✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

स
सविता यांनी
Sun, 09/12/2010 - 14:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18263 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

आन् निस्ते पापकार्नं

मितान
गुरुवार, 09/16/2010 - 16:53 नवीन
आन् निस्ते पापकार्नं केव्ड्याला देता भौ ? नाही , कवाचि झाडावर बसून लै कट्टाळा आलाय म्हून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आयला मी स्वतः पॉपकोर्न घेउन

मृत्युन्जय
गुरुवार, 09/16/2010 - 17:07 नवीन
आयला मी स्वतः पॉपकोर्न घेउन बसलो आहे. पाच का दस थोडे कमी वाटते खरे. सामना रंगत जाइल तसा दर वाढत जाइल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>पाच का दस थोडे कमी वाटते

धमाल मुलगा
गुरुवार, 09/16/2010 - 17:53 नवीन
>>पाच का दस थोडे कमी वाटते खरे. सामना रंगत जाइल तसा दर वाढत जाइल काय? जरुर... (म्हणजे अवश्य! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

च्यामारी.... माझ्या धाग्याचा

सविता
गुरुवार, 09/16/2010 - 19:42 नवीन
च्यामारी.... माझ्या धाग्याचा आखाडा झाला की!!! होऊन जाऊ दे..... आम्ही झाडावर बसून पॉपकॉर्न खातो :) खुद के साथ बातां : ६०+..आणि अजून सुरू...जमलं जमलं..शतकी प्रतिसाद आपल्या पण धाग्याला पण मिळण्याची शक्यता आहे .. अगदी चोता दोन, परा सारखे द्विशतकी, त्रिशतकी नाही जमलं तरी!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सुपारी दे ना

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 22:32 नवीन
गो, सुपारी दे ना ... परा आणि चोता दोन काय उगाच फेमस नाही झाले! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

ही घे सुपारी......

सविता
गुरुवार, 09/16/2010 - 22:40 नवीन
ही घे सुपारी...... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकाटाआ

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 22:33 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

जरुर... (म्हणजे अवश्य! )

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/16/2010 - 21:27 नवीन
जरुर... (म्हणजे अवश्य! )
धम्या, खुलाशाबद्दल धन्यवाद. नाही तर आम्हाला भलतंच वाटलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बरोबर आहे. अपेक्षित होतं

धमाल मुलगा
गुरुवार, 09/16/2010 - 21:31 नवीन
बरोबर आहे. अपेक्षित होतं म्हणुनच सांगितलं हों
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आधी नीट वाचा आणि मग तारे

नीधप
गुरुवार, 09/16/2010 - 20:19 नवीन
आधी नीट वाचा आणि मग तारे तोडा. धागाकर्तीने मुळात वपुंच्याबद्दल वाईट बोलणार्‍यांबद्दल नाराजी व्यक्त केलीये आणि मग दुसर्‍या एका लेखकाबद्दल भरपूर तोंडसुख घेतलेय. ह्या विरोधाभासाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही पण वपुंबद्दल काही बोलाल तर फटके पडतील अशी धमकी दिलीतच की. मी माझ्या आवडत्या लेखकांबद्दल कोणी काय बोलावं वा बोलू नये, एवढेच काय माझे आवडते लेखक कोण हेही सांगण्याच्या भानगडीत पडलेली नाहीये. माझ्या आवडत्या लेखकांबद्दल तुम्ही काय बोलता किंवा नाही याबद्दल मी कशाला चिंता करू? मला फरक पडत नाही अजिबात तुम्ही काय बोलता याने आणि म्हणूनच माझ्या न आवडत्या लेखकांबद्दल जे वाटेल ते प्रांजळपणे लिहिण्याचा मला अधिकार नक्कीच आहे. आणि तुमचं फटके पडतील हे बोलणंही तितकंच हास्यास्पद आहे. पण ज्याला आपल्या आवडत्या लेखकाबद्दल कोणी काहीही बोललेलं चालत नाही. त्याला दुसर्‍याच्या आवडत्या लेखकांबद्दल तरी काही बोलण्याचा अधिकार उरतोच कुठे? इतकाच मुद्दा आहे. अर्थात वपु आवडणारे लोक असेच हमरीतुमरीवर उतरताना आणि तितक्याच जोरात इतरांना नावं ठेवताना नेहमीच बघितलेत त्यामुळे आश्चर्य नक्कीच वाटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धागाकर्तीने मुळात

मृत्युन्जय
गुरुवार, 09/16/2010 - 20:50 नवीन
धागाकर्तीने मुळात वपुंच्याबद्दल वाईट बोलणार्‍यांबद्दल नाराजी व्यक्त केलीये आणि मग दुसर्‍या एका लेखकाबद्दल भरपूर तोंडसुख घेतलेय. ह्या विरोधाभासाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? माझं कशाला काही म्हणणं असेल. तुम्ही वेगळे काय केले? तुम्ही पण वपुंबद्दल काही बोलाल तर फटके पडतील अशी धमकी दिलीतच की. मी? छ्या ब्वो. मी नाही असली काही धमकी दिली. मी सोज्वळापणे तुम्हाला सांगितले की नसेल आवडत तर नाही आवडत म्हणा ना. उगाच नसती विशेषणॅ नको त्याला लावली तर फटके पडतीलच म्हणुन. मी फटके देइन अशी धमकी अजिबात नाही दिली. दिलीच असती तर एव्हाना फटके दिलेही असते. त्यावर तुम्ही तारे तोडलेत की "तुम्ही इतर लेखकांना शिव्या देऊन वाईट म्हणू शकता......" तर गंमत अशी की मी कोणालाच शिव्या नव्हत्या दिलेल्या. मी तर माझ्या ७ वर्षे वयाच्या भाच्च्याने लिहिलेले साहित्य पण उच्च दर्जाचे आहे असे म्हणतो. मी माझ्या आवडत्या लेखकांबद्दल कोणी काय बोलावं वा बोलू नये, एवढेच काय माझे आवडते लेखक कोण हेही सांगण्याच्या भानगडीत पडलेली नाहीये. माझ्या आवडत्या लेखकांबद्दल तुम्ही काय बोलता किंवा नाही याबद्दल मी कशाला चिंता करू? मग कशाला उगाच व पु, इतर असा वाद उकरुन काढलात? मला फरक पडत नाही अजिबात तुम्ही काय बोलता याने तुम्ही प्रतिसाद दिलात तेव्हाच लक्षात आले होते ते. आणि म्हणूनच माझ्या न आवडत्या लेखकांबद्दल जे वाटेल ते प्रांजळपणे लिहिण्याचा मला अधिकार नक्कीच आहे. आहेच की नक्कीच आहे. पण मग इतर कोणि जर त्यांच्या नावडत्या लेखकाबद्दल लिहिले तर एवढे अंगावर कशाला येताय उगाच? आणी किमान प्रतिसाद देणार्‍याने कोणावर टीका केली आहे का हे तरी बघायचे मग किमान? आणि तुमचं फटके पडतील हे बोलणंही तितकंच हास्यास्पद आहे. मग हसा की. गरम कशाला होताय उगाच पण ज्याला आपल्या आवडत्या लेखकाबद्दल कोणी काहीही बोललेलं चालत नाही. त्याला दुसर्‍याच्या आवडत्या लेखकांबद्दल तरी काही बोलण्याचा अधिकार उरतोच कुठे? कसे बोललात. तुम्हालाच लागु होते हे. तुम्हाला लेखकांना शिव्या घातलेल्या चालतात ना? मग इतर कोणाला चालतात की नाही याच्याशी काय घेणे देणे? इतकाच मुद्दा आहे. अर्थात वपु आवडणारे लोक असेच हमरीतुमरीवर उतरताना आणि तितक्याच जोरात इतरांना नावं ठेवताना नेहमीच बघितलेत त्यामुळे आश्चर्य नक्कीच वाटलं नाही. इथे कोणिच वपु प्रेमी हमरीतुमरी वर उतरलेला नाही आहे. व पु हा विषयच नव्हता कुठे. तुम्हीच हास्यास्पद विषय पुढे केला. जळजळा काढण्यासाठी चुकीच्या माणासावर चुकीचे आरोप केलेत. बर कारणे विचारली तर ती न देता उगाच अवांतरच लिहिले. व पु भंपक का याचे उत्तर दिलेच नाही. वपुंचे किती आणी कोणते साहित्य वाचुन तुम्ही असले विनोदी मत बनवलेत देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

दस का बीस....दस का बीस....दस

धमाल मुलगा
गुरुवार, 09/16/2010 - 21:16 नवीन
दस का बीस....दस का बीस....दस का बीस....दस का बीस....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आत्तापर्यंत किती कमावलेत

मृत्युन्जय
गुरुवार, 09/16/2010 - 21:28 नवीन
आत्तापर्यंत किती कमावलेत बारामतीकर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आमच्या नावावर फक्त साडेबारा

धमाल मुलगा
गुरुवार, 09/16/2010 - 21:31 नवीन
आमच्या नावावर फक्त साडेबारा एकर आहे हाँ. बाकी कमाईचे प्रश्न असे जाहीर विचारु नयेत, आपली राष्ट्रकुल स्पर्धा करणेत येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बारामतीकर

श्रावण मोडक
गुरुवार, 09/16/2010 - 21:38 नवीन
'बारामतीकर'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आपली राष्ट्रकुल स्पर्धा करणेत

मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 10:35 नवीन
आपली राष्ट्रकुल स्पर्धा करणेत येईल. बारामतीकरांचा पुणेकरांवर राग आहेच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

काहीही

नीधप
Fri, 09/17/2010 - 00:49 नवीन
>>तुम्ही वेगळे काय केले?<< मी काही केलेच नाही. धागाकर्तीचा डबल ढोलकी प्रकार अधोरेखित केला फक्त. >>उगाच नसती विशेषणॅ नको त्याला लावली तर फटके पडतीलच म्हणुन.<< तुमच्या मते नसती आणि नको त्याला. माझ्या मते ती विशेषणे योग्य आहेत आणि योग्य व्यक्तीलाच आहेत. इतरांची मतं वेगळी म्हणून फटके पडतील हे सांगण्याचा काय अर्थ होतो? तशी मतं असायचा अधिकार नाही किंवा मांडू नका? >>मी कोणालाच शिव्या नव्हत्या दिलेल्या. << शिव्या देणार्‍यांचं समर्थन केलंत ना. मग तुमच्या वपु ला नावं ठेवल्यावर का त्रास झाला? >>मग कशाला उगाच व पु, इतर असा वाद उकरुन काढलात?<< धागाकर्तीनेच वपु हे नाव काढलंय मूळ लेखात. मी नाही. आणि तुम्ही कशाला मधे पडलात एवढे चवताळून? >>पण मग इतर कोणि जर त्यांच्या नावडत्या लेखकाबद्दल लिहिले तर एवढे अंगावर कशाला येताय उगाच? आणी किमान प्रतिसाद देणार्‍याने कोणावर टीका केली आहे का हे तरी बघायचे मग किमान?<< चोराच्या उलट्या बोंबा... तुमच्या आवडत्या लेखकाबद्दल काही बोललं तर तुम्ही फटके पडतील अशी गुंडगिरीची भाषा बोलताय. आणि माझा आवडता लेखक कोण हेच मी कधी लिहिले नाही इथे तर माझ्या आवडत्या लेखकावर कोणी टिका केली की नाही हे तुम्ही कसं ठरवलंत? मुळात तुम्ही धागाकर्तीचे डुप्लिकेट आयडी असल्यासारखे का भांडताय माझ्याशी? >>>इथे कोणिच वपु प्रेमी हमरीतुमरी वर उतरलेला नाही आहे. व पु हा विषयच नव्हता कुठे. तुम्हीच हास्यास्पद विषय पुढे केला. जळजळा काढण्यासाठी चुकीच्या माणासावर चुकीचे आरोप केलेत.<< फटके पडतील याला हमरीतुमरीची भाषाच म्हणतात. वपु हा विषय धागाकर्तीनेच काढलेला आहे. वपुप्रेमामुळे दिसला नसेल तुम्हाला. तुम्ही सगळे आरोप अंगावर ओढवून घेतलेत धागाकर्तीचा डुप्लिकेट असल्याप्रमाणे. हा तुमचा प्रॉब्लेम माझा नव्हे. >>व पु भंपक का याचे उत्तर दिलेच नाही. वपुंचे किती आणी कोणते साहित्य वाचुन तुम्ही असले विनोदी मत बनवलेत देव जाणे.<< सगळं वाचलंय. अतिशय संकुचित आणि डबक्यात राहून आकाशाला मापायला बघण्याची, आणि डबक्यातले नियम आपल्या डबक्याबाहेरच्या विषयाला/ अवकाशाला लावून त्यावर डुढ्ढाचार्यासारखी टिप्पणी करण्याची शैली मला भंपक वाटते. अतिशय एकांगी लिखाण वाटतं. माझे मत तुम्हाला विनोदी वाटते याला माझ्या लेखी कणभरही अर्थ नाही. आणि परत एकदा आश्चर्य नाहीच. वपु प्रेमी असेच चवताळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी काही केलेच नाही.

मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 11:16 नवीन
मी काही केलेच नाही. धागाकर्तीचा डबल ढोलकी प्रकार अधोरेखित केला फक्त. धागाकर्तीनेही कुठेही डबल ढोलकी प्रकार केलेला नाही आहे. तुमच्या मते नसती आणि नको त्याला. माझ्या मते ती विशेषणे योग्य आहेत आणि योग्य व्यक्तीलाच आहेत. इतरांची मतं वेगळी म्हणून फटके पडतील हे सांगण्याचा काय अर्थ होतो? तशी मतं असायचा अधिकार नाही किंवा मांडू नका? अर्थ असा होतो की तुम्ही एखाद्याला भंपक म्हणु शकता तर मग दुसरा एखादा नेमाड्यांना भंपक म्हणु शकतो. आणि जेव्हा तो सडेतोड उत्तर देतो तेव्हा ते फटकेच असतात. कोण्या वपुप्रेमीने तुम्हाला आत्तापर्यंत घरी येउन प्रत्यक्ष फटके मारले असतील असे वाटत नाही. तुम्ही भंपक, संकुचित, मध्यमवर्गीय असे फटके मारु शकता तर मग इतर कोणी फटके मारले तर तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? शिव्या देणार्‍यांचं समर्थन केलंत ना. मग तुमच्या वपु ला नावं ठेवल्यावर का त्रास झाला? मी वपुंचा भक्त नाही. पण त्यांच्या लिखाणावर तुमच्या प्रतिक्रिया तद्दन स्टंटबाजी वाटते. त्रास स्टंटबाजीचा होतो, धागाकर्तीनेच वपु हे नाव काढलंय मूळ लेखात. मी नाही. आणि तुम्ही कशाला मधे पडलात एवढे चवताळून? लेख नीट न वाचताच लोक बोंबा का मारतात ते कळाले नाही. चोराच्या उलट्या बोंबा... तुमच्या आवडत्या लेखकाबद्दल काही बोललं तर तुम्ही फटके पडतील अशी गुंडगिरीची भाषा बोलताय. धागा तर नाहीच नाही किमान ज्याला प्रतिसाद देता आहात त्याची प्रतिक्रिया तर नीट वाचत जा. मी आधीच्याच प्रतिक्रियेत लिहिले आहे की मी फटके मारेन असे कुठेच लिहिले नव्हते. तुम्ही फटके स्वतःवर ओढवुन घेतले. प्रतिक्रिय सार्वत्रिक होती. जर कोणी शिव्या घातल्या तर फटके पडतीलच अशी तुम्ही शिव्या घातल्या तर मी तुम्हाला फटके मारीन अशी नव्हतीच आणि हे मी मागेही सांगितले आहे. त्यावर चवताळुन उत्तर तुम्ही दिलेत. प्रतिक्रिया नीट न वाचताच दहशतवाद, गुंडगिरी असे तारे तोडलेत. साहित्य पण असे वाचत असाल तर तुमचे विचार बरोबरच आहेत असे म्हणायचे. आणि माझा आवडता लेखक कोण हेच मी कधी लिहिले नाही इथे तर माझ्या आवडत्या लेखकावर कोणी टिका केली की नाही हे तुम्ही कसं ठरवलंत? कोसला मला खूप आवडलेले नाही पण ते आलं तेव्हाचा काळ बघता कोसला महत्वाचं, माईलस्टोन म्हणावं असं पुस्तक आहे याबद्दल मला शंका नाही. नेमाड्यांचं बाकीचं थोडंसंच वाचलंय आणि नक्कीच आदर आहे. आणि काही झालं तरी समृद्ध अडगळ वाचणारच आहे. अहो दुसर्‍यांची नाहीत तर किमान स्वत:ची मतं तरी नीट वाचत जा मुळात तुम्ही धागाकर्तीचे डुप्लिकेट आयडी असल्यासारखे का भांडताय माझ्याशी? तुमचा वरचा प्रतिसाद, धागा नीट न वाचताच वपु आणी अवचटांना एकाच रांगेत बसवल्याबद्दल केलेले अभिनंदन, नंतर वपुंबद्दल उगाचच मांडलेली मते, नंतर मला दिलेले उलट्सुलट प्रतिसाद यातुन उलट असेच सुचित होते आहे की भांडायचा आनंद तुम्हीच मनमुराद घेत आहात. एकामागुन अशी उलट्सुलट मते मुद्दाम मांडल्यासारखी वाटत आहेत. अजुन काही सांगने न लगे, फटके पडतील याला हमरीतुमरीची भाषाच म्हणतात. वपु हा विषय धागाकर्तीनेच काढलेला आहे. वपुप्रेमामुळे दिसला नसेल तुम्हाला. खुलासा वर केलेलाच आहे. आधीच नीट वाचले असते तर असे मत पडलेच नसते तुम्ही सगळे आरोप अंगावर ओढवून घेतलेत धागाकर्तीचा डुप्लिकेट असल्याप्रमाणे. हा तुमचा प्रॉब्लेम माझा नव्हे. तुम्ही माझ्यावर काही आरोप केलेत? नक्की कुठले? सगळं वाचलंय. अतिशय संकुचित आणि डबक्यात राहून आकाशाला मापायला बघण्याची, आणि डबक्यातले नियम आपल्या डबक्याबाहेरच्या विषयाला/ अवकाशाला लावून त्यावर डुढ्ढाचार्यासारखी टिप्पणी करण्याची शैली मला भंपक वाटते. अतिशय एकांगी लिखाण वाटतं. पुन्हा पहिलेच प्रश्न, २ पाने ... ४ आत्महत्या... माझे मत तुम्हाला विनोदी वाटते याला माझ्या लेखी कणभरही अर्थ नाही. मला विनोदी अजिबात वाटत नाही. तुमचे मत तसेच असेल तर त्याचा आदर करतो मी. आणि परत एकदा आश्चर्य नाहीच. वपु प्रेमी असेच चवताळतात. वपुप्रेमींपेक्षा वपुविरोधी जास्त चेकाळतात हे आज कळून चुकले मला. मला तर कुठलाही वपुप्रेमी असा उगाच वाद ओढुन काढणारा सापडला नाही आहे अजुन. पण म्हणजे वपु प्रेमींनी वपुंना कितीही शिव्या घातल्याघारीही "वा वा, छान छान. अजुन घाला. ती कोसला मधली पान क्रमांक ७४ वर असलेली शिवीही घाला" असे काहीतरी बडबडत रहायचे का? अवांतरः मी कधीही कुठल्याही लेखकाला शिव्या घातलेल्या नाहीत. लेखन आवडले नाही तर लेखनातले दोष दाखवतो कधीकधी (मला ते झेपलेच तर). नाहीतर लेखन माझ्या डोक्यावरुन गेले हे मान्य करुन मोकळा होतो. धागाप्रवर्तिकेला पण मी अश्याच आशयाची एक प्रतिक्रिया दिली होती (खाली परत देत आहे). पण त्या वपुप्रेमी असुनसुद्धा अश्या अंगावर धावुन आल्या नव्हत्या: आधीची प्रतिक्रिया बाकी एवढेच म्हणेन की एवढ्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेली कादंबरी अगदीच फुटकळ नसेल. कुछ तो बात होगी. कदाचित धागाप्रवर्तिकेला आवडली नसेल ही गोष्ट वेगळी. पण म्हणुन एकदम फुटकळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

दस का पचास....दस का

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/17/2010 - 11:28 नवीन
दस का पचास....दस का पचास....दस का पचास....दस का पचास.... हमाल धुलगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ओ तै... माझे पॉपकॉर्न

सविता
Fri, 09/17/2010 - 12:38 नवीन
ओ तै... माझे पॉपकॉर्न संपले...... देता का थोडे तुमचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हे घे ... (एकेरीत ये गं

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/17/2010 - 17:55 नवीन
हे घे ... (एकेरीत ये गं प्लीज) आणि सरक थोडी तिकडे, तेवढ्यात माझी जागा या द्मुने पळवली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

हात रे.... कोण तो विक्षिप्ततै

सविता
Fri, 09/17/2010 - 18:09 नवीन
हात रे.... कोण तो विक्षिप्ततै ची जागा पळवतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्रत बव्ल्त... =)) =))

धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 12:40 नवीन
अच्रत बव्ल्त... =)) =)) =)) =)) दहा वरुन एकदम पन्नास? शिणुमा ब्लॉकबस्टर झाला काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

धम्या, ब्लॉकबस्टर नायतर काय?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/17/2010 - 17:56 नवीन
धम्या, ब्लॉकबस्टर नायतर काय? किती दिवस शिणुमा चाललाय बघतोयस ना तू! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

खफ

पैसा
Fri, 09/17/2010 - 18:33 नवीन
अदिती, सविताने तुझ्या "धाग्याचा खफ कसा करावा?" चा चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो नी ताई मी म्हटलं

सविता
गुरुवार, 09/16/2010 - 22:55 नवीन
अहो नी ताई मी म्हटलं होतंच.. "मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का? मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना! राहता राहीले, व.पु. आणि अवचट्...वेल मला आवडते त्यांचे लिखाण...आणि मला त्याचा अभिमान आहे.. तुम्हाला ते मध्यमवर्गीय वाटतेय याच्याशी मला काही देणे घेणे नाही." तुम्ही माझ्या आवडत्या लेखकाबद्दल काय म्हणताय... या कडे मी लक्षच देत नाहीये मुळी...मग मला ते पसंत.नापसंत असण्याचा प्रश्न् च येत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

मलाही वपुंचे लेखन आवडत नाही.

यशोधरा
गुरुवार, 09/16/2010 - 15:20 नवीन
मलाही वपुंचे लेखन आवडत नाही.
  • Log in or register to post comments

वरती ज्या ज्या लेखकांची नावे

अवलिया
गुरुवार, 09/16/2010 - 17:34 नवीन
वरती ज्या ज्या लेखकांची नावे आली आहेत ती सर्व भंपक आहेत. च्यामायला हाय काय अन नाय काय !
  • Log in or register to post comments

मग त्यात ऋ, धमाल मुलगा हे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 17:40 नवीन
मग त्यात ऋ, धमाल मुलगा हे लेखकही आले का? धमाल मुलगा हे आमचे आवडते खरडलेखक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

धमाल मुलगा लेखक आहे ? कुठला

अवलिया
गुरुवार, 09/16/2010 - 17:42 नवीन
धमाल मुलगा लेखक आहे ? कुठला कथासंग्रह किंवा कादंबरी प्रकाशित झाली आहे त्यांची? मागे शिकार नामक महाकादंबरी लिहिण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता ... पुढे काय झाले कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लिहीलं ना

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 17:48 नवीन
अहो लिहीलं ना, ते खरड लेखक आहेत! तसे ऋअण्णा आमचे आवडते स्वाक्षरीलेखक आहेत. तुम्ही असं कुठे म्हटलं होतंत कथा आणि/किंवा कादंबरी लेखकच भंपक आहेत म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नानाऽऽऽ... ना! ना!

धमाल मुलगा
गुरुवार, 09/16/2010 - 18:00 नवीन
नानाऽऽऽ... ना! ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लेखक

अडगळ
गुरुवार, 09/16/2010 - 17:55 नवीन
लेखक ही जातच मुळी भंपक आहे. एक कादंबरी लिहून अमर झालो समजतात .अमर ..च्यायला.. अमर सायकल मार्ट. कागद स्वस्त आहे म्हणुन साले लिहीतात. एका तावाची किंमत एक लाख . आता कोण लिहील ? (आम्ही सारे कोसला - वपु नेमाडे)
  • Log in or register to post comments

खो खो खो

अवलिया
Fri, 09/17/2010 - 11:54 नवीन
कोसला वाचुन हसलो नव्हतो तेवढा हा धागा वाचुन हसत आहे ! नेमाडे झिंदाबाद !
  • Log in or register to post comments

शी बै अच्रत

सविता
Fri, 09/17/2010 - 13:27 नवीन
शी बै अच्रत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१ , नेमाडे आणि सवितातैं

पुष्करिणी
Fri, 09/17/2010 - 14:54 नवीन
+१ , नेमाडे आणि सवितातैं झिंदाबाद. डायरीच्या पुढच्या पानांबद्द्लही लिहा लौकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅ हॅ हॅ

समंजस
Fri, 09/17/2010 - 18:26 नवीन
.....ये काय हो रहा है ? आता पर्यंत या धाग्यापासून दुर होतो परंतू शेवटी न राहवून हे विचारावं लागतंय :) [ अवांतरः धागा कर्ती ने "कोसला" ला थोडंसं कोसलं तर एवढी धुमश्चक्री ? नेमाडेंना कोसलं असतं तर काय झालं असतं ;) ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>.....ये काय हो रहा है

अवलिया
Fri, 09/17/2010 - 18:43 नवीन
>>>.....ये काय हो रहा है ? कोसला काही जणांसाठी कुरआन सारखे आहे. त्याविरुद्ध बोलले की अंगावर धाऊन येतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

हाण्ण तिच्यायला!!!!

धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 18:45 नवीन
हाण्ण तिच्यायला!!!! नान्या...येकच नंबर. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कोसला काही

समंजस
Fri, 09/17/2010 - 18:57 नवीन
>>> कोसला काही जणांसाठी कुरआन सारखे आहे. त्याविरुद्ध बोलले की अंगावर धाऊन येतात.. बाप रे केवढा हा अतिरेक एखाद्या साहित्य/पुस्तका बद्दल..... :) [अवांतरः एवढे अतिरेकी विचार असलेल्यांना साहित्यिक अतिरेकी म्हणता येईल का ? अश्या अतिरेंकीना कुठला कलर कोड द्यावा ? ]
  • Log in or register to post comments

पिवळा चालेल? नाय, कालांतरानं

धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 19:02 नवीन
पिवळा चालेल? नाय, कालांतरानं पानं पिवळी पडतात ना म्हणुन .... =-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

लाल कसा वाटतो ?

अडगळ
Fri, 09/17/2010 - 19:07 नवीन
म्हणजे लाल करणे वगैरे वगैरे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

काळानिळा मिक्स जास्त

अवलिया
Fri, 09/17/2010 - 19:10 नवीन
काळानिळा मिक्स जास्त चांगला... समोरच्याला ठोसा मारला की असा कलर होतो म्हणतात मी कुणालाही अजुन मारला नाही.. पण काही जण मधुन मधुन मला मारत असतात तेव्हा आमचे मित्र खरडीतुन "विचारतात कित्ती काळानिळा पडला आहेस..फार लागलं का? "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

नको बुवा! मग लाल रंगाला विरोध

धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 19:10 नवीन
नको बुवा! मग लाल रंगाला विरोध म्हणुन कोणी हिरव्याच्या छटा सुचवल्या तर उगाच विचारजंतांच्या सेक्युलर भावना दुखावतील ना. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

लाल

समंजस
Fri, 09/17/2010 - 19:10 नवीन
लाल नाही चालणार... तो आधीच घेतला गेलेला आहे. अधिक माहिती ग्रुहमंत्रालयाकडे मिळेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

चालेल...

समंजस
Fri, 09/17/2010 - 19:08 नवीन
या पुढे साहित्यिक अतिरेकींना पिवळे अतिरेकी असे म्हणता येईल.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

=)) =))

यशोधरा
Fri, 09/17/2010 - 19:15 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पिवळा चालेल...

मस्त कलंदर
Fri, 09/17/2010 - 19:19 नवीन
माझ्या कडचं बाकी शून्य असंच पानं पिवळी पडलेलंच मिळालं मला. मग वाचताना राहून राहून यालाच पिवळं पुस्तक म्हणतात का अशी शंका मनात आली होती.. पळते आता नाहीतर डॉन्या येईलच धावत खरडखेचर मारायला.... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

९५... अजुन फक्त ५......... मग

सविता
Fri, 09/17/2010 - 19:16 नवीन
९५... अजुन फक्त ५......... मग शंभर...... पण खरं सांगु...मज्जा नाय आला.......... या १०० पेक्षा... माझ्या आधीच्या धाग्याने मला समाधान दिले...... फक्त वीस प्रतिसाद होते...पण प्रतिसाद देणा-या प्रत्येकाने माझा लेख ब-यापैकी वाचला होता...आणि मला काय म्हणायचे आहे..हे त्यांना थोडेफार समजले होते असे वाटले... इथे एक तर खफ झालाय्..नाहीतर्..दोन तीन वाक्ये वाचून लोक त्यावर भाष्य करताहेत......
  • Log in or register to post comments

१००

अवलिया
Fri, 09/17/2010 - 19:35 नवीन
१००
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा