✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आशा भोसलेंचा आज वाढदिवस!

च
चतुरंग यांनी
Wed, 09/08/2010 - 21:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11445 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

लेकिन

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 21:06 नवीन
लेकिन ह्या चित्रपटात, बाळासाहेबांनी बरीच गाणी दीदींना दिली, आणि आशाताईंना एकच दिले: झूटे नैना बोले. Image removed." alt="" /> पण शेवटी हेच गाणे सगळ्यात जबराट ठरले. माझे आणखी एक आवडते गाणे, दीदी आणि आशाताईंनी एकत्र म्हटलेले: उत्सव चित्रपटातले - मन क्यूं बहका रे बहका... Image removed." alt="" /> दोघींच्याही आवाजाची उंची लक्षात येते.
  • Log in or register to post comments

वा वा काय सुंदर गाणी सुचवलीत मिभो!

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 21:15 नवीन
ह्यातलं झूटे नैंना बोले जे आहे त्याची सुरुवात विष्णु दिगंबर पलुसकरांच्या कुठल्यातरी एका बंदिशीसारखी वाटते पण कोणती ते लक्षात येत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

जाओ जाओ जाओ

मुक्तसुनीत
Wed, 09/08/2010 - 21:23 नवीन
जाओ जाओ जाओ जाओ बलमा किन सबतीसंग ... असे शब्द आहेत. बंदीश भावसरगम मधे ऐकली होती. अवांतर : आशाबाईंचा वाढदिवस ऑक्टोबर २८ असल्याचे आठवते. १९९३ साली बाई साठीच्या झाल्या तेव्हाचा उत्सव अजून लक्षांत आहे. विकी इत्यादि ठिकाणी तारीख सप्टे. ८ आहे हे खराय. पण अन्य काही ठिकाणी २८ ऑक्टो. ही तारीख दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नी के घूंघरिया

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 21:32 नवीन
नी के घूंघरिया ठुमकत चाल चलत सत्यशील देशपांडेंनी म्ह्टलेली जुनी बिलासखानी तोडीतील बंदिश आहे. (माझ्याकडे अजय पोहनकरांची आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

येस येस!

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 21:39 नवीन
हीच. पलुसकरांची रेकॉर्ड होती आमच्याकडे. बिलासखानी तोडी बरोब्बर! धन्यवाद मिभो! :) Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

भावगीतं, भक्तीगीतं, करूण गाणी

शुचि
Wed, 09/08/2010 - 22:06 नवीन
भावगीतं, भक्तीगीतं, करूण गाणी ही म्हणण्यास जितकं कौशल्य लागतं तितकच किंबहुना जास्त तारेवरची कसरत कॅबरे डान्स ची गाणी म्हणण्यास लागते. कारण यात मादकता, मस्ती तर आली पाहीजे पण भडकपणा नको. गाणं अंगावर यायला नको. ( चोली के पीछे माझ्या मते अंगावर येतं) आशाबाईंचं "पिया तू अब तो आजा" माझं आवडतं. त्यात ते "आह आह आ आ" सुद्धा फेमिनाइन आणि नशीलं वाटतं. बटबटीत वाटत नाही. हा सट्ल टच खास आशा भोसले टच!
  • Log in or register to post comments

इजाजत

मनिष
Wed, 09/08/2010 - 21:26 नवीन
सगळीच गाणी म्हणजे सोन्याला सुगंध म्हणावा अशी. गुलजार, आर. डी. आणि आशा...अप्रतिम!
  • Log in or register to post comments

सुरेश भट, बाळासाहेब आणि आशा...अप्रतिम!!

बेसनलाडू
गुरुवार, 09/09/2010 - 03:08 नवीन
गुलजार, आर. डी. आणि आशा...अप्रतिम! याच धर्तीवर मराठीत सुरेश भट, बाळासाहेब मंगेशकर आणि आशा...अप्रतिम असे म्हणावेसे वाटते. 'मी मज हरपून बसले गं', 'उषःकाल होता होता काळरात्र झाली', 'केव्हा तरी पहाटे', 'तरुण आहे रात्र अजुनी' .. एकेक गाणे एकेका हिर्‍यासारखेच आहे. (आशाप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

मला वाटते

विकास
गुरुवार, 09/09/2010 - 21:23 नवीन
मला वाटते, "मी मज हरपून बसले गं" हे सुधीर मोघ्यांनी लिहीले आहे. (पक्ष्यांचे ठसे). आत्ता पुस्तक जवळ नाही पण आठवणीवर सांगतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

नाही. हा पहा दुवा - आठवणीतली गाणी

चतुरंग
गुरुवार, 09/09/2010 - 22:24 नवीन
http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/227.htm सुरेश भट, बाळासाहेब, आशाताई भन्नाट त्रिकूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

स्वर्गीय आवाजाच्या

पाषाणभेद
Wed, 09/08/2010 - 21:33 नवीन
स्वर्गीय आवाजाच्या सुरसाम्राज्ञीला मिसळपावचा मानाचा मुजरा! कितीतरी सुंदर गाणी गावून आमचे जिवन समृद्ध केले त्यांनी.
  • Log in or register to post comments

आशा माझीही आवडती गायीका...

अनामिक
Wed, 09/08/2010 - 21:45 नवीन
आशा माझीही आवडती गायीका... सखी री सुन बोले पपीहा उस पार, वो चांद जंहा वो जाये , आगे भी जाने ना दू, ये क्या जगह है दोस्तों, मेरा कुछ सामान... किती किती म्हणून सांगावे? गानसम्राज्ञीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

"बस एक बार, मेरा कहा मान लिजीये...."

इन्द्र्राज पवार
Wed, 09/08/2010 - 21:49 नवीन
"अर्थात त्यांच्याबद्दल इतकं लिहिलं गेलंय की मी अजून काय भर घालणार म्हणा...." ~~ ही कबुली विनयशील तर आहेच शिवाय या धाग्यावर प्रतिसाद देऊ इच्छिणार्‍यांनाही एक प्रेमाची सूचनाही आहे असे वाटते, ती अशी की धागाकर्त्यांना आशाताईंच्या फक्त चांगल्या वा खूप चर्चिल्या गेलेल्या गाण्यांची इथे यादी अपेक्षित नसून त्यांच्या विषयी एक संगीतप्रेमी या नात्याने गाण्याच्या माहितीत अजून काय/किती भर घालता येईल, तसेच मंगेशकर कुटुंबियांच्या कारकिर्दीचा या वाढदिवसानिमित्त आपल्याच शब्दात आढावा घेता यावा. "उत्सव चित्रपटातले - मन क्यूं बहका रे बहका...दोघींच्याही आवाजाची उंची लक्षात येते." ~~ मिभो...या गाण्यावर थोडे सविस्तर लिहाल का? मी 'उत्सव' डीव्हीडी पाहिली पण नेमके हेच गाणे इतक्या अंधुक प्रकाशात घेतले असल्याचे जाणवले की ऑडिओची सुंदरता त्यात जाणवली नाही. (कदाचित ती डीव्हीडीदेखील खराब असेल.) रेखावरच चित्रीत झालेले आणि सर्वांनाच वेडावून टाकणारे गाणे म्हणजे..."दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजीये"... कुणाला यात जास्त गुण द्यावे? अदाकारा, संगीतकार, गीतकार, त्या गाण्याचे चित्रीकरण की यापेक्षा ही जबरदस्त ताकतीची गायिका ? काहीही मते असोत, आशाताईंनी यातील सर्वच गाण्यांना जी उंची दिली आहे की त्यापुढे बाकी सर्व घटक दुय्यम ठरावेत. (शेवटच्या वेळेतील "बस एक बार, मेरा कहा मान लिजीये...." यातील आर्जव तर जीवघेणे !) इन्द्रा
  • Log in or register to post comments

उमराव जानची गाणी तर

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 21:52 नवीन
कलेजा कापून घेऊन जातात! खय्यामने सारंगीचा असला कातिल वापर केला आहे की बस! क्या बात है!! @डॉ.दाढे/प्रदीप - ह्यातली सारंगी कोणाची आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

