Skip to main content

भगवान श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य?

लेखक सहज यांनी सोमवार, 30/08/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला. डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे. हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात. ३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट

Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.

जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!

वाचने 62892
प्रतिक्रिया 201

प्रतिक्रिया

"हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कॄष्ण हरे कॄष्ण कॄष्ण कॄष्ण हरे हरे". या धाग्यात खगोल प्रेमी मंडळी आपली काही मते सांगु शकतील काय ? :) झानेश्वरांची समाधी ही संजीवन समाधी आहे. नरसोबाच्या वाडीला सुद्धा अशाच दोन योगी पुरुषांच्या जिवंत समाध्या आहेत्,त्या म्हणजे श्री रामचंद्र योगी आणि श्री गोपाळ स्वामी. (ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी वरुन हे आठवले मला.) जाता जाता माझे आवडते भजन... :) http://www.youtube.com/watch?v=Dq0n6XKtPLI

सरस्वती फिल्मस सादर करत आहेत "भगवान कृष्ण इतिहास की .... " ओमSSSS अशी सुरूवात पाहिल्यावरच गंमत वाटली.. म्हणजे यांना अशी काही documentary बनवायची असली तरी देवाचे आशिर्वाद लागतात..यातच उत्तर मिळाले..

नान्या, पुप्या, पर्‍या, टिंग्या वगैरे मिपावरील अडगळ आहे नान्या, पुप्या, पर्‍या, टिंग्या वगैरे मिपावरील समृद्ध अडगळ आहे

आता श्रीक्रूष्णाच्या होउन जाण्या न जाण्यावर शंका घेतायेत. त्यात विशेष असे काहीच नाही. हे कलीयुग आहे. मानवाची बुद्धी "त्याचं" अस्तित्व नाकारण्याकडे प्रव्रुत्त होणे ही नियती आहे. हे चार युगांचे चक्र आहे. त्या त्या युगात ते ते घडणारचं! शेवटी ही सर्व त्या जगन्नियन्त्याची "माया" आहे. "वसुदेवसूतं देवं कंसचाणूरमर्दनं I देवकीपरमानन्दं क्रूष्णं वंदे जगद् गुरुमII

जुन्या काळात एखादा राजा होऊन गेला ह्याचा ठोस (फिजिकल) पुरावा म्हणजे नाणी, शिलालेख, कागदपत्रे, भूर्जपत्रे. श्रीकृष्णाचे अस्तित्व दाखवणारे असे काही पुरावे का नाही मिळाले आजपर्यंत? खापरे, गाडगी, मडकी असेही पुरावे शोधता येतील. आजही उत्तम कादंबर्‍यांमधे स्थळांचे, त्या काळातील घटनांचे अचूक वर्णन असते पण मूळ कादंबरी कल्पित असते. जसे दा विंची कोड ह्यात अगदी आज अस्तित्त्वात असणार्‍या जागा जसे पॅरीस, तिथले म्युझियम वगैरे वर्णन केले आहे पण म्हणून ती कादंबरी इतिहास होऊ शकत नाही. निव्वळ खगोलशास्त्रीय घटना अचूकपणे वर्णन केल्या असतील, जागांची नावे अचूक असतील तर लिहिणार्‍याचा त्याविषयी अभ्यास उत्तम आहे असे म्हणू. पण त्याने तो इतिहास ठरतो का? नाही. शिवाजी, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्याशी संबंधित कागदपत्रे, नाणी, शिलालेख असे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे महाभारताची सत्यता पडताळून बघणे म्हणजे अधर्म आहे असे मानू नये. जर सत्य नसले तर ते एक उत्तम महाकाव्य आहे आणि ते शतकानुशतके भारतीय लोकांच्या हृदयात विराजमान आहे ह्यात शंका नाही. अर्थात मला स्वतःला कृष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे लवकर मिळावेत आणि तो खरोखरचा महापुरुष होता असे सिद्ध व्हावे असेच वाटते. पण पुरावे मिळेपर्यंत मी तसे मानणार नाही. हे खूप खूप पूर्वी घडले म्हणून त्याचे पुरावे मिळत नाहीत असेही सांगितले जाते. पण डायनोसॉर्स आणि तत्सम अश्मयुगीन जीव, भूगर्भातल्या घटना ह्या नि:संशय महाभारतापेक्षा जुन्या घटना आहेत आणि त्यांचे पुरावे आजही सापडत आहेत.

मी इतिहासाचा तज्ञ नाही. फक्त त्या व्हिडिओत काय दिलं आहे, त्याविषयी मला काय वाटतं हे लिहितो आहे. व्हिडिओ बघितला. पहिली बारा ते पंधरा मिनिटं कृष्णा कॉन्शसनेसवाले कृष्णाविषयी सांगतात. हा भाग पाश्चात्यांसाठी तयार केलेला दिसतो. टाळ्य आहे. इतिहासकारांच्या, व संशोधकांच्या साउंडबायटी आहेत, मध्ये मध्ये उगाच आय कॅंडी म्हणून नाच, मंत्र वगैरे टाकलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग शेवटी आहे - त्यात एक खगोलशास्त्रज्ञ ग्रहगोलांच्या स्थितीवरून तारीख ठरवतो. त्यात निवेदकाचा 'शनिच्या भ्रमणावरून युद्धं प्रेडिक्ट केली जाऊ शकतात' वगैरे भंपकपणा आल्यावर पुढे जाववेना, पण तरी बघितला व्हिडिओ... मुळात कृष्ण नावाची व्यक्ती होती की नाही हा प्रश्न नसून लोक कृष्णाने केलेल्या ज्या ज्या गोष्टींविषयी विश्वास ठेवतात त्या प्रत्यक्ष एकाच व्यक्तीने केल्या की नाही हा आहे. महत्त्वाच्या प्रश्नाला ही डॉक्युमेंटरी स्पर्शही करत नाही. केवळ कृष्ण नावाचं कोणी होऊन गेलं की नाही यावरच (काहीसा भोंगळ) ऊहापोह करते. व्हिडिओचं सार खालीलप्रमाणे. महाभारत झालं, महाभारतात कृष्णाचा उल्लेख आहे म्हणून कृष्ण अस्तित्वात होता. -सरस्वती होती यावरून सिद्ध होतं की महाभारत घडलं -कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काही हाडं सापडली. -ग्रहांच्या परिस्थितीवरून सुमारे 3000 बीसी मध्ये ते घडलं असं एक खगोलशास्त्रज्ञ सांगतो. -लिव्हिंग ट्रॅडिशन हा शब्द इतक्या वेळा वापरलेला आहे... की त्यातून लोकांचा विश्वास आहे म्हणून कृष्ण अस्तित्वात असावा असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतर पुरावे -150 बीसीला कृष्णाचा शिक्का आहे यावरून कृष्ण नावाची कोणीतरी देवसदृश प्रतिमा अस्तित्वात होती हे सिद्ध होतं. -द्वारकेच्या जागी पाण्याखाली गेलेलं एक शहर सापडलं. नदी आहे म्हणून महाभारत घडलं हा संबंध कळला नाही. तसंच हाडं योद्ध्यांची असू शकतील अशा तर्कापलिकडे काहीच नाही. ती नसूही शकतील. जय मध्ये सांगितलेलं युदध् घडलं असावं हा तर्क मान्य करायला काहीच हरकत नाही. ते ज्याकाळी झालं त्याकाळी कृष्ण नावाचं कोणीतरी होतं यात विशेष काय सांगितलं आहे ते कळलं नाही. पण महाभारतातल्या कृष्णानेच गीता सांगितली असंही सिद्ध होत नाही. हे म्हणजे कोणीतरी घाशीराम कोतवाल नाटकाची मूळ प्रत काही हजार वर्षांनी शोधून नाना फडणवीस होता व तो बाईलवेडा होता असं सिद्ध करण्यासारखं आहे. महाभारताच्या श्लोकांच्या आधारावरून एक्झॅक्ट आकाश त्यावेळचं उभं करणं, त्यावरून तारखा काढणं हे कितपत रास्त आहे कळत नाही. मुळात तो इतिहास व काव्य याचं मिश्रण आहे. त्यातली वर्णनं कुठच्यातरी एका वर्षाला लागू होतात यावरून काहीच सिद्ध होत नाही. मुळात कथेतलं एक कॅरेक्टर दुसऱ्याला त्या त्या ग्रहीय घटना दुश्चिह्न म्हणून सांगतो. त्यावेळी दुश्चिह्न म्हणून मान्यता पावलेलं काहीही सांगेल. मग ती वर्णनं खरी आहेत (कविकल्पना नाही) हे गृहित धरून ते घडलेलं वर्ष शोधायचं आणि त्यावरून मुळातलं गृहितक सत्य ठरल्याचं सिद्ध करणं हे चक्रीय तर्कट (सर्क्युलर लॉजिक) आहे.

इसवी सनाच्या पाचव्या शतकात जगाची लोकसंख्या १७ कोटी होती फक्त ! संशोधक म्हणतात महाभारत इसवी सनाच्या ५५०० वर्षांपूर्वी होवून गेले आणि महाभारताचे जाणकार सांगतात कि ४० लाख योध्ये या युद्धात मारले गेले म्हणे :) कसं शक्य आहे हे, ज्ञात इतिहासानुसार सर्वात मोठा सैन्य हे चंद्रगुप्त याचं होता (सुमारे १० लाख ) आणि त्यानंतर आपल्या लाडक्या औरंगजेबाच :D (९ लाख ) ,शेवटी महाभारत एक पुराण आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट फुगवून सांगितली गेलीये ,त्यामुळे यातून इतिहास बाजूला काढणे बरेच अवघड आहे असे वाटते !

In reply to by मालोजीराव

१६६ कोटी २० हजार लोक त्या युद्धात मेले आणि साधारण २२५००० जिवंत उरले असा उल्लेख आहे महाभारतात. :)

कृष्णाजीपंत खरंच होते की नाही माहित नाही, जाणून घ्यायची गरजही नाही. त्यांच्या छान छान गोष्टी ऐकत लहानाच मोठा झालो. कळत न कळत, त्या गोष्टींमधून शिकत गेलो. त्यांच्या नावावर लागलेली भगवद्गीता वाचली. फर थोडी कळली, त्याहूनही फार कमी आचरणात आणता आली, पण जेवढी आचरणात आणता आली त्याचाच खूप फायदा झाला. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे हे नक्की. त्यावरच सध्या फोकस करतोय. त्यामुळे ते खरंच होते की नव्हते वगैरेने काहीही फरक पडत नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

म्हणुनच बिपीनदा (काहि बाबतीत मतभेत असुन सुद्धा)आपण तुमचे फॅन आहोत (बिका साहित्य प्रेमि) अर्धवटराव

In reply to by बिपिन कार्यकर्ते

खरे बोललात बिपीनदा !! (सर्वात पहिले ईथे एक लाबंलचक आळस देणारी स्मायली कल्पावी.) लैच कंटाळा आला आता !! कोणीतरी 'क्ष' व्यक्तीने 'वाय' पुस्तकात अनंत काळ आधी लिहुन ठेवले आणी म्हणुन मी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवुन त्या व्यक्तीला देवत्व देणार नाही,पण ह्याचा अर्थ असा नाही मी ते कधीही आचरणात आणणार नाही वा दुसर्‍याला हे सांगत बसेन की बाबा तु ही तसेच कर,जर त्याचा विश्वास आहे (भले तो श्रध्दा असो वा अंधश्रध्दा असो),तर त्याला बदलायला सांगुन काय फायदा ? धर्म आणी शास्त्र ह्यांची योग्य ती सांगड घातली पाहिजे धर्म हेच शास्त्र म्हटल्याने जसा अतिरेक होतो तसाच शास्त्र हाच धर्म म्हटल्याने होतोच की मला सर्वच धर्मातल काही-काही गोष्टी भावतात.ईस्लामध्ये नशाखोरीला हराम म्हणण किंवा बौध्द धम्मा मघील अष्टांग मार्ग, तसच गीतेतलही काही-काही भावतं(मग त्याच्यामुळे आख्ख्या महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथाला मी 'महान' म्हणणार नाही, पण म्हणुन फडतुस ही म्हणणार नाही.). आता गोष्ट येते पुराव्यांची... आईने सांगीतले की हा तुझा बाप ? ह्यावर आपण विश्वास ठेवतोच ना की लगेच डिएनए टेस्ट मागतो आणी जरी डिएनए टेस्ट घेतली तर तो बाप आहे की काका हे कस ठरविणार ?विश्वासाच ही तसच आहे तो आपोआप निर्माण होतो, श्रध्दाभावाची ही ऊत्पती तशीच आहे.मानवी स्वभाव आहे तो.माझा एक मुस्लीम मित्र दरवर्षी 'नवरात्र' एकदम कडक पाळतो. बघा,तो मुस्लीम असुन पाळतो आणी मी हिंदु असनही त्याच्या ईतकी कडक पाळु शकत नाही,शेवटी हा भाग आहे ज्याच्या त्याच्या विश्वासाचा राहिली गोष्ट ह्यावरील चर्चेची(खर तर मुळात ज्या दिशेने चर्चा गेली हाच एक खुप मोठा जोक आहे). चर्चेत काही लोंकानी दांडियाच्या वेळी होणार्‍या र्‍हासाचे ऊदाहरण दिले आहे, मान्य आहे सत्य आहे,पण दोस्तांनो, कधी आस्था वगैरै चॅनेलवर पण बघा.तल्लीन झालेली तरुणाई तिथेही दिसेल आपल्याला.प्रमाण कमी असेल एक वेळ पण श्रध्दावान आहेतच की ते ही एक सत्य आपण नाकारू शकत नाही. सणावाराबद्दल !! मालक ,एकमेव हिन्दु राष्ट्र आहे हे.त्यातील लोक्स कित्येक प्रथा बाळ्गुन आहेत,रहातील मुळात सणावाराच्या निमीत्ताने लोक एकत्र येणाल्या विरोध का असावा मला हेच कळत नाही, हल्ली प्रथा पाळताना अतिरेक होतोय हेही खरच पण सगळ्याच ठिकाणी होत नाही. बाकी असल्या चर्चेसाठी केवळ अंगाने भारतात रहाणार्‍या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !! (च्यायला ? टंकलच का शेवटी !! हातोंकी खुजली बातोसें नही जाती )

In reply to by सुहास..

