आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट.
मलाही असेच वाट्ते.
भानसताई, आख्खा लेख वाचुन एकच शब्द येतोय... 'खरंय'!
बस्स...ह्यापुढं काहीच बोलवत नाही...बोलण्यासारखं उरतच नाही ना. :(
वाईट ह्याचंच वाटतं, की कायदा-सुव्यवस्थेसाठी नेमलेल्या बर्याचशा शाखांना बरीच माहिती असते, पण केवळ त्यांच्या हाती पुरेसे अधिकार नाहीत आणि सर्वात वर कागदी घोडे नाचवणारे आणि मतपेट्यांवर डोळे लाऊन बसणारे बाजारबुणगे हे सेनापती म्हणुन हिंडत असतात. मिळालेल्या माहितीनुसार टाकोटाक कारवाई केली तर कित्येक दुर्घटना टळु शकतात पण........ हा पणच आडवा येतोय ना. :(
असो,
तुमचा उद्वेग पोहोचला..अगदी मनाच्या गाभ्यापासुन पुर्ण सहमत आहे.
(स्वगतः आता भानसताई तथाकथीत उदारमतवाद्यांच्या कुचेष्टेला बळी पडल्या नाहीत म्हणजे मिळवली. )
नका लिहित जाऊ हो असे काहीतरी, त्रास होतो खूप, वाचून.
त्यापेक्षा मेरा भारत, त्याची महान लोकशाही, कित्ती कित्ती महान आहे असंच लिहित जावा.
नाहीतर पांढरे दहशतवादी खेळ खल्लास करतील हा ? त्यांना तुम्ही/आम्ही/कसाब/अफजल फक्त मतांसाठी जिवंत पाहिजे.
बरं तुमच्या हक्काविषयी,
तुम्हाला दर ५ वर्षांनी एकदाच बटन दाबण्याचा हक्क आहे. तो काय कमी झाला काय ?
(असे आमचे येथील जालावरचे पांढरपेशे लोक शिस्तीत पटवून देतील. कसे ? हे पाहायचे असेल तर सांगा, मी लागलीच कळवितो. मात्र अतिरेक्यांना भारतात कधीही येऊन कितीही लोकांना जीवे मारून सर्वोच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज करण्याचा हक्क आहे.)
आनि त्यांचा हा हक्क बजावायला नुकतेच दोन अतिरेकी मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत.
मुंबईत घुसले दोन दहशतवादी
कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत आपला हक्क बजावीत आहे.
कसाब उच्च न्यायालयात दाद मागणार
उच्च न्यायालयात दाद मागणार म्हणजे अजून सर्वोच्च न्यायालय बाकी आहे काय ?
इथे ४-५ वर्षे काढले कि मग तिथे, तिथून ४-५ वर्षांनी मग फाईल माननीय राष्ट्रपतींच्या टेबलावर,
(तिथे किती वर्षांचे लिमिट असते ? )
असंतोषासमोर कुठलीही सुरक्षा यंत्रणा फिकि असते.जगात सर्वत्र शांतता नांदावी अस स्वप्न साकारणे कठीण. लेख उत्तम संवेदनशील आहे. सामान्य माणसाचे चित्रण त्यात आहे.
भिउ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणार्या स्वामीभक्तीत तो बुडुन जातो. ही श्रद्धा त्याला जगण्याला बळ देते.
जेव्हा ही हानी नैसर्गिक आपत्तीतुन असते तेव्हा तो कुणाला जबाबदार धरणार? आपल्याच पुर्वसंचिताचे फळ म्हणुन नशीबाला दोष देत बसणार.
ज्याच जळत त्याला कळत या उक्तीत असणार व्यक्तिसापेक्ष दु:ख विश्लेषणापलिकडे असते.
विलासराव, धमाल मुलगा, बेसनलाडू, पैसा, प्रीत-मोहर, अनामिक, शुचि, गांधीवादी, प्रकाश घाटपांडे, स्पा, अब क, Pain, रेवती मनःपूर्वक आभार.
असह्य असाहयता धड ना जगू देते ना मारू देतेय.... फक्त मरणेच ते काय हाती उरलेयं. तेही हे असं... कधीही, कुठेही, अचानक... किडामुंगीपेक्षाही बत्तर.... :(
अहो, एवढे असहाय होऊ नका राव.
असे तुम्ही असहायतेचे जंतू पसरवायला सुरुवात केलीत तर सगळे हळूहळू असहाय होतील.
काहीतरी मार्ग शोधा. इथे मांडा. सगळे विचार करू. पण असहाय होऊ नका.
आपल्या पेक्षा कितीतरी भीषण परिस्थितीत लोक जगत आहेत. दिवसा काठी ५०-६० रुपये कमावून लोक आपले पोट भरत आहेत. त्यांचा पण विचार करा, ते कसे जगत असतील.
आणि मरणाच्या गोष्ठी करू नका.
वेळ आली तर एक दोन अतिरेक्यांना मारा/मारु. माणूस कधीही, कुठेही, अपघातात सुद्धा मारु शकतो. मग त्याला काय करणार ? जीवन हे क्षणभंगुर आहे. मरायचं तर प्रत्येकाला आहे.
हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.
अगदी असंच वाटतं...
नका त्रास करुन घेवु..पाक व चिन आता नाहितर काश्मीर..अरुणाचल..आसाम चा काहि भाग..बंगालचा काहि भाग .घेणारच आहे..अन त्या बदल्यात भारत पाक व चिन अतिरेकी कारवाया करणार नाहि अशि हमी त्यांच्या कडुन घेईल..मग कमी होतिल हल्ले..तो पर्यंत सहन करा
प्रतिक्रिया
सहमत.....
दुर्दैव!
सहमत आहे
>>'खरंय'! बस्स...ह्यापुढं
सहमत
वर्च्या सगळ्यांशी
खरं आहे. जन पळभर म्हणतील...
बाप रे!! खूप तळतळाटातून
नका लिहित जाऊ हो असे काहीतरी, त्रास होतो खूप वाचून
कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत
असंतोषासमोर कुठलीही सुरक्षा
खरय.......... हे सर्व कधी
:(
हे असच चालू राहाणार
काय लिहावं सुचत नाही.
आभार.
अहो, एवढे असहाय होऊ नका
हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला
नका त्रास करुन घेवु..पाक व
पाक-चीनला, पुणे सोडून काहीही