अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या
अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या
आडकल घास, थोडं पानी प्या, तुमी धिरानं घ्या ||धृ||
पुरणावरनाचं जेवन केलं निगूतीनं
तिखट सार केला मसाला वाटून
आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१||
कुरडई पापड कढईत तळले
वाटीमधी गुळवणी ताक दिले
हातामधी घेवून सारं तुम्ही कुस्करा ||२||
घाई नका करू जेवतांना
घास चावून घ्या खातांना
आरामात करा सारं, मग मसाला पान खा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1940
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>आता सारं संपवायचं, नाही
कारभारी चापून चापून
In reply to >>आता सारं संपवायचं, नाही by गांधीवादी
चाव्ट. आमी नायी ज्जा.
In reply to कारभारी चापून चापून by मितभाषी