सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,
प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो !
त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
अशा गावि आला एक चालू जालवंत
महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट
त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली
हवेशीर कोठी एक पाहण्यात आली
पण अट मालकानं, अशी घातली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
फॅमिलीस आणा अधी असा हट्ट केला
घरासाठी विजूभाऊ त्या पार येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
करारस गेला तेव्हा, त्याने केला डाव
मैत्रिणीस करूनी पत्नी सांगितले नाव
त्यानं लबाडीने वेळ होती मारली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
खुळ्यास त्या कळला नाही, नियतिचा खेळ
मैत्रिणीच्या नवर्यानेच पुढे केला घोळ
त्याने घरमालकाची कामं घेतली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
योगायोग पाहा तरी कसा अता झाला
कामासाठी मालक त्याच्या ऑफिसात गेला
तिथे मैत्रीण त्याला ह्याची भेटली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
क्षणामध्ये ओळखले त्याने फसगत झाली
सत्य शोधणास त्यांने खेळी एक केली
त्याने दोघींना त्या अवतान धाडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
सुटण्यास लफड्यातून ह्या, ह्याने केला डाव
सल्ल्या साठी मिपावरती घेतली ही धाव
त्याच्या लेंग्याची अयती नाडी घावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
मार बायकोला खोट्या, खरीस तू आण
किंवा त्याचा पापा घे तू गालावरी छाण
अश्या सल्ल्याची ही रांग बघा लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
याची देही याची डोळा पाहिले मरण
वाचकांनी देउन सल्ले रचिले सरण
त्यांचा कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गग्ग!! =))
अग्गग्ग!! =))
+१
In reply to अग्गग्ग!! =)) by यशोधरा
असेच म्हणतो... अग्गग्ग ! :)
केसु एकदम फॉर्मात !
सहमत आहे
In reply to अग्गग्ग!! =)) by यशोधरा
+१.
महान आहात!
जालावरच तुमच्या पायांचा फोटो आहे तो शोधून दर्शनासाठी (सशुल्क) उपलब्ध करून देतेच.
हा तर नव्हे?
In reply to महान आहात! by ३_१४ विक्षिप्त अदिती
(सौजन्यः सुनील पाटकरांचे चप्पल पुराण आणि दीपक यांची त्यावरील प्रतिक्रिया.)
इथे बघा.
अगायायायायाया
अगायायायायाया.
हिशेब चुकता झाला का? ;)
आता इथंही शतक!
=)) =)) =)) अटके पार.
=)) =)) =))
अटके पार.
गुरुजी साष्टांग __/\__ चेतन
गुरुजी साष्टांग __/\__
चेतन
अवांतरः मिभो विजुभाउ या धाग्यानंतर कुठल्या पानावर :)
असेच म्हणतो
In reply to गुरुजी साष्टांग __/\__ चेतन by चेतन
_/\_ साष्टांग दंडवत!!!!!
(नतमस्तक) बेसनलाडू
बाजार उठवला. =))
बाजार उठवला.
=))
च्यायला!
म्हणुनच केसुगुर्जींना कुठं न्यायची सोय नाही. दिसलं धोतर की ओढ..दिसलं धोतर की ओढ... ;)
भापो
In reply to च्यायला! by धमाल मुलगा
भापो. ;) मालबरो लाईट्स, इंडिया!
आयायायाय गं!
=))
=))
__/\__
__/\__
टेंपोत बसवला!!! ... आणि आता
टेंपोत बसवला!!!
... आणि आता मूळ धागाही वाचावा लागणार....
ऑ?
In reply to टेंपोत बसवला!!! ... आणि आता by बिपिन कार्यकर्ते
>>आणि आता मूळ धागाही वाचावा लागणार....
हाय कंबख्त, तुने पी ही नहीं.
सर, सध्या काही अगदीच जरूरी
In reply to ऑ? by धमाल मुलगा
सर, सध्या काही अगदीच जरूरी वैयक्तिक कामं करायलाही वेळ मुश्किलीने मिळतो आहे... कोणती ते विचारू नका लगेच... त्यामुळे सगळीच गंमत जंमत मारामार्या वगैरेपासून लांब आहे. असो.
उप्मा करुन ठेवलाय...
In reply to सर, सध्या काही अगदीच जरूरी by बिपिन कार्यकर्ते
उप्मा करुन ठेवलाय...
दं ड व त !!!!
दं ड व त !!!!
सॉल्ल्लीड...
अगदी झक्कास झालंय.. माझ्या डोळ्यांसमोर केसु हे गाणं हातात तुणतुणं घेऊन म्हणताहेत आणि मधून मधून विजुभाऊ त्यांच्यामागे "नाही.. नाही.. नाही..." म्हणत स्टेजवर इकडून तिकडे.. तिकडून इकडे करत आहेत असेही आले!!!
गेली
In reply to सॉल्ल्लीड... by मस्त कलंदर
काय? केसु आणि तुणतुणं? ;) केसु, काय ऐकतोय हे? ;)
शी बै, अच्रत!
In reply to सॉल्ल्लीड... by मस्त कलंदर
शी बै, अच्रत!
अगागागा
In reply to सॉल्ल्लीड... by मस्त कलंदर
कडक विडंबन, केसुगुर्जी!
काय विजुअल आपलं विज्युअल आहे! अगागागा, म्येलो!
लिहीताना..
In reply to सॉल्ल्लीड... by मस्त कलंदर
मला विजुभाउचं खर कलंत्र तुनतुणे वाजवताना आणि मागे विजुभाउ नाही नाही .. म्हणताना दिसत होते..
(विजुअल)केशवसुमार
अगदी झक्कास झालंय.. माझ्या
In reply to सॉल्ल्लीड... by मस्त कलंदर
च्यायला एकदा लुटलेला सुरतेचा बाजार पुन्हा लुटल्यागत वाटला.
--/\--
--/\--
पुरता बाजार उठवला!!!
पुरता बाजार उठवला!!!
अप्रतिम , महान
अप्रतिम , महान
+१
In reply to अप्रतिम , महान by पुष्करिणी
महान!!
ह. ह. पु.वा.
थोडक्यातच सांगतो.
ह. ह. पु.वा.
जबरा!
ह. ह. पु. वा.
सा. नमस्कार!!
फक्त एक कळले नाही.
विषयः नृत्य??? या विडंबनावर कोण कोण नृत्य करणार आहेत त्याची यादी द्यावी आणि सोबत रेकॉर्डिंग करून मिपावर लावलेत तर अधिकच बहार येईल. ;)
मुळ
In reply to जबरा! by प्रियाली
लेख नृत्य ह्या सदरात वर्गीत केला आहे त्यामुळे आम्ही लावणीचा आधार घेतला आणि विडंबन हे पणा नृत्य ह्या सदरात वर्ग केले..
ज ह ब ह र्या!!! _/\_
ज ह ब ह र्या!!!
_/\_
मार डाला !!
_/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\_
_/\__/\_
_/\_
_/\__/\_
_/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\_
अग्गायायायाया!!!
सक्काळी सक्काळी गुर्जींनी बाजार उठवला!!!
विजुभौंची पतंग कन्नीसकट कापली राव!!!!! =)) =)) =)) =)) =))
(विडंबननृत्यदिग्दर्शक)रंगुल सरकार
हॅहॅहॅ,,,,,,,तुम्च्यापायी आज
हॅहॅहॅ,,,,,,,तुम्च्यापायी आज बॉस्ची बोलणी खाल्ली.....हहपुवा.....गेली.१० मिन्ट हसतच ए ......
हाहहहाअहहहाआहहहहाआ =)) _/\_
हाहहहाअहहहाआहहहहाआ =))
_/\_
अर्र!!! भलतंच घडलं जणू!!
अर्र!!! भलतंच घडलं जणू!! :)
मस्त!!!
मस्त!!!
हॅ हॅ हॅ ( या खेरीज दुसरी
हॅ हॅ हॅ
( या खेरीज दुसरी काही प्रतिक्रीया आहे का याचा सल्ला कोण देईल का )
हॅ हॅ हॅ
मस्त!!!
सल्ला मागितला त्यांनी आणि हे
सल्ला मागितला त्यांनी आणि हे काय दिलंत हो केसुगुर्जी...
:) :) :)
-^- हहपुवा
-^-
हहपुवा
टांगा पलटी घोडे फरार
टांगा पलटी घोडे फरार
कोपरापासून हात जोडून
कोपरापासून हात जोडून नमस्कार!
कधीतरीच येउन असे षटकार मारून पुन्हा गायब!
संपादकीय टवाळकी. टाळ्या
संपादकीय टवाळकी.
टाळ्या वाजवल्याच पाहिजेत.
धन्यवाद!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
दोन बायका आणि फजिती ऐका!
दोन बायका आणि फजिती ऐका!
अत्त्युत्कृष्ट
उत्कृष्ट विडंबन.