Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Sun, 09/26/2010 - 06:41
काल रात्री सापाचं सौम्य स्वप्न पडलं. सकाळी लक्ष दिलं नाही. पण मिपावर लॉगिन झाले आणि कावळ्याकडे लक्ष गेलं मग कळलं अरे पितृपक्ष सुरू झाला आहे आणि मी चमकले. तुम्ही म्हणाल मी वडाची साल पिंपळाला लावते आहे, अंधश्रद्धाळू आहे. म्हणायचं ते म्हणा बापडे पण गेले ४ ते ५ वेळा हा अनुभव मी घेत आले आहे की सापाचं स्वप्न आणि पितृ पक्षाची सुरुवात यांची एकच गाठ पडते. मग मला चैन पडलं नाही. मी देवळात गेले आणि भटजींना शिधा , दक्षीणा दान केली. भटजींनी देखील मुख्य गाभार्‍यात या गोष्टी घेतल्या नाहीत तर गाभार्‍याबाहेर हॉलमधे व्यवस्थित मंत्र म्हणून आणि गेल्या तीन पूर्वज पीढ्यांमधील कर्त्या पुरुषांचा मंत्रामधे उच्चार करून त्यांनी हे दान स्वीकारलं. मला नंतर हात, पाय धुवून मगच देवळात यायला सांगीतलं. घरी आल्यावर जालावर माहीती वाचली. खूप माहीती सापडली. त्यातून कळलं जे आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात. आपण दिलेले मुख्यत्वे अन्न, पाणी ते ग्रहण करतात म्हणून अन्न पाणी यांचे दान या पक्षात खूप महत्वाचे असते. या पंधरवड्याच्या शेवटी केले जाणारे महालय श्राद्ध हे त्यादृष्टीने विशेष महत्त्वाचे असते. या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात. मी दरवर्षी माझ्या परीने हा पक्ष पाळत आले आहे कारण मी भले विश्वास ठेवत असेन बाकीच्या घरच्यांनी विश्वास ठेवणंही गरजेचं असतं. असो. कोणाला अधिक माहीती असल्यास या धाग्यावर जरूर सांगावी. आपले अनुभव नमूद करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
  • 17051 views
  • पितृपक्ष-२

Book traversal links for पितृपक्ष

  • पितृपक्ष-२ ›

प्रतिक्रिया

Submitted by गांधीवादी on Sun, 09/26/2010 - 06:51

Permalink

माझी आजी पितृपक्षाच्या

माझी आजी पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी छान छान मलिदा करते. तसा मलिदा अजून पर्यंत माझ्या आईला आणि सौ. ला जमला नाही. तो मलिदा मला खूप आवडतो. त्यामुळेच पितृपक्ष लक्षात आहे. आणि पितृपक्षात movies release होत नाही, एवढेच माहित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/26/2010 - 16:17

In reply to माझी आजी पितृपक्षाच्या by गांधीवादी

Permalink

मलिदा

"मलिदा" हा फक्त एक वाक्प्रचार आहे असा माझा आतापर्यंत समज होता. जर तो खराच खायचा पदार्थ आहे, तर कृपया त्याची पाककृति (त्या विभागात) द्या ना !
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sun, 09/26/2010 - 16:22

In reply to मलिदा by पैसा

Permalink

+१ असेच म्हणतो. ('मलिदा'

+१ असेच म्हणतो. ('मलिदा' खाण्यास उतावळा) इं. स्नेही.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Sun, 09/26/2010 - 16:32

In reply to मलिदा by पैसा

Permalink

मलिदा

अगं, पोळी कुस्करून अगदी बारीक करायची. शक्यतो मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये केल्यास छान चुरा होतो. त्यात तूप, गूळ आणि वेलची घालायची. की झाला मलिदा तयार. पीरांना हिंदू-मुस्लिम दोघेही मानतात. पीराच्या उरूसात मलिदा हाच प्रसाद असतो. क्वचित भाकरीचा मलिदाही करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/26/2010 - 16:35

In reply to मलिदा by मस्त कलंदर

Permalink

हात्तेच्या!!

माझी आजी याचे लाडू करायची. आजीच्या हातच्या लाडवाची चव कशालाच नाही हे बाकी खरं!
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Sun, 09/26/2010 - 16:40

In reply to मलिदा by पैसा

Permalink

हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला

हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला नाय्ये, जेणेकरून मला हे असला स्वयंपाक/पाककृती वगेरे येत असायला, मला फक्त खायचे माहित आहे. जेवणाचे ताट रोज आयते पुढे येते. थोडे खासगी अवांतर : (सुदैवाने) आमच्या सौ. पण IT वाल्या नाहीयेत. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाक घरात पाय न ठेवणे हा आमच्या घरचा (अलिखित) नियम आहे. त्यात आमच्या सौ. मिपा वाचत नाहीत, मी मिपावर ह्या ID ने लिहितो हे देखील सौ. ला माहित नाही. त्यामुळे (आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे) हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ. तरी सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन, आजीकडे गेलो कि तिला विचारून टाकीन ह्याची पाककृती. रवा, गुळ आणि अजून काहीतरी पासून बनवितात एवढेच माहित आहे. खूप मस्त लागतो. मलिदा खाण्यासाठी पितृपक्षाची वाट बघत असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 09/27/2010 - 08:21

In reply to हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला by गांधीवादी

Permalink

अमसूलाची चटणी हा एक अनवट

अमसूलाची चटणी हा एक अनवट पदार्थ पण पितृपक्षात हमखास खायला मिळतो. कारल्याचे पंचामृत पण असेच.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sun, 09/26/2010 - 07:04

Permalink

चिनी पितृपक्ष

सिंगापूरला राहून एका चिनी प्रथेची माहिती झाली. आपल्या पितृपंधरवाड्याच्या सुमारासच चिनी लोक पितरांची शांती करतात. पोर्णीमेच्या रात्री खास, मोठ्या प्रमाणावर आणि त्या पंधरवाड्यात रोज रात्री, पितरांना प्रसाद अर्पण केल्या जातो. चिनी कालगणने प्रमाणे हा सातवा महिना मोजल्या जातो. ह्या उत्सवाला छिंगमिंग उत्सव म्हणतात. ह्या पंधरवाड्यात, रोज रात्री पुर्वजांचे आत्मे नातलगांच्या घराजवळ गिरट्या घालतात. त्यांच्या साठी रोज रात्री उदबत्या, मेणबत्या पेटवल्या जातात. डुकराचे वा कोंबडीचे मांस अर्पण केले जाते. पुर्वजांना मिळावे म्हणून कागदाच्या वस्तु, जसे बंगले, कार, खोटे पैसे, म्हणजे 'हेल मनी' च्या नोटा हे सगळे जाळले जाते. धुरांमधून पुर्वजांना ते मिळते अशी समजूत आहे. हा महिना भुतांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ताओईझम मधून ही पद्धत आलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 09/26/2010 - 08:04

In reply to चिनी पितृपक्ष by अरुण मनोहर

Permalink

माहीती चांगली आहे .

माहीती चांगली आहे . :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 09/26/2010 - 08:15

Permalink

मला मागच्या आठवड्यात नागाचे

मला मागच्या आठवड्यात नागाचे स्वप्न पडले. त्या आठवड्यात पंचमुखी नागाचे एक चित्र सकाळ मधे वाचकांच्या पत्रात आले होते ते कुठतरी सुप्त मनात नोंदलेले असावे त्याचा हा परिणाम अशी संगती मी त्याची लावली.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 09/26/2010 - 16:22

In reply to मला मागच्या आठवड्यात नागाचे by प्रकाश घाटपांडे

Permalink

मी देखील असा कार्यकारणभाव

मी देखील असा कार्यकारणभाव तपासून पहाते. पण मला तो ना यावेळी सापडला ना गेली कित्येक वर्ष पितृपक्ष सुरु होताच सापाचं स्वप्न पडतं तेव्हा सपडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 09/26/2010 - 10:27

Permalink

आत्मे ?

प्रेतयोनीत पूर्वजांचे काय भटकत असते? शरीरे तर आपण जाळलेली असतात. आत्मे म्हणाल तर त्या आत्म्यांनी दुसरा जन्म घेतला असणार ना, चौर्‍याऐशी लक्षांपैकी एक? की शरीर आणि आत्मा यांखेरीज तिसरे 'काहीतरी' असते जे भटकत असते? फार तर नुकताच मृत्यू झालेल्याचा आत्मा अजून राहिला असेल जन्म न घेतलेला.... पण आजोबा, पणजोबा, वगैरे पण अजून भटकतच? (अवांतर : अरेरे, कालच मी माझ्या खोलीतल्या बर्‍याच मुंग्या मारल्या. अन्नपाण्याच्या आशेने आलेले माझे पूर्वज असतील तर....... ) टीप : वरील प्रतिसादाचा हेतू खिल्ली उडवण्याचा नसून, लेख वाचणार्‍या इतरांना "विचार करण्यास उद्युक्त" करण्याचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 09/26/2010 - 16:12

In reply to आत्मे ? by नितिन थत्ते

Permalink

होय हे जे दान करतात तेदेखील

होय हे जे दान करतात तेदेखील गेल्या (रिसेंट) ३ पीढ्यांनाच जातं. त्यांचेच आत्मे प्रेतयोनीमधे भटकत असतात. बाकीच्यांचं माहीत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 09/26/2010 - 17:29

In reply to होय हे जे दान करतात तेदेखील by शुचि

Permalink

किती काळानंतर पुढचा जन्म

किती काळानंतर पुढचा जन्म मिळतो. तीन पिढ्या प्रेतयोनीत म्हणजे माझ्या पणजोबांचा पण अजून पुढचा जन्म मिळाला नाही? तुमच्या म्हणण्यावरून असे दिसते की मी मरेपर्यंत (इनफॅक्ट माझ्या पिढीतले सगळे चुलत भाऊ मेल्याशिवाय) पणजोबांना पुन्हा जन्म मिळणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Sun, 09/26/2010 - 18:59

In reply to किती काळानंतर पुढचा जन्म by नितिन थत्ते

Permalink

आमच्या पितरांनी, महान भारतची

आमच्या पितरांनी, महान भारतची सद्य परिस्थिती लक्षात घेता पुढचा जन्म कुठे(कोणत्या देशात) घेऊ अशी विचारणा BULK SMS द्वारे नुकतीच केली आहे. थत्ते काका , कृपया जरा मदत करता काय ? कोणता देश सुचवू त्यांना ? चीन, अमेरिका, कि अजून कोणता.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 09/26/2010 - 21:18

In reply to आमच्या पितरांनी, महान भारतची by गांधीवादी

Permalink

१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे

१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे कधी आले होते? कारण २९ तारखेपर्यंत बल्क एसेमेसना बंदी आहे. २. परतचा जन्म माणसाचा मिळत नसून कुठल्यातरी प्राण्याचाच मिळतो. तो या मानवजन्मात केलेली पापे आणि पुण्ण्ये पाहून मिळतो. तेव्हा अनुकूल देशातले हवामान पाहून जन्म मिळेल. ३. तुम्हाला भारतात जे वाईट आहे असे वाटते आहे ते माणसांसाठी लागू आहे. कुत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आणि मनेकाबाईंचे खास संरक्षण आहे. त्यामुळे कुत्र्याचा जन्म भारतात घ्यायला काही हरकत नाही. २९ तारखेनंतर बल्क एसेमेस करून पूर्वजांना कळवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 05:47

In reply to १. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे by नितिन थत्ते

Permalink

आपल्या अमुल्य सल्लाबद्दल

आपल्या अमुल्य सल्लाबद्दल धन्यवाद. >>बल्क एसेमेसना बंदी आहे. १) अहो ह्या बंदी वगेरे शुद्र मानवांसाठी, पितरांना नाही. २) आमच्या पूर्वजांनी बरीच पुण्याची कामे केली आहेत, त्यांचा पुण्याचा घडा भरलेला आहे. मला पुणे-मुंबई सोडून जगातले दुसरे कुठलेच हवामान माहित नाही. त्यामुळेच तर विचारणा केली होती. असू दे मीच जरा गुगलतो. ३) 'भारतात माणसांपेक्षा कुत्री बरी' हे माहित आहे. आणि त्यामुळेच जिकडे तिकडे कुत्र्यांचे फोफावले आहे. त्या फोफावलेल्या कुत्रांच्या जमातीती जर का जन्म घेतला तर एका दिवसांत सगळे पुण्य खतम होईल. अशी भीती आमच्या पितरांना आहे. बघू मीच काहीतरी आयडिया काढतो. आणि २९ नंतर त्यांना BULK SMS करतो. (आम्हाला मात्र सध्या BULK SMS बंदी आहे. शेवटी आम्ही काय, एक शुद्र मानव)
  • Log in or register to post comments

Submitted by आंसमा शख्स on Mon, 09/27/2010 - 07:39

In reply to आपल्या अमुल्य सल्लाबद्दल by गांधीवादी

Permalink

संयम

तुम्ही लोक या विषयाची खिल्ली का उडवत आहात? पटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 09/28/2010 - 04:10

In reply to संयम by आंसमा शख्स

Permalink

मिसळपाव वर स्वागत आहे. सवय

मिसळपाव वर स्वागत आहे. सवय करून घ्या अशा खिल्लींची. हळूहळू त्याचे काही वाटेनासे होईल (आंतरजालीय प्राथमिक) आणि मग एके दिवशी तुम्हीच अनाठायी खिल्ली उडवू लागाल (आंतरजालीय माध्यमिक). पुढील स्टेप्स बाकीचे जुने आणि जाणते सांगतीलच हळूहळू. (आंतरजालीय प्राथमिक मध्ये शिकणारा) वि. मे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 09/26/2010 - 10:55

Permalink

रूपक

मी पितरांचे आत्मे याकडे रूपक म्हणून बघतो. हिंदू संस्कृतीत पितृऋण मानलं गेलेलं आहे - याचा अर्थ मी आपल्या पितरांनी जसा आपल्याला जन्म दिला तसा जर आपण कोणाला जन्म दिला तर आपल्या मुलांचं प्रेमाने संगोपन करून त्यांना उत्तम व्यक्ती बनवण्याचा मनापासून प्रयत्न करावा, असा मी लावतो. यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Sun, 09/26/2010 - 13:35

In reply to रूपक by राजेश घासकडवी

Permalink

तत्व पाळणे.

"यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही." ~~ नेमके हेच माझे मत आहे; आणि यात एकच वाक्य वाढवितो : मात्र जे ही रूढी पाळतात त्यांच्या भावनांना माझ्या मतामुळे धक्का लागणार नाही किंवा ते दुखावले जाणार नाहीत, इतपत पाहतो. शेवटी मी समाजप्रिय आहेच, सबब वेळप्रसंगी तत्वाला मुरड घालायलादेखील शिकलो आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 09/26/2010 - 10:59

Permalink

हे पितर बितर फक्त या पंधरा

हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय? काळजीग्रस्त (रोज जेवणारी ) शिल्पा
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sun, 09/26/2010 - 16:23

In reply to हे पितर बितर फक्त या पंधरा by शिल्पा ब

Permalink

+१ लोल्स! असेच म्हणतो.

+१ लोल्स! असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 09/26/2010 - 23:13

In reply to हे पितर बितर फक्त या पंधरा by शिल्पा ब

Permalink

चित्राहूती

हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय?>>> तुमच्यात रोज चित्राहूती ठेवत नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 09/26/2010 - 23:30

In reply to चित्राहूती by कवितानागेश

Permalink

आमच्यात फक्त जिवंत

आमच्यात फक्त जिवंत असलेल्यांनाच खायला घालायची पद्धत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उपेन्द्र on Mon, 09/27/2010 - 22:55

In reply to आमच्यात फक्त जिवंत by शिल्पा ब

Permalink

सहमत..

इथे जिवंत माणसांना खायला पुरेसं अन्न नाही आणि मेलेल्यांची काळजी कशाला.. ? पितृपंधरवड्यात शुभकार्य करायचं नाही असं मानतात.. तर.. श्वास तरी का घेतात.. ते तर जगायला आवश्यक असलेलं सगळ्यात महत्वाचं शुभ कार्य आहे.. नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 09/27/2010 - 08:27

In reply to हे पितर बितर फक्त या पंधरा by शिल्पा ब

Permalink

हे पितर बितर फक्त या पंधरा

हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय? तुम्ही रोज करून घालात तर रोज येतील. :) बाकी पितर बितर वर्षातून एकदा नाही २दा जेवतात. १ ज्या दिवशी गेले त्या तिथिला आणि २ ज्या तिथीला गेले ती तिथी पितृपक्षात. बाकी हॅलोवीन मला रोज करायला आवडतो पण बाकी कोणालाच आवडत नाही. :( (हॅलोवीनप्रेमी) पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Sun, 09/26/2010 - 11:13

Permalink

आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ?

>>या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात........... मी गेली केत्येक वर्षे मुद्दमच या पंधरवड्यात खरेदी करतो किंवा शुभ कार्ये करतो अजुन तरी माझे काहीही वाईट झाले नाही. मी माझ्या पुर्वजांना अमंगल/अभद्र मानत नाही म्हणुनच मी त्यांना वाळीत टाकत नाही. उलट पक्षी त्यांना माझ्या आनंदात सहभागी करतो. माझ्या आनंदात त्याचा देखिल आनंद नक्कीच असणार. माझे आजी/ आजोबा, पणजी /पणजोबा ई. माझ्या वर जळतील शक्यच नाही. थत्ते काकांशी १००००००००........% सहमत. खुळचट कल्पनांना थारा देउ नका. दिवसा भरपुर अंगमेहनत घ्या .झोपताना पाणि प्या ,सैल कपडे घाला व आराम दाई बिछान्यावर झोपा म्हणजे असली स्व्प्न पडत नाहीत (जमल्यास उशाशी एक पुंगी व पेटारा ठेवा Image removed.)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 09/26/2010 - 16:24

In reply to आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ? by jaypal

Permalink

पूर्वज अमंगल नव्हते पण आता

पूर्वज अमंगल नव्हते पण आता ज्या योनीत ते आहेत ती अमंगल गणली जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 09/27/2010 - 08:29

In reply to आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ? by jaypal

Permalink

जयप्या काहीही लिहीतोस काय

जयप्या काहीही लिहीतोस काय रे??? आराम दाई बिछान्यावर . हे काय नवीण बॉ? तू मास्तरांसारखा लिहू लागला आहेस? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उपेन्द्र on Mon, 09/27/2010 - 22:57

In reply to आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ? by jaypal

Permalink

जयपाल..

+१०० आपण थोर अहात..
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 09/26/2010 - 11:29

Permalink

पितृपक्षानिमित्त सर्व

पितृपक्षानिमित्त सर्व पितरांना विनम्र अभिवादन..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 09/26/2010 - 12:13

In reply to पितृपक्षानिमित्त सर्व by अवलिया

Permalink

१+

असेच म्हणतो. जयपाल ची सैल कपड्याची कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/26/2010 - 11:31

Permalink

आपला काही विश्वास नाही

''आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात'' अशा गोष्टींवर आपला काही विश्वास नाही. पण, आमच्याकडे 'पितृपक्ष' उत्सवात साजरा केला जातो. आमच्या पूर्वजांना काय काय आवडत होते ते आठवून जसे, [बीडी काडी] पान, पेग वगैरे, दाखवून आम्ही तो दिवस इंजॉय करतो. आठवणीत काढतो. या दिवशी आमच्याकडे सर्व प्रकारचे नैवद्य असते. उदा.मासे, मटन,चिकन, पुरण-पोळी, कुरडाया,पापडं,भजी,कढी, आमटी,खीर,वरण-भात, पुर्‍या, सर्व प्रकारच्या भाज्या काय नी काय असते जेवायला सॉरी नैवद्य दाखवायला....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Sun, 09/26/2010 - 12:59

In reply to आपला काही विश्वास नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बरं झालं आठवलं..

एकदा यायचंय प्रवरा संगमला. गोड्या पाण्यातले ताजे फडफडीत मासे खायला. केव्हा बोलवताय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/26/2010 - 13:11

In reply to बरं झालं आठवलं.. by योगप्रभू

Permalink

>>>एकदा यायचंय प्रवरा संगमला.

>>>एकदा यायचंय प्रवरा संगमला. गोड्या पाण्यातले ताजे फडफडीत मासे खायला. केव्हा बोलवताय ? कधीही या....! स्वागत आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sun, 09/26/2010 - 16:27

In reply to आपला काही विश्वास नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरुटे सर, एकदा 'बसु' आपण!

बिरुटे सर, एकदा 'बसु' आपण! तेवढीच आपल्या पुर्वजांना शांती, काय? (प्यार्टी प्रेमी) इंटरनेटस्नेही!
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 09/26/2010 - 12:23

Permalink

इथे बेल्जियम मध्ये पण याच

इथे बेल्जियम मध्ये पण याच सुमारास अशाच प्रकारच्या रुढी पाळल्या जातात. १५ ऑक्टो ते ३१ या पंधरवाड्यात आपल्या सर्व आप्तेष्टांना ( जिवंत ! ) वॅफल्स खाण्यासाठी बोलावतात. ( चंगळ असते आमची पण ! ) मग १ नोव्हे ला सर्व संत दिवस ! त्यादिवशी सिमिट्रीत जाऊन सर्व पूर्वजांच्या कबरींवर फुलं वहायची आणि वाईन चा नैवेद्य (!) दाखवायचा. म्हणजे सर्वपितरी अमावास्या :) बाकी या काळात होणार्‍या कार्यांबद्दल, खरेदी विक्री वगैरे बाबत काही वेगळा अनुभव नाही. माझ्या लग्नाची खरेदी याच काळात केली होती. बाजारात गर्दी कमी असते म्हणून !
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Sun, 09/26/2010 - 12:28

Permalink

???

>>त्यातून कळलं जे आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात मोक्ष म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 09/26/2010 - 12:45

In reply to ??? by अनिल २७

Permalink

<<<मोक्ष म्हणजे काय? जो

<<<मोक्ष म्हणजे काय? जो दुपारच्या जेवणाने (तासभर का होइना) मिळतो तोच...म्हणूनच या पितरांना गिळायला घालत असावेत... ही ही ही
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Sun, 09/26/2010 - 12:56

In reply to <<<मोक्ष म्हणजे काय? जो by शिल्पा ब

Permalink

शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?)

शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?) करणे यावर तुमचे मत काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 09/28/2010 - 04:13

In reply to शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?) by अनिल २७

Permalink

टोकाचे

टोकाचे :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 09/28/2010 - 04:42

In reply to टोकाचे by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

आता मेलेल्यांना खाऊ

आता मेलेल्यांना खाऊ घालण्याविषयीचे विचार टोकाचेच असणार...एकतर टोकाचे किंवा पकडीचे... त्यात आम्ही टोकाचे...कारण हा विषय पकडीचा वाटत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 09/28/2010 - 21:23

In reply to आता मेलेल्यांना खाऊ by शिल्पा ब

Permalink

शिल्पाताई, बाकी तुम्ही परत

शिल्पाताई, बाकी तुम्ही परत आलात हे पाहून आनंद झाला. बरेच दिवस तुमचे फक्त "आवडले", "छान आहे" असेच प्रतिसाद येत होते. तुम्ही परत फार्मात आलात हे बघून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 09/26/2010 - 16:00

Permalink

पितृपक्षात कावळ्याचं चित्र

पितृपक्षात कावळ्याचं चित्र लावायची पद्धत मिपावर रूढ केली होती ती तशीच पुढे सुरू ठेवली आहे.. (रुढी-परंपरावादी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 09/26/2010 - 16:08

In reply to पितृपक्षात कावळ्याचं चित्र by विसोबा खेचर

Permalink

चांगली पद्धत आहे.

चांगली पद्धत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 09/26/2010 - 17:45

Permalink

भुत योनी पापी लोकाना

प्राप्त होते असे मी एकले आहे ते खरे आहे का? आमचे पितर आता कोणत्याही योनीत फिरत नसलेमुळे ह्या सणाचा आम्हाला उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Sun, 09/26/2010 - 19:09

In reply to भुत योनी पापी लोकाना by वेताळ

Permalink

भूत जमातींची एका 'रामगोपाल

भूत जमातींची एका 'रामगोपाल वर्मा' नामक व्यक्तीशी मैत्री आहे, त्यामुळे जर का आपले (म्हणजे सगळ्यांचे ) पितर भूत जमातीतील असतील असे आपल्याला वाटत असेल तर 'त्या' व्यक्तीला घरी बोलून जेवायला घातले कि सर्व भूत जमात संतुष्ट होईल आणि त्यांना कायमची मुक्ती मिळेल. ~~गांधीवादीदेव बाबा ~~
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/26/2010 - 19:22

Permalink

सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला

सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला आणणार्‍या भगिरथाचे पुर्वज किती काळ ताटकळतं बसले होते कोणास ठावुक ? ;) बाकी या आत्मा बित्मा गोष्टीला अपुन सॉलिट्ट मानतो !!! ( न मानुन रिस्क क्वोन घेणार ? ;) ) काय ते लोक असेल तिथे सुखामंदी असुदे !!! लफडा नको साला !!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Sun, 09/26/2010 - 19:30

In reply to सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला by मदनबाण

Permalink

मीबी मान्तो. मी त्यांच्या

मीबी मान्तो. मी त्यांच्या पत्ता पण हुडकून काढलाय. हिथ रहातात ते. Image removed. http://en.wikipedia.org/wiki/Genie
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com