिकजी, एकतर या
In reply to मग काय? दादा-भाई नंतर आता by अनामिक
हे पहा अनामिकजी, एकतर या पाशवी धाग्यात तुम्हाला प्रवेश मिळायला नको. पण आता आलात तर ठिके.;)
तुम्ही महिती तंत्रज्ञानात ५ वर्षें किंवा जास्त काम केले आहे काय? नाही, नुसते काम करून उपयोग नाही. भरीव कामगिरी, पाठोपाठ सत्कार, होर्डिंग (एकतरी) लागायला हवे. मिपावरचे काही सदस्य पकडून गंध लावून फटू काढलेत काय? नाही ना? मग काय उपयोग? नौरोजींची चर्चा पुढल्या धाग्यात करू!;) तूर्तास गॉगल लावा पाहू.
आता तुम्ही इतकं त्यांच्या
In reply to हे पहा अनामिकजी, एकतर या by रेवती
आता तुम्ही इतकं त्यांच्या नावापुढं 'जी' लावलत, गॉगलवाला फोटू राहिलाय फक्त
माहिती तंत्रज्ञानात नाही पण
In reply to आता तुम्ही इतकं त्यांच्या by पुष्करिणी
माहिती तंत्रज्ञानात नाही पण गवंडीकामात ५ वर्षाचा अनुभव आहे... शिवाय गवंडी काम असल्याने काम भरीवच आहे. उत्तर्-पुर्वेकडच्या काही संपादकांनी मनावर घेतलं तर आमचाही असाच एक फोटो (संपादकांच्या फोटोसकट) बोस्टनच्या डाउनटाउनमधे लागायला हरकत नाही. बोला, आहे का तयारी? गॉगल लावलेला फोटो लगेच व्यनी करतो.
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू
In reply to माहिती तंत्रज्ञानात नाही पण by अनामिक
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू काय कराय्चाय? एकतर भाइंसारखं एक मित्र मंडळ काढा आधी स्वतःच्या नावावर, किंवा कोणत्यातरी भाइंच्या मित्रमंडळात सामिल व्हा..( बघा जमलं तर संपादकांनाच पकडा, नुसतीच भीती दाखवत असतात पण फोटो नाही ना पाहिले कधी संपादकांचे म्हणून ). मग सगळ्या गँग्चा टाका फोटू
आईग्ग!! हसून हसून पोट दुखायला
आईग्ग!!
हसून हसून पोट दुखायला लागले.
हा धागा माहिती तंत्रज्ञानावरचा असल्याच्या समजुतीमध्ये 'निवांतपणे' वाचण्यासाठी ठेवला होता.
चांगली माहिती मिळेल या आशेनं (आणि आदरानं) धागा उघडला आणि जे काय पहायला मिळालं......त्यावरचे प्रतिसादही मजेशीर आलेत. मीही एकदम अंकुरभाईंवर फिदा झालिये.......त्याचे दोन फायदे, एक म्हणजे मला आज्जी म्हणणार्यांना मला तरुणी म्हणणे भाग आहे.;) वाचतोयस ना प्रभो! दुसरा फायदा सगळ्यांनाच होणारे. आमच्यासारख्या काकवा फिदा व्हायला लागल्या कि असली होर्डींग्ज लागणार नाहीत.;)
अंकुरसाहेबांना हे सगळं कसं चालतं कळत नाही बुवा! बाकिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना तरी किती हौस म्हणते मी!;)
मागच्या भारतभेटीत एकेठिकाणी शाळकरी वाटतील अश्या मुलांचे फोटो होते आणि त्यांनाही जी, साहेब, दादा वगैरे म्हटलेले पाहिले होते. हे सगळे माझ्या नजरेला गुंड वाटतात. काहीजणांना केस कापायला पुरेसे पैसे मिळाले नसल्यागत दिसताहेत.
मिपावरचे अनेक सदस्य माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा जास्त काम (गिरी) करत आहेत त्यांचे असे कौतुक झाले असल्यास आम्हाला आनंदच होइल.
जाउंद्या ओ रेवती मॅम.. तुमचे
In reply to आईग्ग!! हसून हसून पोट दुखायला by रेवती
जाउंद्या ओ रेवती मॅम.. तुमचे ३% घ्या आणि मिटवुन टाका!
--
इंटरनेटचंद्रभाईस्न्हेहीरावअण्णादादाजी!
मला वाटते की कुणाचे तरी या
मला वाटते की कुणाचे तरी या अंकुरशी भांडण झाले असावे म्हणून त्याने असा सूड उगवला. मंडळाचे नाव पाहिल्यावर तर अगदी तसेच वाटते.
माझा ही राग आहे काही जणांवर. त्यांचे फोटो शोधतो आहे. मिळाले की लगेच होर्डिंग छापून, लावून, स्वतःच त्याचे फोटो काढून जालावर टाकेन म्हणतो.
सूड उगवला? बाप रे! आज आज हसू
In reply to मला वाटते की कुणाचे तरी या by विश्वनाथ मेहेंदळे
सूड उगवला? बाप रे! आज आज हसू हसून पुरती वाट लागणार.;)
तुमचा राग असलेले लोक्स बघायला आवडतील.
उपाध्यांची खैरात
साहेब, जी, भाई, दादा वगैरे आदरार्थी उपाध्यांची खैरात केलेली दिसते. त्यातल्या खाशा मंडळींच्या नावामागे आणि आडनावामागे दोन्ही उपाध्या दिसत आहेत. अमुकराव तमुकसाहेब वगैरे.
एकदा "जाणता राजा" शरद पवार ह्यांच्या नावाचे होर्डिंग होते त्यात श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असा उल्लेख होता. त्यात आणखी अण्णा आणि अप्पा कुठे बसवता आले असते तरी चालले असते. असो. यथा राजा तथा प्रजा.
"तरुणी हृदयसम्राटांची भरीव
"तरुणी हृदयसम्राटांची भरीव कामगिरी" येथे पाहणे ;-)
यात 'इंग्लंड-UK रिटर्न' असे
In reply to "तरुणी हृदयसम्राटांची भरीव by निस्का
यात 'इंग्लंड-UK रिटर्न' असे कुठेच म्हटल्याचे दिसत नसल्याने माहिती अग्राह्य ठरत आहे. सबब चुकीचे असे टाचण दिलेले आहे. ;)
अहो सिंबी चा कोर्स
In reply to यात 'इंग्लंड-UK रिटर्न' असे by मेघवेडा
अहो सिंबी चा कोर्स इंग्लंडातून केला असावा (लाँग डिस्ट्न्स आहे ना ;) )
अरे, काय राव तुम्ही पण! आधी
अरे, काय राव तुम्ही पण! आधी त्या अनामिकजींना मदत करा.
एखाद्या विकांताला गंध लावून फोटूगिटू काढून हुप्प्याभाई, निस्काजी, मेघवेडासाहेब अशी नावे लिहून आपण होर्डींग तयार करू. बॉस्टनात लावून टाकू.
फार अपेक्षेने हा धागा उघडला
फार अपेक्षेने हा धागा उघडला होता अन त्याचे फळ मिळाले.
बाकी 'संतोषभाऊ देशपांडे' हे या गृप फोटोत विसंगत दिसत आहेत नाही?
भडभडून आले
माझे तर ही भव्य दिव्य पाटी दिसताच अंकुरदादा(भाई) यांच्या कौतुकाने डोळेच पाणावले.
एकच वादा.............
चाय्ला, या अन्कुर च्या "जी" मधे "जी" आहे का स्वतहाला भाई म्हनुन घ्यायला. हा नक्कि हाउस कीपीग मधे असनार.
ही पण पहा.. मला ढकलपत्रातून
ही पण पहा.. मला ढकलपत्रातून आली होती काही दिवसांपुर्वी!!
शिकागो (USA ) 'कोणीतरी
In reply to ही पण पहा.. मला ढकलपत्रातून by सविता
शिकागो (USA )
'कोणीतरी ह्यांच्याकडून काहीतरी शिका गो'
असा एक फालतू विनोद आठवला.
फ्लेक्स चे बोर्ड किती स्वस्त झाले आहेत, ८ रुपये प्रती चौरस फूट.
अवांतर : कोणाला फ्लेक्स चे बोर्ड करून हवे असतील तर त्यांनी कृपया संपर्क साधावा. फ्लेक्स चे बोर्ड करून मिपावर जाहिरात पण केली जाईल. (फुकटात). ग्रुप ने येणार्यांस १० टक्के कमिशन. USA ला जाणार्या साठी बोर्डचे templates तयार आहेत, त्वरा करा.
आमचा पत्ता : पुण्यात येऊन कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा. ( अट : मुलगा शेंबडाच असला पाहिजे )