Skip to main content

तू येतोस ...

लेखक ढब्बू पैसा यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच. जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर. विद्या बालन ने साकारलेल्या कृष्णाने पार झपाटून टाकलं होतं मला! तू येतोस ... नको ना जाऊस असा उन्हं यायच्या आधी रात्रभर दिलेल्या खुणा पुसट होण्याआधी ! तू येतोस अन् सगळं विस्कटून जातोस मी जपत बसते खुणा कित्येक रात्री पलंगावर, देहावर अन् मनावरही ! सुरकुतली चादर तुझीच सय देते, तू पुन्हा येईपर्यंत ! तू ओरबाडून घेतोस हवं ते सगळं कधी गोंजारत मला सुखावून कधी नकळत मला दुखावून ! मी तोंडातून ब्र ही काढत नाही कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर ! तू अवचित येतोस वावटळी सारखा मी पण गिरकी घेते तुझ्या भोव-यात ! तू निघून जातोस शांत झाल्यावर आणि मी विखुरते पाचोळ्यागत ! मी म्हणते "घर बांधूयात ..." तू मधाळ हसतोस काहीच न बोलता तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकत, मी तयार होते पुन्हा एका रात्रीसाठी अन् त्यानंतर येणार्‍या रित्या दिवसासाठीही !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1960
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कविता आवडली. फक्त एक ओळ थोडी खटकली... कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर ! हे कारण न येता नुसतंच बाकीचं वर्णन आलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. या ओळीमुळे एक रिश्ते का इल्जाम येतो.

छा न लिहिता हो तुम्ही

आवडली कविता. मी तोंडातून ब्र ही काढत नाही कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर ! हा प्रेम करणारीचा निर्णय ना? मग तो बोलून दाखवला की मजा गेली की त्याची :)

In reply to by यशोधरा

हा प्रेम करणारीचा निर्णय ना? मग तो बोलून दाखवला की मजा गेली की त्याची
हेच म्हणतो. बाकी आमचा नानबा म्हणतो तसा प्रयत्न चांगला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

डिट्टो!

ही कविता एक monologue आहे. म्हणून त्या ओळी आल्या आहेत. पण तरीही पुढच्या वेळी अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करेन.

>> तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकत, मी तयार होते पुन्हा एका रात्रीसाठी अन् त्यानंतर येणार्‍या रित्या दिवसासाठीही ! >> सुंदर!!

यशोधरा आणि राजेश यांच्याशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू