✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 09/05/2010 - 11:41  ·  लेख
लेख

Book traversal links for माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..

  • ‹ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25667 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

वाचनीय

श्रावण मोडक
Sun, 09/05/2010 - 11:49 नवीन
वाचनीय अनुभव. यातला 'मी' थोडा कमी आणि 'इतर' थोडे अधिक असते तर अधिक खुलले असते हे लेखन. पण पुलंचा आदर्श असल्याने त्यांच्या, प्रवासातील त्यांच्याविषयीच्या लेखनाला प्रवासवर्णन म्हणतात, तसे इथेही मानून घ्यायचे.
  • Log in or register to post comments

पण पुलंचा आदर्श असल्याने

विसोबा खेचर
Sun, 09/05/2010 - 11:57 नवीन
पण पुलंचा आदर्श असल्याने त्यांच्या, प्रवासातील त्यांच्याविषयीच्या लेखनाला प्रवासवर्णन म्हणतात,
असहमत.. असो.. (कट्टर पुलंभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

स्वानन्द
Sun, 09/05/2010 - 12:22 नवीन
मी देखील असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

असहमत असण्याचा तुम्हाला पूर्ण

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 09/05/2010 - 12:50 नवीन
असहमत असण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण हे मत खुद्द पुलंचे आहे. अधिक माहिती साठी वाचा अपूर्वाई ची प्रस्तावना. शंका :- कट्टर भक्त आता त्यांचे मत बदलणार काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

चालायचेच

श्रावण मोडक
Sun, 09/05/2010 - 13:00 नवीन
चालायचेच विश्वनाथराव. हिजडे (किंवा वेश्या) माणसात नसतात, अशी गृहितके घेऊन आपल्या भाषाविषयक ताकदीच्या जोरावर रंजकरित्या केलेले लेखन आहे हे. तेव्हा हे असेही चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

शेलार मामा मालुसरे
Sun, 09/05/2010 - 13:16 नवीन
<<<<हिजडे (किंवा वेश्या) माणसात नसतात, अशी गृहितके घेऊन आपल्या भाषाविषयक ताकदीच्या जोरावर रंजकरित्या केलेले लेखन आहे हे..<<<< माझ्या मते या लेखाचा उद्देश हिजड्यांचे रंजक लेखन किंवा भाषाविषयक ताकद दाखविणे हा खचितच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आवश्यक

शेलार मामा मालुसरे
Sun, 09/05/2010 - 13:07 नवीन
आवश्यक आहे तितकाच मीपणा यात आढळला. माझ्या मते हा यातील गौण मुद्दा आहे. लेखन खुप प्रभावी आहे.विषय चांगला आहे.मांडणी नेट़की आहे.पाल्हाळ टाळण्यात यश मिळाले आहे.काही शब्दांची पुनरोक्ती टाळता आली असती तर लेख अधिक कसदार वाटला असता. मी कामाठीपुरात असताना मला आलेले काही अनुभव डोळ्यापुढे लगेच तरळून गेले हे या लेखाचे यश. भावनांची तरलता आणी मनातले द्वंद्व छान रेखाटले आहे. असेच लिहा . आपला शेलारमामा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आवश्यक आहे तितकाच मीपणा यात

विसोबा खेचर
Sun, 09/05/2010 - 14:37 नवीन
आवश्यक आहे तितकाच मीपणा यात आढळला.
माझ्या मते या लेखाचा उद्देश हिजड्यांचे रंजक लेखन किंवा भाषाविषयक ताकद दाखविणे हा खचितच नाही.
जाऊ द्या हो शेलारमामा..मी माझ्या कुवतीप्रमाणे लिहिले आहे.. काही वाचक त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रतिसाद देतात..! शिंपल..:) धन्यवाद.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेलार मामा मालुसरे

उत्तम लेखन. असेच विविध

अवलिया
Sun, 09/05/2010 - 11:53 नवीन
उत्तम लेखन. असेच विविध प्रकारचे लेखन येउ दे तात्या. >>>मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..! असेच आयुष्यभर पुरो ! आणि सर्व अडचणींवर मात करुन पुन्हा आयुष्य बहरो !! गणेशाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच.. प्रयत्नांची कास सोडु नको.. !!
  • Log in or register to post comments

+१

गांधीवादी
Mon, 09/06/2010 - 06:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाह वाह...

मी-सौरभ
Sun, 09/05/2010 - 11:57 नवीन
सुंदर लेखन..
  • Log in or register to post comments

सुरेख ...

छोटा डॉन
Sun, 09/05/2010 - 11:58 नवीन
एकदम ताकदवान लेखन. नक्कीच वाचनीय अनुभव आणि तो ही मस्तपण वर्णन केलेला. असेच अजुन येऊद्यात ही विनंती. :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

+१

मस्त कलंदर
Sun, 09/05/2010 - 12:41 नवीन
असेच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

जियो..

अर्धवट
Sun, 09/05/2010 - 12:01 नवीन
जियो..
  • Log in or register to post comments

अनुभवाची अनुभूती

प्रचेतस
Sun, 09/05/2010 - 12:14 नवीन
>>>सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?! क्या बात है. अजून येउ द्यात.
  • Log in or register to post comments

व्वा तात्या !

शाहरुख
Sun, 09/05/2010 - 12:20 नवीन
व्वा तात्या !
  • Log in or register to post comments

तात्याच्या लेखनाने अनेक

प्रकाश घाटपांडे
Sun, 09/05/2010 - 12:26 नवीन
तात्याच्या लेखनाने अनेक नवोदितांना एका वेगळ्या भावविश्वात गेल्याचा आनंद नक्की मिळाला असेल.
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
Sun, 09/05/2010 - 12:30 नवीन
दोन्ही भाग वाचले, अर्थातच आवडले. पण भाग १ असं काल वाचलं तेव्हाच ठरवलं की वाचून श्रीखंडाच्या चक्क्यासारखं टांगून घ्यायचं नाही.(रोशनी, शिंत्रे गुरुजी, सालस... यादी मोठी आहे) म्हणून काल वाचायचा मोह टाळलाच. आज अंतिम भाग असे दिसल्यावर सुखद धक्का बसला आणि दोन्ही भाग वाचले. स्वाती
  • Log in or register to post comments

वाहवा

पैसा
Sun, 09/05/2010 - 12:47 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अगदी अगदी!

प्रियाली
Sun, 09/05/2010 - 15:29 नवीन
अंतिम भाग लगेच टाकल्याबद्दल धन्यवाद. अनुभव आवडला हे वे.सां. न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

तात्या

तिमा
Sun, 09/05/2010 - 12:43 नवीन
लेखन लाजवाब, शेवटच्या पिशवीतल्या शिध्याबद्दल लिहिलेले वाचून डोळ्यात पाणी आले. वा! गायक तात्या, संगीतप्रेमी तात्या, खवैय्या तात्या आणि लेखक तात्या. दंडवत , सगळ्याच प्रांतात तुमची उत्कटता मनाला भिडते.
  • Log in or register to post comments

+१

राजाभाउ
Sun, 09/05/2010 - 18:30 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मस्त लेख........

प्रीत-मोहर
Sun, 09/05/2010 - 12:50 नवीन
मस्त लेख........
  • Log in or register to post comments

श्रामोंशी सहमत

राजेश घासकडवी
Sun, 09/05/2010 - 12:53 नवीन
वाचनीय अनुभव. लेखकाच्या बहुआयामी अनुभूतीची कल्पना येते. चारचौघांना न दिसणारा एक कोपरा उलगडून दाखवण्यात यशस्वी.
यातला 'मी' थोडा कमी आणि 'इतर' थोडे अधिक असते तर अधिक खुलले असते हे लेखन.
हे श्रामोंचं पटलं. तसंच काही ठिकाणी जे उघड सत्य वाचकाला जाणवतं त्याची द्विरुक्ती केल्यामुळे मजा जाते....
गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"?
अवतरणातलं वाक्य एकदा येतं तेव्हा परिणाम साधतं. दुसऱ्यांदा येतं तेव्हा साधलेल्यातला निम्मा परिणाम जातो.
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!
हे काहीसं पोकळ, ओढून ताणून निष्कर्ष काढणं वाटतं. अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो.
  • Log in or register to post comments

>>अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल

अर्धवट
Sun, 09/05/2010 - 12:57 नवीन
>>अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो. ह्म्म्म.. दुसर्‍यांदा वाचल्यावर असं वाटलं खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वेल...

श्रावण मोडक
Sun, 09/05/2010 - 13:06 नवीन
अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो.
वेल, गुर्जी... ! ते कसलेसे दागीने असतात ना तसा प्रकार होत चाललाय हे लेखन म्हणजे. अनुभवाच्या सच्चेपणाविषयी लेखकाचा स्वतःचाच विश्वास नसावा बहुदा. स्वतःचे भिकारचोट, हरामखोर या जोडीने पांढरपेशा उच्चभ्रू वगैरे (अंडरएस्टिमेटेड) वर्णन केले की बहुदा अनुभवांपेक्षा स्वतःविषयीचा विश्वास वाढत असावा. एरवी अनुभव सच्चा असेल तर अगदी व्यक्तीचित्रांमध्ये त्या व्यक्तींचे "सौंदर्य दाखवण्यासाठी" छायाचित्रे टाकण्याची वेळ येत नसते. इथल्या लेखनात ती द्विरुक्ती गरजेची नसते. पण हे सांगणे म्हणजे... !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

श्रावण आणि गुर्जींचे प्रतिसाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/05/2010 - 14:33 नवीन
... समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही काळापूर्वी आलेलं बिपिनचं 'खोबार' असो वा अलिकडचं अर्धवट यांचं 'आफ्रिका'वर्णन, इथून तिथून माणसं सारखीच असा जो काही समज होता तो पक्का होत चालला आहे. शुचिर्भूतपणाच्या व्याख्या असोत अथवा कसलं तत्त्वज्ञान, प्रत्येक समाजगटाला त्याची गरज असावी. अर्थात हे तत्त्वज्ञान वेगळं असतंच का नाही याचा मागोवा राजेशच्या 'खमंग थालिपीठ' धाग्यावर घेण्याचा प्रयत्नही झाला आहे. श्रद्धेची गरज आणि श्रद्धेचं दृष्य स्वरूप याबद्दलही मिपावर अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर, असलेल्या एका अनुभवातून माणसांची/च्या श्रद्धा, माणसां-माणसांतलं आणि/किंवा दोन समाजगटांमधलं वेगळेपण यावर खरोखर भाष्य करता येईल काय असा प्रश्न पडला आहे. एक गोष्टदा सांगून लिखाण थांबवलं असतं तर अधिक उठावदार झालं असतं या मताशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

माझ्या लेखनातील उणीवा

विसोबा खेचर
Sun, 09/05/2010 - 14:40 नवीन
माझ्या लेखनातील उणीवा दाखवणार्‍या प्रतिसादाबद्दल धन्यवाद घासकडवीसाहेब, मी मला जसे जमले तसे लिहिले आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पुन्हा एकदा

सहज
Sun, 09/05/2010 - 13:18 नवीन
होमपीचवर तात्याची तुफान फलंदाजी. फोरास रोड, वेश्यावस्ती, झमझमबार एरीया हा तात्याच्या लेखनाचा बालेकिल्ला. तात्यांच्या अश्या गिर्रेबाज लेखनाने त्यांचे नवे नवे फॅन निर्माण होतात यात वादच नाही. मागच्या बॅचला तात्याच्या 'रौशनी'ने भुरळ घातली होती. नविन बॅचसाठी आता 'शाहीन'. तात्या नुकताच म्हणाला आहे खरा की लवकरच नवे संकेतस्थळ काढेल व खात्री आहे की तो हे करुन दाखवेलच. तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी. (भाईकाकांच्या 'एक शुन्य मी'चा पंखा) सहज ------------------------------- मराठी संस्थळाचा इतिहास विसरु नका.
  • Log in or register to post comments

तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे

मदनबाण
Sun, 09/05/2010 - 13:23 नवीन
तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी. सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

.

शाहरुख
Sun, 09/05/2010 - 17:48 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

प्वाईंट

श्रावण मोडक
Sun, 09/05/2010 - 15:53 नवीन
तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी.
भुरळच ती. त्यामुळं मग सावधानता आवश्यक ठरतेच. म्हण ध्यानी घ्यावी अशीच आहे. इतिहासाची पुनरावृत्ती घडतेच म्हणतात. एकूण लेखनाचा उपयोग "बहुआयामी" असतोच. छान. त्यामुळंच हल्ली मी लेखनाचा फॅन असतो. लेखकाचा नाही. हल्ली क्रेमर दिसत नाहीत कुठंही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

तात्या लेख जमलाय.

चतुरंग
Sun, 09/05/2010 - 16:09 नवीन
अनुभव आवडला. दुसरा भाग तातडीने टाकलात ही गणेशाची कृपाच म्हणायची! ;) रंगा
  • Log in or register to post comments

पूजेचा फोटो?

सुनील
Sun, 09/05/2010 - 17:21 नवीन
पूजा घालतानाचा फोटो पहायला मजा आली असती! अवांतर - तात्या जानवं घालतो का?
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Sun, 09/05/2010 - 17:36 नवीन
लेख. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments

मस्त ..........

वेताळ
Sun, 09/05/2010 - 17:56 नवीन
मला तरी आवडले तात्या.....
  • Log in or register to post comments

छान...

प्रसन्न केसकर
Sun, 09/05/2010 - 20:26 नवीन
तात्या परत लिहिते झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लिखाण वाचायला मिळायला लागले हे उत्तम झाले. शाहिन पेक्षा मला स्वतःला हे लिखाण जास्त भावले. (ज्याची त्याची आवड.) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि त्याबाबत फार थोडे लोक लिहितात. त्यामुळेच अश्या लिखाणाचे महत्व वाढते. लेखकाचा दृष्टीकोण वगैरे खटकले तरी ज्यांनी हे जग पाहिलेले नाही अश्यांना ते नजरेआड करुन बरेच काही समजावुन घेता येते अश्या परिस्थितीत. हिजड्यांच्या गणेशोत्सवाबाबत वाचताना माझ्या डोळ्यासमोर आले पुण्यातले बुधवार पेठेतले चोळखण आळी मंडळ. एरवी ज्यांना वेश्या, रंडी अश्या विषेशणांनी संबोधले जाते त्या महानंदांचे हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रश्नांना हात घालणारे देखावे आणि शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुकीकरता गाजले आहे. नो कंडोम नो सेक्स ही घोषणा, एडस वरचे देखावे याद्वारे या मंडळाने एडस विरोधी जनजागृतीचे बरेच काम केले. शेवटी हिजडे असोत, तात्यांनी लिहिलेल्या रोशनी, शाहिन असोत की पुण्यातल्या दाणेआळीतल्या वेश्या असोत, माणसेच ती. समाजाने आपल्यातुन खड्यासारखी वगळलेली असली, जनावरासारखे किंवा त्यापेक्षाही भयानक जीवन ती जगत असली तरी माणसे माणसेच रहातात याचेच हे उत्तम नमुने.
  • Log in or register to post comments

कोणी काहीही म्हणो...लेखन

शिल्पा ब
Sun, 09/05/2010 - 21:37 नवीन
कोणी काहीही म्हणो...लेखन आवडले. एका वेगळ्या विश्वाबद्दल थोडीशी माहिती मिळाली.. सहज एक वाटून गेले : असे कितीही वाचले तरी आपले समाजमन "त्या " वर्गाबद्दल असणारे मत बदलणार आहे का? ती सुद्धा माणसेच आहेत एवढे लक्षात ठेवले तरी पुरे. अशा लोकांची समाजालाहि गरज असतेच...नाहीतर वासनांध कुठे त्यांची वासना शमवणार? आपल्यासारख्या पांढरपेशा मुलीबाळींचे घराबाहेर फिरणे अशक्य व्हायचे..
  • Log in or register to post comments

) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि

विंजिनेर
Sun, 09/05/2010 - 21:43 नवीन
) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि त्याबाबत फार थोडे लोक लिहितात. त्यामुळेच अश्या लिखाणाचे महत्व वाढते. लेखकाचा दृष्टीकोण वगैरे खटकले तरी ज्यांनी हे जग पाहिलेले नाही अश्यांना ते नजरेआड करुन बरेच काही समजावुन घेता येते अश्या परिस्थितीत.
ऐसाईच बोल्ता है. लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.
  • Log in or register to post comments

लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा

विसोबा खेचर
Sun, 09/05/2010 - 21:49 नवीन
लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.
हा हा हा..अस्तित्वासाठीची केविलवाणी लढाई! दुसरं काय?! धन्यवाद विंजिनेरसाहेब.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा

पांथस्थ
गुरुवार, 09/09/2010 - 11:40 नवीन
लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा

यशोधरा
गुरुवार, 09/09/2010 - 15:41 नवीन
लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय. अगदीच सहमत. लेख आवडला. अगदी लेखकाने केलेल्या निवेदनासकट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

प्रकाटाआ.

यशोधरा
गुरुवार, 09/09/2010 - 15:42 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

छान लेखन

ऋषिकेश
Sun, 09/05/2010 - 21:50 नवीन
छान लेखन.. नेहमीच्या विषयावरचे तरीही वेगळे.. मला आवडले. अजून येऊ दे! खरंतर श्रामो म्हणतात तो मीपणा या लिखाणापेक्षा मला "शाहीन" मधे जाणवला होता.. ते तिचं व्यक्तीचित्र न वाटता तिच्याबरोबरच्या तात्यांचं चित्रण वाटत होतं :)
  • Log in or register to post comments

