चला मित्रांनो, 'आयटीवाला नवरा' होऊ यात !!
हेतु : सहज-गंमत-जम्मत ..कोणालाही दुखवण्याचा हेतु नाही.
" देखा है पहली बार साजन "....
कधी नव्हे ते ,माझ्या भ्रमणध्वनीवर, सदाशिव-पेठी, पर्याच्या फोन आलेला पाहुन,मी ,डॉन्याचा एकोळी प्रतिसाद बघुन जसा धम्या दचकतो,तसा दचकलो.फोन न घेण्यासारख दुसर काहीही कारण समोर न आल्याने मी फोन ऊचलला.तसेही आमच्या मोबाईलात ईनकमिंग फ्री असल्याने आम्ही सगळेच फोन उचलतो.(सध्या वोडाफोनच्या डायलर ट्युन्स प्रमोशनल कॉल्सनी झ्झीट्ट आणली आहे,ते देखील कन्नडात सुरु होतात, निव कर माडिद्रे का असल कायतरी ?). तर फोन ऊचलला (न घेऊन सांगतो कोणाला ? उद्या खरडवहीत " आर्थिक परिस्थितीने गाजुंन आपण आपला फोन गहाण ठेवला आहे काय? अश्या प्रकारची एखादी खवचट खरड आढळली की बाजार ऊठलाच म्हणुन समजा.)
" सुहास , अरे मी बोलतोय "
" हो हो मी पण बोलतोय "
" हो का ? मी चुकुन बोंबलतोय असे एकले"
पचका झाला.
" सदाशिवात किती वाजेपर्यंत येऊ शकतोस "
अचानकच, पर्याच्या आवाजात आलेल गांभीर्य लक्षात आल्याने, क्षणभर,वैचारिक धाग्यावर,विचारवंत जसे बाह्या सावरुन, तत्परतेने,कळफलक बडवायला निघतात,त्याच तत्परतेने,बाईकला किक मारुन, लगेच निघावसं वाटल.
पण..
" तासाभरात कावेरीत ये ,तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे ."
" ओके " (हा शब्द फार आवडतो आमच्या पिताश्रींना, 'ओके ' म्हटल्या-म्हटल्या,मग ते कशाच्याही संदर्भात असे ना, त्वरीत फोन ठेऊन टाकतात.)
आम्ही तासाभरात कावेरी-दरबारच्या दरवाज्याच्या जवळ असलेल्या वाहनतळावर आम्ही, आमची 'थंडरबर्ड' पार्क करत होतो(कोण रे तो म्हणतोय की ,आम्ही "आमच्याकडे 'थंडरबर्ड' आहे " अशी जाहीरात करतोय म्हणुन). शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्यापाशी, एका कोपर्याच्या टेबलावर,पर्या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला.
" कसला विचार करतोयस रामैय्या,आयमीन परररय्या ? "
" ............... "
" ? ??? "
" आधी बस तर खर !!"
" अरे पण ईतका गौतम गंभीर का झालायस ? "
" मला एक मुलगी पसंत पडली आहे आणी तिला मी "
" हे धत्तड-तत्तड धत्तड-तत्तड धत्तड-तत्तड "
" ऊड्या काय मारतोस भाड्या,पावसाळ्यातल्या बेडकासारखा '
गप खुर्चीत बसलो.
"तिची एक अट आहे , तिला आयटीवालाच नवरा पाहिजे " ('च' ह्या शब्दावर शभंर टन भार, मी द्विमुढ,कंपण्यात शिव्ही सारायला मित्रांची यादी आठवायला लागलो.)
" सर क्या लाऊं ? "
" एक रॉयल स्टॅग !! झेल लेंगे यार,(आपको भी तो झेल रहे है !! ) बघुयात की आपण जॉब "
" त्याची गरज नाही, मी तिला कन्व्हिंस केलय की मला ते शक्य नाही ,पण तिने कमीत-कमी आयटीवाल्यांसारख वाग अशी अट घातलीये "
तोंडाचा 'आ' वासुन, " मग "
" मला त्यांच्यासारखे वागायचेय,त्या करिता मला तुझ्याकडुन 'टीपा' हव्या आहेत."
" अरे मग कौल नाही का टाकायचा "
" मला काय स्वतासारखा, *** प्रेमी समजलास का ? "
" बर बाबा ! सांगतो !"(खर तर मनात खुष झालो होतो, कधीतरी पर्याला आमच्या टीपांची गरज पडली होती,निधर्मीक लोकांच्या धाग्यावर धार्मिक मंडळीना किंवा धार्मिक धाग्यावर निधर्मीक लोकांना जसे अर्धवट अंगुली-धुमारे सुटतात, तसे मला विचार-धुमारे सुटायला लागले.)
"सर्वात पहिले , एक रिकामं कार्ड-सॉकेट विकत घे,त्याला निळी,पिवळी,हिरवी किंवा काळी रिबीन घाल,त्या रिबीनीवर कसलीतरी विंग्रजीत (झिजलेली असली तरी) अक्षरे असली पाहिजेत, एक छानसा,पाढंर्या शुभ्र शर्टात,काळा टाय घालुन ,चालु फॅशनचा चष्मा चढवुन, एक फोटो काढुन घे.प्लास्टीक प्रिंटेड कार्ड मिळाल तर ठीक नाहीतर नाव पत्ता असलेल,कागदी कार्ड घे,आणी त्यात घाल.
ते कार्ड फक्त दोनच ठिकाणी असल पाहिजे,एक तर तुझ्या गळ्याभोवती किंवा मग घरातल्या खूंटीवर, मग तु कोठेही असला तरी चालेल,बाईकवर,पिएमटीत,मित्रांबरोबर,पार्टीला,मॉलमध्ये,बाजारात,तुळशीबागेत,केळकर वस्तुसंग्रहालयात,देशी दारु दुकानाच्या बाहेर किंवा मग सार्वजनीक मुतारीत, फक्त तु सायबर कॅफेतल्या संगणकासमोर बसलेला असताना घालायच नाही, टेबलावर काढुन ठेवायच.
तेच कार्ड घालुन ,मुद्दामुन मित्रांच्या किंवा स्नेह्यांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात जायच,जरा अंमळ ऊशीर करायचा आणी कोणी कारण विचारले की तोंडावर 'ब्रॅड पिट'चा भाव आणुन " अरे, एक क्रिटीकल 'ईश्श्यु 'आला होता ,"(ईश्श्युच म्हणायच बर का ? प्रॉब्लेम म्हणालास तर पोरदेखील ओळखेल की तु आयटीवाला नाहीस ते) "अरे,कॉलवर होतो "(ईथे क्लांईट हा शब्द वापरायचा नाही.) ," अरे, बग फिक्स करत होतो " किंवा मग " कॅब-मिटीग होती रे " ,अशी वाक्ये चारचौघांत मोठ्या आवाजात बोलायची,समोरचा गांगरुन गेला तर त्याला गांगुलीछाप स्माईल द्यायची, आख्ख्या कार्यक्रमात, आपली कंपनी किती भिकार आहे, आमच्या कामाची किमंत करत नाही,मॅनेजरपेक्षा आपल्यालाच टेक्नीकल नॉलेज जास्त आहे,आयटीतल्या मुली किती फॉरवर्ड झाल्यात वगैरै विषयावर चर्चा करायची.
दुसरे म्हणजे सिगरेट प्यायला सुरुवात कर,पण अट अशी आहे की त्या सिगारेटची किंमत 'पाच रुपयांपेक्षा' जास्त असली पाहिजे आणी बाहेर निघताना आख्खा वीस सिगरेट असलेलं पाकिटच घ्यायच,बाळगायच.आपण किती परफेक्ट आहोत हे दाखविण्याकरता'माचिस' खिशात बाळगलीच पाहिजे.लाईटर असेल तर ऊत्तम, पण तो दहा-वीस रुपड्यांना मिळणारा नव्हे, मग भलेही तुला त्यात गॅस भरायला, पुण्याचा दुसर्या टोकावर जावे लागले तरी चालेल,चकचकीत असेल तर मग जबराच.
साधी राहणी ऊच्च विचार हा सुविचार फक्त कपड्यांपुरताच वापरायचास, सगळ्या दिवशी फक्त आणी फक्त फॉर्मल्स कपडेच घालायचे,एक वेळ पन्नास-एक खिशे असलेली,थोडीशी घुडघ्याच्या खाली आलेली,अर्धचड्डी चालेल (कुठल्या खिशात काय आहे हे लक्षात राहिल नाही तर अजुनच छान !!)'जॉन प्लेयर्स,ला-कोस्ट,काल्विन क्लेंन या कंपन्यांशिवाय दुसर्या कंपन्यांना सदरे बनविता येत नाहीत असा ठाम विश्वास ठेवायचा.मंडईतल्या भाज्या खायच्या नाहीत,भाज्या फक्त 'रिलायन्स फ्रेश'मध्येच स्वस्त मिळतात असा आपण स्वता फेरीवाल्याकडुन विकत आणलेली भाजी खात-खात घरी येणार्या पाहुण्याला सुनवायच.
