नमस्कार मंडळी,
मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच.
जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर. विद्या बालन ने साकारलेल्या कृष्णाने पार झपाटून टाकलं होतं मला!
तू येतोस ...
नको ना जाऊस असा
उन्हं यायच्या आधी
रात्रभर दिलेल्या खुणा पुसट होण्याआधी !
तू येतोस अन् सगळं विस्कटून जातोस
मी जपत बसते खुणा कित्येक रात्री
पलंगावर, देहावर अन् मनावरही !
सुरकुतली चादर तुझीच सय देते,
तू पुन्हा येईपर्यंत !
तू ओरबाडून घेतोस हवं ते सगळं
कधी गोंजारत मला सुखावून
कधी नकळत मला दुखावून !
मी तोंडातून ब्र ही काढत नाही
कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर !
तू अवचित येतोस वावटळी सारखा
मी पण गिरकी घेते तुझ्या भोव-यात !
तू निघून जातोस शांत झाल्यावर आणि
मी विखुरते पाचोळ्यागत !
मी म्हणते "घर बांधूयात ..."
तू मधाळ हसतोस काहीच न बोलता
तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकत,
मी तयार होते पुन्हा एका रात्रीसाठी
अन् त्यानंतर येणार्या रित्या दिवसासाठीही !
काव्यरस
वाचने
1960
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत
चांगला प्रयत्न !
किती
आवडली कविता. मी तोंडातून ब्र
+१
In reply to आवडली कविता. मी तोंडातून ब्र by यशोधरा
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
कविता आवडली
धन्यवाद सगळ्यांना!
छान आहे कविता ! आवडली बाकी
>> तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून
'इश्किया'मधली विद्या बालन
कविता आवडली