Skip to main content

चला मित्रांनो, 'आयटीवाला नवरा' होऊ यात !!

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 16/09/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
हेतु : सहज-गंमत-जम्मत ..कोणालाही दुखवण्याचा हेतु नाही. " देखा है पहली बार साजन ".... कधी नव्हे ते ,माझ्या भ्रमणध्वनीवर, सदाशिव-पेठी, पर्‍याच्या फोन आलेला पाहुन,मी ,डॉन्याचा एकोळी प्रतिसाद बघुन जसा धम्या दचकतो,तसा दचकलो.फोन न घेण्यासारख दुसर काहीही कारण समोर न आल्याने मी फोन ऊचलला.तसेही आमच्या मोबाईलात ईनकमिंग फ्री असल्याने आम्ही सगळेच फोन उचलतो.(सध्या वोडाफोनच्या डायलर ट्युन्स प्रमोशनल कॉल्सनी झ्झीट्ट आणली आहे,ते देखील कन्नडात सुरु होतात, निव कर माडिद्रे का असल कायतरी ?). तर फोन ऊचलला (न घेऊन सांगतो कोणाला ? उद्या खरडवहीत " आर्थिक परिस्थितीने गाजुंन आपण आपला फोन गहाण ठेवला आहे काय? अश्या प्रकारची एखादी खवचट खरड आढळली की बाजार ऊठलाच म्हणुन समजा.) " सुहास , अरे मी बोलतोय " " हो हो मी पण बोलतोय " " हो का ? मी चुकुन बोंबलतोय असे एकले" पचका झाला. " सदाशिवात किती वाजेपर्यंत येऊ शकतोस " अचानकच, पर्‍याच्या आवाजात आलेल गांभीर्य लक्षात आल्याने, क्षणभर,वैचारिक धाग्यावर,विचारवंत जसे बाह्या सावरुन, तत्परतेने,कळफलक बडवायला निघतात,त्याच तत्परतेने,बाईकला किक मारुन, लगेच निघावसं वाटल. पण.. " तासाभरात कावेरीत ये ,तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे ." " ओके " (हा शब्द फार आवडतो आमच्या पिताश्रींना, 'ओके ' म्हटल्या-म्हटल्या,मग ते कशाच्याही संदर्भात असे ना, त्वरीत फोन ठेऊन टाकतात.) आम्ही तासाभरात कावेरी-दरबारच्या दरवाज्याच्या जवळ असलेल्या वाहनतळावर आम्ही, आमची 'थंडरबर्ड' पार्क करत होतो(कोण रे तो म्हणतोय की ,आम्ही "आमच्याकडे 'थंडरबर्ड' आहे " अशी जाहीरात करतोय म्हणुन). शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला. " कसला विचार करतोयस रामैय्या,आयमीन परररय्या ? " " ............... " " ? ??? " " आधी बस तर खर !!" " अरे पण ईतका गौतम गंभीर का झालायस ? " " मला एक मुलगी पसंत पडली आहे आणी तिला मी " " हे धत्तड-तत्तड धत्तड-तत्तड धत्तड-तत्तड " " ऊड्या काय मारतोस भाड्या,पावसाळ्यातल्या बेडकासारखा ' गप खुर्चीत बसलो. "तिची एक अट आहे , तिला आयटीवालाच नवरा पाहिजे " ('च' ह्या शब्दावर शभंर टन भार, मी द्विमुढ,कंपण्यात शिव्ही सारायला मित्रांची यादी आठवायला लागलो.) " सर क्या लाऊं ? " " एक रॉयल स्टॅग !! झेल लेंगे यार,(आपको भी तो झेल रहे है !! ) बघुयात की आपण जॉब " " त्याची गरज नाही, मी तिला कन्व्हिंस केलय की मला ते शक्य नाही ,पण तिने कमीत-कमी आयटीवाल्यांसारख वाग अशी अट घातलीये " तोंडाचा 'आ' वासुन, " मग " " मला त्यांच्यासारखे वागायचेय,त्या करिता मला तुझ्याकडुन 'टीपा' हव्या आहेत." " अरे मग कौल नाही का टाकायचा " " मला काय स्वतासारखा, *** प्रेमी समजलास का ? " " बर बाबा ! सांगतो !"(खर तर मनात खुष झालो होतो, कधीतरी पर्‍याला आमच्या टीपांची गरज पडली होती,निधर्मीक लोकांच्या धाग्यावर धार्मिक मंडळीना किंवा धार्मिक धाग्यावर निधर्मीक लोकांना जसे अर्धवट अंगुली-धुमारे सुटतात, तसे मला विचार-धुमारे सुटायला लागले.) "सर्वात पहिले , एक रिकामं कार्ड-सॉकेट विकत घे,त्याला निळी,पिवळी,हिरवी किंवा काळी रिबीन घाल,त्या रिबीनीवर कसलीतरी विंग्रजीत (झिजलेली असली तरी) अक्षरे असली पाहिजेत, एक छानसा,पाढंर्‍या शुभ्र शर्टात,काळा टाय घालुन ,चालु फॅशनचा चष्मा चढवुन, एक फोटो काढुन घे.प्लास्टीक प्रिंटेड कार्ड मिळाल तर ठीक नाहीतर नाव पत्ता असलेल,कागदी कार्ड घे,आणी त्यात घाल. ते कार्ड फक्त दोनच ठिकाणी असल पाहिजे,एक तर तुझ्या गळ्याभोवती किंवा मग घरातल्या खूंटीवर, मग तु कोठेही असला तरी चालेल,बाईकवर,पिएमटीत,मित्रांबरोबर,पार्टीला,मॉलमध्ये,बाजारात,तुळशीबागेत,केळकर वस्तुसंग्रहालयात,देशी दारु दुकानाच्या बाहेर किंवा मग सार्वजनीक मुतारीत, फक्त तु सायबर कॅफेतल्या संगणकासमोर बसलेला असताना घालायच नाही, टेबलावर काढुन ठेवायच. तेच कार्ड घालुन ,मुद्दामुन मित्रांच्या किंवा स्नेह्यांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात जायच,जरा अंमळ ऊशीर करायचा आणी कोणी कारण विचारले की तोंडावर 'ब्रॅड पिट'चा भाव आणुन " अरे, एक क्रिटीकल 'ईश्श्यु 'आला होता ,"(ईश्श्युच म्हणायच बर का ? प्रॉब्लेम म्हणालास तर पोरदेखील ओळखेल की तु आयटीवाला नाहीस ते) "अरे,कॉलवर होतो "(ईथे क्लांईट हा शब्द वापरायचा नाही.) ," अरे, बग फिक्स करत होतो " किंवा मग " कॅब-मिटीग होती रे " ,अशी वाक्ये चारचौघांत मोठ्या आवाजात बोलायची,समोरचा गांगरुन गेला तर त्याला गांगुलीछाप स्माईल द्यायची, आख्ख्या कार्यक्रमात, आपली कंपनी किती भिकार आहे, आमच्या कामाची किमंत करत नाही,मॅनेजरपेक्षा आपल्यालाच टेक्नीकल नॉलेज जास्त आहे,आयटीतल्या मुली किती फॉरवर्ड झाल्यात वगैरै विषयावर चर्चा करायची. दुसरे म्हणजे सिगरेट प्यायला सुरुवात कर,पण अट अशी आहे की त्या सिगारेटची किंमत 'पाच रुपयांपेक्षा' जास्त असली पाहिजे आणी बाहेर निघताना आख्खा वीस सिगरेट असलेलं पाकिटच घ्यायच,बाळगायच.आपण किती परफेक्ट आहोत हे दाखविण्याकरता'माचिस' खिशात बाळगलीच पाहिजे.लाईटर असेल तर ऊत्तम, पण तो दहा-वीस रुपड्यांना मिळणारा नव्हे, मग भलेही तुला त्यात गॅस भरायला, पुण्याचा दुसर्या टोकावर जावे लागले तरी चालेल,चकचकीत असेल तर मग जबराच. साधी राहणी ऊच्च विचार हा सुविचार फक्त कपड्यांपुरताच वापरायचास, सगळ्या दिवशी फक्त आणी फक्त फॉर्मल्स कपडेच घालायचे,एक वेळ पन्नास-एक खिशे असलेली,थोडीशी घुडघ्याच्या खाली आलेली,अर्धचड्डी चालेल (कुठल्या खिशात काय आहे हे लक्षात राहिल नाही तर अजुनच छान !!)'जॉन प्लेयर्स,ला-कोस्ट,काल्विन क्लेंन या कंपन्यांशिवाय दुसर्‍या कंपन्यांना सदरे बनविता येत नाहीत असा ठाम विश्वास ठेवायचा.मंडईतल्या भाज्या खायच्या नाहीत,भाज्या फक्त 'रिलायन्स फ्रेश'मध्येच स्वस्त मिळतात असा आपण स्वता फेरीवाल्याकडुन विकत आणलेली भाजी खात-खात घरी येणार्‍या पाहुण्याला सुनवायच. कॅफेत संगणकासमोर बसलेला असताना संगणकाशिवाय दुसरीकडे बघणे म्हणजे पाप आहे,त्यात जर कानात हेडसेट घातलेला असेल तर दुग्धशर्करा योग,शिवाय संगणक हा कंपनीने आपल्याला काम करायला दिलेला नसतो,दिवसभर,चेहर्‍यावर 'अर्जुन रामपालचा" मख्ख भाव आणुन,सोशल नेटवर्कींग साईटवर,आपल्या वेगवेगळ्या आयडीने, कधी गेम्स खेळणे,ऊगाच यु-ट्युब वा न्युज साईटवरच्या लिंका,ईकडे तिकडे पेस्ट करणे,आपल्याला आलेले तद्दन भिकार व रटाळ ई-पत्रे ईतरांना पाठवुन त्यांचा मेल बॉक्स फुल्ल करण्याचे पवित्र कार्य करणे किंवा मग काही कळत नसल तरी ऊगाच ऑनलाईन शेयर ट्रेंडीग साईट वर जाऊन टंगळ-मंगळ करणे,हे सर्व आलेच पाहिजे. आता ईतर काही महत्त्वाचे " स्वयंपाक आलाच पाहिजे ", चार मित्रांत बसल्यावर ,एखादी गहन चर्चा चालु असेल तर आपल्याकडुन येणार्‍या प्रत्येक मुद्दयाच्या पहिल्याच वाक्यात 'मी ऑनसाईटला असताना' हे शब्द आलेच पाहिजेत.शिवाय चारचौंघात पिताना, बियर माईल्ड,व्हिस्की हाय-फाय,व्होडका ज्युस टाकुन,रम भरपुर आईस आणी थम्स टाकुनच प्यावी आणी तीही फक्त दोनच पेग (एकांतात पिऊन,गटारात पडुन,टाकीभरुन ऊलट्या केल्यास तरी चालेल)" " अरे बस-बस " " अरे पर्‍या, हे तर काहीच नाही. गरज नसताना,वेगवेगळ्या बॅकेतुन,पर्सनल लोन्स घेणे चालु ठेवावे. होमलोन तर हवेच शिवाय कार-लोनही घ्यावे, मग तुझी कंपनी चालत जायच्या अंतरावर का असेना.मोबाईल ब्लॅकबेरीच असावा मग भलेही तो चायना मेड का असेना ......................................... अचानक, पर्‍या मला समोरच्या खुर्चीतुन,एखाद्या हिन्दी चित्रपटातल्या सीन सारखा ढीश्श-करुन 'गायब झालेला स्पष्टपणे दिसला........

वाचने 15060
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by धमाल मुलगा

न कळून करतो काय? पऱ्याच्या नावाखाली तुझाही बाजार उठवला सुहासनं. एका दगडात किती पक्षी रे, सुहास? बाकी लेखन छानच. खुमासदार. अजून येऊ द्या अशी कल्पनारम्यता!

अरे काय रे सुहाश्या ? एवढा बाजार का म्हणुन उठवला ... च्यायला परवाच्या कट्ट्याचे बील तुला भरायला लावले म्हणुन असा बदला ? बाकी लेख एकदम कडक !!!

छान रंगात आणलेली गोष्ट एकदम संपवल्यासारखी वाटली. असो, तुम्हा आयटीवाल्यांना वेळ तरी कसा असणार म्हणा (हापिसात कामं, शिवाय घरी स्वयंपाक)!;)

In reply to by रेवती

छान रंगात आणलेली गोष्ट एकदम संपवल्यासारखी वाटली सहमत. लेख खूप आवडला. मस्त आहे :)

आधी थोडे दिवस मित्रांबरोबर बोलताना प्रोजेक्ट संपत आलाय अशी हवा करायची. मग हळुच गायब व्हायचं. सायटींवर अस्सल आयडीनं लॉगीन करायचं नाही (डुप्लीकेट आयडी चालते.) मग थोडे दिवस गेले की एखादी डुप्लीकेट आय डी वापरुन धागा काढायचा परा कुठे आहे, किंवा पराच अमुक अमुक आहे म्हणुन. मग परत ओरीजिनल आयडीनं अवतीर्ण व्हायचं अन धागालेखन्-प्रतिसादकांवर `रेशन' घ्यायचं. तेव्हा जाहीत करायचं की सध्या मी बेंचवर आहे म्हणुन. अन अजुन एक राहिलं: अधुन्-मधुन दोन चार दिवस साईटींवरुन गायब व्हायचं. मग थोडावेळ अवतीर्ण होऊन पुडी सोडायची की सध्या इथं इथं ऑनसाईट आहे. (जागेचं नांव असं सांगायचं की तिथं ओळखीचं कुणीच नसेल.) मग पुढचे पंधरा दिवस एक एक करत धागे सोडायचे - इथे थंडी फार आहे स्वतःचं संरक्षण कसं करु, इथे भांडी नाहीत स्वयंपाक्-बिंपाक कसा करु - असे. आपोआप सगळ्यांचा तुम्ही आयटीवाले असल्यावर विश्वास बसतो.

In reply to by प्रसन्न केसकर

हाण्ण हाण्ण तिच्यायला!!! काय खंडेनवमी कालच झाली की काय? =))

खुप आवडले सगळे . विषेशता //* शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला. *// हे जबरी आहे .. पहिल्यांदाच असे वाचले आहे.

In reply to by गणेशा

//* शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला. *// छानच शब्दचित्र. लिहा लिहा अजुन लिहा

अरे सुहाश्या!!!!!!!! मारशील ना एके दिवशी स्वतःच हसून मरेन किंवा हाफीसातले हाकलतील!!! =)) =)) =)) लय भारी!!! -(ऐटीतला आपलं.... आयटीतला) ऋ

अ-प्र-ति-म नीरीक्षण!!!!! मी वाचलं हसत बसले. मग ३ दा चूकीचं संकेताक्षर दिलं या हसण्यात आणि माझा संगणक लॉक झाला. _______________ माझे काही मुद्दे - (१) मीटींगमधे हजेरी लावता आली पाहीजे. एक ना एक अतिउत्साही बकरा असतोच. जो बडबड करून गाडं पुढे नेत असतो. आपल्याला मधेमधे फक्त संमती दर्शवता आली पाहीजे. (२) मुख्य म्हणजे कलाकारी!!! सिस्टीम इन्टीग्रेशन चे क्रिप्टीक आणि अर्धवट डायग्रॅम्स बनवता आले पाहीजेत, ज्यांचा उपयोग मीटींगमधे लोकांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देणं हा आणि हाच असतो. लोकं फक्त आ वासून ते डायग्रॅम्स उकलू पहातात आणि तुमचा हेतू साध्य होतो. (३)मीटींगमधे कोणत्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देऊ नका मात्र एखाद्या "गीक" ने काही उत्तर दिलं तर ताबडतोब त्याच्या हो मधे हो मिळवा.

" ओके " (हा शब्द फार आवडतो आमच्या पिताश्रींना, 'ओके ' म्हटल्या-म्हटल्या,मग ते कशाच्याही संदर्भात असे ना, त्वरीत फोन ठेऊन टाकतात.)
हाहाहा

हाहाहाहा.. खल्लास. मी पण हा लेख वाचून अंमळ अदॄष्य झालो. अजून एक चेहर्‍यावर कायम मुजोरीचा भाव पाहीजे. :)

पन हे आय टि काय भानगड हाय बॉ आमि कय टिआयटि केलेल नाय (माफ करा टायपो झाला) टि *च्या जागि ति ?ल्ह्याय्चा व्हता....

सहा चेंडुंवर ७ षटकार ठोकलेय सुहासराव. आयटी, आयटी वाइफ, स्वयंपाक, सदाशिव पेठ, परा, निरीश्वरवाद आणी बोनस चेंडु असावा तसे चोता दोन सगळे एकाच लेखात कवर केलेत तुम्ही.

अगदी फर्मास, खुसखुशीत लेखन!!! बाकी, एक कळत नाही.. असले लेख लिहायला लोकांना बकरा म्हणून 'परा'च बरा सापडतो!!!! http://www.misalpav.com/node/8893 http://www.misalpav.com/node/8906 http://www.misalpav.com/node/8917 परा, नक्की प्रॉब्लेम काय रे तुझा??

In reply to by मस्त कलंदर

>>परा, नक्की प्रॉब्लेम काय रे तुझा?? हम्म्म्, प्रॉब्लेम पराचा नसुन खुद्द पराच प्रॉब्लेम असावा असे वाटते. पुण्यात आल्यावर मी जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालुन संबंधितांना कानपिचक्या देईन ... - ( डागदर ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>>खुद्द पराच प्रॉब्लेम असावा असे वाटते. (तिसरा डोळा नावाच्या भंपक मालिकेतल्या कर्णिक बाईंची कॉपी करत) मलाही असंच वाटतंय.. बाकी इतरांचे कान काय पिचकवताय? आधी आपली 'केस' सांभाळा!!!

In reply to by मस्त कलंदर

बकरा कोण? ऑं? पऱ्याला बकरा म्हणतीस? त्या लेखमालेचे पुढचे लेखन त्वरेने चालू करावे लागेल आम्हा इतरांना. ;)

In reply to by श्रावण मोडक

हो.. तो असा दोनवेळा दोनलोकांच्या तावडीत सापडला म्हणून. बाकी, मी आताच पुन्हा एकदा तिन्ही भाग वाचून काढले. आणि तेव्हा नवीन होते, म्हणून उगीच स्वत:च स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद कसा काय द्यायचा म्हणून कुणालाही उपप्रतिसाद न देण्याचा उर्मटपणा म्हणा किंवा पाशवीपणा, तिथे मी दाखवलाय असे वाटलं मला!!!!

In reply to by मस्त कलंदर

माझे प्रश्न तीन आहेत. सोयीस्कर उत्तरं नकोत. ती मालिका पुढं लिहावी लागेलच आम्हा इतरांना आता.

मस्त लेखन ! पऱ्याला मस्त कापलाय ! बरोबर सगळ्या आयटीवाल्यना पण!

हा हा. मस्तच रे सुहास. शुक्रवारी फक्त वीटलेली जीन्स,रीबॉक्/नायकी शुजआणि कंपनीचा लोगो असलेला टी-शर्ट घालायचा हे सांगायला विसरलास!

मस्त खुसखुशीत शंकरपाळे आणि कुरकुरीत चकल्या खाल्ल्याचा आनंद मिळाला.

पुन्हा एकदा आयटी संमेलन भरलं वाटतं. पराची पुन्हा एकदा मंडळाचा मानद अध्यक्ष म्हणुन निवड केली गेलेली दिसते. सेक्रेटरी सुहास. चालू द्या. सध्या बिझी आहे लेख वाचीन नंतर. तूर्तास वर्गणी आपलं प्रतिसाद घ्या. कडक लेख !! :-)

आयटी वाले नवरे शनीवारी घरी सकाळी सकाळी लायब्ररीत जातात. एखादे पाचशे पानी बाड आणतात. आणि मग सगळा दिवसभर लोळत घालवतात. रवीवारी त्यांचे हापिसातलेच मित्र भेटणार असतात. तीन तीन कटिंग चहा पीत ट्रेकिंगच्या फक्त गप्पा मरतात. वगैरे वगैरे. हे पण ल्ही ना रे भौ.

In reply to by विजुभाऊ

आयटी वाले नवरे शनीवारी घरी सकाळी सकाळी लायब्ररीत जातात. एखादे पाचशे पानी बाड आणतात. आणि मग सगळा दिवसभर लोळत घालवतात.
??? कुठल्या देशात ? शनिवारी सकाळी उठणे, लायब्ररीत जाणे, पुस्तक आणणे .... छ्या छ्या छ्या, काय पण कल्पनाविलास !
रवीवारी त्यांचे हापिसातलेच मित्र भेटणार असतात. तीन तीन कटिंग चहा पीत ट्रेकिंगच्या फक्त गप्पा मरतात. वगैरे वगैरे. हे पण ल्ही ना रे भौ.
रविवार, मित्र आणि चहा ? विजुभाऊ, मुकाट्यांनी तुम्ही स्वतःच आता "मी आयटीतला नाही" हे कबुल करुन टाका बरं. ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ, मुकाट्यांनी तुम्ही स्वतःच आता "मी आयटीतला नाही" हे कबुल करुन टाका बरं. अरे आयटी तला नवरा. तो देखील चांगला सीझन्ड. अनमॅरीड आयटीवाला वेगळाच असतो. तो पक्का पांडुरंग सांगवीकर + चांगदेव पाटील असतो. ( आता पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव पाटील म्हणजे कोण हे विचारून आपले नेमाडपंथीय अज्ञान प्रकट करू नकोस )

In reply to by विजुभाऊ

>>अनमॅरीड आयटीवाला वेगळाच असतो. तो पक्का पांडुरंग सांगवीकर + चांगदेव पाटील असतो. विजुभाऊ, ऊदाहरणार्थ वगैरे, तुमचे विचार थोरच आहेत. आम्हीतरी अनम्यारिड आयटीवाला असताना विलासी मुघल बादशहापेक्षा कमी नव्हतो बॉ. ;)

ओ आणि एक राहिल ना? कुठेही गप्पा मारताना फोन वाजला की लगेच अ‍ॅक्सेंट बदलुन इंग्लिश बोलायच्..यास फ्यास यास फ्यास. अहो शिष्य तयार करायचा तर असा की बायकोला सुद्धा भ्रम झाला पाहिजे. लेखण 'परिस्थीती चित्रण' म्हणुन अवर्णनिय! अवांतर्-आणि म्हणे आम्ही हल्लि रसाळ लिहिण सोडलय.

हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... +१११११११११११११११११ हहपुवा

आय टी वाल्यांची संभाषण कानावर येत असतात. एक कॉमन पॉईंट ऐकला तो असा की या सगळ्या मुलांना एचआरच्या मुली फार चमत्कारीक वाटतात पण आवडतातही. तुमच्या ऐकण्यात असं कधी आलं आहे का ?

हे पण लिही रे मित्रा... म्हणजे असं की साधं कुठल्या रेस्टॉरंटमधे जेवायला जायचं हे ठरवायलाही चार-पाच जणांना कॉन्फरन्स कॉलवर घ्यायचं आणि मग चर्चेचं गुर्‍हाळ वाढवत नेऊन एक दोन विषयांबद्दल तरी कॉलवरच्या कुणाला तरी म्हणायचं की लेट'स टेक इट ऑफ लाईन !

In reply to by संदीप चित्रे

सह्ही!!!! =)) =)) हे " लेट'स टेक इट ऑफ लाईन !" भारी प्रकरण असतं =)) ह** पा** सगळ्याला आपलं लेट'स टेक इट ऑफ लाईन !