Skip to main content

विडंबन परिपूर्ती करा

लेखक योगप्रभू यांनी गुरुवार, 23/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिलेल्या ओळीची विडंबन परिपूर्ती त्याच मीटरमध्ये करा. तुमची ओळ हसू येणारी हवी, पण अश्लील नको. परिपूर्तीसाठी ओळ आहे राजसा जवळी जरा बसा आता तुम्हाला त्यापुढे गेयता टिकेल असे दोन-तीन शब्दच टाकायचे आहेत. उदाहरणार्थ राजसा जवळी जरा बसा, लाळ ती पुसा किंवा राजसा जवळी जरा बसा, रडा ढसढसा (पुन्हा एकदा विनंती : अश्लील सूचक शब्द टाकू नयेत)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4119
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

राजसा जवळी जरा बसा, विदुषक बाई जसा राजसा जवळी जरा बसा, उडवा कीहो मासा राजसा जवळी जरा बसा, तोन्डाला पाने पुसा

सूत्रधार, जमलं तुम्हाला. आणखी येऊ द्या. विनायक, फार अवघड नाहीय. हे बघा राजसा जवळी जरा बसा, त्रास हा कसा राजसा जवळी जरा बसा, जरासे हसा राजसा जवळी जरा बसा, घाबरट ससा

विनंती करायची आणि आपणच मोडाय्ची.?

राजसा जवळी जरा बसा, लाळ ती पुसा राजसा जवळी जरा बसा थोडी आण्खी ढोसा दारू ती.... राजसा राजसा जवळी जरा पत्ते की पिसा लावून एक्का.... राजसा राजसा जवळी जरा बसा कोपर्‍यात घुसा ढेकूण ठेचा..... राजसा

ते घाबरट सशाचे पण जरा बघा की.

राजसा जवळी जरा बसा, जाच हा कसा राजसा जवळी जरा बसा, डाग जरा घासा राजसा जवळी जरा बसा, कवळीत हळु हसा राजसा जवळी जरा बसा, कोपर्यात वाकुन बसा राजसा जवळी जरा बसा,मारीला तळ्यात मासा राजसा जवळी जरा बसा,सगळीच भान्डी घासा राजसा जवळी जरा बसा,दु़खतो का घसा राजसा जवळी जरा बसा,का मारीला ससा राजसा जवळी जरा बसा,चिरमुरे म्हन्जे नुसता भुसा राजसा जवळी जरा बसा,मिळेल काहो पैसा

कमीत कमी ५ ओळीत विनंतीचा मान ठेवला गेला नाही. ब्रिटीश प्रुंग्या.

विजुभाऊ आणि सूत्रधार, धन्यवाद. हे आणखी बघा राजसा जवळी जरा बसा, सुकलाय घसा राजसा जवळी जरा बसा, पसरला पसा राजसा जवळी जरा बसा, देऊ का ठोसा? राजसा जवळी जरा बसा, फाटलाय खिसा राजसा जवळी जरा बसा, उगा का रुसा?

In reply to by सूड

अहो देवरूखकर, चांगल्या काव्याचंच विडंबन होऊ शकतं (अपवादः शरदिन्या); फालतू कवितांच्या नशीबात विडंबन आल्याचं माझ्या तरी माहितीत नाही. अवांतरः http://atre-uvach.blogspot.com/2010/04/blog-post_05.html

राजसा किचनमधे घुसा, कामाला लागा भाजी जरा धुवा, आता ति चिरा फोडणीला टाका, तोवर कणिक जरा मळा भाजी जरा परता, गॅस बन्द् करा कुकरची तयारी करा, तवा गॅसवर ठेवा पोळ्या छानस्या लाटा, त्या निट जरा भाजा टिफिन आता भरा, भान्डी जरा घासा किचन जरा आवरा, आता तोन्द काळे करा ;)

In reply to by सूड

काकूंनी तर सरळ राजसांना कामाची लिस्ट दिलंनीत. अरे बाबा हाच तर फरक आहे स्त्री आणि पुरुष यांच्यात. स्त्रीच पुरुषाला कामाला लावते

In reply to by पर्नल नेने मराठे

आता तोन्द काळे करा =)) चुचू बाइ तोन्द याचा अर्थ ढेरी..... मराठीत तरी ढेरी काळी करणे असा काही वाक्प्रचार आस्तित्वात नाहिय्ये

आहे काकु. एवढे सगळे केल्यावर काहीतरी बक्षीस नको?

आहे काकु. एवढे सगळे केल्यावर काहीतरी बक्षीस नको?