कॅफेत संगणकासमोर बसलेला असताना संगणकाशिवाय दुसरीकडे बघणे म्हणजे पाप आहे,त्यात जर कानात हेडसेट घातलेला असेल तर दुग्धशर्करा योग,शिवाय संगणक हा कंपनीने आपल्याला काम करायला दिलेला नसतो,दिवसभर,चेहर्यावर 'अर्जुन रामपालचा" मख्ख भाव आणुन,सोशल नेटवर्कींग साईटवर,आपल्या वेगवेगळ्या आयडीने, कधी गेम्स खेळणे,ऊगाच यु-ट्युब वा न्युज साईटवरच्या लिंका,ईकडे तिकडे पेस्ट करणे,आपल्याला आलेले तद्दन भिकार व रटाळ ई-पत्रे ईतरांना पाठवुन त्यांचा मेल बॉक्स फुल्ल करण्याचे पवित्र कार्य करणे किंवा मग काही कळत नसल तरी ऊगाच ऑनलाईन शेयर ट्रेंडीग साईट वर जाऊन टंगळ-मंगळ करणे,हे सर्व आलेच पाहिजे.
आता ईतर काही महत्त्वाचे " स्वयंपाक आलाच पाहिजे ", चार मित्रांत बसल्यावर ,एखादी गहन चर्चा चालु असेल तर आपल्याकडुन येणार्या प्रत्येक मुद्दयाच्या पहिल्याच वाक्यात 'मी ऑनसाईटला असताना' हे शब्द आलेच पाहिजेत.शिवाय चारचौंघात पिताना, बियर माईल्ड,व्हिस्की हाय-फाय,व्होडका ज्युस टाकुन,रम भरपुर आईस आणी थम्स टाकुनच प्यावी आणी तीही फक्त दोनच पेग (एकांतात पिऊन,गटारात पडुन,टाकीभरुन ऊलट्या केल्यास तरी चालेल)"
" अरे बस-बस "
" अरे पर्या, हे तर काहीच नाही. गरज नसताना,वेगवेगळ्या बॅकेतुन,पर्सनल लोन्स घेणे चालु ठेवावे. होमलोन तर हवेच शिवाय कार-लोनही घ्यावे, मग तुझी कंपनी चालत जायच्या अंतरावर का असेना.मोबाईल ब्लॅकबेरीच असावा मग भलेही तो चायना मेड का असेना .........................................
अचानक, पर्या मला समोरच्या खुर्चीतुन,एखाद्या हिन्दी चित्रपटातल्या सीन सारखा ढीश्श-करुन 'गायब झालेला स्पष्टपणे दिसला........
प्रतिक्रिया
अग्गायायायाय.....
+१
न कळून
कह्हरच
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.........
आयच्च्या गावात ...
छान रंगात आणलेली गोष्ट एकदम
छान रंगात आणलेली गोष्ट एकदम
असं ढीश्श करुन गायब नसतं व्हायचं....
हाण्ण हाण्ण तिच्यायला!!! काय
+१
एकदम झकास
खुप आवडले सगळे . विषेशता
=))
(विषय दिलेला नाही)
अ-प्र-ति-म नीरीक्षण!!!!!
" ओके " (हा शब्द फार आवडतो
हाहाहाहा.. खल्लास. मी पण हा
छान लेख... (सध्या खरोखरचं
फर्मास, खुसखुशीत लेखन
=)) =)) =)) =)) टिंग्याचा
किंवा
व्वा.............मस्तच लय भारी लिवलय राव
सही रे सही मस्त खुमासदार
सहा चेंडुंवर ७ षटकार ठोकलेय
सही!
सही!
हहपुवा....मला बॉस
मस्तच..
परा ...
>>>खुद्द पराच प्रॉब्लेम असावा
बकरा
पऱ्याला बकरा म्हणतीस?
तीन
मस्त रे सुहाश्या
+१
ज ह ब ह रा !!!
मस्तच!!!
मस्त
हा हा
मस्त....
लय भारी....
मस्तच, मजा आली.
मस्त!
झालं
अरे पण या ष्टॉरीचा हीरो कथेचा
आय टी म्हणजे काय?
मस्त
आयटी वाले नवरे शनीवारी घरी
तुम्ही नक्कीच आयटीवाले नाही ...
Pagination