प्वाईंट

मिसळभोक्ता
Sun, 09/05/2010 - 22:00 नवीन
प्वाईंटचा मुद्दा असा, की हिजडे गणेशोत्सव करतात, आणि त्यांना त्यातले शष्प कळत नसल्याने तात्याला पूजा सांगायला बोलवतात. तात्या त्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग करून "सदा सर्वदा" वगैरे म्हणून वेदातल्या ऋचा वगैरे म्हटल्याचा आभास निर्माण करतो, म्हणून हिजडे खूष होऊन त्याला बक्शीस देतात. ह्या दोन वाक्यांसाठी दोन भागात लेख टाकणे ही तात्याची कलाकारी. श्रामो, जानी, समझा करो.
  • Log in or register to post comments

अच्छा

श्रावण मोडक
Sun, 09/05/2010 - 22:17 नवीन
अच्छा, असं आहे होय! आत्ता सगळं नीट समजलं. 'टाळ्यां'चे आवाज ऐकू येऊ लागले, मिभोकाका... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हे बघा

सन्जोप राव
Mon, 09/06/2010 - 06:19 नवीन
मिभोसाहेबांचे असे हे 'आपुन तुमको दोईच मारा, लेकिन सॉलिड मारा के नई' असते. आता या लेखाला 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' अशीच प्रतिक्रिया द्यावी म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मस्त लेख तात्या!!

समंजस
Mon, 09/06/2010 - 13:27 नवीन
हिजडयांच्या गणेशोत्सवाबद्दल ऐकून(वाचून) होतो. तुमच्या या लेखामुळे त्या बद्दल थोडी आणखी माहिती मिळाली. हिजडयांशी आपण फटकून वागत असलो किंवा त्यांचा तिरस्कार करत असलो किंवा त्यांची चेष्टा करत असलो तरी त्यांच्या एकंदरीत राहणीमाना बद्दल, त्यांच्या विश्वाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ही कायम असतेच. ह्या प्रकारचे काही लेख ती उत्सुकता थोडीफार शमवण्याचा प्रयत्न करतात :) अर्थातच प्रस्तुत लेख हा स्वानुभवातून आलेला असल्यामुळे तसेच अनुभवकथन या प्रकारातील असल्यामुळे लेखकाच्या लेखातील टिप्पणींना जसे आहे तसे मान्य करणे आवश्यक आहे. हे असे का? तसे का नाही हा आग्रह धरणे म्हणजे दुसर्‍याचा अनुभव, दुसर्‍याचा दृष्टीकोण स्वतःच्या शब्दात, स्वत:च्या दृष्टीकोणातून मांडणेच आहे. हे कितपत योग्य? विचार करतोय :) [अवांतरः तात्या एक विनंती, ह्या पुढे कुठलंही अनुभव कथन, ललित लेखन हे जरी २-४ पानांचं होत असलं तरी १-२ पानांची प्रस्तावना नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करा बुवा :) त्यात हे सांगायला विसरू नका की ह्या लेखा मागची प्रेरणा काय? अनुभव व्यक्तीगत आहे की दुसर्‍याचा, कल्पनाविलास आहे की सत्य, कुठे काय स्वातंत्र्य घेतलंय, वाचकांनी कितपत गंभिरतेने घ्यावे वै. वै. म्हणजे काय माझ्या सारख्यांना कसलाही संभ्रम राहणार नाही आणि काय अपेक्षा ठेवावी काय नाही हे प्रस्तावना वाचूनच ठरवता येईल आणि त्यामुळे पुढे लेख/कथा वाचावी की नाही हे ठरवायला सोप्प जाईल :) ]
  • Log in or register to post comments

तसेच अनुभवकथन या प्रकारातील

विसोबा खेचर
Mon, 09/06/2010 - 19:06 नवीन
तसेच अनुभवकथन या प्रकारातील असल्यामुळे लेखकाच्या लेखातील टिप्पणींना जसे आहे तसे मान्य करणे आवश्यक आहे.
आपल्या सूज्ञतेबद्दल बरे वाटले..
हे असे का? तसे का नाही हा आग्रह धरणे म्हणजे दुसर्‍याचा अनुभव, दुसर्‍याचा दृष्टीकोण स्वतःच्या शब्दात, स्वत:च्या दृष्टीकोणातून मांडणेच आहे.
जे हास्यास्पद आहे! :)
म्हणजे काय माझ्या सारख्यांना कसलाही संभ्रम राहणार नाही आणि काय अपेक्षा ठेवावी काय नाही हे प्रस्तावना वाचूनच ठरवता येईल आणि त्यामुळे पुढे लेख/कथा वाचावी की नाही हे ठरवायला सोप्प जाईल
अवांतर आवडले.. :) धन्यवाद समंजसराव.. तात्या. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

.

समंजस
Mon, 09/06/2010 - 13:54 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा