Skip to main content

पितृपक्ष-२

लेखक शुचि यांनी रविवार, 26/09/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
पितृपक्षाविषयी चर्चेमधे एक लक्षात आलं की बहुतेक जणांनी या रूढीविरोधी सूर लावला होता. कोणी अक्षरक्षः कोणीही बाजू घेणारं निघलं नाही. काहाजणं कुंपणावर होते (on the fence). याबाबत वाईट वाटलं. मी २००० मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतात असताना टिळकांचं "गीतारहस्य" वाचलं होतं. त्यातही सगळं नाही पण ६ वा च मला वाटतं अध्याय ज्याचं नाव आहे "कर्मविपाक" वाचला होता. आणि खूप मंत्रमुग्ध झाले होते. अतिशय तर्कशुद्ध रीतीने गूढ गोष्टी मांडल्या होत्या, व्यवस्थित पटवून दिल्या होत्या. संचित, क्रियमाण, प्रलब्ध हे कर्माचे तीन प्रकार सुरेख म्हणजे अतिशय सुरेख रीतीने व्यक्त केले होते. याच धड्यात जीवात्म्याचा मृत्यूपश्चात प्रवास, नंतरची त्याची योनी याबाबत काही मुद्दे होते. तसच श्राद्ध, पितृपक्ष आदिंचे महत्त्व आणि जीवात्म्यास या रुढींचा होणारा फायदा विषद केला होता. मला ते सर्व वाचायला खूप अद्भुत वाटले. जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते. अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?

वाचने 32587
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

In reply to by इन्द्र्राज पवार

आता सगळे मंगलोरी कोकणी पण धावणार बघ तुझ्यामागे!

In reply to by इन्द्र्राज पवार

मुळात जगातील एकजात धर्मांची उभारणी एका क्षणी 'सृष्टीत मानवापेक्षा मोठा कुणी नाही..." या वेडेपणातून झाली असल्याने, कित्येक धर्म मानवाचे आजचे रुप हे अवनत असुन त्याच्या मुळ स्वरुपापासुन च्युत झाला आहे असे प्रतिपादन करतात. मुळचे अमृतमयी रुप म्हणजे मानवाचे दिसत असलेले रुप (दोन पाय दोन हात एक डोकं इत्यादी) अभिप्रेत नसुन त्याच्या अंतर्यामी असलेले ते चिरंतन नित्य चैतन्यरुप हेच सर्वात मोठे आहे ह्याचे प्रतिपादन केलेले असुन त्याच अनुषंगाने अमृताच्या पुत्रांनो जागे व्हा ही घोषणा आहे. उगाच काहीतरी कुठे तरी जोडून बोलु नका.

In reply to by इन्द्र्राज पवार

कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... कशावरुन? संदर्भ द्या !

In reply to by इन्द्र्राज पवार

इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण नीट आठवत नाही पण इंग्रजी पुस्तकं काही आठवताहेत आणि एकामधे हे होतं की - एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही. जसं एकदा तुम्ही ५वीत असता मग तुम्हाला ४ थीत ढकलत नाहीत त्याचप्रमाणे. सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही.

In reply to by शुचि

>>एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही चला, (मला) आता निर्धास्त मरायला काही हरकत नाही.

In reply to by अवलिया

अहो, काय सांगू, एवढाली मोठ्ठी मोठ्ठी पापे केली आहेत. म्हणून जरा काळजीत होतो. (स्विस माझ्यामुळेच तर चाललेली आहे.)

