Skip to main content

डबडेस्ट पुणेरी पाटी

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/09/2010 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक डबडेस्ट पुणेरी पाटी पॅथॉलॉजी लॅब च्या बाहेर ही पाटी होती ईट मे बी युरीन अ‍ॅन्ड स्टूल्स फॉर यू...बट इट्स अवर ब्रेड अ‍ॅन्ड बटर " "आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. स्पोक्स बसवून मिळतील , मुळव्याधीवरचे औषध मिळेल " ( ही पाठी पुणे स्टेशन बस स्टॅन्ड च्या जवळ पहावयास मिळेल ) आमचे येथे काजू ,अमसुल ,आणि परकर मिळतील ( स पेठेत मोदी गणपतीजवळ) तुम्हाला अजून अशा काही पुणेरी पाट्या माहीत असतील तर सांगा.

वाचने 32003
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

सातार्‍यात एक पाटी आहे बालाजी मिल्क्...अद्ययावत म्हशींच्या गोठ्यातील दूध. माझ्या एका इरसाल मित्राची कॉमेन्ट " कोण अद्ययावत ?म्हशी की गोठा?"

~~~~~

डोंबिवलीतील रेतीबंदरवर, खाडीकीनारी असलेली, खास आगरी पाटी. "येते जोरप्यांनी वाय्हात चाले करु नये, पकरल्यास पोकल बांबुचे फटके परतील."

In reply to by विजुभाऊ

इजुभौ हे कैच्याकैच हा. हा जुना जोक पुणेकरांच्या नावावर खपवताय. ;) हाच जोक आम्ही शाळेत असताना मारवाड्यांच्या बाबतीत ऐकलाय.

हा जुना जोक पुणेकरांच्या नावावर खपवताय. नाय ओ.... मी तो पार्ल्यातला किस्सा सांगितला. मला पुण्यातली स पेठेतली एक पाटी कधीच कळाली नाही वात ! वात !! वात !!! जिवाला खा जिवाला खा...अनरसे सामोसेवाले. या दोन्ही पाट्या ज्ञानप्रबोधिनी च्या बाहेर आहेत स प महाविद्यालायच्या समोर एस पीज असे एक भेळ वगैरे चे दुकान होते/आहे तेथे येथे हात धुवावेत असा उलट्या अक्षरातील बोर्ड आहे. तो बेसीनवरच्या आरशात सुलटा दिसतो. त्याच आरशावर आरशात बघून भांग पाडून नये असाही बोर्ड आहे. तो मात्र सुलटा आहे

जंगली महाराज रस्ता, मथुरा हॉटेलच्या एंट्रंसच्या अगदी बाजूला त्या इमारतीचा एंट्रंस आहे तिथे...

In reply to by बिपिन कार्यकर्ते

काय बिका? आता ही पण पुणेकरांचीच चुक का? या बिचार्‍याला शाळेत किती त्रास झाला असेल नाही?

ओ ठणेवाल्या ताई यमक जुळवायला पुणे तेथे काय उणे असे म्हंटले जाते. पण ठाणे तेथे काय उणे असे का म्हंटले जात नाही.

In reply to by विजुभाऊ

ठाण्यात हाय काय तिच्या****? सगळीकडे नुस्ती तळी होती ती बुजवत सुटले आहेत कधीचे, एक पागलखाना होता तो हलवला ... आता ठेवलंय काय तिथे, तर गर्दी? हॅट, ठाणं बेक्कार आहे एक लंबर!! पुण्यात पहा जागोजागी तळी आहेत, जागोजागी नवीन निर्माण होत आहेत, पागलखाना अजून सुरू आहे ... पुण्यात गर्दीही नाही!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काय आहे. ठाण्यातले सगळ्यात डेंजर येडे उठुन पुण्यात आले. त्यामुळे गरज उरली नसावी बहुधा पागलखान्याची. पण एकुण ठाण्यात पागलखाना होता तेव्हा(च) ठाण्यात काही शान होती हा विचार आवडला.

In reply to by मृत्युन्जय

छे छे, ठाण्यात शान कधीच नव्हती; चान्सच नाही! ते आपलं उगाच बोंबलायला लोकं काय वाट्टेल ते बोंबलतात हो, तुम्ही नका लक्ष देऊ! पागलखाना होता तेव्हा ठाण्यात जरातरी काहीतरी सांगण्यासारखं होतं. आता काय आहे, तो टीचभर मासुंदा तलाव आणि आक्रमण झालेला इंचभर आंबेघोसाळे तलाव आणि अतिक्रमणयुक्त येऊर?? हॅट... त्यापेक्षा तळतळाटांचं (भरपूर तळी असलेलं) आणि पागलखाना असलेलं पुणं खूप चांगलं!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवो तो पागलखाना चालु हाये म्हणे अजुन. पुन्यांदा तपासुन बगा जरा. कदी बंद जाला? बाकी ठाणे म्हणजे देसाची शान हाय. कोनालाबी गुनेगाराला पकडलं की तो पिच्चर मधला हवालदार्र म्हनतो ना - चल ठाण्याला म्हननु. आनि उपवन ल्याक आहे ना तिथे अजुन?

In reply to by विजुभाऊ

घ्या वरतीच लिहिली आहे एक ठाणेरी पाटी. इथे परत लिहितो "यशवंत भोजनालय - येथे फक्त राहण्याची सोय केली जाइल "

In reply to by गांधीवादी

क ड क! कैलास स्मशानभूमीखालच्या बाणासमोरच 'अब मेरा नंबर है' =)) आणि 'रिटर्नसाठी शववाहिनी उपलब्ध होणार नाही' _/\_ हैट्ट आहे!

मागे एकदा बडोद्यात असताना बसच्या मागे गुजराथीत 'गमे मनने फावे तनने', अशी ड्रेसेसची जाहिरात होती. ती मराठी अर्थाने वाचली. ठ्ठो! गुजराथी लिपी येत असेल तर कळेल.

In reply to by तिमा

'गमे मनने फावे तनने' याचा मराठीत अर्थ असा होऊ शकतो. (पाहिल्यावर) मनाला (ड्रेस) आवडतो (व परिधान केल्यावर) शरीराला सुखाचा वाटतो.

क्रुपया पेश॑टनी नाव नो॑दणी सकाळी ११:१५ च्या आत व रात्री ८:१५ च्या आत करावी, न॑तर आलेल्या पेश॑ट कडुन ५० रुपये ज्यादा आकारण्यात येतील.

नुकतीच प्रकाशित झालेली एक जाहिरात. ही पाटी काही तशी पुणेरी नाही...तरीही भाषेच्या केलेल्या चिंध्या पाहण्यासाठी एक नमुना. bhasha इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

ही पाटी काही तशी पुणेरी नाही...तरीही भाषेच्या केलेल्या चिंध्या पाहण्यासाठी एक नमुना. पाटी पुणेरी नाही त्यामुळेच भाषेच्या चिंध्या केलेल्या आहेत. :P बाकी पाटी दिसत नाही आहे त्यामुळे अजुन काही लिहित नाही

शतकोत्तर प्रतिसांदासाठी धन्यवाद. पुण्यात चितळेंकडे असलेली पाटी हे पार्किंग चितळे बंधु मिठाईवालेंच्या ग्राहकांसाठी राखीव आहे. वाहन फक्त २० मिनिटे पार्क करावे. २० मिनिटांनन्तर वाहन बाजूला करण्यात येईल

मुंबईकर काही कमी नाहीत. कालच एका टोईंग व्हॅनच्या मागे लिहिलेलं वाचलं. ' चालतो की उचलुं?