Skip to main content

शाहीन..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी. "माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन. दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता. मला म्हणाला, " तात्यासाब बैठो व्हीआयपी रूम मे. क्वार्टरवार्टर पियो.. बाद मे बात करेंगे.." 'चला, फुकट क्वार्टर तर मिळाली!' असं म्हणून मी व्ही आय पी रूममध्ये बसलो आणि ब्लॅकलेबलची ऑर्डर दिली. 'चमचम करता..' हे गाणं मोठ्यानं सुरू होतं. माझ्या आजुबाजूला मुलुंड आणि आसपासच्या परिसरातले अमिरजादे गुज्जूभाई बसले होते.. समोर तरण्याताठ्या खुबसुरत पोरी थिरकत होत्या.. माझ्या शेजारीच एक गुज्जू आपल्या पुढ्यात साधारण ५० ते ६० हजार रुपये घेऊन बसला होता. २० च्या, ५० च्या, १०० च्या को-या करकरीत नोटा. उडवत होता भोसडीचा बेभान होऊन समोर नाचत असलेल्या एका पोरीवर. माझा जीव जळत होता.. साला, आयुर्विमा दलालीच्या आशेनं तिथं मी गेलेला.. मुलखाचा गरीब..! त्याच्यासमोर नाचणारी मुलगी मात्र खरंच कुणीही पागल व्हावं अशी होती.. झक्कास ठुमकत होती.. जरा वेळानं मला शेट्टीनं बोलावणं पाठवलं व मी उठून त्याच्या कॅबिन मध्ये गेलो. आम्ही कामाचं बोललो. शेट्टीनं आता खायला मागवलं आणि एका वेटरला म्हणाला, "शाहीन को अंदर भेजो..": ती मगासची त्या आमिरजाद्या म्होरं नाचणारी छोकरी आत आली. क्लासच दिसत होती. " तात्यासाब, ये शाहीन है" "हम्म. तुम्हारा नंबर दो एकदुसरे को. तात्यासाब, ये लडकी का इन्शुरस्न वगैरा करवा दो. मुझे पुछ रही थी. तुम जब टाईम मिले तो तात्यासाबको फोन करना. चलो भागो.." शेट्टीनं तिला पिटाळली.. 'चला, बरं झालं. अजून काही विम्याचा धंदा मिळाला तर बरंच..' असं म्हणून मीही तेथून सटकलो. दोनचार दिवसातच माझा फोन वाजला. शाहीनचा फोन होता. ती ठाण्याच्या घोडबंदर रोडला राहते. जवळच्याच एका हाटेलात चा पिण्याकरता आणि विम्याचं बोलण्याकरता मी शाहीनला भेटायला गेलो.. आम्ही भेटलो. चा सँडविच वगैरे मागवलं. साला बया दिसायला लै भारी होती, आव्हानात्मक होती. चा पिता पिता मी तिला विम्याबद्दल माहिती दिली. सारा तपशील सांगितला. ती तिचा आणि तिच्या बहिणींचा विमा घ्यायला तैय्यार झाली. मी पुढच्या फॉर्म वगैरे भरण्याच्या कारवाईला लागलो..लौकरच ती माझी अशील बनली.. त्यानंतर थोडाबहुत टाईम गेला असेल.. माझा फोन वाजला. शाहीनचा होता..पुढे पिक्चरमध्ये वगैरे घडतं तसं घडणार होतं याची मला कल्पना नव्हती.. "तात्यासेठ, एल आय सी के बारेमे कुछ बात करनी है.. शाम को मिलोगे? आज मेरी छुट्टी है..फलाना जगह रुकना.. मै मिलने आउंगी.." मी ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी तिची वाट पाहात उभा राहिलो.. थोड्याच वेळात एक होन्डा सिटी गाडी माझ्या पुढ्यात थांबली.. मागचं दार उघडलं गेलं.. आत श्वेतवस्त्र परिधान केलेली, केवळ सुरेख दिसणारी शाहीन बसली होती. मी गाडीत दाखल झालो.. "ड्रायवर, चलो, वरली..!" शाहीननं हुकूम सोडला.. साला डान्सबार मध्ये नाचणारी शाहीन ब-यापैकी मालदार होती.. "वरली सीफेस चलेंगे. खानावाना खाएंगे..!" शाहीनंच ठरवलं सगळं.. साला, मी मुलखाचा भिकारचोट.. मुंबैचा बाजार फिरलेला. माझी कशाला ना असणारे? :) हायवेवरून मुलुंड गेलं असेल नसेल, शाहीन मला खेटली. मी समजलो, पोरगी डेंजर वाटते..! थोड्याच वेळात शाहीन साता जन्माची ओळख असल्यासारखी गप्पा मारू लागली. ती चालू वगैरे आहे हा माझा गैरसमज हळूहळू दूर होत होता.. हां, पण चालू नसली तरी बिनधास्त मात्र होती.. फ्री होती. आता चालू आणि बिन्धास्त या शब्दातली सीमारेषा संपादकांनी शोधावी! ;) ती मूळची दिल्लीची.. कनाट प्लेसमधल्या शाळेत काही बुकं शिकलेली. उफराटं रूप.. आली पैका कमवायला मुंबैला.. त्या सुमारास मुंबैत डान्सबार जोरात सुरू होते. शाहीन लौकरच मुंबैचे तोरतरीके शिकली. आयटम बनली.. साला, मोप पैका उडू लागला तिच्यावर.. पोरीचे पाय मुंबैच्या चारआठ बार मध्ये थिरकले आणि पैका जमला. घोडबंदर रोडला तिनं फ्लॅट घेतला, आणि आपल्या आजारी व बेकार असलेल्या वडिलांना, आईला व दोन धाकट्या बहिणींना मुंबैला घेऊन आली.. चार जणांची पोशिंदी बनली..! पुढे ती व मी खूप वेळा भेटलो.. मस्त आहे ती.. अगदी बोलघेवडी.. पण मनानं खूप चांगली.. असाच एकदा तिच्यासोबत वरळी सीफेसवर बसलो होतो. शाहीन तेवढी मूडात नव्हती.. 'उस की मा का..!" शाहीनच्या तोंडात शिवी उमटली.. अहमदाबादचा एक कुणी गुज्जू.. गेले काही दिस मोप पैका उडवत होता तिच्यावर.. आणि दोनच दिसांपूर्वी त्यानं साहजिकच तिला 'बाहर आती है क्या रुममे?" असं विचारलं होतं.. "मग काय चुकलं त्याचं? तुझ्यावर साला तो पैसे उडवतो.. तुला भोगायला मिळावं म्हणूनच ना?" मी. "तो मत उडाए पैसा.. ! मुझे नही जाना है उसके साथ..! साला टिचकी वाजवून मला म्हणतो..'चल किसी होटल के रूम मे.. २५००० फेकुंगा..! भिकारी साला, २५००० मे मुझे खरीदने चला..!" "मग काय तुला २५ लाख हवेत?" आणि एकदम शाहीनच्या चेह-यावर खुलं हसू उमटलं.. "जानू, तू चल ना मेरे साथ.. चल, तेरेको फोकोटमे..!" सुरेखसा डोळा मारला तिनं...! :) आपण साला क्लीन बोल्ड..! मी तिचा 'जानू..' केव्हा झालो?! ;) मीही तसा हरामखोरच. शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..! एके दिवशी शाहीनच्या घरी एक विमापावती देण्याकरता गेलो होतो.. पत्ता होता माझ्याकडे. प्रथमच तिच्या घरी जात होतो.. स्वच्छ, टापटीप आवरलेलं घर.. शाहीनच्या आईनं कोण कुठले विचारलं.. आतल्या खोलीतून शाहीन बाहेर आले.. माझं मनमोकळं स्वागत केलं.. बसा म्हटलं.. "तात्यासाब, अंदर आईये..इधरही बात करते है.." मी आत गेलो आणि जे दृष्य पाहिलं ते पाहून मला भरून आलं खूप.. आपल्या पक्षाघाती अपंग बापाला शाहीन कसलंसं खिमट भरवत होती.. ते भरवता भरवता त्याचाशी आपुलकीनं बोलत होती. मध्येच त्याच्या तोंडातून खिमट बाहेर येत होतं ते पुन्हा चमच्याने नीट त्याला भरवत होती..म्हात-याच्या चेह-यावर फक्त कृतज्ञता होती पोरीबद्दल..! मी ते दृष्य पाहात होतो.. भारावला गेलो होतो.. भक्तिमार्गाचा एक नमुना पाहात होतो..! आणि शाहीनच्या एका अवखळ प्रश्नाने माझी समाधी भंग पावली.. "क्यो तात्यासाब, जमाईराजा बनोगे इस बुढ्ढेके?!" :) शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..! -- तात्या अभ्यंकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45463
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by मुक्तसुनीत

चुम्माचाटीमुळे ओरल हर्पीज सोडता फारसा धोका नसावा. तेवढी रिस्क घेण्यास तात्यांना जड नसावे. त्यांचा गुंतवणुकीचा व्यवसाय त्यापेक्षा कितीतरी जास्त रिस्की आहे, त्यापुढे ही रिस्क काहीच नाही.

In reply to by आमोद शिंदे

घाबरू नका. "फू.." हा आवाज शिवास रीगल (वय १८) कीबोर्डावर शिंतडण्याचा आहे. शिंदे साहेब, मान गये बॉस. अपना तो पुराना याराना होना चाहिये.

त्यांनी देखिल आपले खुमारदार अनुभव मिपावर सगळ्याशी शेअर केले तर खुप आनंद वाटेल. बारबाला व्यवसाय हा अनैतिकच आहे.पण त्याच्यावर ५०/६० हजार उधळणारे ते पैशे काय नैतिक मार्गाने कमवुन आले होते का?माझी जर एपत नसेल तर मी कशाला डान्सबारची पायरी चढु? तात्या डान्सबार मध्ये दारु पियायला गेला होता का बार बालेशी चुम्माचाटी करायला गेला होता.तात्याला त्या बारबालेची जाहिरात करायची होती तर मिपावर तिचा फोटो डकवण्याची जरुरत नव्हती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती जर जाहिरात असेल तर बहुसंख्य मिपाकर डान्सबार मध्ये जाणारे असतील नाही?त्याच्या माहितीकरिता तात्याने हा उद्योग केला आहे काय? चुम्माचाटी शब्द अश्लिल वाटतो तर मागे एका सदस्याने चुंबनावर कविता केली होती त्याचे प्रतिसाद तपासुन पहा.

छान सुरू आहे चर्चा.. :) मुक्तराव,
या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ?
कल्पना नाही..निदान शाहीनशी तरी माझं त्या बाबतीत काही बोलणं झालं नाही..
आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे (सचित्र) वर्णन करण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?
आपखुशीने उतरतात की बळजबरीने याबद्दल वर म्हटल्याप्रमाणे कल्पना नाही.. श्रेयाचं म्हणाल तर तसा काही खुलासा मला करता येणार नाही..शाहीन नावाची एक व्यक्ति माझ्या आयुष्यात आली आणि मी तिच्यावर चार ओळी लिहिल्या इतकंच. याचं मला कुणी श्रेय दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक.. मिपावरचा मी एक कडमड्या लेखक. लिहायचं काम केलं आहे!
चुम्माचाटी इतकी जवळीक प्रस्थापित करण्याच्या आगेमागे वर उल्लेखलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ?
नाही पडले..
पडले नसल्यास का पडले नसावेत
माहीत नाही..
निदान ही व्यक्ती शरीरसुखाचे आदानप्रदान करत असताना काही सुरक्षित साधने वापरते की नाही,
माहीत नाही..
आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्‍याना पडलेले दिसत नाहीत.
नाही पडले.. स्पष्टच शब्दात सांगायचं तर शाहीनसोबत मी असुरक्षित तर सोडाच, परंतु सुरक्षित संभोगही केलेला नाही.. वरवरचे शरीरसुख घेताना मला स्वत:ला सांभाळायची गरज वाटली नाही आणि जेव्हा आवेग अनावार होऊन असुरक्षित किंवा सुरक्षित संभोग करण्याशिवाय पर्याय उरत नाही अश्या क्षणी मी स्वत:ला सांभाळू शकतो, आजवर सांभाळले आहे! (वरील प्रश्नाचं खरं तर मी उत्तर देणार नहतो परंतु माझे हितचिंतक असलेल्या मुक्तरावांनी इतकं स्पष्ट विचारल्यामुळे उतर देणे भाग पडले.. असो.)
पडले असल्यास , असले फालतू - परंतु तरीही मूलभूत - प्रश्न इथे मांडण्याची गरज पडलेली दिसत नाही.
खरं आहे.. लेख लिहिताना तशी गरज वाटली नाही.. (निरोगी) तात्या.

प्रशंसा करणार्‍या, टीकाटिपण्णी करणार्‍या सर्व प्रतिसादींचे आभार..सर्व वाचनमात्रांचेही आभार.. तात्या.

प्रशंसा करणार्‍या, टीकाटिपण्णी करणार्‍या सर्व प्रतिसादींचे आभार..सर्व वाचनमात्रांचेही आभार.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, छान लेख.इतके दिवस मी मि पा वाचनमात्र मोड मध्ये वाचत होते पण खूप दिवसांनी तुझे लिखाण आले प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहावले नाही . ''फोटो लावणे" याव्यतिरिक्त पूर्ण लेख उत्तम. एखाद्याने असेच लिहावे तसेच लिहावे हे इतरांनी सुचवणे गैरच. (त्यापेक्षा सगळे खरे लिहून नंतर दांभिकतेचा आव आणून 'सदर लेखातील व्यक्ती आणि स्थळे यांची नांवे बदलली आहेत' असे लिहिण काहिंना अपेक्षित होतेसे दिसले .बहुदा "होंडा सिटीत ती इतक्या जवळ असुनही कधी आमच्या मनात कुठला वावगा विचार आला नाही" असे लिहिले असते तर "तात्या किती थोर" असे त्यांना वाटले असते. पण तू ह्या फुकटच्या थोरपणाला फाट्यावर मारणारा आहेस हे तुझ्या फॅन्सना माहिती आहे.) बाय द वे, तू इथला मालक होतास त्याचा एकदम कुडमुड्या लेखक कसा झालास हे वाचणे आवडेल.

In reply to by साती

बाय द वे, तू इथला मालक होतास त्याचा एकदम कुडमुड्या लेखक कसा झालास हे वाचणे आवडेल. येस्स, बाय पॉप्युलर डिमांड, येऊ दे एक फर्मास लेख. जो माणूस हिजड्यांसाठी दशग्रंथी ब्राह्मण होऊ शकतो, तो त्याच्या सो-कॉल्ड मित्रांसाठी इन्वेस्टमेंट कन्सल्टंट, किंवा कॅन्सरमुक्ती एनजीओचा प्रमुख कसा झाला, हे तुझ्या फर्मास शैलीत वाचायला आवडेल.

प्रकाटाआ