Skip to main content

कास .. फुलांचे पठार २०१०

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 19/09/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सातार्‍याहून सुमारे २५ किमी अंतरावर कासचे पठार आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर हे पठार अनेकरंगी फुलांनी बहरून येते. निसर्गाचा हा सोहळा सुमारे १५ दिवस टिकतो. गेली ३ वर्षे मी त्याचा आस्वाद घेतो आहे. आजच मी निसर्गाचं हे अनमोल देखणं रुप परत एकदा डोळ्यात आणि कॅमेर्‍यात साठवून आलो. त्याची ही छोटीशी झलक... आणि पठार उतरुन थोडं पुढे गेल्यावर लागणारा थंडगार पाण्याने भरलेला कास तलाव..

वाचने 6152
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

अप्रतिम नजारा!! कासच्या पठाराला आता युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. अधिक माहिती येथे.

In reply to by शिल्पा ब

वेल्वेट वाली फुलं खूप कमी प्रमाणात आहेत.. पण निळ्या जांभळ्या मखमली रंगावरील परागकणांचे पिवळे धम्मक ठिपके लगेच लक्ष वेधून घेतात...

उपेन्द्र धन्यवाद. ७-८ वर्षापूर्वी गेलो होतो तेंव्हा फारच मजा आली होती. चार वर्षापूर्वी माझ्या परदेशी पाहुण्यांना घेवून गेलो तेंव्हा सातार्यातला रस्ता फारच खराब होता. फुले उमलायला नुकतीच सूरवात झाली होती त्यामुळे जरा पचका झाला होता. या विकांता पर्यंत हा नजारा टिकेल असे वाटते का? परत जायची ईछा आहे. मोहन

In reply to by मोहन

फुलं फुलायला लागून ८-१० दिवस झालेत. पण अजुन ८-१० दिवस रहातील. कारण अजून कडक ऊन पडायला नाही लागलं.. अवश्य भेट द्या..

नयनरम्य परिसर आणि तितकीच मोहक प्रकाशचित्रे. येथे दिल्याबद्दल धन्यवाद! (आभारी)बेसनलाडू