तात्याचे अजून एक व्यक्तिचित्र. तात्याच्या खास स्वतःच्या शैलीतले. मला व्यक्तिशः या लेखातील काहीच खटकले नाही. अगदी फोटो सुद्धा. अर्थात तो फोटो अनाठायी आहेच. गरज नव्हती. पण टाकल्याने काही बिघडले असेही नाही. त्या स्त्रीची त्याला अजिबात हरकत नाही एवढे पुरेसे असावे.
पण मला हा लेख आवडला नाहीये. तात्याची शैली एक वेगळीच आहे आणि ती इथेही जाणवते आहे. पण तरीही हा लेख पुरेशी उंची गाठत नाहीये. नको तेच सांगायच्या भानगडीत मूळ व्यक्तिरेखा वगैरे थोडी हरवते आहे. म्हणूनच लेखाचा नक्कीच उद्देश काय किंवा लेखकाला नक्की सांगायचे काय याबद्दल वाचकाच्या मनात संदेह उत्पन्न झाला तर दोष वाचकाचा नाही.
तात्या कडून अपेक्षाही फार जास्त आहेत.
सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित सांभाळून घ्यायच्या हे बिपिनदांइतकं कोणालाही उत्तम जमत नाही!
धन्यवाद, यशोताई. हे कॉम्प्लिमेंट असावे असे मी धरून चालतो.
पण तसे नसल्यासही काही हरकत नाही.
खरं तर हा लेख काल रात्री आल्या आल्या मी बघितला आणि वर वर वाचला. अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. पण रात्री उशिर झाला असल्याने, उद्या परत नीट वाचून प्रतिक्रिया द्यावी असे वाटले. त्या प्रमाणे आज वेळ मिळताच तसे केले. जे काही व्यक्त केले आहे ते माझे प्रामाणिक मत आहे याबद्दल शंका नसावी.
मूळात मिपावर आलो तेच तात्याच्या लिखाणाचा शोध घेत (तात्या मायबोलीवरून गायब झाला म्हणून). हे मी आधीही जाहिरपणे आणि खाजगीमधेही बोललो आहेच. त्यामुळे तात्याचे लेखन, शैली वगैरेमुळे आवडते. सालस, रोशनी, संगितविषयक वगैरे लेखन आवडलेलेच आहे. पण हे तितकेसे नाही आवडले, काय करू? एखाद्या माणसाने नेहमीच चांगले वागावे अथवा नेहमीच वाईट वागावे असे नाहीच ना.
बिपिनदा, कॉम्प्लिमेंट्च आहे. मला तिरकस बोलायची सवय नाही. जे काही खरेखुरे आहे,वाटते, मी सांगते. समोर कोण व्यक्ती आहे ते पाहून मी माझे शब्द वा लेखन वा मत बनवत वा बदलत नाही. तेह्वा सरळ मनाने पाहिलेत तर कॉम्प्लिमेंट आहे हे ल़क्षात यावे. एवढा मोठा खुलासा आणि माझे वाक्य कॉम्प्लिमेंट आहे की कसे हा संशय येण्याची शक्यता का?
तरीही सांगते की, माझ्याकडून ही कॉम्प्लिमेंटच आहे. ह्याउप्पर चर्चा करायची असल्यास ख व आहेच. धन्यवाद.
लेख चांगला आहे तात्या. आवडला. अर्थातच रौशनी किंवा तीच्या मुलीवर लिहीलेल्या लेखांएवढा कसदार नाही :) परंतू चालायचंच. सचिन प्रत्येक सामन्यात १०० करत नाही किंवा अब्दुल कादिर ला १९८९ मध्ये जसं तोडलं तसं प्रत्येक सामन्यात परत अब्दुल कादिर ला तोडलं नाही म्हणून काही सचिन ची बॅटींग बघणे मी सोडले नाही :)
[वयाच्या १३ वर्षी 'चक्र' ही दळवींची कादंबरी पचवलेली असल्यामुळे अश्या लेखांची भिती नाही ;) ]
मला एक कळत नाही की काही मंडळींना 'चुम्माचाटी' या शब्दात किंचित आश्चर्य वाटण्याजोगो वा खटकण्याजोगे काय वाटते?
आमच्या मुंबैच्या बोलीभाषेत हा शब्द सर्रास वापरला जातो..
असंख्य मराठी कथा-कादंब-यात तुम्हीआम्ही 'चुंबन' हा शब्द सर्रास वाचला आहे..त्या शब्दाला आता आपण रुळलो आहोत असे समजात सर्वत्र दिसते..
तोच शब्द थोडा फुलवला की चुम्माचाटी हा अंमळ खुमासदार शब्द तयार होतो.. मला व्यक्तिश: त्यात काही गैर वाटत नाही.. अर्थात, ज्यांना हा शब्द खटकला त्यांच्याबदल आदर आहेच..
प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन.. ;)
आपला,
(चुम्माचाटी बहाद्दर) तात्या.
प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन..
"प्रात्यक्षिकाद्वारे" असे श्री. मिसळभोक्ता यांचे अभिप्रेत असावे. चूभूद्याघ्या.
उनके "अभिप्रेत"का ऐसाईच अभी प्रेत हुव्वा देखके श्री. मिभो रोनेको आया होएगा ।
>>>"प्रात्यक्षिकाद्वारे" असे श्री. मिसळभोक्ता यांचे अभिप्रेत असावे. चूभूद्याघ्या.
अरे व्वा...! कोणाला कोणता अर्थ कशाद्वारे अभिप्रेत होतो याचा शोध लावतांना पाहून आनंद वाटला.
>>>प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन..
काही बोललोच नाही. काही लिहिलेच नाही, काही समजावलेच नाही, अशा न बोलल्या गेलेल्या वाक्यांबद्दल, शब्दांबद्दलचा अर्थ आपल्या मि. मित्राला न सांगता समजतो हे तुम्हाला माहित आहे ना ! अर्थात मि.ला काय म्हणायचे आहे हे मला समजले आहे. वो बाते फिर कभी....!
-दिलीप बिरुटे
रोशनी नंतर आलेल्या शाहीनला फारसा उठाव नाही. :) लेख फारसा आवडला नाही कारण तो कसा असणार/ कोणत्या वाटेने जाणार हे अगदी कळून येत आहे. अपंग वडलांना खीमट भरवत होती/ मुलाला पाजायला घेऊन बसली/ की अंथरूणाला खिळलेल्या आईच्या अंगाखालची माखलेली चादर बदलत होती एवढीच वाक्ये बदलायची. बाकी लेख तोच.
मंदाकिनीला भेटलेले दुबईतील आमचे नातेवाईकही ती किती सोज्वळ आणि सात्विक आहे ते खुलवून सांगत असत. बारबाला, नट्या, वेश्या, कॉलगर्ल्स वगैरेंबद्दल असेच सांगण्याची पद्धत असावी का काय असे वाटू लागले आहे. असो.
चुम्माचाटी हा शब्द मुंबईला प्रचलित आहे. शाहीनच्या परवानगीने फोटो लावला असेल तर ठीक वाटते.
काय तात्या (विम्याची) दलाली किती घेतली शाहीन बाईंकडून? :)
अश्या बिनधास्त प्रसंगासाठी चुम्माचाटी हा शब्द तर खासच.
ते खिमट बिमट वगैरेचा शेवट सोडला तर झकास जमलाय लेख. फोटो तर क्लासच!!
लेख वाचून पडलेले काही प्रश्न :
१. या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ? बळजबरीने उतरल्या असल्यास , अशी नेमकी काय समस्या असेल की निव्वळ शरीरविक्रय करूनच - आणि होंडा सिटी गाडी खरेदी करून - सोडवता येईल ? आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे (सचित्र) वर्णन करण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?
२. चुम्माचाटी इतकी जवळीक प्रस्थापित करण्याच्या आगेमागे वर उल्लेखलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ? पडले नसल्यास का पडले नसावेत ?
३. वेश्याव्यवसायामागची मजबूरी किंवा स्वयंनिर्णयाची कारणीमीमांसा सोडा. निदान ही व्यक्ती शरीरसुखाचे आदानप्रदान करत असताना काही सुरक्षित साधने वापरते की नाही, आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्याना पडलेले दिसत नाहीत. पडले असल्यास , असले फालतू - परंतु तरीही मूलभूत - प्रश्न इथे मांडण्याची गरज पडलेली दिसत नाही.
मुक्तसुनीत,
मुद्दा १ विचारात घेण्याजोगा आहे. बार्बालांबाबत फार सहानुभूती बाळगण्याची गरज नाही हे माझे वैयक्तिक मत. बर्याचशा बांग्लादेशी असतात.
मुद्दा ३ मात्र गैरलागू वाटला. तात्यांनी योग्य ती काळजी घेतली असेलच. बाकी त्यांच्या प्रांजळपणाबाबत शंभर पैकी शंभर गुण दिले पाहिजेत. लिखाण नेहमीप्रमाणेच ओघवतं आहे.
आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्याना पडलेले दिसत नाहीत.
-प्रश्न पडले नाहीत हे बरंच आहे. असल्या मूलभूत प्रश्नांचा नको इतका विचार केल्याने वयाची २५ वर्षं उल्टून गेली तरी अजून पर्यंत आम्ही सैपाक करु शकलो नाही आणि पूजाही केली नाही.
- सैपाक,पूजा ई. करण्यास उत्सुक
>>बार्बालांबाबत फार सहानुभूती बाळगण्याची गरज नाही हे माझे वैयक्तिक मत.
सहमत आहे. म्हणूनच तो खिमट वगैरे प्रकार काही आवडला नाही. तो तात्यांनी अॅड केलेला मसालाही असू शकतो. ललित लेखनात काही प्रमाणात साहित्यिक लिबर्टी घेता येते.
चुम्माचाटीमुळे ओरल हर्पीज सोडता फारसा धोका नसावा. तेवढी रिस्क घेण्यास तात्यांना जड नसावे. त्यांचा गुंतवणुकीचा व्यवसाय त्यापेक्षा कितीतरी जास्त रिस्की आहे, त्यापुढे ही रिस्क काहीच नाही.
त्यांनी देखिल आपले खुमारदार अनुभव मिपावर सगळ्याशी शेअर केले तर खुप आनंद वाटेल.
बारबाला व्यवसाय हा अनैतिकच आहे.पण त्याच्यावर ५०/६० हजार उधळणारे ते पैशे काय नैतिक मार्गाने कमवुन आले होते का?माझी जर एपत नसेल तर मी कशाला डान्सबारची पायरी चढु? तात्या डान्सबार मध्ये दारु पियायला गेला होता का बार बालेशी चुम्माचाटी करायला गेला होता.तात्याला त्या बारबालेची जाहिरात करायची होती तर मिपावर तिचा फोटो डकवण्याची जरुरत नव्हती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती जर जाहिरात असेल तर बहुसंख्य मिपाकर डान्सबार मध्ये जाणारे असतील नाही?त्याच्या माहितीकरिता तात्याने हा उद्योग केला आहे काय?
चुम्माचाटी शब्द अश्लिल वाटतो तर मागे एका सदस्याने चुंबनावर कविता केली होती त्याचे प्रतिसाद तपासुन पहा.
या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ?
कल्पना नाही..निदान शाहीनशी तरी माझं त्या बाबतीत काही बोलणं झालं नाही..
आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे (सचित्र) वर्णन करण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?
आपखुशीने उतरतात की बळजबरीने याबद्दल वर म्हटल्याप्रमाणे कल्पना नाही..
श्रेयाचं म्हणाल तर तसा काही खुलासा मला करता येणार नाही..शाहीन नावाची एक व्यक्ति माझ्या आयुष्यात आली आणि मी तिच्यावर चार ओळी लिहिल्या इतकंच. याचं मला कुणी श्रेय दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक.. मिपावरचा मी एक कडमड्या लेखक. लिहायचं काम केलं आहे!
चुम्माचाटी इतकी जवळीक प्रस्थापित करण्याच्या आगेमागे वर उल्लेखलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ?
नाही पडले..
पडले नसल्यास का पडले नसावेत
माहीत नाही..
निदान ही व्यक्ती शरीरसुखाचे आदानप्रदान करत असताना काही सुरक्षित साधने वापरते की नाही,
माहीत नाही..
आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्याना पडलेले दिसत नाहीत.
नाही पडले.. स्पष्टच शब्दात सांगायचं तर शाहीनसोबत मी असुरक्षित तर सोडाच, परंतु सुरक्षित संभोगही केलेला नाही.. वरवरचे शरीरसुख घेताना मला स्वत:ला सांभाळायची गरज वाटली नाही आणि जेव्हा आवेग अनावार होऊन असुरक्षित किंवा सुरक्षित संभोग करण्याशिवाय पर्याय उरत नाही अश्या क्षणी मी स्वत:ला सांभाळू शकतो, आजवर सांभाळले आहे!
(वरील प्रश्नाचं खरं तर मी उत्तर देणार नहतो परंतु माझे हितचिंतक असलेल्या मुक्तरावांनी इतकं स्पष्ट विचारल्यामुळे उतर देणे भाग पडले.. असो.)
पडले असल्यास , असले फालतू - परंतु तरीही मूलभूत - प्रश्न इथे मांडण्याची गरज पडलेली दिसत नाही.
खरं आहे.. लेख लिहिताना तशी गरज वाटली नाही..
(निरोगी) तात्या.
तात्या, छान लेख.इतके दिवस मी मि पा वाचनमात्र मोड मध्ये वाचत होते पण खूप दिवसांनी तुझे लिखाण आले
प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहावले नाही .
''फोटो लावणे" याव्यतिरिक्त पूर्ण लेख उत्तम.
एखाद्याने असेच लिहावे तसेच लिहावे हे इतरांनी सुचवणे गैरच.
(त्यापेक्षा सगळे खरे लिहून नंतर दांभिकतेचा आव आणून 'सदर लेखातील व्यक्ती आणि स्थळे यांची नांवे बदलली आहेत' असे लिहिण काहिंना अपेक्षित होतेसे दिसले
.बहुदा "होंडा सिटीत ती इतक्या जवळ असुनही कधी आमच्या मनात कुठला वावगा विचार आला नाही" असे लिहिले असते तर "तात्या किती थोर" असे त्यांना वाटले असते. पण तू ह्या फुकटच्या थोरपणाला फाट्यावर मारणारा आहेस हे तुझ्या फॅन्सना माहिती आहे.)
बाय द वे, तू इथला मालक होतास त्याचा एकदम कुडमुड्या लेखक कसा झालास हे वाचणे आवडेल.
बाय द वे, तू इथला मालक होतास त्याचा एकदम कुडमुड्या लेखक कसा झालास हे वाचणे आवडेल.
येस्स, बाय पॉप्युलर डिमांड, येऊ दे एक फर्मास लेख.
जो माणूस हिजड्यांसाठी दशग्रंथी ब्राह्मण होऊ शकतो, तो त्याच्या सो-कॉल्ड मित्रांसाठी इन्वेस्टमेंट कन्सल्टंट, किंवा कॅन्सरमुक्ती एनजीओचा प्रमुख कसा झाला, हे तुझ्या फर्मास शैलीत वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
सुरेख, छान लिहले आहे, तात्या
तात्याचे अजून एक
सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित
सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित
बिपिनदा, कॉम्प्लिमेंट्च आहे.
यशोधरा ह्यांच्याशी सहमत.
लेख
मस्त
चुम्माचाटी
मला एक कळत नाही की काही
प्रात्यक्षिक चूभूद्याघ्या
अरे वा...! छान...! सुंदर....!
प्राडॉ
ठीक
काय तात्या (विम्याची) दलाली
प्रश्न
मुक्तसुनीत, मुद्दा १ विचारात
>>बार्बालांबाबत फार सहानुभूती
सदर स्त्री शरीरविक्रय करतेय
शरीरविक्रय
चुम्माचाटीमुळे ओरल हर्पीज
फू...
आमोद शिंदेना बारबालाच्या व्यवसायाबद्दल खुपच माहिती दिसते.
छान सुरू आहे चर्चा..
वा! तात्या! आवडलं. सगळे चेंडू
प्रशंसा करणार्या,
प्रशंसा करणार्या,
उगीचच!
येस्स....
थोडा अवधी लागू शकेल, पण नक्की
.