(ही गाडी तिच्या मालकीची होती, बारच्या नाही असे गृहीत धरून) काय चुकले त्यांचे? गाडी दिसणारच हो. होंडा सिटी (ती ही चालकासकट) ही माझ्यालेखी तरी चैनीची वस्तू आहे. जीवनावश्यक नाही.
नाईलाज म्हणून हा धंदा करावा लागला तर एका मर्यादेपर्यंत पैसे कमावून झाले की बाहेर पडावे. पूर्वेतिहास सांगितला तर बाहेर काम सहज नाही मिळणार कदाचित, पण मिळणारच नाही असे नाही. खोटा अनुभव पण दाखवता येतो. Contacts असतील तर references पण दाखवता येतात खोटे. होंडा सिटी ची मुंबईतील किंमत साधारण ९ लाखाच्या घरात जात असेल (चुभूद्याघ्या). जिला हे परवडू शकते ती त्या पैशात एखादा व्यवसाय पण करू शकते, करायचा असेल तर.
>> तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली
मानल तुमच्या ऑनेस्टीला. इतक खुलेआम बिनधास्त सांगणे!!
शाहीन बाकी सुरेखच
तात्या लेखन चांगले करता तुम्ही. नेहेमीच. पण या लेखातला शाहीनचा फोटो खटकला. गोड आजे पोरगी. हा लेख तिच्या चेहेर्यामुळे लक्षात राहील. तुमच्या लेखणीमुळे नाही. मग काय उपयोग?
बाकी लोकांनी फोटोवरुन काही अचकट विचकट प्रतिसाद नाही दिले म्हणजे झाले
व्यक्तीचित्र नेहमीसारखेच ओघवते आहे. विशेषतः रंगरूप आणि स्वभावाबद्दलचा explicit फाफटपसारा न लावता संभाषणातूनच व्यक्ती जमेल तितकी ओळखता यावी, यामागचा लेखनप्रयत्न स्तुत्य आहे.
(चिकित्सक)बेसनलाडू
मात्र डान्सबार किंवा लेखात म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या बाजारातील बव्हंशी मुलीबाळींचे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असावेत, असे वाटते. त्यामुळे असे एखादे व्यक्तीचित्र वाचायला मिळाल्यावर, त्यात वेगळे ते काय हे हुडकायचे प्रयत्न करावे लागतात.
(शोधक)बेसनलाडू
तात्या बाकी व्यक्तिचित्रे सुरेखच लिहितात.
मृत्यूंजयच्या मुद्याशी सहमत. यापूर्वी रोशनीच्या मुलीच्या धाग्यात फोटोवरून हीच चर्चा झाल्याचे आठवतेय.
http://www.misalpav.com/node/8411#comment-129862
तिथल्या एका प्रतिसादातली श्रामोंची काही वाक्ये मलाही पटली म्हणून जशीच्या तशी इथे देतेयः
माझा मुद्दा वेगळा आहे - अशी छायाचित्रे टाकावीत का? या मंडळींच्या या ओळखी अशा व्यक्त कराव्यात का? तुमच्या याच लेखात मिपाच्या एका सदस्याचा उल्लेख आहे. त्याची प्रायव्हसी आपण जपतो, त्याचा तो अधिकार आहे. तसाच अधिकार याही मुलीचा आहे असे माझे मत आहे. मुलीचाच नव्हे केवळ, तिची आई, आजी, मावशी, आत्या... कोणीही असो, त्यांचाही आहे. त्या दृष्टीने मला ते छायाचित्र केवळ अवांतर वाटते. मी म्हटले तसे, त्याने लेखनात ना भर पडते, ना ते नसल्याने खोट येते. त्यांची एक विशिष्ट परिस्थिती आहे. आणि म्हणून तर त्यांची प्रायव्हसी अधिक महत्त्वाची मानली पाहिजे आपण. लेखनाची संवेदनशीलताच हरपते असे छायाचित्र आल्यानं.
शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..!
हे वाचलं. त्यावर प्रामाणिकपणाचे प्रशस्तीपत्र लेखकाला मिळाल्याचे पाहून ऊर भरून आला.
काहीतरी करून आपली अन कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावे लागते लोकांना.
हेही वाचलं. किती समर्पक प्रतिक्रिया असं वाटलंच. यापुढे 'असेही' लेखक मराठीत येणार आहेत हे समजलं. त्याच क्षणी लेखाच्या शेवटाला असलेल्या,
शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..!
या ओळींनं एक चिमटा काढला.
यापुढे हृदयद्रावकता वगैरे इथं उतू जाऊ लागेल हे कळून चुकलं. "वा, वा" - "छान, छान" !!!
पूर्वीच्या एका धाग्याची, त्यावर झालेल्या दंग्याची (जो आता तिथं नाही) आठवण झाली.
disgusting, cheap but honest.
१) हिच्या कथेत आणि आधी वाचलेल्या ( तुमच्या किंवा इतरत्र) कथांमधे काहीच फरक नाही. तेच ते. मग पुन्हा नवीन लेख कशाला? लेख म्हणजे आय-कार्ड नव्हे की प्रत्येकाला एक-एक दिले.
२) तुम्ही या लोकांच्या भागातील हॉटेलमधे काम करत किंवा पॉलिसी वगैरे व्यवसाय होता/ आहात/ कराल याला आक्षेप नाही. पण अशा स्त्रियांची कुठलीही सेवा विकत/ फुकट आपल्या सारखे सभ्य घरातले लोक घेत नाहीत. तुम्ही हे करायला नको होते.
३) तिच्या आसपास वावरणार्या लोकांमधे तुम्ही केव्हाही वरचढ ठरणार. त्यामुळे ती तुमच्यावर फिदा झाली तर त्यात नवल काय? पण तुम्ही संयम बाळगायला हवा होता.
जर तिची जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही आणि तुमच्याच एका गोष्टीतील त्या "ठोक्या"मधे फक्त quantity चा फरक पडतो, quality (वृत्तीचा) नाही - त्याने तिचा खूप गैरफायदा घेतला आणि तुम्ही थोडासा.
मग तो पैसे देउन बोलावणारा शेठ काय वाईट आहे?
४) तुम्ही जर या पातळीवर किंवा पुढे गेलेले असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मग विसोबा खेचरांसारख्या संतांच्या आयडीने लिहू नका. ऐतिहासिक थोर व्यक्तींच्या नावाचे आयडी घेउ नयेत आणि घेतलेच तर किमान त्यांचा मान तरी राखावा.
पण अशा स्त्रियांची कुठलीही सेवा विकत/ फुकट आपल्या सारखे सभ्य घरातले लोक घेत नाहीत.
मी त्या स्त्रियांच्या वतीने त्यांची कुठलीही सेवा कुणाला ऑफर केली आहे असं मला लेखावरून वाटत नाही.. :)
पण तुम्ही संयम बाळगायला हवा होता.
बंद काळ्या काचा असलेल्या वातानुकुल गाडीत मला नाही बाळगता आला संयम..!
जर तिची जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही आणि तुमच्याच एका गोष्टीतील त्या "ठोक्या"मधे फक्त quantity चा फरक पडतो, quality (वृत्तीचा) नाही - त्याने तिचा खूप गैरफायदा घेतला आणि तुम्ही थोडासा.
मे बी..!
मग तो पैसे देउन बोलावणारा शेठ काय वाईट आहे?
मी त्या शेठला वाईट म्हटलेलंच नाही.. शाहीनच्या मते तो वाईट आहे!
पण मग विसोबा खेचरांसारख्या संतांच्या आयडीने लिहू नका. ऐतिहासिक थोर व्यक्तींच्या नावाचे आयडी घेउ नयेत आणि घेतलेच तर किमान त्यांचा मान तरी राखावा.
मी त्या स्त्रियांच्या वतीने त्यांची कुठलीही सेवा कुणाला ऑफर केली आहे असं मला लेखावरून वाटत नाही..
कुणाला ऑफर केलीत असे मी म्हटले नाही, तुम्ही घेतलीत असे म्हणालो आणि त्याला माझा आक्षेप आहे.
तुम्ही तुमच्या प्रेयसी अथवा बायकोसोबत काहीही करा, पण या स्त्रियांच्या संदर्भात ही गोष्ट पैशाच्या मोबदल्यात पुरवली जाणारी सेवा आहे. सभ्य लोकांनी ती विकत (इतर ग्राहकांसारखी) किंवा फुकट (vulnerabilty चा गैरफायदा घेउन किंवा इतर काही मार्गाने) घेणे अयोग्य आहे.
इथे काहींचा फोटो डकवण्यास आक्षेप आहे पण तिनेच परवानगी दिल्यावर प्रश्न मिटतो.
चुम्माचाटी हा शब्दही काहींना खटकला. शब्दप्रयोग किंवा दृष्टीकोन बदलून वस्तुस्थिती बदलत नाही.
पेन साहेब, एक शंका आहे. प्रेयसीचे (किंवा मैत्रिणीचे म्हणू) चुंबन घेतलेले चालते तर या प्रसंगात केवळ ती मैत्रीण बारबाला आहे म्हणून ते अनैतिक कसे ठरते? खालील काल्पनिक प्रसंग बघूया. (आमच्या आयुष्यात असले प्रसंग काल्पनिकच असायचे)
"माझी एक मैत्रीण आहे, शिक्षणाने MBA, एका बहुराष्ट्रीय कंपनीत HR आहे. तिच्या गाडीत बसून मी आणि तिने कित्येकदा चुम्माचाटी केली आहे. आमचे एकमेकांशी लग्न होणार नव्हते पण शारीरिक आकर्षण होते म्हणून"
आता हे योग्य कि अयोग्य? ह्याला अयोग्य म्हणतीलही कुणी. पण असे प्रकार हल्ली सर्रास होतात. शहरातच नव्हेत तर गावातही. खरे सांगायचे तर गाववाले शहरापेक्षा खूप पुढे आहेत काहीकाही बाबतीत. यावर वेगळा धागा होईल, त्यामुळे पुढे चर्चा करायची झाली तर वेगळ्या ठिकाणी करू, इथे नको.
सुरुवात तुमच्या टिपिकल स्टाईलने झाली आहे ती पकड घेणारी आहे, नंतर एकेक पायरी चढत जाईल असे वाटतानाच एकदम पायरी सटकली! अनुभवांचे प्रामाणिक वर्णन आणि बटबटीत वर्णन ह्यातली सीमारेषा सांभाळता आली नाही असे जाणवले.
(बाकी फोटो नसावा ह्या श्रामो आणि मस्तकलंदर ह्यांच्या मताशी सहमत आहे.)
पुलेशु.
चतुरंग
>>मीही तसा हरामखोरच. शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली
हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले. कृती (किंवा Object ) तीच असली तरी शब्द बदलले तर वाचून येणारी अनुभूती बदलू शकते. इथे एकाहून एक दिग्गज असल्याने उदाहरण द्यायच्या भानगडीत न पडता इतकेच म्हणेन की या वाक्यामुळे जेवताना अन्नात खडा आल्यासारखे वाटले.
हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले. कृती (किंवा Object ) तीच असली तरी शब्द बदलले तर वाचून येणारी अनुभूती बदलू शकते. इथे एकाहून एक दिग्गज असल्याने उदाहरण द्यायच्या भानगडीत न पडता इतकेच म्हणेन की या वाक्यामुळे जेवताना अन्नात खडा आल्यासारखे वाटले.
लेखकानी त्याला आलेला अनुभव (किंवा वाटले तर फिलींग म्हणु) त्याला योग्य वाटेल / भावेल त्याच शब्दात व्यक्त करावा. उगाच लोकांना काय वाचायला आवडेल असा विचार करुन लिहित बसले तर लेखकात आणि व्यापार्यात फरक काय उरला ?
तात्या हे व्यक्ती चित्र देखील सुंदर उतरले आहे. मुख्य म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा जुन्या ढंगात मिपावर वावरायला लागल आहात हे बघुन आनंद झाला.
लेखकानी त्याला आलेला अनुभव (किंवा वाटले तर फिलींग म्हणु) त्याला योग्य वाटेल / भावेल त्याच शब्दात व्यक्त करावा. उगाच लोकांना काय वाचायला आवडेल असा विचार करुन लिहित बसले तर लेखकात आणि व्यापार्यात फरक काय उरला ?
+१, हेच म्हणतो.
कुठल्याही प्रकारचे लेखन हे केवळ स्वतःच्या नजरेतुन केलेले असावे, वाचकांना काय आवडेल किंवा काय नाही आवडेल ह्याचा विचार करुन येणार्या प्रतिक्रियांची चिंता करत बसल्यास लेखन करणे अशक्य होईल व तसे लेखन हे 'प्रामाणिकपणा'शी प्रतारणा होईल.
तात्यांनी जे काही लिहले आहे ते त्यांच्या फ्रेममध्ये आहे व त्यांना जे वाटले ते त्यांनी लिहले आहे.
वाचकांचे काम एवढेच आहे की वाचणे आणि आवडले / न आवडले ते कळवणे, अर्थात तशी इच्छा असेल तर.
बाकी अनुभूती वगैरे बाबी लेखकाकडेच सोडल्या तर बरे होईल.
बाकी टिपीकल तात्यास्टाईल असलेले हे व्यक्तिचित्र मस्त उतरले आहे असे म्हणतो, आम्ही फक्त व्यक्तिचित्र वाचले व त्यात काय लिहावे हा लेखकाचा अधिकार मान्य करुन जे काही लिहले आहे ते एकंदरीत 'जमले आहे' असे म्हणतो, बाकी इतर बाबींवर नो कमेंट्स ...
- छोटा डॉन
चाकोरीबाहेरचे व्यक्तिचित्र आणि अनुभव साक्षीत्वाने विना-नाटकीपणाने वाचकापर्यंत पोचवणे म्हणजे महा कठिण काम. (ते श्रामो वगैरे जाणोत.)
(माझ्या ओळखीचे स्ट्रिपर वगैरे आहेत. पण नीरगाठ-उकल करत त्यांचा माणूसपणा दाखवायला जमणार नाही. सुरुवातीपासूनच त्यांच्याशी अनुभव सामान्य माणूसपणाचा येतो. म्हणून अशा रीतीने शेवटी माणूसकी दाखवणारे कथानक थोडेसे कृत्रिम वाटते.)
चाकोरीबाहेरचे आणखी अनुभव आणि व्यक्तिचित्रे येऊ देत.
हे बघ, इथे तिचे नांव, ती जिथे काम करते त्या बारचे नांव, राहत्या जागेचा पत्ता असं सगळं सगळं आलंच. आता जर ही बाई कुठे बाहेर गेली, तर प्रत्येकवेळेस तिला याच ओळखीने ओळखलं जावं असे वाटणार नाहीच. तेव्हा इथल्या वाचकांनी(सदस्य्+पाहुण्या) असेच म्हणून तिला ओळखले तर??
इथे पांढरपेशातले लोक देखील जालावर आपली ओळख कळू नये म्हणून इतका आटापिटा करतात.. अशावेळी तिचा फोटो इथे कशाला?? आणि तो दिला नाही म्हणून व्यक्तिचित्रात काहीच उणीव नाही येत.
तेव्हा इथल्या वाचकांनी(सदस्य्+पाहुण्या) असेच म्हणून तिला ओळखले तर??
आयडेंटीटी च भय तिला नसावं.कारण तस असतं तर आपल आयुष्य ओपन कार्ड आहे असे ती म्हणाली नसती.ते काही असले तरी आपल्या पांढरपेशा मनाला ते खटकतं एवढमात्र खरं!
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी.
"माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.
म्हणजे परवानगी आहे असे गृहीत धरले आहे. समजा परवानगी नसती आणी तरी तात्याने लिहिल असत तर हा मुद्दा वादग्रस्त झाला असता. ( म्हणजे मतमतांतरे झाली असती)
बाकी चेहरे व बुरखे ( किंवा मुखवटे) या विषयी स्वगत मधे थोडेसे लिहिले आहेच.
एकदम झक्कास आणि बिनधास्त.....आपल्याला आवडले.
गाडीत काय केले ते कुणाला अश्लिल वाटले असेल तर ती व्यक्ती खोटे बोलते असे समजावे. अशा परिस्थितीत कोणी भजन किंवा मनाचे श्लोक म्हणणार नाही हे निश्चित आहे. बाकी शाहिन शाहिनच आहे. दिलखल्लास
तात्या,
झकास जमून आलाय लेख. आणि तुमच्या बिनधास्त सगळं कबूल करण्याच्या हिमतीला सलाम!
अशा परिस्थितीत स्वतःला आवरू कसं शकता तुम्ही? मोह भल्या-भल्यांची विकेट उडवतो. आणि 'असा' नशा आणणारा मोह टाळणं सोपं नव्हे. धन्य आहात तुम्ही!
च्यायला, आमच्या व्यवसायात आम्हाला गेटवरचे सिक्युरिटी गार्ड गुरकावून एंट्री करायला लावतात किंवा मॅनेजर संगणकात डो़कं घालून मेंदूचा भुगा करायला लावतात. (मी सॉफ्टवेअर इंजिनीअर नाही; सीनीयर काँटेंट लीड आहे; म्हणजे टेक्निकल रायटर; चांगल्या संधी असतील तर कृपया सांगा. ;-) टेक्नीकल रायटिंग मध्ये बरं का....)
बाकी तुम्ही जे लिहिलं आहे ते सगळ्यांच्याच मनात असतं; ते उघड सांगण्याचं डेअरिंग मात्र खूप थोड्या लोकांमध्ये असतं.
--समीर
लेख वाचला.
लेखकाकडे लेखविषयासाठी अनुरुप वाटेल अशी आणि छोट्या छोट्या गोष्टी खुलवून सांगण्याची भाषाशैली आहे, त्यामुळे लेखन चांगले जमते. एक तो 'चुम्माचाटी' शब्द सोडल्यास मला लेखन आवडले. अर्थात, दुदैवाने शाहीनच्या आयुष्याचे तेच वास्तव आहे, आणि घाटपांडे म्हणतात तसे, माझ्या पांढरपेशा मनाला तो शब्द पेलण्याची ताकद नाही.
पुढे जाऊन असेही वाटते, की स्वतः शाहीनला स्वतःचा फोटो मिपावर असण्याची व त्या ओळखीची लाज (तिला स्वतःला) वाटण्यापेक्षा, शाहीन जर कधी समोर आली तर माझ्यासारखी पांढरपेशी व्यक्तीच अधिक गडबडून जाईल की काय? शाहीनला स्वतःची लाज वाटण्यापेक्षा आमच्या मधयमवर्गीय मानसिकतेलाच तिची अधिक लाज वाटते आहे का? उदा: - समजा कोणी विचारले, की "तू त्या शाहीनचा फोटो असलेल्या संसथळावर असतेस का?" आली का पंचाईत! तर हे असेही असू शकते. म्हणजे खरं तर कुठेतरी मला माझीही मानसिकता कदाचित बदलावी लागेल का?
फोटोबाबत घाटपांड्यांशी सहमत.
शेवटचं म्हणजे प्रतिक्रियांमधली "पिंप" ही प्रतिक्रिया अतिशय अस्थानी वाटली व खटकली. संपादक मंडळाने असली प्रतिक्रिया कशी काय तशीच ठेवली? दुसर्या कोणी मिपावर इतरत्र अश्या प्रतिक्रिया दिल्य तर त्या तशाच ठेवणार का?
पुढे जाऊन असेही वाटते, की स्वतः शाहीनला स्वतःचा फोटो मिपावर असण्याची व त्या ओळखीची लाज (तिला स्वतःला) वाटण्यापेक्षा, शाहीन जर कधी समोर आली तर माझ्यासारखी पांढरपेशी व्यक्तीच अधिक गडबडून जाईल की काय? शाहीनला स्वतःची लाज वाटण्यापेक्षा आमच्या मधयमवर्गीय मानसिकतेलाच तिची अधिक लाज वाटते आहे का? उदा: - समजा कोणी विचारले, की "तू त्या शाहीनचा फोटो असलेल्या संसथळावर असतेस का?" आली का पंचाईत! तर हे असेही असू शकते. म्हणजे खरं तर कुठेतरी मला माझीही मानसिकता कदाचित बदलावी लागेल का?
उत्तम प्रतिसाद. परवा दुसर्या एका धाग्याबद्दल बोलताना तू मला "नावडतीचे मीठ अळणी" या म्हणीची आठवण करून दिली होतीस. सदर धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया वाचताना तीच म्हण आठवली पुन्हा. शेवटच्या मुद्द्याबाबत सहमत आहे.
प्रतिक्रिया
आवडलं लेखन...काहीतरी करून
असेच म्हण्ते.............
असेच म्हणतो. बिच्चारी शाहिन.
पोटाची खळगी भरणे म्हणजे एयर
तुम्हाला फक्त गाडीच दिसली का?
(ही गाडी तिच्या मालकीची होती,
पटलं
द्विरुक्ती झाल्यामुळे
तात्यासाब
घरी घरवाली नसल्याने जामतीये
>>शाहीन बाकी
तात्या लेखन चांगले करता
नेहमीसारखेच
उमा पॅलेस.......
लेख सुरेख..
"वा, वा" "छान, छान"
लागा चुनरी मे दाग?
नेहमीप्रमाणेच
जबरा...
disgusting, cheap and honest
मग पुन्हा नवीन लेख कशाला?
मी त्या स्त्रियांच्या वतीने
पेन साहेब, एक शंका आहे.
सहमत.
नाही आवडलं व्यक्तिचित्र तितकसं!
वाह वाह सुभां अल्ला ! एकदम
>>मीही तसा हरामखोरच.
हेच वाक्य वेगळ्या शब्दात
-१
+१
+१
+ ३
कठिण आहे
बरेच दिवसांनी
ह्म्म
लाडूरावांशी सहमत... बाकी
शाहीन भावली
काय फोटोच चाललंय? तिने
काय फोटोच चाललंय? तिने
मुद्दा वेगळा आहे गं..
त्यातून जमलंच तर आज दुपारी
आयडेंटीटी चे भय
ए तात्या मस्तच......
आवडेल
तात्या स्टाईल मधे
मस्त!
लेख वाचला. लेखकाकडे
सुंदर
उत्तम प्रतिसाद. परवा दुसर्या
अतिशय उत्तम