उमराव जान

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 22:39 नवीन
उमराव जान ज्या वर्षी रिलीज झाला, त्याच वर्षी (१९८१) कुदरत नावाचा एक टुकार चित्रपट आला. पण त्यातले एक गाणे "हमे तुमसे प्यार कितना" हे परवीन सुलतानांनी म्हटले होते. त्याला तोड नव्हती. त्यामुळे त्यावर्षीचे बेस्ट फिमेल सिंगरचे फिल्म फेअर अवार्ड चक्क एका अभिजात गायिकेला गेले. पण खय्याम ला उम्राव जान साठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर चे अवार्ड मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खरं आहे

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 22:46 नवीन
ऐका कुदरत मधलं गाणं http://www.youtube.com/watch?v=TDWAWHz6Am0 बेगम परवीन सुलताना ह्या अत्यंत भारित (चार्ज्ड) आवाज असलेल्या गायिका आहेत. श्रोतृवृंदावर एका क्षणात कबजा घेण्याची अफाट क्षमता त्या आवाजात आहे. त्यांचं सवाईमधे ऐकलेलं गाणं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

पण..

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 22:51 नवीन
एक लिहायचे विसरलो. त्याच वर्षीचे नॅशनल अवार्ड (पार्श्वगायिकेसाठी) "दिल चीज क्या है" बद्दल आशाताईंना मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

उमराव जान, कुदरत

विकास
Wed, 09/08/2010 - 23:25 नवीन
>>>उमराव जान ज्या वर्षी रिलीज झाला, त्याच वर्षी (१९८१) कुदरत नावाचा एक टुकार* चित्रपट आला. <<< मला वाटते त्याप्रमाणेच त्या वर्षी आरडीने संगीत दिलेल्या लव्हस्टोरीतील गाणी देखील बक्षिसाच्या स्पर्धेत होती. कुद्रत आणि लव्हस्टोरी आधी आले होते, गाणी खूप गाजली (येथे त्यांचे गुणात्मक विश्लेषण करत नसून केवळ त्यावेळेच्या जनतेत जे लोकप्रिय झाले तितकेच सांगत आहे). मात्र नंतर उमरावजान आला आणि संगीत काय असू शकते हे पब्लीकला आणि फिल्मफेअरला कळले... *"कुद्रत" सारख्या चित्रपटाला टुकार म्हणल्याबद्दल तिव्र निषेध. ज्यामधे मानसोपचार तज्ञ संमोहनाने आधीच्या जन्मात पाठवू शकतो हे सिद्ध झाले त्यामुळे पुनर्जन्म सिद्ध झाला तसेच भृगुसंहीतेचा स्पष्ट संदर्भ आला आहे... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

कुद्रत

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 23:31 नवीन
ज्यामधे मानसोपचार तज्ञ संमोहनाने आधीच्या जन्मात पाठवू शकतो हे सिद्ध झाले त्यामुळे पुनर्जन्म सिद्ध झाला तसेच भृगुसंहीतेचा स्पष्ट संदर्भ आला आहे... फिल्मफेयरच्या अवार्ड कमिटीवर हिंदुत्त्ववादी होते का ? ;-) असो, अवांतर होते आहे. (हा खाल्ला शंभरावा उंदीर.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सारंगी....उमराव जान

इन्द्र्राज पवार
Wed, 09/08/2010 - 22:57 नवीन
"...ह्यातली सारंगी कोणाची आहे?" ~ ती आहे राजस्थानमधील सिकर घराण्याचे उस्ताद सुलतान खान यांची.... ज्यांची ओळख खुद्द लताबाईंनी त्यांच्या "मिर्झा गालीब" या एल.पी.च्या वेळी मुंबईतील संगीतक्षेत्राला करून दिली होती (सन १९६७). या एल.पी.ला संगीत दिले होते ते खय्याम यांनी. त्यामुळे साहजिकच खय्याम यांच्या स्मृतीत सुलतान खान यांचे सारंगी कौशल्य त्याचवेळी ठसले....आणि "उमराव जान" च्या वेळी अर्थातच त्यांनी उस्ताद सुलतान खान यांच्यासमवेत जी जादू केली ती आपण श्रवण करतो आहोतच. (सध्या उस्ताद सुलतान खान यांची सारंगी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या टीमसमवेत विश्वसंचार करीत आहे.) इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ओह..

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 23:00 नवीन
उस्ताद सुलतान खान! मग शब्दच संपले!!! धन्यवाद इंद्रा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सुलतान खान - हम दिल दे चुके सनम

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 23:10 नवीन
हम दिल दे चुके सनम, ह्या चित्रपटात, अलबेला साजन आयो रे, ही अहिर भैरवातील पारंपारिक चीज म्हणणारे, ते हेच सुलतान खान, ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मिभो, गल्लत होत आहे.

चिंतामणी
Wed, 09/08/2010 - 23:47 नवीन
सारंगीवाले सुल्तान खाँ म्हणजे २००१ साली Piya Basanti (Non-Film) नावाचा अल्बम काढणारे आंणि गाणारे. हम दिल दे चुके सनम, ह्या चित्रपटात, अलबेला साजन आयो रे, ही अहिर भैरवातील पारंपारिक चीज म्हणणारे सुलतान खॉ वेगळे आहेत. ते शास्त्रीय संगिताच्या मैफलीत गाणारे प्रसिध्द गायक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

धन्यवाद इन्द्र! मला नेहमी

शुचि
Wed, 09/08/2010 - 23:06 नवीन
धन्यवाद इन्द्र! मला नेहमी वाटतं - सनईचे सूर जसे मांगल्याचे तरंग घेऊन येतात तसे सारंगी चे कातरता आणि बेचैनी. कोठ्यावरचं वातावरण सारंगी बरोबरच शोभतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

साथ

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 23:13 नवीन
संवादिनी, म्हणजे हार्मोनियम, ही अभिजात संगीताला सध्या सर्रास वापरली जाणारी साथ, ही पश्चिमेकडून (युरोपातून) आलेली आहे. अजीबात अभिजात नाही. मौखिक अभिजात संगिताला खरी अभिजात साथ, म्हणजे सारंगी. (मुसलमानांची देण.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आशाताई एक आकाशगंगा...

संजय अभ्यंकर
Wed, 09/08/2010 - 21:55 नवीन
आशाताई ह्या भारतीय संगीतातल्या एक अनोख्या आकाशगंगा आहेत. त्यातले असंख्य तारे म्हणजे त्यांची गाणी. प्रत्येक गाणे आपापल्या जागी तेजस्वी तार्‍या समान समान. त्यातील मला सुचलेली काही गाणी... http://www.youtube.com/watch?v=QDPtyEmSQ1k&feature=related http://www.youtube.com/watch?v=zWjKnv8ry1E&feature=related http://www.youtube.com/watch?v=F2NA8e8y_I0 http://www.youtube.com/watch?v=nXFtY8KIVNQ&feature=related http://www.youtube.com/watch?v=T-1htTfeOSc http://www.youtube.com/watch?v=JGfP_cYkQak http://ishare.rediff.com/music/Entertainment/TERE_GHAR_KE_SAMNE_-_DIL_KI_MANZIL/862251 http://ishare.rediff.com/music/Entertainment/DKP_Jo_Tum_Muskurado/867727 http://www.youtube.com/watch?v=0-twiimiM6g&feature=related http://ishare.rediff.com/music/others/dkp-jhukti-ghata-gaati-hawa/867725 यादी खूप मोठी होईल..
  • Log in or register to post comments

आशाताईंचे एक अप्रतिम भजन...

संजय अभ्यंकर
Wed, 09/08/2010 - 22:19 नवीन
http://www.esnips.com/doc/ef1a06d6-5852-42ea-8a15-4f0d8d5f2c97/Phagun-Ke-Din-Char---Asha-Bhosle
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

आणी हे सलिलदां साठी गायीलेले...

संजय अभ्यंकर
Wed, 09/08/2010 - 22:26 नवीन
http://ishare.rediff.com/music/Entertainment/BAGH-MEIN-KALI-KHILI/737666
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

अनेक गाणी आवडतात पैकी जीवघेणं

शुचि
Wed, 09/08/2010 - 22:08 नवीन
अनेक गाणी आवडतात पैकी जीवघेणं आवडतं म्हणजे - "सांज ये गोकुळी सावळी सावळी .... सावळ्याची जणू साऊली" ...... अवीट गोड गायलं आहे. या गाण्याची गोडी शब्दात मला तरी नाही वर्णन करता येणार. मुक्याला साखरेची वडी देऊन सांगीतलं आता वर्णन कर त्या गोडीचं तर तो बिचारा करू शकेल काय? हृदयात अवर्णनीय मधुर तरंग उमटतात हे गाणं ऐकताना. ...... "पैलघंटा घुमे राऊळी" ऐकताना लहानपणीचं अरण्येश्वराचं संध्यकाळ च्या वेळीचं देऊळ साक्षात मनःचक्षूंसमोर साकार होतं, अगदी आवारातल्या झोपायच्या तयारीत असलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाटानी गजबजलेलल्या पिंपळ वॄक्षासकट.
  • Log in or register to post comments

+१

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 22:30 नवीन
त्यातले माउली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा हे शब्द शांताबाईंचा मास्टरपीस ! ऋतु हिरवा ह्या गाण्यात आशाताईंनी एक अत्युत्कृष्ट अवरोही तान घेतली आहे. (ही अशी तान घेऊन बघा, हगवण होते की नाही ते, असे मी सर्व नवोदित कल्लाकारांना सांगत असतो. असो. अवांतराबद्दल क्षमस्व.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

शांताबाईंचा मास्टरपीस??

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 22:35 नवीन
हे गीत सुधीर मोघे यांचे आहे. तुम्हाला आशाबाईंचा म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हेच..

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 22:47 नवीन
मध्येच "ऋतु हिरवा" आठवल्यामुळे चुकून घोळ झाला. सांज ये गोकुळीचे सुधीर मोघेच कवी आहेत. ऋतु हिरवा शांताबाईंचे आहे. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

मी ऋचा
गुरुवार, 09/09/2010 - 10:21 नवीन
माउली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अगदी अगदी!

चतुरंग
Wed, 09/08/2010 - 22:30 नवीन
सांज ये गोकुळी हे अप्रतिमच आहे. श्रीधर फडक्यांचे संगीत अफलातून आहे. आशाताईंच्या किंचित अनुनांसिक आवाजातली खास मींड उमटते आणि आंगावर काटा येतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कोतवाल साहब !!

अर्धवटराव
Wed, 09/08/2010 - 22:12 नवीन
या सुरमयी गळ्यातुन अवतरलेलं कोतवाल साहब चित्रपटातलं "साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ऐकावे आणि पुढचा एक तास दुनीया-जहान विसरुन आपल्या अंतरमनात खोल खोल शिरावे. हॅट्स ऑफ्फ !! (आशा फॅन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

गोडीचे वर्णन...!!

इन्द्र्राज पवार
Wed, 09/08/2010 - 22:16 नवीन
"मुक्याला साखरेची वडी देऊन सांगीतलं आता वर्णन कर त्या गोडीचं तर तो बिचारा करू शकेल काय?" ~ ही खरी तारीफ ! (श्री.चतुरंग...तुम्हाला व मला अपेक्षीत आहे सर्वांकडून, ती अशी शुचिताई यांनी शब्दबद्ध केलेली अचूक भावुकता...हवी तर अशी झगझगीत तारीफ ! धन्यवाद शुचिताई.) इन्द्रा
  • Log in or register to post comments

धन्यवाद माझी मूळ उपमा नाही

शुचि
Wed, 09/08/2010 - 22:24 नवीन
धन्यवाद :) माझी मूळ उपमा नाही पण. एका अध्यात्मिक पुस्तकात वाचनात आली होती १०/१२ वर्षापूर्वी. परत एकदा धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

उपमा...

इन्द्र्राज पवार
Wed, 09/08/2010 - 22:32 नवीन
"माझी मूळ उपमा नाही पण....." ~ नसेलही....पण त्यामुळे उपमेतील गोडवा रत्तीभरही कमी होत नाही....आणि त्यातही तुम्हास ती आशाताईंच्या गाण्यासाठी आठवावी यातच त्यांची महती लक्षात येते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आशा भोसले .... आजही तीतक्याच

अनिल हटेला
Wed, 09/08/2010 - 22:32 नवीन
आशा भोसले .... आजही तीतक्याच ताकदीची गायीका...लिस्ट द्यायची झाली तर भली मोट्ठी होइल... :-) १) http://www.youtube.com/watch?v=K119UH1M6Xc&feature=related २) http://www.youtube.com/watch?v=IB-mMSySzd0 ३) http://www.dhingana.com/play/rutu-hirawa-marathi-movie-film-album/MzQwMzQ=/pop/1 सध्या आवरतं घेतोये......... आशादी चा फॅणोबा :-)
  • Log in or register to post comments

अब के बरस...

नंदन
Wed, 09/08/2010 - 23:32 नवीन
अजून असंच एक गाणं म्हणजे बंदिनीमधलं 'अब के बरस'. आपापसांतले मतभेद मिटवून लताबाई आणि एस. डी. बर्मन पुन्हा एकत्र काम करू लागले, त्यानंतरचा हा पहिला चित्रपट ('मोरा गोरा अंग लई ले'), पण यातच दु:खी/आव्हानात्मक गाणी लताकडून गाऊन घ्यायची आणि उडत्या चालीची आशाकडून, ही तेव्हा रूढ झालेली प्रथा या गाण्याद्वारे प्रथम मोडली गेली असं म्हणतात.
  • Log in or register to post comments

आव्हानात्मक ?

मिसळभोक्ता
Wed, 09/08/2010 - 23:46 नवीन
नंदनशेठ, ह्या गाण्यात (यूट्यूब दिसत नाही, तरी आठवणीप्रमाणे) काही आव्हानात्मक आहे असे वाटत नाही. हा एसडी चा ब्रिलियन्स, की जात्यावरचे गाणे अगदी साधे सोप्या चालीतले निवडले. हां, उडत्या चालीत नाही हे मात्र मान्य. (थोडे अवांतरः बाबूजींची "ने मजसी ने" ची चाल मला आवडते ती ह्यामुळे. इंग्लंडात शिकायला गेलेला एक कोकणी मुलगा बाळासाहेबांची आव्हानात्मक चाल वापरून समुद्राला विनंती करेल असे अजीबात शक्य नाही. त्याला आपली साधी सोपी ओवीची चालच आठवणार.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मूड प्रमाणे...

विकास
Wed, 09/08/2010 - 23:34 नवीन
लता-आशांच्या बाबतीत एकच गाणे आवडते असे म्हणणे पटत नाही. मूडप्रमाणे गाणे आवडते असे वाटते. आशाची "काही" आवडती / तात्काळ आठवलेली गाणी: (वर आलेल्याव्यतिरीक्त) प्रत्येकात आवाज वेगवेगळ्या पद्धतीने लागलेला आहे... ही वाट दूर जाते परवशता पाश दैवी माझा होशील का रूप पाहता लोचनी जीवलगा राहीले दूर घर माझे मलमली तारूण्य माझे तरूण आहे रात्र अजूनी चुरा लिया है तुमने मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है खाली हात शाम आयी है कुछ् ना कहो असो. जीवेत शरदः शतम!
  • Log in or register to post comments

गाणं हा बोलायचा विषय नाही..

मस्त कलंदर
गुरुवार, 09/09/2010 - 00:08 नवीन
एकतर शांतपणे ऐकण्याचा नाहीतर त्या तालावर थिरकण्याचा!!! तरीही आधीच्या सगळ्या गाण्यांत थोडी भर माझ्याकडूनही.. त्यातही माझी आवड बरीचशी जुन्या गाण्यांचीच.. वरती दिलेली गाणीही आवडतातच. पण पुनरूक्ती नको म्हणून परत देत नाही... माझा आवडता चित्रपट सांग म्हटले की तीन नांवे ठरलेली.. बंदिनी, चिल्ड्रेन ऑफ हेवन आणि परस्यूत ऑफ हॅपिनेस.. बंदिनीमध्ये नक्की काय छान ते सांगता येणं कठीण आहे. त्यातले ओ रे माझी तर मास्टरपीस आहेच, पण आशाबाईंचं "अब के बरस भेजो भैय्या को बाबूल" या गाण्यालाही तोड नाही.. पडद्यावर शांत, सोज्वळ नूतन... आणि आशाचा तितकाच तलम आणि आर्त स्वर... पुढे वर्णन करायला शब्दही अपुरे ठरतात... साहब, बिवी और गुलाम मधली बरीचशी गाणी आशा भोसलेंनीच गायली. मी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तो दूरदर्शनवर निवडणूकीच्या काळात बातम्यांच्या मध्ये मध्ये चित्रपट दाखवत तेव्हा.. चौथी-पाचवीत असेन मी. त्यातलं "भँवरा बडा नादान है" गाताना मधूनच लाडिक स्वर असा येतो, की ज्याचे नांव ते!!! थोडं अवांतरः त्यातलंच आणखी एक आशाबाईंचं गाणं, "साकिया आज मुझे नींद नहीं आयेगी". हे असंच विनाकारण लक्षात राहिलेलं गाणं. त्यात बूट नवीन असता म्हणून गुरूदत्त हातात घेऊन फिरत असतो. परवा हे गाणं टीव्हीवर लागलं होतं. पाहताना जाणवलं... पूर्ण गाणंभर कॅमेरा कुठूनही मारला तरी कोणत्याही फ्रेममध्ये त्या मागे नाचणार्‍या एक्स्ट्रॉजच्या चेहर्‍यावर जराही उजेड नाही. आणि सगळा प्रकाश त्या मुख्य डान्सरवर. गाणं पटकन यूट्यूबवर शोधलं.. पुन्हा पुन्हा पाहिलं, पण एक चुकार चूक सोडली तर सगळीकडे तस्संच!!! आताच्या नवीन तंत्रज्ञानात हे सहज शक्य आहे.. पण हे १९६२ मध्ये करणारा गुरूदत्त, आणि त्याचा कॅमेरामन.. दोघेही महान!!! आशाबाईंनी सगळ्याच प्रकारची गाणी गायली... त्यांचे अंगूरमधले, "रोज रोज डाली डाली" हे ही एक अवीट असं गाणं.. गाणं गाता गाता चष्मा सावरणारी दिप्ती नवलही गोड दिसते. :) कधी कधी असा मूड लागतो की कुणाची पर्वा न करता मस्त गळा हवा तितका मोकळा सोडून खुशाल मोठमोठ्यांदा गात सुटावं.. अशा वेळी हमखास मला आठवण होते ती या दोन गाण्यांची: "बलमा खुली हवा में" आणि " तू कहाँ... मैं यहाँ". "तू कहाँ..." जर कॉलेजच्या फेस्टोव्हलमध्ये चालू असेल तर ओरडणार्‍या गळ्यांना आणखी छानसा व्यायाम मिळतो. :) बाकी.. मेरा कुछ सामान हे पद्यात गायलेले गद्य तर ऑल टाईम हिट्ट.. !!! आशाबाईंबद्दल बोलायचे तर ते उमराव जानच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहिल.... "जुस्तजू जिसकी की" आणि "ये क्या जगह है दोस्तों" ही माझ्या खास आवडीची.. आणि ये क्या जगह है मधल्या "मेरे लिए भी क्या कोई उदास बेकरार है" या ओळी टचकन डोळ्यात पाणी आणणार्‍या!!! उमराव जानमधल्याच.. मध्येच कधीतरी येणार्‍या, "जब भी मिलती हैं तो अजनबी लगती क्यूँ है, जिंदगी रोज़ नयें रंग बदलती क्यूँ है। तुझसे बिछडे हैं तो किससे मिलाती हैं हमें? जिंदगी देखिए क्या रंग दिखाती हैं हमें॥" या ओळी कित्येक दिवस माझ्या सेलफोनची रिंगटोन म्हणून वाजत होत्या... अजूनही पुष्कळ गाणी आहेत.. पण मी इथेच थांबते!!!
  • Log in or register to post comments

'नाच रे मोरा' पण खूप आवडतं

पुष्करिणी
गुरुवार, 09/09/2010 - 00:33 नवीन
'नाच रे मोरा' पण खूप आवडतं मला ( व्हिडिओ मिळत नाहीये ) दुसरं खूप आवडणारं, थोडं नवं गाणं म्हणजे साथिया मधल 'चोरी पे चोरी' ( लिंक सौजन्य मस्त कलंदर )
  • Log in or register to post comments

'नाच रे मोरा' मलाही खूप

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/09/2010 - 13:04 नवीन
'नाच रे मोरा' मलाही खूप आवडतं. नवीन गाण्यांपैकी माझं आवडतं गाणं म्हणजे 'तक्षक'मधलं 'रंग दे'! खालच्या पट्टीतला आशाताईंचा आवाज कितीही वेळा ऐकला तरी तेवढाच फ्रेश वाटतो. 'जानम समझा करो'ही माझं आवडतं गाणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त

रेवती
गुरुवार, 09/09/2010 - 01:13 नवीन
आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गाजलेली गाणी या धाग्यावर ऐकायला मिळतील म्हणून वाचनखूण साठवल्या गेली पाहिजे. :)
  • Log in or register to post comments

आशाताईंचा आणखी लोभस पैलू

शुचि
गुरुवार, 09/09/2010 - 03:47 नवीन
आशाताईंचा आणखी लोभस पैलू म्हणजे "अदाकारी". काही लोकं स्टारड्स्ट लेऊन जन्माला आलेली असतात त्यापैकी त्या एक. मला त्यांची वेशभूषा, पब्लीक पर्सोना आकर्षक वाटतो. आता पुढील गाणच पहा ना - त्या फेअरी गॉड्मदर म्हणून किती शोभतात.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सुनील
गुरुवार, 09/09/2010 - 06:35 नवीन
आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! जालावर उंडारताना मिळालेले हे "ही वाट दूर जाते" ह्या गाजलेल्या गीताचे बंगाली रूप! दोन्ही गाणी ऐका - मराठी बंगाली
  • Log in or register to post comments

अत्यंत कष्टानं, मेहनतीनं

विसोबा खेचर
गुरुवार, 09/09/2010 - 13:08 नवीन
अत्यंत कष्टानं, मेहनतीनं स्वत:चं अष्टपैलुत्व सिद्ध केलेली एक महान गायिका - आशाताई यांना वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा..! तशी अनेक आहेत परंतु बाबुजींनी बांधलेलं अशाताईंचं 'जिवलाग कधी रे येशील तू..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं..
आशाताई ह्या भारतीय संगीतातल्या एक अनोख्या आकाशगंगा आहेत. त्यातले असंख्य तारे म्हणजे त्यांची गाणी. प्रत्येक गाणे आपापल्या जागी तेजस्वी तार्‍या समान
संजय अभ्यंकरांनी अगदी नेमकं वर्णन केलं आहे.. माझ्याकडून आशाताईंना वाढदिसानिमित्त ही लहानशी भेट - :) Image removed. तात्या.
  • Log in or register to post comments

सुहासिनी

विकास
गुरुवार, 09/09/2010 - 21:28 नवीन
अशाताईंचं 'जिवलाग कधी रे येशील तू..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं.. सुहासिनीमधील त्यांची सर्वच गाणी मस्त आहेत. सर्व गाण्यांमधे वेगवेगळ्या वेळचे आर्त स्वर आहेत. "मी तर प्रेम दिवाणी" हे गाणे आशाताईंचे तसेच ललीता फडक्यांनी शास्त्रीय चालीत म्हणलेले पण खूप छान आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा