मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे..
अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे". लग्नात जायचे म्हणजे लग्नात खायचे), उदाहरण, पर्यंत, आना (आणा), तुमि (तुम्ही) आपुनी (आपण) असे बरेच शब्द मराठीसारखेच आहेत.
पण उच्चारांच्या बाबतीत मात्र तफावत आहे आणि ती गमतीशीर आहे. शब्दांचे उच्चार "ओ"कारांत करतात. "च" चा उच्चार "सो" असा होतो. म्हणजे "सोनु" म्हणायचं असेल तर "चनु" लिहा. चिटीबच = सिटीबस. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, पण त्यातही nuiances आहेत. "क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो.पण जोडाक्षरे मात्र जशीच्या तशी उच्चारली जातात. म्हणजे चिन्मय "सिन्मॉय" झाला तरी च्यवन "च्यवन"च राहतो, आणि शिक्षक "हिख्खोक" झाला तरी अश्व तो "अश्व"च... खरंतर अहोमीयातली "स" "श" "क्ष" असलेले शब्द उच्चारले तर रामदेवबाबांचे श्वासोच्छावासाचे व्यायाम आपोआप होतील ! अवांतर: अहोमीयात "बिया" म्हणजे लग्न आणि बेया म्हणजे वाईट !! (किती सुचक असतात ना शब्द !?)
मागे उषा मंगेशकरांची मुलाखत ऐकत होतो. त्या आहोमीयात प्रसिद्ध गायिका आहेत आणि त्यांना आसाम सरकारचा राज्य पुरस्कारही मिळाला आहे. मुलाखतकार वारंवार त्यांना "उखाजी, उखाजी" करत होता. शेवटी त्याला चुक कळली आणि तो "उषाजी" वर आला.
आसाममध्ये वेगवेगळ्या जाती, जमाती, आदिवासी आहेत. इथे चातुर्वर्ण्य पद्धती फारशी रुढ नव्हती. निसर्गाच्या कृपेनी खायला-प्यायला भरपूर असल्याने लोकांमधे थोडा Laid-back attitude दिसून येतो. १३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला. अहोमांच्या युध्द-क्रोर्याची एक किंवदंती आहे. त्यांच्या एका सेनापतीने नागा लोकांना (जे स्वत:च लढवय्ये म्हणून प्रसिद्ध आहेत) धडा शिकवण्यासाठी नागा सैनिकांना जिवंत भाजुन, त्यांचे तुकडे बाकीच्या बंदिस्त नागा सैनिकांना खायला लावले होते, असे म्हणतात.
नंतरच्या काळात श्री शंकरदेवांनी आसाममध्ये "वैष्णव" धर्माची स्थापना केली. इथे श्रीकृष्णाच्या निराकार रुपाची पुजा केली जाते. "होराई" वर "गामोसा" टाकुन त्यासमोर गीतापठन केल्या जाते. किर्तन-पुजेसाठी लोक "नामघरात" एकत्र येतात. एकूणच आपल्याकडील भक्ति-संप्रदायासारखे येथे वैष्णव धर्माचे अनुसरण करतात.
आसामचा निसर्ग, काझिरंगा पार्क तर प्रसिद्धच आहेत. इथल्या कलेची, नृत्याची, एकूणच टॅलेंट्ची आता रियॅलिटी शोज मुळे लोकांना आता ओळख होत आहे आणि ह्या "Not so known" भागाबद्दल उत्सुकता वाढायला लागली आहे.
So if you want to escape to a serene beauty, मोइ आख्होमोत आपुनार स्वागत करि आसु | आहॉक | आदोरोनि (स्वागतम) !!
वाचने
6610
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती आवडली .. भाषा
छोटासा पण चांगला लेख मग
मस्तच...
आवडला
+१
In reply to आवडला by प्रियाली
वा! उपेक्षित राज्यांपैकी एका
हेच म्हणतो
In reply to वा! उपेक्षित राज्यांपैकी एका by धमाल मुलगा
आसाम
आणि ह्या सोनेरी चित्राला
In reply to आसाम by प्रशांतकवळे
चिगोराव तुम्ही दिलेली माहिती
माहितीबद्दल धन्यवाद. फोटो खरच
@ प्रशांत
@चिगो
In reply to @ प्रशांत by चिगो
उल्फा, बोडो
In reply to @चिगो by धमाल मुलगा
बिहारी मजूरांना आसामातच ठार
In reply to उल्फा, बोडो by प्रशांतकवळे
छान नवीन माहीती. आतापर्यंत
>> च" चा उच्चार "सो" असा
In reply to छान नवीन माहीती. आतापर्यंत by शुचि
थँक्स...
लेख आवडला. अजून सविस्तर
अविनाश बिनीवाले
छान माहिती दिलीत बरं का!
छान. खरंच अजून लिहा चिगोराव.
१३व्या शतकात येथे "अहोम"
छान
मी काही दिवसांपूर्वी एका
@ Pain...
इतकी वाईट परीस्थिती नाहीये.
In reply to @ Pain... by चिगो