मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

What is non-negotiable in your life?

शुचि · · जनातलं, मनातलं
सध्या "लीडरशिप" अर्थात नेतृत्व विषयक लेख वाचतेय. माझा अतोनात आवडीचा विषय. म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी नाही तर नुसता वाचनमात्र म्हणून. एक खूप सुंदर लेख *१ वाचनात आला काल परवा. विषय होता - What is non-negotiable in your life? अर्थात तुमच्या जीवनात तुम्ही काही मूल्य अतीव प्रेमादरानी म्हणा, अतिशय ध्यासाने म्हणा अशी ऊराशी धरली आहेत का ज्यांच्याशी तुमच्या जीवनात तडजोडीला स्थान नाही? मग लेखकाने पुढे दिले आहे जर तशी मूल्य नसतील आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं आयुष्य हे वादळात हेलकावे खाणार्‍या नौकेसारखं का भरकटत आहे किंवा तुम्ही समाधानी का नाही आहात तर ते रास्तच आहे ई. ई. लेख खूप विचार करायला लावणारा होता. मला लेखानी ढवळून काढलं. प्रत्येकाच्या मनाच्या खोल कुपीत एक स्वप्न असतं. ते साकार होतच असं नाही. मग सगळे कसे शहाण्यासारखे सामोरे जातात? मला वाटतं कोणी मित्रांचा आसरा घेतं, कोणाला मानसोपचारतज्ञाची गरज पडते , कोणाला अध्यात्माची तर कोणाला दारूची . पण हा हळवा कोपरा असतो जरूर. यासंदर्भात खूप समृद्ध करणारं कुणाच्यातरी*२ खवमधे कुणीतरी*२ लिहीलेलं हे वाक्य मी वाचून टिपून ठेवलं होतं.- अवचटांना लिहिलेल्या पत्रातले 'प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा कोपरा असतो की जेथे तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ शकत नाही. कारण तसे करावे लागले की मग सगळे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते' *१ http://www.leadershiparticles.net/Article/Leadership---What-kind-of-Legacy-will-you-Leave-/1607 *२(हे दोघं मान्यवर लेखक आहेत मिपावरचे. त्यांनी मला माफ करावं त्यांची खव इथे उध्रुत केल्याबद्दल. पण वाक्यच तसं सुंदर, समृद्ध करणारं आहे.)

वाचने 3763 वाचनखूण प्रतिक्रिया 20

शुचि Sat, 09/18/2010 - 01:06
सॉरी हा लेख चुकून चौकशी या सदरात पडला आहे. मला कसलीही चौकशी करायची नाही. प्रत्येकाचा हळवा कोपरा हा वैयक्तीक असतो आणि मला त्या खाजगीपणाचा आदरच आहे. येथे त्या गोष्टींची चर्चा व्हावी हा उद्देश नाही. माफ करणे.

नि३ Sat, 09/18/2010 - 03:04
अतीशय सुंदर विषय.. मला वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात तडजोडीला स्थान नाही अश्या काही गोष्टी असतातच आणी अर्थातच त्या असायला पण हव्या.

In reply to by विनायक प्रभू

प्रदीप Sat, 09/18/2010 - 12:15
तुम्हाला कळले हो!!' -- मीही अगदी सहमत आहे. After all, every man has his price. तत्व, मूल्य वगैरे थोड्याफार चघळायच्या गोष्टी.

In reply to by विनायक प्रभू

प्रदीप Sat, 09/18/2010 - 13:06
पण पोलिटिकल करेक्टनेस हे जगात रूढ होण्याच्या अगोदर ही म्हण प्रचलित झालेली होती (इथे पहा) आणि काही माणसे पोलिटीकली करेक्ट आयुष्यात होऊ शकत नाहीत :) बाय द वे, ते '- जी' नको लावूत हो!

विनायक प्रभू Sat, 09/18/2010 - 12:16
ते तर सर्वात महान निगोशिएशन. तुम्ही भारतातच राहाता ना? विसरलात वाटते ती महान सर्कस?

विनायक प्रभू Sat, 09/18/2010 - 12:27
गेल्या काही दिवसात नात्यागोत्यांची विल्हेवाट लावणारी काही निगोशिएशन्स बघीतली. त्यावर लवकर च लिहीतो.

In reply to by विनायक प्रभू

अवलिया Sat, 09/18/2010 - 12:29
नक्की लिहा.. तुमच्या सारख्या जीवनाच्या सर्वांगाला स्पर्शुन जगणार्‍या महानुभावांच्या अनुभव शिदोरीतील दोन चार तुकडे जरी प्रसाद रुपाने मिळाले तरी आमचे जीवन धन्य धन्य होईल याबाबत आमच्या मनात काहीही शंका नाही.

विसोबा खेचर Sat, 09/18/2010 - 21:40
तुमच्या जीवनात तुम्ही काही मूल्य अतीव प्रेमादरानी म्हणा, अतिशय ध्यासाने म्हणा अशी ऊराशी धरली आहेत का ज्यांच्याशी तुमच्या जीवनात तडजोडीला स्थान नाही?
१) मातृभक्ति २) संगीत, सांगितिक मूल्य..! तात्या.

क्लिंटन Sat, 09/18/2010 - 23:59
तुमच्या जीवनात तुम्ही काही मूल्य अतीव प्रेमादरानी म्हणा, अतिशय ध्यासाने म्हणा अशी ऊराशी धरली आहेत का ज्यांच्याशी तुमच्या जीवनात तडजोडीला स्थान नाही?
अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दातील पॅट्रिक हेन्रीने म्हटले,"Give me Liberty, or give me Death!". माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर व्यक्तीस्वातंत्र्य सर्वात महत्वाचे. I may not agree with what you say but I will defend to the death your right to say it. ---व्हॉल्टेअर क्लिंटन

शुचि Sun, 09/19/2010 - 04:47
तुमच्या बाळाच्या डोळ्यात एकदा तुम्ही बघता आणि हृदयात अगदी काय होतं ते सांगताच येत नाही.... शब्दात मांडताच येत नाही पण एक पीळ बसतो म्हणा काहीतरी होतं. आणि पुढे त्याला परिपूर्ण कुटुंब, चांगलं घर सगळं चांगलं मिळणं हे तुमच्या दृष्टीनी नॉन्-निगोशिएबल होऊन बसतं.

मुक्तसुनीत Sun, 09/19/2010 - 05:48
लेखाचा मसुदा आवडला. प्रामाणिकपणे उत्तर देण्याकरता धैर्य पाहिजे खरे.