In reply to by शुचि

"जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते." ~~ हे मान्यच आहे शुचिताई. कोणतीही गोष्ट स्वीकारताना तिची चिकित्सा करणे हे डोळसपणाचे लक्षण आहे. मग तुम्ही ते ज्ञान पुस्तकाद्वारे प्राप्त केलेले असो वा ज्याच्या शिकवणीविषयी तुमच्या मनात कोणताही संदेह नाही अशा गुरुतुल्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान असो. मी पुनश्च एकदा इथे सांगू इच्छितो की, मी कोणत्याही 'श्रद्धे' च्या विरूध्द नाही, फक्त तिच्या प्रवासाकडे लक्ष ठेवून त्या शुध्द झर्‍याचे अंधश्रद्धा नामक डबक्यात रूपांतर झालेले पाहू इच्छित नाही. आपल्या पूर्वजांच्या काळात अशी श्रद्धा होती की आपली पृथ्वी सर्व विश्वाच्या केंद्रस्थानी असून ३३ कोटी देव तिच्यावर वरदहस्त ठेवून आहेत. पण पुढे विज्ञानाने हेही सिद्ध केले की विश्वाच्या या महाप्रचंड उलथापालथीत सामील असलेल्या हजारो आकाशगंगापैकी एक व तिच्यातील सूर्यासारख्या दोनशे अब्ज तार्‍यांच्यापैकी एका सूर्यतार्‍याच्या कुळात आपला पृथ्वी नावाचा ग्रह आहे....ज्याचे आकारमान या जंजाळात सुईच्या अग्रावर कसेबसे मावेल इतपत आहे. ~ हे तरी आपण मानतोच ना? आणि जर याचे उत्तर 'होय' असेल तर मग कोणत्या गोष्टीवर कितपत श्रद्धा ठेवावी ही बाबदेखील विज्ञानाच्या कसोटीवरच प्रमाणभूत मानली पाहिजे. "सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही." ~ ठीक आहे. तुमचा हा विश्वास सार्थ ठरो इतपतच म्हणतो. शेवटी या देशातील 'सिंधू' कुठल्यातरी जन्मी सुखी होणार असेल तर तुमचे वरील विधान मी कदापि खोडू इच्छिणार नाही. इन्द्रा

In reply to by शुचि

>>एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही. >>सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही पहिले वाक्य बरोबर नाही. चौर्‍याऐशी लक्ष जन्म सायक्लिक असतात. त्यात शेवटचा जन्म नसतो. [मोक्ष प्राप्ती झाली तरच हे सायकल तुटते]. सुधाकरला डुकराचा जन्म मिळणार नाही या सुधारणेबद्दल धन्यवाद. चूकच झाली होती. ब्रह्महत्या करणारा डुक्कर होतो. दारू पिणारा कृमीकीटक* होतो असे मनु:स्मृती सांगते. (बायकोला मारणे हा नवर्‍याचा लग्नसिद्ध अधिकार असल्याने त्याबाबत मनु:स्मृती काही म्हणत नाही. दारू पिऊन बायकोला मारणे यासाठी काही स्पेशल शिक्षा नाही). स्त्री आणि कृमीकीटक यांचा विवाह पुढच्या जन्मी कसा होणार ते मला विचारू नका. *पुढच्या जन्मी कीटक होऊन कुणाकुणाला चावायचे याची यादी करायला घेतली आहे. (पितृपक्षात जन्मलेला)

In reply to by नितिन थत्ते

(पितृपक्षात जन्मलेला) नितिन थत्ते >>>>>>>>>>> हॅप्पी बर्थडे थत्तेकाका! ब्रह्महत्या करणारा डुक्कर होतो. दारू पिणारा कृमीकीटक* होतो असे मनु:स्मृती सांगते. >>>> पण ते शोधून कसे काढणार, अत्ताच्या डुकराला गदागदा हलवून विचारवे लागेल, "खरे बोल, कुणाला मारलस गेल्या जन्मी?" ;)

**एकदा मी फिरायला बाहेर पडलो असताना मला प्रोफेसर धनुष्कोडी भेटले. रस्त्यातच थांबून आमच्या गप्पा सुरू झाल्या.... त्यांच्या आत्येसासूबाई वेलिंग्टनला असतात्.त्यांच्यासाठी बाकरवड्या घ्यायला ते आले होते असे त्यांनी मला सांगितले..... खूप ऊन असल्याने मी त्यांना म्हणालो, चला जरा चहा घेऊ. मग मी आणि प्रोफेसर चहा घ्यायला थांबलो. बाबल्याच्या दुकानात चहा छान मिळतो. मी प्रोफेसरांना बाबल्याची ओळख करून दिली. बाबल्याला आनंद झाला... "असे छोटे छोटे आनंद वाटायला हवेत " प्रोफेसर म्हणाले. मलाही खूप बरे वाटले. छोट्याछोट्या आनंदावरून आठवण झाली आणि मी प्रोफेसरांना म्हणालो," आपण मिसळपावावर असता की नाही?" त्यांना कळेना... मी त्यांना मिसळपाव आणि खरडवही म्हणजे काय ते समजावून सांगितले.... त्यांना माझे म्हणणे पटले... बोलताबोलता खूप वेळ गेला होता. आम्ही आत्येसासूबाईंसाठी आणलेल्या सगळ्या बाकरवड्या संपवल्या.... मला अपराधी वाटले. पण ते म्हणाले, " छोटेछोटे आनंद वाटायला शिकले पाहिजे" मलाही आनंद झाला.... जाताजाता मी म्हणालो, " पितृपक्षावरील लेख चाळणे पितरांच्या आरोग्यास चांगले असते.." तेही हसून म्हणाले, " लेख चाळलेच पाहिजेत.. पितरांचे आरोग्य चांगले ठेवलेच पाहिजे"...** **सौजन्य :- भडकमकर मास्तर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

_/\_ हो परासेठ! असो, अधिक काही लिहिले तर पराचा कावळा करण्याचा (तोही या 'पक्षी' :)) आळ यायचा, त्यामुळे लेखनसीमा.

In reply to by मस्त कलंदर

आजचा दिवस कारणी लागला. भडकमकर मास्तर, परा आणि कोटीकेसरी नंदन एकत्र बसून बाकरवड्या खात कावळे हाकलत आहेत असं दृष्य डोळ्यासमोर आलं.

आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो, यासाठी या आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांच्या बद्दलचा कृतज्ञभाव व्यक्त करणारा हा पितृपक्ष. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञ भावाला फार महत्त्व आहे. जिथे प्रेम आहे, तेथे कृतज्ञता आहे आणि कृतज्ञताभाव हा ऋणमोचना भाव आहे. कारण आपल्या पूर्वजांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे आणि ते उभ्या जन्मात फिटू शकत नाही, त्यासाठी हा पितृ पंधरवाडा निर्माण झाला. या निमित्ताने आपण आपल्या वाडवडिलांची आठवण करतो. त्यांचा आदर्श, शिकवण, त्यांचं मोठेपण आठवतो आणि पुन्हा पुन्हा हे व्हावं यासाठी दरवर्षी पितृपक्ष नेमाने येतो. आम्हि पण हा विधि सश्रद्ध मनाने करतो..आम्ही धार्मिक प्रवृत्तिचे असलो तरी कर्म कांडाचा फाफट पसारा पासुन आम्हि दुर रहातो..महत्वाचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे..ज्या आई वडिल.. आजी आजोबांच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो..ज्यांचे बोट धरुन शाळेत गेलो..ज्यांच्या त्यागावर व श्रमावर आज आपण सुसंस्कारित व ्समृद्ध जिवन जगत आहोत त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला पाहीजे..आज ते कुठल्या जगात आहेत हे आपणास हि ठावुक नाहि पण त्यांचे आशीर्वाद व मायेचा अखंड वर्षाव आपल्यावर होतच आहे...त्या साठी हा कृतज्ञ भाव....

पण आपल्या श्रध्दा आपण चार भिंती आड ठेवल्या पाहिजेत .त्याचे चव्हाट्यावर प्रदर्शन मांडणे योग्य नाही.जिथे कावळ्याचा फोटो दिला आहे तिथेच ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज ह्याचे देखिल फोटो आहेत. त्यानी देखिल अश्या किती तरी खुळचट कल्पनांवर टिका केली आहे. जे काही इथे करायचे आहे ते इथेच फेडायचे आहे.त्यासाठी देव तुम्हाला दुसरी संधी देत नाही.

In reply to by अवलिया

देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही.पण मी देव आहे असे एक बापु ओरडुन सांगतात असे मी वाचले आहे. हवतर तुम्ही त्याचे वानर माफ करा शिष्य व्हा,तुम्हालाही संधी मिळेल देव पहाण्याची.

In reply to by वेताळ

चला,चला ५ का दस, ५ का दस, लॉट का माल , लॉट का माल देव बघा , देव बघा, चला,चला लवकर लवकर. हि संधीपू न्हायेणार नाही.

In reply to by वेताळ

>>>देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही मग
जे काही इथे करायचे आहे ते इथेच फेडायचे आहे.त्यासाठी देव तुम्हाला दुसरी संधी देत नाही.
हे तुम्ही कसे काय म्हटले आहे?

In reply to by अवलिया

वापरले ते माझ्या आसपास असणार्‍या देवांच्या मंदिरावरुन मांडले आहे. आमच्या भागात प्रत्येक गल्ली बोळात देवाची मंदीरे उभी आहेत. त्यातली मुर्ती म्हणजे देव आहेत व ते लोकांच्या पापापुण्याचा फैसला करतात असे पुर्वी पासुन सांगितले असल्यामुळे मी तसे म्हणालो. नाना ह्या उपर मला देवांबद्दल माहिती नाहीतेव्हा ह्या पामराला क्षमा कर.

In reply to by वेताळ

अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव असे करतो असे प्रतिपादन आजुबाजुच्या समाजाकडे पाहुन केले. किमान समोरच्याला सांगण्यापुरते तरी तुम्ही क्षणभर देवाचे अस्तित्व मानीव का होईना गृहित धरुन सांगितले याच न्यायाने मग जर कूणी आजुबाजुच्या समाजानुसार परंपरा रुढी जतन करुन पितरांविषयी काही भावना जपत असतील, कदाचित पूर्वायुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे मनात किल्मिष असेल त्याचे निराकरण या आधाराने करत असतील आणि पुन्हा आयुष्याला धडाडीने सामोरे जात असतील तर त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही. होय की नाही ? हा प्रश्न केवळ तुम्हाला एकट्यालाच आहे असे नाही आणि कुणालाही विशिष्ट उद्देशुन नाही. शेवटी काय आहे भारत हा अनेक विचारधारांचा देश आहे. समोरच्याची खिल्ली उडवणे हेच अनेकांना जमते बाकी जमत नाही. शेवटी ज्याची त्याची जाण, समज हेच खरे.. !! असो. यानिमित्ताने या जन्मातील तसेच (असल्यास) मागील सर्व जन्मांतील सर्व बांधव, आप्त, मित्र, पितरांना विनम्र अभिवादन !

In reply to by अवलिया

वर जे लिहले ते बरोबर आहे,मग आपल्या पितरांचे कौतुक घरी करावे असे वाटते.

In reply to by वेताळ

देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही.
तुम्ही असा माणूस शोधायचा प्रयत्न केला आहे का? असल्यास : कधी? कसा? किती? नसल्यास : प्रयत्नच नाही केला तर अपेक्षा का?

म्हणुनच कावळा ओरडायच्या आधी संधी साधुन घ्यावी वेताळा.

ते पण खर आहे मास्तर्.....पुढच्या वेळी चान्स सोडत नाही.

In reply to by विनायक प्रभू

गळ्यात जेव्हा हवं तेव्हा पुडीच्या दोरापासुन जानवं तयार करुन वेळ निभावुन नेऊ शकतो. रामरक्षा तोंडातल्या तोंडात पुटपुटत जोतीष्टोम आणि पुर्णदर्शाच्या यागाची मंत्र म्हटल्याचा आभास उत्पन्न करु शकतो.. इत्यादी सॉफ्ट स्किल्स आहेत त्यामुळे ब्राह्मण !

In reply to by गांधीवादी

आम्ही अ‍ॅडव्हान्स घेतो रोकड... आणि ऐनवेळी परत १०१, ५०१, १००१.... ****१ समोरच्याच्या ऐपतीनुसार घेतोच घेतो.. आणि हो जाण्यायेण्याचे रिक्षाचे भाडे स्वतंत्र... परगावी शिवनेरीचे भाडे जाउन येऊन

In reply to by अवलिया

credit card , master card, सोडेक्सो कुपन्स, चेक्स, स्वीकारता का ? आणि हो परदेशी आमंत्रण असेल तर हवाई प्रवासा साठी कोणता क्लास मागता, बिसनेस कि इकोनोमी चालतो.(काये इथे मिपावर बरेचशे परदेशी आहेत, त्यांना उपयोगी होईल हि माहिती)

In reply to by अवलिया

जेन्ट्स सेक्रेटरी, आम्ही आतापर्यंत फकस्त ********** पोरीच बघितल्या आहेत सेक्रेटरी म्हणून. तुमचा बिसनेस खालावतोय असे दिसतंय.

In reply to by गांधीवादी

चुकीचे आकलन. अनेक फटाकड्या पोरी आधी सेक्रेटरी म्हणुन ठेवल्या होत्या.. दोन महिन्यात चार जणींचे लग्न मलाच लावुन द्यावे लागले माझ्या क्लायंटमधल्या होतकरु उपवर तरुणांशी... ते ही विना दक्षिणा.. ! तेव्हापासुन पराला ठेवले (सेक्रेटरी म्हणुन) आहे. तुम्हाला पोरीमधेच विंटरेश्ट असेल तर आमचे मित्र आहेत, ते दुबैतुन हल्लीच पुण्याला आले आहेत.. म्हणत असाल तर रुजवात घालुन देतो. कळवा !

In reply to by अवलिया

अशी भांजगड अस्ते ब्राम्हण म्हणजे काय? कशावरुन म्हणजे वाहन कोणते? आजकाल पुजा सांगणार्‍या ब्राम्हणाकडे पण पॉश गाड्या असतात म्हणे. तुमच्याकडे कुठले वाहन?

In reply to by विनायक प्रभू

ब्राह्मण या विषयावर बोलायचं काम नाय ! नही तो 'गोरिला' आयेगा !!

मला जर कोणीही देव दाखवल्यास मी 'पाणी' पिणं सोडुन देईन! (पाणी म्ह्णजे काय ते संबंधितांना कळं असेल्च)

In reply to by इंटरनेटस्नेही

मी दाखवून देइन! >:) पण तुम्ही ओळखणार कसे की हाच/हीच देव आहे? तुम्हाला काही खाणखुणा तरी माहीत आहेत का?B-) (देवाला ओळखणारी) ;)

मस्त एक खड़ा मारला अणि नेमका कावला जख्मी जाला बिचारा सॉरी हा परत पुढल्या वर्षी जरा मोठा खड़ा / पत्थर मारींन . आता कावला कोण ते विचारू नका कारन कावला काला असला तरी ............ आहे.

काहिच भाग वाचला .. -------------- माणसाने माणसाच्याच स्वार्थासाठी देव, पुजा, मुर्ती , दान ,पद्धती , रुढ केल्या आहेत . जेथे देवच माणसाने बनवले आहेत, तेथे स्वर्ग .. नरक माणन्यात असे काय जास्त तारे तोडावे लागतात ?. कुठलीही पुस्तके, वेद आणि अन्य काही शास्त्र मानव सोडुन कोणी लिहिलेले नाही . त्यामुळे कोणाचे लिखान वाचायचे कोणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न .. आणि कोणी म्हणुच नये या देवाने हे लिहिले आहे. मग मला कळत नाही देव काय फक्त भारतातल्या लोकांसाठी होता का ? जाउद्या .. एक भावनांच नात म्हणुन काही दुसर्याचे वाचुन - बघुन केले तर ठिक आहे .. पण तेच कसे चांगले वगैरे सांगण्यात काही उपोयोग नाही. आपण ज्यावर श्रद्धा ठेवतो .. अआणि काही वाचुन वगैरे विश्वास ठेवतो .. ते वाचलेले किंवा श्रद्धा ठेवलेले खरेच हा अट्टाहास करणे चुकीचे आहे. जोपर्यंत इतरांना कसलाही त्रास होत नाही तोपर्यंत माणुस स्वताची कसलीही श्रद्धा - अंधश्रद्धा बाळगु शकतो ..

जोपर्यंत इतरांना कसलाही त्रास होत नाही तोपर्यंत माणुस स्वताची कसलीही श्रद्धा - अंधश्रद्धा बाळगु शकतो ..>>>>> हे मात्र खरे आहे. जिची परिणती चांगली, उपयोगी, ती श्रध्दा, जी त्रासदायक, ती अंधश्रध्दा! ( रिझल्ट ओरिएंटेड) माउ

मी एक फक्त दगड मारला आणि अगदी बरोबर बसला बिचारा कावळा जखमी झाला शमा असावी कि आपण फार दुखी आहात पण काही केल्या आमची खोड जात नाही रे बाबा पुढील वर्षी धोंडा मारणार कृपया चिडू नकोस आता विचारू नका कि मी कोणत्या कावळ्या बद्दल बोल्तोई ज्या साठी लिहितो आहे तो नक्कीच सुजाण आहे ब्राह्मण असून हे कृत्य केला ह्या बद्दल शमस्व. पण कावळा जाक्मी मात्र झाला .............

वरील सर्व चर्चाकारांनी The Hidden Forces of Life - collection from the works of Sri Aurobindo and The Mother , edited by Mr. A S Dalal हे पुस्तक जरुर वाचावे. हे पुस्तक मी पॉण्डीचेरीच्या श्री अरविंद आश्रमात घेतले आहे. अन्य कुठे मिळते माहीत नाही. पण हे पुस्तक जरुर जरुर वाचावे. शुचि जी, आपण मांडलेला विषय दुस-यास पटवणे खरेच अवघड आहे. ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा | इतरा सांगावा | कळो न ये || ह्रदयांतरात | राहे आत्माराम | परि त्याचे प्रेम | उमजे ना || ज्याची त्याची जैसी | माती घडविली | मति ही बनली | बहुविध || वृथा वाद चर्चा | नको अनुभवा | त्याचा साक्षी रावा | अंतरीचा || -- सागरलहरी.

>> आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो एखाद्याही अपत्याने "मला तुमच्या पोटी जन्माला यायचेच आहे" असा हट्ट आई-वडीलांपुढे धरला होता असे काही ऐकीवात नाही. कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हा निर्णय अपत्याचा नक्कीच असू शकत नाही;कारण जन्मापूर्वी अस्तित्वच नसणार ना .... कार्य-कारण भाव लक्षात घ्यावा (पूर्वजन्मविस्मृत) चिकित्सतर्कट