Skip to main content

अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या

अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या आडकल घास, थोडं पानी प्या, तुमी धिरानं घ्या ||धृ|| पुरणावरनाचं जेवन केलं निगूतीनं तिखट सार केला मसाला वाटून आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१|| कुरडई पापड कढईत तळले वाटीमधी गुळवणी ताक दिले हातामधी घेवून सारं तुम्ही कुस्करा ||२|| घाई नका करू जेवतांना घास चावून घ्या खातांना आरामात करा सारं, मग मसाला पान खा ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २६/०९/२०१०
काव्यरस

वाचने 1940
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

>>आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१|| एवढ्या लाडिक पणे आग्रह ऐकल्यावर कोण नाय म्हणणारे ? कारभारी चापून चापून हाणल्याशिवाय काय उठणार नाय.

In reply to by गांधीवादी

कारभारी चापून चापून हाणल्याशिवाय काय उठणार नाय. =)) =)) =)) =)) @गांधीवादी, अरे पार वघळ येइपेर्यंत होनार मंग