प्रिय राहुल देशपांडे,
(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,
मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.
तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.
अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..
पण.......
दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?
मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..
सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!
मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!
राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?
अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?
कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!
मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)
अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?
तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?
अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!
दोन सूर धडपणे गाता आले नाही तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!
तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!
असो..
जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!
तुझा,
तात्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
15910
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाउद्यात , माफ करून
>>अरे ती स्पर्धा म्हणजे
अशा कार्यक्रमात परीक्षकाचे
In reply to >>अरे ती स्पर्धा म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
परंतु माझ्या आठवणीप्रमाणे
In reply to अशा कार्यक्रमात परीक्षकाचे by विसोबा खेचर
विनोद बघा. कुणीही बटन दाबून
In reply to >>अरे ती स्पर्धा म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
दोष देऊ नये असे वाटते.
काही मुद्द्यांशी सहमत नसलो
In reply to दोष देऊ नये असे वाटते. by इन्द्र्राज पवार
तात्याशी तत्वतः सहमत. राहुल
पण झी सारेगम सारख्या आता
In reply to तात्याशी तत्वतः सहमत. राहुल by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to तात्याशी तत्वतः सहमत. राहुल by बिपिन कार्यकर्ते
अंशतः सहमत
In reply to सहमत by स्वाती दिनेश
प्रसिद्धी आणि पैसा महत्वाचा
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुळात दोन्ही बाजूंची बोलणी
In reply to प्रसिद्धी आणि पैसा महत्वाचा by बिपिन कार्यकर्ते
राहूलसाठी योग्य मानधन आणि
In reply to मुळात दोन्ही बाजूंची बोलणी by ३_१४ विक्षिप्त अदिती
जुने मालक, हे पत्र तुम्ही खरच
भापो
प्रिय तात्या अभ्यंकर,
आणि शेवटच्या फेरीत तर
In reply to प्रिय तात्या अभ्यंकर, by आपला अभिजित
यंव रे गब्रु!!! आम्हाला जर
In reply to प्रिय तात्या अभ्यंकर, by आपला अभिजित
आणि आम्हाला जर गाता आले
In reply to यंव रे गब्रु!!! आम्हाला जर by बिपिन कार्यकर्ते
अनूमोदन.
In reply to आणि आम्हाला जर गाता आले by परिकथेतील राजकुमार
आज राहूलसारखी तरूण मंडळी
(प्रिय तात्या)
आणि चमत्कार दाखवत नसल्याने
In reply to (प्रिय तात्या) by विकास
पत्र आवडले. राहुल देशपांडे
मला जे म्हणायचयं ते आपल्या
राहूलने मुकुलजींकडे ही धडे
बाकी, काही लोक प्रतिक्रिया
In reply to राहूलने मुकुलजींकडे ही धडे by भारी समर्थ
राहूलने रुपये ७५०* ची वगैरे
बर्याच प्रसिद्ध कलावंताचे
व्यवहाराची गणितं वेगळी असतात
पत्र चांगले .. मात्र
सहमत
In reply to पत्र चांगले .. मात्र by ऋषिकेश
सुनीता देशपांडे यांचे मत
In reply to सहमत by विकास
असावं...
In reply to सुनीता देशपांडे यांचे मत by इन्द्र्राज पवार
सहमत आहे
In reply to पत्र चांगले .. मात्र by ऋषिकेश
एकदम जबरा ! तात्यांचे सर्व
रफी आणि किशोर
In reply to एकदम जबरा ! तात्यांचे सर्व by माझीही शॅम्पेन
बेसनलाडुंशी काहीसा
In reply to रफी आणि किशोर by बेसनलाडू
म्हणूनच
In reply to बेसनलाडुंशी काहीसा by अनाम
तात्याराव...
श्री राहुल देशपांडें यांचे काही चुकले असे वाटत नाही.
दिदी- शास्त्रीय संगीत
In reply to श्री राहुल देशपांडें यांचे काही चुकले असे वाटत नाही. by निरन्जन वहालेकर
आपापले विचार कळवणा-या सर्व
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो
बाकी काही नाही पण तात्या लिहायला लागला ह्याचा आनंद झाला.
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा
In reply to बाकी काही नाही पण तात्या लिहायला लागला ह्याचा आनंद झाला. by वेताळ
तात्या, आपल्या एक लक्षात आले
म्हणून मी ह्या स्पर्धाच पाहात नाही..
तुम्हीच मागे सांगितलेला
In reply to म्हणून मी ह्या स्पर्धाच पाहात नाही.. by डॉ.प्रसाद दाढे
मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धा आणि महेन्द्र कपूर
In reply to म्हणून मी ह्या स्पर्धाच पाहात नाही.. by डॉ.प्रसाद दाढे
प्रतिसाद