Skip to main content

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 22/09/2010 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो, प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो ! त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव सुखी समाधानी होतं, रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! अशा गावि आला एक चालू जालवंत महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली हवेशीर कोठी एक पाहण्यात आली पण अट मालकानं, अशी घातली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! फॅमिलीस आणा अधी असा हट्ट केला घरासाठी विजूभाऊ त्या पार येडा झाला त्यांनी लाज भीड निती सारी सोडली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! करारस गेला तेव्हा, त्याने केला डाव मैत्रिणीस करूनी पत्नी सांगितले नाव त्यानं लबाडीने वेळ होती मारली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! खुळ्यास त्या कळला नाही, नियतिचा खेळ मैत्रिणीच्या नवर्‍यानेच पुढे केला घोळ त्याने घरमालकाची कामं घेतली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! योगायोग पाहा तरी कसा अता झाला कामासाठी मालक त्याच्या ऑफिसात गेला तिथे मैत्रीण त्याला ह्याची भेटली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! क्षणामध्ये ओळखले त्याने फसगत झाली सत्य शोधणास त्यांने खेळी एक केली त्याने दोघींना त्या अवतान धाडली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! सुटण्यास लफड्यातून ह्या, ह्याने केला डाव सल्ल्या साठी मिपावरती घेतली ही धाव त्याच्या लेंग्याची अयती नाडी घावली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! मार बायकोला खोट्या, खरीस तू आण किंवा त्याचा पापा घे तू गालावरी छाण अश्या सल्ल्याची ही रांग बघा लागली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! याची देही याची डोळा पाहिले मरण वाचकांनी देउन सल्ले रचिले सरण त्यांचा कर्मसोहळ्याची यात्रा चालली कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
लेखनविषय:

वाचने 8111
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

असेच म्हणतो... अग्गग्ग ! :) केसु एकदम फॉर्मात !

जालावरच तुमच्या पायांचा फोटो आहे तो शोधून दर्शनासाठी (सशुल्क) उपलब्ध करून देतेच.

अगायायायायाया. हिशेब चुकता झाला का? ;) आता इथंही शतक!

म्हणुनच केसुगुर्जींना कुठं न्यायची सोय नाही. दिसलं धोतर की ओढ..दिसलं धोतर की ओढ... ;)

In reply to by धमाल मुलगा

भापो. ;) मालबरो लाईट्स, इंडिया!

=))

__/\__

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>आणि आता मूळ धागाही वाचावा लागणार.... हाय कंबख्त, तुने पी ही नहीं.

In reply to by धमाल मुलगा

सर, सध्या काही अगदीच जरूरी वैयक्तिक कामं करायलाही वेळ मुश्किलीने मिळतो आहे... कोणती ते विचारू नका लगेच... त्यामुळे सगळीच गंमत जंमत मारामार्‍या वगैरेपासून लांब आहे. असो.

अगदी झक्कास झालंय.. माझ्या डोळ्यांसमोर केसु हे गाणं हातात तुणतुणं घेऊन म्हणताहेत आणि मधून मधून विजुभाऊ त्यांच्यामागे "नाही.. नाही.. नाही..." म्हणत स्टेजवर इकडून तिकडे.. तिकडून इकडे करत आहेत असेही आले!!!

In reply to by मस्त कलंदर

केसु हे गाणं हातात तुणतुणं घेऊन म्हणताहेत
काय? केसु आणि तुणतुणं? ;) केसु, काय ऐकतोय हे? ;)

In reply to by मस्त कलंदर

... विजुभाऊ त्यांच्यामागे "नाही.. नाही.. नाही..." म्हणत स्टेजवर इकडून तिकडे.. तिकडून इकडे करत आहेत असेही आले!!!
शी बै, अच्रत!

In reply to by मस्त कलंदर

कडक विडंबन, केसुगुर्जी!
माझ्या डोळ्यांसमोर केसु हे गाणं हातात तुणतुणं घेऊन म्हणताहेत आणि मधून मधून विजुभाऊ त्यांच्यामागे "नाही.. नाही.. नाही..." म्हणत स्टेजवर इकडून तिकडे.. तिकडून इकडे करत आहेत असेही आले!!!
काय विजुअल आपलं विज्युअल आहे! अगागागा, म्येलो!

In reply to by मस्त कलंदर

मला विजुभाउचं खर कलंत्र तुनतुणे वाजवताना आणि मागे विजुभाउ नाही नाही .. म्हणताना दिसत होते.. (विजुअल)केशवसुमार

In reply to by मस्त कलंदर

अगदी झक्कास झालंय.. माझ्या डोळ्यांसमोर केसु हे गाणं हातात तुणतुणं घेऊन म्हणताहेत आणि मधून मधून विजुभाऊ त्यांच्यामागे "नाही.. नाही.. नाही..." म्हणत स्टेजवर इकडून तिकडे.. तिकडून इकडे करत आहेत असेही आले!!!
च्यायला एकदा लुटलेला सुरतेचा बाजार पुन्हा लुटल्यागत वाटला.

--/\--

थोडक्यातच सांगतो. ह. ह. पु.वा.

ह. ह. पु. वा. सा. नमस्कार!! फक्त एक कळले नाही. विषयः नृत्य??? या विडंबनावर कोण कोण नृत्य करणार आहेत त्याची यादी द्यावी आणि सोबत रेकॉर्डिंग करून मिपावर लावलेत तर अधिकच बहार येईल. ;)

In reply to by प्रियाली

लेख नृत्य ह्या सदरात वर्गीत केला आहे त्यामुळे आम्ही लावणीचा आधार घेतला आणि विडंबन हे पणा नृत्य ह्या सदरात वर्ग केले..

_/\__/\__/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\_ _/\__/\_ _/\_ _/\__/\_ _/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\__/\__/\_

सक्काळी सक्काळी गुर्जींनी बाजार उठवला!!! विजुभौंची पतंग कन्नीसकट कापली राव!!!!! =)) =)) =)) =)) =)) (विडंबननृत्यदिग्दर्शक)रंगुल सरकार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार