यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम्
विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येइल...
तेव्हा तेव्हा मी परत अवतार घेइन...
तु सांगितलं होतंस रे कृष्णा...
पण विसरलास ना....?
conditions apply चा क्लॉज टाकायला...!
विसरलास रे देवा...
धर्माची तुझी व्याख्या सांगायला,
आम्ही अडकलोय..
हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात
का नाही सांगितलीस तेव्हा...?
व्याख्या ....
मानवतेची ....
तुला अभिप्रेत असलेल्या माणुसधर्माची...?
विशाल कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1903
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्या देवानं अंबानी आडनाव
सध्या देवानं अंबानी आडनाव लावलं असेल..
कलमाडी पण असु शकते. कविता
कलमाडी पण असु शकते.
कविता भारी विशालभौ. आवडली.
कोण जाणे अभ्यंकरदेखील असु
कोण जाणे अभ्यंकरदेखील असु शकेल ;)
छान आहे कविता ... आवडली ...
छान आहे कविता ...
आवडली ...
धन्स रे बंड्याभौ
धन्स रे बंड्याभौ :)
भारी रे विशल्या!!
भारी रे विशल्या!!
>>आम्ही
>>आम्ही अडकलोय..
हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात
बर्याच जणांची पोटे आणि घरे-दारे, खुर्च्या त्याच चक्रव्युहा पायी शाबूत आहेत. तुम्हाला बाहेर पडायचे असेल तरी ते काही पडू देणार नाही. कौरवान सारखे तुम्हाला चारी बाजूने घेरून संपवून टाकतील.
(उदा. जातीनिहाय जनगणना )
खरय गांधीवादी तुमचं...., कटु
खरय गांधीवादी तुमचं...., कटु असलं तरी तेच सत्य आहे आज :(