Skip to main content

डबडेस्ट पुणेरी पाटी

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/09/2010 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक डबडेस्ट पुणेरी पाटी पॅथॉलॉजी लॅब च्या बाहेर ही पाटी होती ईट मे बी युरीन अ‍ॅन्ड स्टूल्स फॉर यू...बट इट्स अवर ब्रेड अ‍ॅन्ड बटर " "आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. स्पोक्स बसवून मिळतील , मुळव्याधीवरचे औषध मिळेल " ( ही पाठी पुणे स्टेशन बस स्टॅन्ड च्या जवळ पहावयास मिळेल ) आमचे येथे काजू ,अमसुल ,आणि परकर मिळतील ( स पेठेत मोदी गणपतीजवळ) तुम्हाला अजून अशा काही पुणेरी पाट्या माहीत असतील तर सांगा.

वाचने 32003
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

येथे १. परकर २. ३. ४. नाइटी मीळतील....फक्त स्त्रियांकरिता. कौपिनेश्वर,बाजार गल्ली ठाणे.

आईsssssssss ग ! विजुभौ तुम्ही सुद्धा झटपट प्रसिद्धीच्या मागे लागलात ? यु टु??

खतरनाक पाट्या विजुभाऊ..... आमच्या येथे २५ रुपयात २५ पासपोर्ट मिळतील...... (कदाचित त्याला पासपोर्ट फोटो म्हणायचं असावं) चित्रा फोटो studio डोंबिवली

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"आता तरी सफाई करा" (गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"आता तरी सफाई करा" (गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.) हा हा हा हा आ आ आ ... आँ? आवाज गेला की हसून हसून! आता जीव जायची वेळ येतेय बहुतेक! ओ, ३_१४ तै, जरा दमानं की वो! ;-)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ! मी हीच्च सुधारणा टाकायला आलो होतो. कष्ट वाचवल्याबद्दल मंडळ काच्चकन आभारी आहे. अवांतरः बाई 'न्यु औंधकर' आहेत हो, घ्या सांभाळुन. ;)

In reply to by धमाल मुलगा

चालायचंच. अहो हल्ली पुण्यात राहूनही पुण्याला शिव्या घालायची फॅशन आहे. ( हे वाक्य आजकल बापू को गाली देनेकी फॅशन है च्या चालीवर वाचावे) :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काय संबंध? एक बोर्ड लिहीला म्हणजे पुण्याला शिव्या दिल्या? आयला, पुण्याला शिव्या घालणं येवढं सोपं आहे होय! उगाच गुर्जींनी येवढा लांबलचक लेख लिहीला! शिका गुर्जी, शिका काहीतरी यातून!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

च्यामारी !!! हे तर धार्मिक भावना दुखावण्यापेक्षा पण सोपे आहे. अशा वागण्याला आमच्या कडे एक म्हण आहे, "मीठ लाया माका खाया" => गरज नसताना स्वतःवर एखादी गोष्ट ओढवून घेणे. बाकी चालू द्या....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ताच एक पाटी पाहीली. वरच्या मजल्यावरील लोकांबद्दल खाली चौकशी करू नये. जेवताना ढेकर देऊ नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही. म्हणजे? इथली धूळ तशीच ठेवायची की काय? ;)

काजू, आम्सूल आणि परकर =)) =)) काहीतरी बेअकली संच बनवायचे झालं. पण मग वाटतं - आता ते लोक या ३ गोष्टी विकत अशीत तर ते तरी काय २/२ पाट्या बनवायचा खर्च करणार?

In reply to by शुचि

काजू, आम्सूल आणि परकर कदाचित तिन्ही कोकणातुन येत असेल. आता ते लोक या ३ गोष्टी विकत अशीत तर ते तरी काय २/२ पाट्या बनवायचा खर्च करणार अवो मी तर असेही ऐकुन आहे की पुण्यातले लेले शिक्का सुद्धा फक्त ले एवढाच बनवुन पैसे वाचवतात. तुम्हे तर आख्ख्या पाटीची गोष्ट करुन राहिलात शुचितै.

राम मंदिराच्या बाहेर पाटी लावली होति... देवळास रंगकाम चालु असल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि चहाच्या कपात सिगारेट विझवल्यास चहा अॅशट्रेमध्ये दिला जाईल..... संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.

In reply to by गणपा

त्या स्पीकना वर फिदीफिदी हसणारे आपण देखील तर "धन्स" आणि "वीकान्त" सारखे शब्द आजकाल सर्रास वापरून राहीलोय :-/

ते देवळास रंगकाम, लिंबु सरबत कोकम, कुत्रा झक्कास हं... च्यायला, ह्यांचं रंगकाम आणि त्रास रामाला...

लक्ष्मी नारायण येटरच्या आसपास .. दोन टपर्‍या शेजारी-शेजारी ,अगदीच खेटुन नाही पण दहा-पंधरा फुटावर. दोन्ही कडे रेट , टपर्‍यांची ठेवण, रंग,आत ठेवलेले भांडे,मेनु, ऊभे राहुन खाण्याची पध्दत, अगदी सगळ काही जुळ. पहिल्या टपरीवरील पाटी : " कृपया आधी टोकन घ्यावे " दुसर्‍या टपरीवरील पाटी : " ईथे टोकन-पध्दत नाही "

१. "पूलाचे काम चालू आहे सावधान" २. "रेल्वेरूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका" ह्या दोन पाट्या थोड्या थोड्या अंतरावर... कळवा स्टेशन... (खूप महिन्यांपूर्वी होती)

"पुण्याचे नसाल तर पुण्याविषयी काही गैर बोलू नये. पुण्याबाहेर केवळ औरंगजेब राहातात" म्हणजे, मला आधी कधी ही पाटी दिसली नव्हती, पण आता दिसते आहे. :)

In reply to by राजेश घासकडवी

अहो अजून एक पाटी असते खाली. "पुण्याचे असाल तर काहीही बोललात तरी चालेल, कारण मांजरीचे दात तिच्या पिल्लांना....."

In reply to by चन्द्रशेखर सातव

अग्गायायायाया..... गाडी लावायला आलेला एकवेळ गाडी बोकांडी घेऊन फिरेल असली धमकी वाचल्यावर! =))

In reply to by धमाल मुलगा

आन ती एक रे धम्या .. "येथे लघवी करु नये .. अन्यथा कायमचा इलाज करण्यात येईल !!"

बर्‍याच पाट्या (पुणेरी लोकांनाही फिक्या पाडतील अश्या) ईथे आहेत... वानगी दाखल काही:

In reply to by नाटक्या

हे एकदमच पोचलेले निघाले की सगळे, पुणेरी लोक लाजून चूर झाले! ;) Shakespeare Lingerie Club म्हणजे 'ज्ञानेश्वर रद्दी केंद्र' च्याही पुढचे झाले. (तरी बरं Shakespeareचं स्पेलिंग बरोबर लिहिलंय! ;) )

In reply to by चतुरंग

ह्यातील बर्‍याच पाट्या इंग्लिश भाषेतून लिहीण्याच्या गोंधळामुळे विनोदी झालेल्या आहेत. चीनमधून असे बरेच काही काढता येईल.

In reply to by चतुरंग

मला "शेक्सपियर लाँजेरी क्लब" पाटीमधील गोम कळली नाही. शेक्सपियर बहुधा रंगेल होता. (म्हणजे ज्ञानेश्वर रद्दी केंद्र सारखा प्रकार नाही.) माझ्या (पोरकट) मित्रमंडळात वाटेल त्या शब्दात दुसरा अर्थ काढून खिक्क् करून हसत असू. शेक-स्पियर म्हणजे "भाला हलव." वेळी-अवेळी भाला हलवण्याबाबत त्या वयात फारच विचार होत असे. प्रौढपणी (किंवा धाकटेपणी) तितका एकमार्गी/एकाकी विचार होत नाही (किंवा होत नसे). पण "शेकस्पियर"चा तसा टीनेजर अर्थ घेतला तरी लाँजेरी क्लबसाठी पाटी ठीकच वाटते.

In reply to by धनंजय

Shakespere च्या ऐवजी Shakesphere असं हवं होतं का? मग ते त्या क्लबला सुटेबल वाटतं.. चायनीज लोकं स्पेलिंग चुकू शकतात ;)

In reply to by एक

इथे अफ्रीकेत एक पाटी बघितली. खाजगी विमानतळाच्या बाहेर. "बीवेअर ऑफ लो फ्लाइंग प्लेन्स." फोटो काढायचा राहीला

ठाण्याला एक यशवंत भोजनालय आहे. तिथे फक्त राहण्याची सोय केली जाते. तशी पाटीच आहे तिथे "यशवंत भोजनालय - येथे फक्त राहण्याची सोय केली जाते".

पूर्वी सकाळ प्रेस च्या दारात खूप वाहने पार्क केली जात, त्यामुळे आतमधे जाताना त्रास होई. म्हणून तिथे भिंतीवर लिहीले येथे वाहने लावू नयेत. तिथे लोकांनी गाड्या लावणे बंद केले आणि फेरीवाल्या विक्रेत्यांनी रात्री हातगाड्या , सायकली आणून लावायला सुरुवात केली. मग परत भिंत रंगवली, लिहीले येथे कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत. उदा. स्कूटर, चारचाकी, सायकली, हातगाड्या एका टारगट माणसाने विटेच्या तुकड्याने हातगाड्यांच्या पुढे २ शब्द खरडले. आता असे दिसू लागले. येथे कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत. उदा. स्कूटर, चारचाकी, सायकली, हातगाड्या आणि विमाने

एका टारगट माणसाने विटेच्या तुकड्याने हातगाड्यांच्या पुढे २ शब्द खरडले तो टारगट इसम नक्की शनीवार पेठेतला सकाळ ऑफीसच्या जवळच रहात असणार. असो. ही घ्या चिंचवडमधील एक पाटी येथे ष्टो दुरुस्ती, नाडी बंडल, घरगुती परकर आणि ताजा काळा मसाला मिळेल.

In reply to by विजुभाऊ

>>तो टारगट इसम नक्की शनीवार पेठेतला सकाळ ऑफीसच्या जवळच रहात असणार. ह्म्म्म...कळतायत बरं टोमणे. ;)

In reply to by धमाल मुलगा

धम्या ते विजुभौंनी म्हटलेंलं मोदी गणपती स पेठेत कुठं आहे रे. पत्ता मिळाला तर आम्हाला पण सांग.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मोदी गणपती ठाऊक नाय? मेल्या लाज आणतोस चारचौघात. स्वतःला पुणेकर म्हणवुन घ्यायच्या लायकीचा न्हाईस लेका. चित्रशाळेपासून सरळ नो वेंट्रीतुन गाडी नारायणपेठेत घातली की जिथं रस्ता संपतो तिथं डाव्या बाजूला मोदी गणपती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नाय, पोकळ शब्दात पकडायलायस म्हणुन विचारतो हां. पुणे-व्हाया-मुंबई-व्हाया-होसुर-व्हाया-बारामती-व्हाया-सातारा असा प्रवास झाल्यानंतर एव्हढी तेव्हढी गडबड व्हायचीच की हो. घ्या सांभाळुन. आपलंच हैत ते बी.

मोदी गणपती स पेठेत कुठं आहे रे पेशवे अभ्यास कमी पडतोय तुमचा जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला मिळते तेथे ( जिथे सागरा धरणी मिळते च्या चालीवर ) हा घ्या एक्झॅक्ट पत्ता Coordinates: 18°28'38"N 73°57'20"E ... मोदी गणपती ला बोंबल्या गणपती असेही एक नाव आहे ( Legend has it that Modi Ganpati temple got its name since the temple idol was found in a farm next to Khushrooshet Modi’s garden (how it landed there we do not know). A lesser known name for this charming temple is Bomblya Ganpati (which sounds both fishy and loud)! The story goes that this name got associated with it due to fisher folk selling Bombil (a fish also known as Bombay Duck) nearby. In colloquial Marathi Bomblya also means – one who speaks loudly. This temple from the Peshwa era dates back to before 1811. Bhat (a Maharashtrian surname) from Ratnagiri, later settled in Pune and built the temple. The idol is thought to be 200 years old )

In reply to by विजुभाऊ

जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला मिळते तेथे हा हा हा हा हा . उगा काहीतरी फेका मारू नका सवईनुसार.. मोदी गणपती अंमळ नारायण पेठेतच आहे फार्फार पूर्वीपासून. सदाशिव पेठ चांगली दूर आहे तिथून. लक्ष्मीरोडच्या पल्याड सदाशिव पेठ आहे आणि अल्याड नारायणपेठ आहे. उगा आपलं कैच्याकै बरळायचं. आणि जालावर (पुणे हेरीटेज ब्लॉगवर) शोधून माहीती कोणीही देईल हो.. ओरिगिनल करा कधीतरी.

आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत महिला मंडळाने भरविलेले विविध वस्तुंचे प्रदर्शन होते. एका मित्राच्या आइचा त्यात स्तॉल असल्याने आम्ही मित्र मैत्रीणी मिळुन सगळे गेलो. बाहेर मोठी पाटी लावली होती "येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री" :(

In reply to by पर्नल नेने मराठे

हाण्ण तिच्यायला!!!! =)) =)) =)) अवांतरः पाटी वाचुन प्रदर्शन पहायला झुंबड उडाली होती का? :P

In reply to by पर्नल नेने मराठे

येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री >>. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मार डाला !! ही चुचु पण ना !!

In reply to by सुहास..

आज अजुन एक पाटी वाचली. विसा रिनिवलसाठी मेडीकल टेस्ट होती. खुप दारं शोधली आत जायला. शेवटी एका दारावर मेडिकल फिटनेस टेस्ट( फिमेल कलेक्शन) जरा उडालेच मग खाली अजुन लिहिलेले वाचले ब्लड कलेक्शन मग आत गेले..

In reply to by पर्नल नेने मराठे

स पेठेतली आणखी पाठी जेवणाच्या ऑर्डरी घेतल्या जातील. आजची स्पेश्यालिटी : श्राधाची थाळी बापट उपाहार गृह पुने येथे असलेले स्टॅन्डर्ड पाटी आमचे लस्सी प्यायची नसते खायची असते.

In reply to by विजुभाऊ

>>आजची स्पेश्यालिटी : श्राधाची थाळी काहीही फेकू नका भौ! इथं काय सरदारजी जमलेत का सगळे? च्यायला...