Skip to main content

मी पुरुष बिच्चारा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 06/09/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
समान संधी मध्ये आजच्या मी पुरुष बिच्चारा बस मध्ये चढलो, अन रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो धक्का तीचा लागतो, पण विनाकारण ' लाईनमन' होऊन मार मला खावा लागतो काय करणार मी पुरुष बिच्चारा वाटत अस्स उठाव अन निवडून याव आपण नियम समान करावेत स्त्री पुरुषांसाठीचे, पण नेमके तेंव्हा तिथले सीट स्त्री साठी राखीव असते काय करणार मी पुरुष बिच्चारा नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले फ़ॉर्म ही भरला, पण नियमानेच गळा कापला ३० % लेडिज reserved म्हणून आमचा नंबर waiting list ला गेला काय करणार मी पुरुष बिच्चारा तरी एकदा बघा सभेत मी मलाच बिच्चारा म्हंटलो तर पहातो काय स्त्रीयांचा हंडा मोर्चा अंगावर धावून आला कारण काय म्हणे तर अबले पणावर त्यांच्या आम्ही घाला घातला आता कसले काय घरातला हंडा ही सावधानतेने घेतो नळाखाली हळूच लावून लोकमत ची सखी अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो काय करणार मी पुरुष बिच्चारा -------- गणेशा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1367
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया