कारगिलचे युद्ध कुणाचे? आपल्या प्यार्या भारताचे कीं त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाचे?
२६ जुलै २०१० हा कारगिलच्या युद्धातील विजयाचा ११वा गौरवदिन. गेल्या वर्षी या विजयाचा दहावा गौरवदिन होता. त्यात आपल्या सध्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या वागणुकीबद्दल खालील लेख माझ्या वाचनात आला. लेखक आहेत 'हिंदुस्तान टाइम्स'चे श्री नीलेश मिश्रा. त्यांची जन्मपत्री मला माहीत नाहीं, म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते झुकतात, कुठल्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे वगैरे.
इथे लिहिले आहे ते खरे आहे कीं नाहीं याचीही मला कल्पना नाहीं. पण 'हिंदुस्तान टाइम्स'सारखे जबाबदार वृत्तपत्र खोडसाळ वृत्ते छापेल असे वाटत नाहीं. भारतात रहाणार्या 'मिपा' सभासदांनी हा लेख गेल्या वर्षी वाचलाही असेल.
पण इथे दिलेली माहिती खरी असेल तर इथे उल्लेखलेल्या आपल्या नेत्यांची वागणूक फारच घृणास्पद आहे. हा लेख इथे पोस्ट करतोय् त्याची सत्यता पडताळण्यासाठी.
------------------------------------------------
कारगिल युद्ध - या युद्धाला देश विसरला?
लेखक: नीलेश मिश्रा, हिंदुस्तान टाइम्स (१५ सप्टेंबर २०१०)
http://www.hindustantimes.com/10-years-later-The-war-that-India-forgot/Article1-435548.aspx
एके काळी ती एक गूढ व भयप्रद अशी ठळक जागा होती. ब्रिगेडच्या जुन्या मुख्यालयाच्या जागी असलेले व सतत झालेल्या बॉंबहल्ल्यांमुळे काळवंडून लक्तरं झालेलं ते झाड मी १९९९च्या उन्हाळ्यात रोज पहात असे. त्या झाडाला आता हिरवीगार पाने फुटली होती.
पण इतर बर्याच गोष्टींचा र्हास झाला होता. आधुनिक युद्धांच्या इतिहासातील एक सर्वात अवघड असं समजलं जाणार्या या युद्धातील आपल्या सैनिकांच्या शौर्याच्या आठवणींचे अवमूल्यन भारतीय राजकीय नेत्यांनी यात राजकारण आणल्यामुळे झाले आहे.
२००४ साली सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने या भाजपा राजवटीत लढल्या गेलेल्या युद्धाच्या वार्षिक गौरवदिनाकडे पहाणेच टाळले आहे. आपल्या राष्ट्रपती व आपल्या सैन्याच्या Commander-in-Chief असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना द्रास या गावी या गौरवदिनानिमित्त्य उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण पाठवूनही त्या आल्या नाहींत असे लष्करी गोटातून सांगण्यात आले.
कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या कॅ. विजयांत थापरचे पिताश्री कर्नल व्ही. एन्. थापर यांनी स्वतः द्रासकडे जायला निघण्यापूर्वी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले कीं ही वागणूक लाजिरवाणी होती कारण या घटनेत विनाकारण राजकारण आणण्यात आले होते. द्रास ही जगातील सगळ्यात थंड असण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकाची अशी वसाहत आहे. द्रासपेक्षा जास्त थंड वसाहत आहे रशियातील ओयमियाकोन!
याचा अर्थ हा कीं १५ वर्षांपेक्षा लहान वयाच्या ३५ कोटी जनतेतील बर्याच जणांना हे युद्ध काय होते व ते कशासाठी लढले गेले आणि भारताला त्या युद्धाचे काय महत्व होते याची आठवणच रहाणार नाहीं. ही खरंच या युद्धाची शोकांतिकाच आहे.
२००० लोकवस्तीच्या द्रास गावाल एका भोजनगृहात जेवणानंतरच्या संभाषणात भाग घेताना पंजाबच्या अभोर गावात शारीरिक शिक्षणाचे विद्यार्थी असलेले १९ वर्षीय मनराज सिंग म्हणाले, "आमची अशी समजूत होती कीं लष्करातले जवान, त्यांचे अधिकारी आरामात रहातात, गाड्या उडवतात आणि पैसे वाया घालतात. त्यामुळे मला लष्कराबद्दल सहानुभूतीच नव्हती, पण इथे आल्यावर व कसल्या जागी कशा तर्हेने आपली सेना देशासाठी यशस्वीपणे लढली हे पाहिल्यानंतर मला खरंच आपल्या सैन्याबद्दल अभिमान वाटला."
या युद्धात ५२० वीर धारातीर्थी पडले.
लडाखमधील या डावपेचांच्या दृष्टीने महत्वाच्या ठाण्याला पुन्हा काबीज करण्यासाठी १९९९मध्ये भारतीय जवानांना अशक्य अशा खड्या कड्यांवर बंदुकीच्या गोळ्याच्या वर्षावात चढायला लागले. त्यांच्यावर शेकडो अचानक धाड घालणारे आणि काहीं पाकिस्तानी लष्करातील नेहमीचे सैनिकही गोळ्यांचा वर्षाव करत होते. हे लोक उंचीवर चढून दबा धरून बसले होते व वर चढणार्या आपल्या सैनिकांना टिपू शकत होते.
२००९च्या २६ जुलै शनिवारी या यशोगाथेच्या डावपेचांचे केंद्र असलेल्या द्रास या गावी योजलेल्या दशवार्षिक विजयोत्सवापासून स्वतःला दूर ठेवून आपल्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीतच हार अर्पण केला. खरं तर शनिवार असल्याने ऑफीसलाही सुटी होती. पण सार्या भारतातून जनरल सारख्या पदावर असलेले उच्च सेनाधिकारी आणि धारातीर्थी पदलेल्या अधिकार्यांच्या आणि सैनिकांचे कुटुंबीय मात्र आवर्जून हजर रहाणार होते.
कॉंग्रेसचे लोकसभेचे सभाअसद रशीद अली या म्नी या युद्धाची "भाजपाचे युद्ध" अशी संभावना केली तर कोळसामंत्री श्रीप्रकाश जस्वाल.यांनी त्यांना याबद्दल कांहीं माहीतच नसल्याचे सांगितले.
एका ज्येष्ठ सेनाधिकार्याने सांगितले कीं आम्ही स्वखुषीने हे आयुष्य निवडले. आम्हाला स्तुतीच्या मागे धावायचे नाहींय्. आम्ही आमच्या आम्हीच आमच्या वीरांचा सन्मान करू. मात्र त्याला मीडियाशी बोलायचा अधिकार नसल्याने त्याने आपले नाव उघड करू देण्यास नकार दिला.
पण Knoll नावाच्या ठिकाणी एका सैनिकी तुकडीला आघाडीकडे नेताना धारातीर्थी पडलेल्या विजयांत थापर या वीराचे पिताश्री कर्नल थापर म्हणाले कीं हे अतीच झाले. ते पुढे म्हणाले कीं अशा नेत्यांकडून आपण कसलीच अपेक्षा ठेवता कामा नये व लष्कराने व नागरिकांनीच अशा विजयांचा गौरवदिन साजरा करावा.
आणि झालेल्ही तसेच.
अनेक वर्षांपूर्वी द्रासला फक्त पाठीवर "बॅकपॅक" घेऊन हिंडणारे पाश्चात्य पर्यटकच येत असत. पण आता पर्यटकांत भारतियांचा भरणाच खूप असतो.
खरंच, बॉंबचा वर्षाव झेललेलं आणि धुळीनं माखलेलं हे छोटंसं गाव आता पर्यटकांच्या गळ्यातला ताईत बनलं आहे.
एके काळी लाकडी फळकुटांच्या झोपडीवजा ठेल्यांनी सजलेल्या व मुख्यत: चहाच्या टपर्या असलेल्या इथल्या ’बाजारा’त आज पाश्चात्य पद्धतीच्या प्रसाधन गृहांनी सुसज्ज अशी अनेक हॉटेले उभी आहेत.
"इथे इतके भारतीय पर्यटक येत आहेत की आम्ही अगदी आश्चर्यचकित झालो आहोत" असे ’अफझल’ हॉटेलचे ४५ वर्षीय मालक महम्मद सलीम म्हणतात. "द्रास, टयगर हिल व तोलोलिंग शिखरावर काय-काय घडले याबद्दल या पर्यटकांना खूप कुतुहल असते." असेही ते म्हणाले.
सलीम इक्बाल या २५ वर्षीय व्यवसायिकांना यात एक सुवर्णसंधी दिसते.
"आम्हाला जर पर्यटकांना घोड्यांच्या पाठीवर बसवून ’टायगर हि”ला नेण्याची परवानगी मिळाली तर इथे पर्यटनाचा व्यवसाय आणखीच भरभराटीस येईल." अशी त्यांना खात्री आहे. १९९९सालच्या भीतीपूर्ण उन्हाळ्याच्या आठवणींपेक्षा व्यवसायाच्या भरभराटीची ही उमेद खूपच वेगळी आहे!
प्रतिक्रिया
खरतर मी लिहिणारच होतो, पण
आमचा सैनिकांवर्च विश्वास आहे
>>राष्ट्रपती म्याडम प्रथम
माणेकशांच्या अंत्यदर्शनालाही कुणी ज्येष्ठ नेते गेले नव्हते?
चालू द्या. लष्कर आणि सरकार,
अपनी-अपनी पसंद!
फालतु कौतुक!!
मला वाटतो अभिमान!
फालतु नाहि तर काय साहेब ??
कोण
प्रतिसादांचे स्वरूप
नितिन थत्ते
माझे observation रिकम्या प्रतिसादाबद्दल आहे
नितिन, मला त्यांचे विचार
'तंगडी तोडली असती' या
थत्ते साहेबाकडून
योगायोगाने सध्या
कारगील ही खरच एक शोकांतिकच
कृतघ्नपणाची कमाल
कारगिल नाव जरी कानावर पडले
माझ्या लेखाला ही छायचित्रे जोडायची राहिलीच!
व्यर्थ ना हो हे बलिदान....इतकेच
काहीतरीच
"यथा राजा तथा प्रजा"
कारगील युध्दात जितके सैनिक
+१
सहज
शुंभासारखे सहन कां करतो?
सहनशीलता
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
व्यर्थ बलीदान !!
अर्धवटराव
विनंती !!
भले राष्ट्रपतीपद हे मानद असल,
आपल्या लष्करी नेतृत्वाने राजकारण्यांचा कित्ता गिरवू नये
"कांहीं प्रतिसादात लिहिलेले
तुमच्यावरचा अविश्वास त्या वाक्याच्या मुळाशी मुळीच नव्हता