नुकताच धनंजयने केलेला फ्लँडर्साच्या रणामध्ये हा उत्तम अनुवाद वाचला. धनंजयने आकारबंध जसाच्या तसा ठेवून, कवीप्रमाणेच मोजके शब्द वापरून ते भाषांतर केलेलं आहे. मात्र ती बंधनं पाळताना मूळ कवितेची धार थोडी बोथट झाली असं मला वाटलं. ती धार तशीच ठेवण्यासाठी मी भावानुवाद केलेला आहे. अर्थातच त्यासाठी कवितेचे काही शब्द, रचना व संकल्पना बदलाव्या लागल्या आहेत. (उदाहरणार्थ मूळ कवितेत खड्ग, भाले यांचा उल्लेख नाही...) ओळी वाढलेल्या आहेत. मूळ कवितेतलं मीटर बदलून आलेलं आहे.
या दोन अनुवादाच्या अनुषंगाने कवितेचं भाषांतर, रूपांतर म्हणजे काय ही चर्चा व्हावी अशी इच्छा आहे.
फ्लॅंडर्सची फुलं
केशर पिवळ्या फुलाफुलांच्या आज बहरल्या बागा
क्रुसाक्रुसांच्या रांगांमधल्या भरून गेल्या जागा
फ्लॅंडर्सच्या कुरणांवर लपते अमुचि मूक निशाणी
स्वैर वरूनी पक्षी फिरती, अजून त्यांची गाणी
कानी पडती खाली भेदुन सरबत्तीची गाज
रक्तथेंब मोहरून झाले केशर पिवळे आज
मुडदे आम्ही जरी अता पण कोणे एके काळी
प्रभा भोगली, सांज पाहिली या देही या डोळी
प्रेमाने किति चषक रिचवले, किती पाजले प्याले
अधिर अधर स्पर्शाने डोळे किती लाजरे झाले
भोगुन, साहुन अता पहुडलो फ्लॅंडर्सच्या या माळी
केशर पिवळ्या ठिपक्यांची अन हिरवी चादर ल्याली
उचला खड्गे, झेला भाले, सोडु नका शत्रूला
क्लांत हतांनी देतो घ्या जी अम्ही वाहिली ज्वाला
उंच धरूनी पेटत ठेवा अमुच्या दग्ध मशाली
शपथ तुम्हा फ्लॅंडर्सच्या भूची प्रतारणा जर केली
स्वस्थ न राहू, उखडुन येऊ क्रुसाक्रुसांच्या रांगा
केशर पिवळ्या फुलाफुलांच्या जरी बहरल्या बागा
________
In Flanders Fields
By: Lieutenant Colonel John McCrae, MD (1872-1918)
Canadian Army
In Flanders Fields the poppies blow
Between the crosses row on row,
That mark our place; and in the sky
The larks, still bravely singing, fly
Scarce heard amid the guns below.
We are the Dead. Short days ago
We lived, felt dawn, saw sunset glow,
Loved and were loved, and now we lie
In Flanders fields.
Take up our quarrel with the foe:
To you from failing hands we throw
The torch; be yours to hold it high.
If ye break faith with us who die
We shall not sleep, though poppies grow
In Flanders fields.
वाचने
18951
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप आवडला. माझी आवडण्याची
अत्यंत सुंदर!
असेच म्हणते
In reply to अत्यंत सुंदर! by चतुरंग
छान
मस्तं. तुम्ही केलेला
+१
In reply to मस्तं. तुम्ही केलेला by llपुण्याचे पेशवेll
+२
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+३
In reply to +२ by मस्त कलंदर
+ ४
In reply to +३ by श्रावण मोडक
+
+१
In reply to + by नितिन थत्ते
भावानुवाद आवडला.
सुरेख भाषांतर
अनुवाद आवडला
सुंदर.. गुरुजी... मजा
उत्तम
साधे सोपे आणी गेय.. तितकेच
किल्लास..!
ही देखील आवडली
'कविते'चा भावानुवाद...!!
दग्ध मशाली
विषयाला व्यापक रूप
येथे डकवायला काही हरकत नाही
In reply to विषयाला व्यापक रूप by इन्द्र्राज पवार
खरडचर्चा - धनंजयची पहिली खरड
खरडचर्चा - राजेश घासकडवी
In reply to खरडचर्चा - धनंजयची पहिली खरड by धनंजय
खरडचर्चा - धनंजय
In reply to खरडचर्चा - राजेश घासकडवी by धनंजय
खरडचर्चा - राजेश घासकडवी
In reply to खरडचर्चा - धनंजय by धनंजय
खरडचर्चा - धनंजय
In reply to खरडचर्चा - राजेश घासकडवी by धनंजय
खरडचर्चा - राजेश घासकडवी
In reply to खरडचर्चा - धनंजय by धनंजय
खरडचर्चा - धनंजय
In reply to खरडचर्चा - राजेश घासकडवी by धनंजय
भाषांतरकाराचे पर्याय
In reply to खरडचर्चा - धनंजय by धनंजय
कवीने आखलेल्यात राहिले, तर मर्यादा वेगळी
In reply to भाषांतरकाराचे पर्याय by राजेश घासकडवी
तिर्हाईताचे काय महत्व ?
पॉपी