केवळ अंगाने भारतात रहाणार्‍या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !! हांग आशी ! म्हणुनच आम्हाला सुहासचा प्रतिसाद नेहमी आवडतो. सुहास आमचा किस्ना आहे..

In reply to by अवलिया

केवळ अंगाने भारतात रहाणार्‍या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !!
भिड!! सौ सुनार की एक लोहार की :) माणसाने अश्रद्ध असणे, नास्तिक असणे अथवा देवाच्या अस्तित्वाचे संयमीत भाषेत पुरावे मागणे ह्या कुठल्याही गोष्टीला आक्षेप नाही किंवा नास्तिक लोकांविषयी राग देखील नाही. मात्र स्वतःला नास्तिक अथवा अश्रद्ध दाखवण्यासाठी राम लक्ष्मणांसारख्यावर जेंव्हा अत्यंत खालच्या भाषेत चिखल उडवला जातो तेंव्हा अशा लोकांची किव मात्र जरुर येते :) इच्छा नसताना देखील कधी कधी मग अशा लोकांची तुलना ब्रिगेडींशी करायचा ओह आवरत नाही. अर्थात मिपावर सर्वच ह्या शब्दात आपल्या प्रतिक्रीया नोंदवणारे नाहीत ह्याची जाणीव आहेच. क्लिंटन अथव अदिती ज्या शब्दात आणि संयमाने वाद घालतात त्याचा तरी निदान इतर चिखल उडव्यांनी अभ्यास करावा असे वाटते. असो.. शेवटी ज्याची त्याची जाण समज...

In reply to by सुहास..

तर त्याला बदलायला सांगुन काय फायदा ?
एखाद्याचे मत चुकीचे असेल असे वाटत असेल तर ते तसे आहे असे सांगण्यात काय तोटा? विचारांचा देवाण्घेवाण हे संस्थळाचे उद्दिष्ट नाहीए का?
तर त्याला बदलायला सांगुन काय फायदा ?
दोन भावांचा डीएनए सारखा असतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तसे असेल तर ते (काची स्पेशल केसेस सोडुन) चुक आहे.
केवळ अंगाने भारतात रहाणार्‍या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !!
अनेक रिकामटेकड्या धर्ममार्तंडांनी इंटरनेटावर माजवलेले धर्माचे स्तोम पाहता हा मुर्खपणा थांबवणे कीती महत्त्वाचे आहे हे सुज्ञास सांगावे लागु नये. बाकी आपण चुक असु शकतो हे ज्यांना मान्यच नाही ते दुसर्‍याचे रिकामटेकडे पण वगैरे मुद्देच काढत बसणार, स्वतः असल्या भाषेत प्रतिसाद लिहणार आणि विरोधकांनी त्याच भाषेत उत्तरे दिली की "चिखलफेकेचे आरोप" करत रडत बसणार हे काही नवे नाही.

In reply to by Nile

अनेक रिकामटेकड्या धर्ममार्तंडांनी इंटरनेटावर माजवलेले धर्माचे स्तोम पाहता हा मुर्खपणा थांबवणे कीती महत्त्वाचे आहे हे सुज्ञास सांगावे लागु नये. बाकी आपण चुक असु शकतो हे ज्यांना मान्यच नाही ते दुसर्‍याचे रिकामटेकडे पण वगैरे मुद्देच काढत बसणार,
नाईलशी त्रिवार सहमत. (काय साला दिवस आलेत, छ्या: !!! ;) ) ... कोणी हिंदू, कोणी बुद्धिवादी... पण वरचे वाक्य अगदी जेनेरिक का काय म्हणतात तसे असल्याने धर्म कोणताही असो, लागू पडतेच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पण वरचे वाक्य अगदी जेनेरिक का काय म्हणतात तसे असल्याने धर्म कोणताही असो, लागू पडतेच.
वरचे कुठले वाक्य? उद्धरणात दोन वाक्ये आहेत. :-) दुसरे वाक्य बुद्धीवादीला लागु पडत नाही, सेल्फ काँन्ट्राडिक्शन आहे. :-)
काय साला दिवस आलेत, छ्या: !!!
ज्याची त्याची.... नाडी हो! दुसरं काय? ;-)

In reply to by Nile

जेनेटीक पॅटर्न सारखा असतो. आणि सारखे पॅटर्न असलेल्या २ भावांपासून एका बाईला २ मुले झाली तर कोणाची कशी ही नेमकी कशी ओळखायची? आणि पुढे जाऊन दिलेला डीएनएचाचणीचा पुरावा हा देखील तुम्हाला पाहीजे तसा तुम्ही मिळवलात असे सागून त्याज्य ठरवता येतो. त्यामुळे त्या बाबतीत आईवर विश्वास ठेवावाच लागतो. बाकी जेनेटीक सिमिलॅरीटी बद्दल अधिक इथे वाचता येईल.

In reply to by सुहास..

यावरून एंजल्स एंड डेमोंस चित्रपटाची आठवण झाली. dan ब्राऊन याने पण यात धर्म विरूध्द शास्त्र अशीच संकल्पना मांडली होती . त्याच्या यापूर्वीच्या पुस्तकाने (आणि त्यावर निघालेल्या चित्रपटानेही) 'डा विन्ची कोड ' ने तर युरोपा मध्ये चांगलाच गदारोळ उठवला होता. जवळपास येशू बद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला. आता हा कृष्णाचा विडीयो रिलीस करणाऱ्या महाशयांचा काय 'मराठी dan Brown' म्हणायचं का ?

पाण्याखाली गेलेलं शहर सापडल्याचे मी आधीही discovery वर पाहिलं होतं...त्याने कदाचित द्वारका होती हे सिद्ध होईल...माझ्या मते कृष्ण वगैरे योद्धे होऊन गेले असावेत... बाकी चमत्कार वगैरे म्हणजे काही योगायोगाच्या घटना फुगवून अथवा काल्पनिक तयार करून महाकाव्यात त्या व्यक्तीला भारदस्तपणा येण्यासाठी घातल्या असाव्यात, जसे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली वगैरे....आता असे काही चमत्कार लिहिल्याने ज्ञानेश्वर झालेच नाही अन ते काल्पनिक होते असे म्हणण्यासारखे आहे. केवळ एका महाकाव्यात लिहिले आहे म्हणून इतके हजारो वर्षे एखाद्याची "देव" म्हणून पूजा करण्याइतके लोक मूर्ख नाहीत... राहिली गीता...त्यातील अर्थ समजावून घेऊन जमेल तेवढा चांगलेपणा ठेवावा...आपण काही देव नाही...

काही गोष्टींवर , कठोर बुद्धीवाद बाजूला ठेवून फक्त विश्वास ठेवावा (असं मला वाटतं) ... उदा. रामायण , महाभारत इ. कारण यात एका आदर्श जीवन पद्ध्तीची कथा सांगीतलेली आहे .. (कदाचित ती काल्पनिक ही असेल). सगळे आदर्श प्रत्येकाला अत्मसात करता येत नाहीत .. पण त्याचं अनुसरण करता येतं/ तसा प्रयत्न करता येतो. "वास्तव रामायण" मधे वर्तकांनी रामायणाची कालनिश्चिती करण्यासाठी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती ग्राह्य धरली आहे ...या माहीतीपटात सुद्धा त्या बद्द्ल थोडी माहीती आहे ... पण त्या मुळे फक्त या कथेची कालनिश्चिती होते. महाभारतकार व्यास महर्षी हे विद्वान होते , त्यांना हे ज्ञान असणारच , त्याचा उपयोग त्यांनी आपल्या कथालेखनात केला असण्याची शक्यता आहे. यात ग्रीक भारतात आल्यानंतर भारताला लेखन कला अवगत झाली असा एक उल्लेख आहे .. पण महाभारत व्यासांनी सांगीतले आणि गणपतीने लिहून घेतले असे आपण मानतो . या माहितीपटात श्रीकृष्ण हा सर्वोत्तम देव होता - (अगदी येशु पेक्षाही श्रेष्ठ - येशु हा देवाचा पुत्र आहे, आणि तो देव म्हणजे कृष्ण असे काही भक्तांनी सांगीतले आहे . (याला काय आधार आहे माहीत नाही ) ) हेच सत्य अधोरेखीत केले आहे . आणि ते तर आम्हाला मान्य आहेच.

In reply to by मनीषा

उदा. रामायण , महाभारत इ. कारण यात एका आदर्श जीवन पद्ध्तीची कथा सांगीतलेली आहे ..
असहमत. लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष सोडून देणं, सीतेवर अविश्वास इ.इ. गोष्टी आदर्श? मुळात रामाने सीतास्वयंवरातच फाऊल केला होता. धनुष्याला दोरी लावायची तर धनुष्य मोडून त्याने जनकालाच शेंडी लावली. द्रौपदीच्या इच्छेविरूद्ध तिला पाच लोकांशी लग्नं करायला लावायचं, तेही वस्तू समजून, लाक्षागृहात ६ लोकांना जिवंत जाळणं, इ.इ. कोणत्या न्यायाने आदर्श? रामायण, महाभारतामधले खगोलीय संदर्भ उचलून ते लिहीले कधी यांचा काल निश्चित करता येईल. (कसा ते मला विचारू नये.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजकारण करुन शत्रुला नमवणे? कर्ण वगैरे प्रकरणं म्हणजे आदर्श जीवनपद्धती का? मला तर बॉलीवुडच्या सिनेमात कसं, आधी सगळं बेस असतं, मग ग्रह फिरतात, तेव्हा दुबला पतला हिरो असतो, व्हिलन एकदम पावरफुल असतात, मंग तो बाय हुक ऑर बाय क्रुक एकेक कर व्हिलनला हरवत जातो वगैरे वगैरे शी फारच साधर्म्य वाटतं ब्वॉ!

In reply to by Nile

द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे , महाभारत व रामायणातील अश्या वादग्रस्त प्रसंगांचे कायम कूतूहल वाटत आले आहे. 'शी बै अच्रट'वाल्या समाजाने हे सगळे कसे काय चालवून घेतले जर ही कथा कादंबरी आहे तर. वाचकांची पत्रेमधे भडीमार करुन प्रकाशकांना आवृत्ती बदलायला लावणे पासुन, प्रकाशकाचे दुकान जाळणे, राजद्रोहाखाली खटला भरणे इ उपाय केले नसतील आपल्या पब्लीकने? त्यामुळे ही कादंबरी नसुन खरेच असले पाहीजे असे वाटते. कारण खर्‍या आयुष्यात काय वाट्टेल ते होते. छापील, वाचनीय गोष्टीत कोणी कोणाचे वाट्टेल ते म्हणणे खपवुन घेते का?

In reply to by सहज

अन वाट्टेल ते करणार्‍या लोकांना तुम्ही बरे सर्वश्रेष्ठ देव म्हणता हो सहज काका! अहो वाट्टेल ते करणारे खरे असतीलही, त्यांनी वाट्टेल ते केले असेलही, पण मग देवत्व कसं आलं ते सांगा पाहु. कालच्या कालवणाला दिली फोडणी, घातलं पाणी अन केली पातळ अन वाढली पुढे, असे रोज करीत राहलांत तर आठवड्याने काय उरेल?

In reply to by शिल्पा ब

म्हणजे आजचे कसाब, मनू शर्मा, छोटा राजन, इ. इ. उद्याचे देव का? बरं त्या शूर्पणखेशी आधी नस्ते विनोद करणारा आणि नंतर तिला विद्रूप करणारा राम आदर्श कसा काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याला वाटले तो विनोद करतोय...afterall he is (was ) a man ... इतर शंकांचे समाधान मला जमणार नाही...एकतर हे लोक मुसलमान..पुढचे लिहिणेच खुंटले..(तरी किती मुसलमान त्यांना देव मानतील हे त्यांचा अल्लाच जाने )

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आजचे कसाब मनु शर्मा इत्यादी प्रभुती आजच्या समाजाच्या निकषांवर देखील गुन्हेगार आहेत. पण राम कृष्ण यांचे तसे नव्हते. त्यांनी जे काही केले ते सगळे योग्यच केले असे नाही. पण अयोग्य किंवा न पटणारी कृत्ये खुप कमी आहेत आणि बाकीचे कार्य खुप महान आहे. त्यामुळे ते देव.

In reply to by मृत्युन्जय

अयोग्य किंवा न पटणारी कृत्ये खुप कमी आहेत
पण आहेत. म्हणजे देवही स्खलनशील असतात तर! मग देव म्हणून त्यांचं वेगळेपण काय? ही पण माणसंच होती का नाही? या हिशोबात अब्दुल कलामांना किंवा शिवाजी महाराजांनाही देव मानलं पाहिजे!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>अब्दुल कलामांना किंवा शिवाजी महाराजांनाही देव मानलं पाहिजे! आम्ही मानतोच. नक्कीच मानतो. शिवाजीला आम्ही रुद्राचा अवतार मानतो... तुम्ही चांगले काम करा तुम्हाला पण मानु,... अजुन काही ?

In reply to by अवलिया

प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये; तुम्ही मानता पण इतर बरेच मानत नाहीत म्हणून तुम्ही तुमचा कल्ट सुरू करणार का? मुळात छाटछूट का होईना, चुका करणार्‍यांना विशेष स्टेटस का??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण ते छाट्छूट चुका करतात आणि त्यांच्या चुका देखील उदात्त कारणासाठी असतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>मुळात छाटछूट का होईना, चुका करणार्‍यांना विशेष स्टेटस का?? आमची मर्जी. चुक काय बरोबर काय... रामायण, महाभारत मुळातुन ज्याने वाचलेले असते त्याला हे प्रश्न पडतच नाही. सर्व नीट व्यवस्थित समोर येतं. असो.

In reply to by अवलिया

आम्ही मानतोच. नक्कीच मानतो. शिवाजीला आम्ही रुद्राचा अवतार मानतो...
व्हेरी गुड. असे असेल तर मग ठिक. मुळात देव म्हणजे सामन्य माणसापेक्षा थोडेसे सरस अशी तुमची व्याख्या असेल तर आमची काहीच हरकत नाही. बाकी ते जर कुठल्या वाराचे उपास करत असाल तर शिवाजी अन कलामांचे वार पण ठरवुन टाका पाहु. तिर्थयात्रेला जात असाल न पुरंदरावर किंवा राष्ट्रपती भवनात? (रामेश्वरला कलामांच्या घरी सुद्धा जायला हरकत नाही म्हणा!) त्याशिवाय, सत्यनारायणासारख्या पुजा पण घाला दोघांच्या नावाने. आणि देवघरात दोघांच्याही मुर्तींची पुजा करत असालच.

In reply to by Nile

>>>>व्हेरी गुड. असे असेल तर मग ठिक. मुळात देव म्हणजे सामन्य माणसापेक्षा थोडेसे सरस अशी तुमची व्याख्या असेल तर आमची काहीच हरकत नाही. बास. हेच अपेक्षित आहे. >>>बाकी ते जर कुठल्या वाराचे उपास करत असाल तर शिवाजी अन कलामांचे वार पण ठरवुन टाका पाहु. तिर्थयात्रेला जात असाल न पुरंदरावर किंवा राष्ट्रपती भवनात? (रामेश्वरला कलामांच्या घरी सुद्धा जायला हरकत नाही म्हणा!) ते आम्ही पाहु.. म्हणत असाल तर ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात तरी चालेल. ;) >>त्याशिवाय, सत्यनारायणासारख्या पुजा पण घाला दोघांच्या नावाने. मालक, सत्यनारायण विष्णूसाठी. इथे सत्यशिवाजी किंवा सत्यकलाम असे करावे लागेल. सदर पूजेसाठी लागणारी कथा संस्कृतात लिहित आहे, लवकरच प्रकाशित होईल. >>>आणि देवघरात दोघांच्याही मुर्तींची पुजा करत असालच. अगदी अगदी. अनेकांच्या घरात तसबिरी पण आहेत. रस्त्यांवर पुतळे आहेत. लवकरच एक मंदीर बांधणार आहोत.. देणगीचे स्वागत आहे.

In reply to by अवलिया

ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात तरी चालेल.
आमंत्रणासाठी आभार. निसर्गावर आमचे बेमालुम प्रेम आहे, ट्रेकसाठी आम्ही पुरंदरावरही जाउ आणि सेंट थॉमस माउंटावरही जाउ. फक्त ते ट्रेक करताना टाळ कुटणे आमच्याने व्हायचे नाही ब्वॉ!
मालक, सत्यनारायण विष्णूसाठी. इथे सत्यशिवाजी किंवा सत्यकलाम असे करावे लागेल.
म्हणुनच सत्यनारायणासारख्या असे लिहले आहे. :-)
सदर पूजेसाठी लागणारी कथा संस्कृतात लिहित आहे, लवकरच प्रकाशित होईल.
लिहा च्यामारी. तुमच्या सारख्या अवलियांमुळेच साहित्यात अमुल्य भर पडली आहे, काही भोळे लोक त्याची पुराण म्हणुन पुजा करतात ते सोडा. ;-)
अगदी अगदी. अनेकांच्या घरात तसबिरी पण आहेत. रस्त्यांवर पुतळे आहेत. लवकरच एक मंदीर बांधणार आहोत.. देणगीचे स्वागत आहे.
मंदिर पुतळ्यांकरता देणगी देणार नाही, क्षमस्व! इतर काही समाजपोयगी असेल तर पाहु. (लगेच अकाउंट नं व्यनीतुन धाडु नये ;-) )

In reply to by Nile

लिहा च्यामारी. तुमच्या सारख्या अवलियांमुळेच साहित्यात अमुल्य भर पडली आहे, काही भोळे लोक त्याची पुराण म्हणुन पुजा करतात ते सोडा. Wink तेच तर म्हणतो त्या भोळ्या लोकांना त्यांच्या नियतीवर सोडुन द्या.. बास ! (अतिभोळा)

In reply to by अवलिया

त्यांना त्यांच्या नियतीवर सोडुन दिलेलंच आहे. इथे फक्त ज्यांची विवेकबुद्धी शाबुत आहे त्यांना दोन्ही बाजु दिसाव्यात अन स्वतःच्या कुवती-बुद्धीनुसार योग्य काय ठरवावे या करीता प्रतिसादप्रपंच केला आहे. भोळसटांनी वाचले नाहीत तरी काय बिघडत नाही.

In reply to by Nile

अच्छा म्हणजे विवेक जागृत असलेल्यांना समजावे म्हणुन भोळसटांच्या देवांवर चिखल उडवावाच लागतो का ? असेल असेल आम्ही काही विवेक वादी नाही. संपला विषय.

In reply to by अवलिया

भोळसटांच्या देवांवर चिखल
ह्याला आम्ही भोळसटांच्या अंधश्रद्धांचे खंडन असे म्हणतो. "आमच्या श्रद्धांवर चिखल उडवला" असे म्हणत रडणार्‍यांची तर आम्हाला कीव येते. पण मग पुराणातले भोळसटांचे हरणारे अन मग रडत "मोठ्या देवांकडे" त्राहिमाम करत जाणारे देव आठवतात अन आम्हाला गमक उमगते.

In reply to by अवलिया

खरं आहे. चुकलंच गड्या..
म्हणुन म्हणतो विवेकवादी व्हा! अशी नंतर पस्तावायची वेळ कमी वेळा येईल मग. ;-) शिका जरा पर्‍याकडुन. >)

In reply to by Nile

आता जसे सत्ताधीश आहेत आपले. जनमानसात ते सत्ताधीश असले तरी त्यांची प्रतिमा भ्रष्ट ते निर्बुद्ध काहीतरी चुकीचे करणारे अशीच असते ना? तसेच हे देखील. आजचे 'देव' उर्फ सत्ताधीश कितीही नावे ठेवा तरी आज आपल्या आयुष्यावर दुरगामी परीणाम करणारे निर्णय घेण्याची पॉवर त्यांच्याचकडे आहेत ना? काही करु शकतो का आपण त्यांचे वाकडे? ठीक आहे कधीतरी एखाद्या सत्ताधीशाला सरळ / पराभूत करतही असु तेव्हा जुन्या ग्रंथात असेही वाचलेच आहे की राक्षसांनी एकदा देवाला हरवले मग ते गेले विष्णुकडे इ इ ... बघ बॉ देव - सत्ताधीश - सर्वेसर्वा ही टोटल परत एकदा लागतीय की नै :-)

In reply to by सहज

ही तुलना चालेल. (जिंकतो तोच इतिहास लिहतो असे म्हणतातच की) पण मुख्य फरक हा आहे, सद्ध्याच्या (तशी कृत्यं करणार्‍या) सत्ताधीशांना आपण शिव्या देतो की नाही? पण (तशी कृत्ये केलेल्या, पण जिंकलेल्या) पुराणातील विजेत्यांची मात्र देवघरात पुजा करतो! हा फरक ठळक आणि महत्त्वाचा आहे. (म्हणुन, ब्रॉडली, देव या संकल्पनेलाच विरोध आहे)

In reply to by Nile

पण मुख्य फरक हा आहे, सद्ध्याच्या (तशी कृत्यं करणार्‍या) सत्ताधीशांना आपण शिव्या देतो की नाही? पण (तशी कृत्ये केलेल्या, पण जिंकलेल्या) पुराणातील विजेत्यांची मात्र देवघरात पुजा करतो! हा फरक ठळक आणि महत्त्वाचा आहे. (म्हणुन, ब्रॉडली, देव या संकल्पनेलाच विरोध आहे) तशी कृत्ये केलेल्या या शब्दाला माझा आक्षेप आहे. चुका तश्या नव्हत्या. चुका होत्या. पण त्या पण उदात्त कारणामुळे झालेल्या होत्या. दोघांच्या चुकाच वेगळ्या प्रकारच्या आहेत.

In reply to by मृत्युन्जय

मूळात त्या चुका नव्हत्या... त्या चुका होत्या हे छाटछूट लोक कोण ठरवणार? इथेच कुठेतरी शूर्पणखा प्रकरणात रामाची कृती काही अयोग्य नव्हती याचा खुलासा आम्ही केला आहे. :)

In reply to by सहज

छापील, वाचनीय गोष्टीत कोणी कोणाचे वाट्टेल ते म्हणणे खपवुन घेते का? आहो 'वाट्टेल ते ' आपल्यासाठी ... त्या काळात त्यांच्या साठी ते सहज असेल .

In reply to by सहज

द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे , महाभारत व रामायणातील अश्या वादग्रस्त प्रसंगांचे कायम कूतूहल वाटत आले आहे. 'शी बै अच्रट'वाल्या समाजाने हे सगळे कसे काय चालवून घेतले जर ही कथा कादंबरी आहे तर. वाचकांची पत्रेमधे भडीमार करुन प्रकाशकांना आवृत्ती बदलायला लावणे पासुन, प्रकाशकाचे दुकान जाळणे, राजद्रोहाखाली खटला भरणे इ उपाय केले नसतील आपल्या पब्लीकने राजवाड्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी म्हणजे आर्ष कालात सर्व लोक पशूवत संचार करीत होते त्यानुसार सर्व व्यवहार लोकांचाही होता असे आर्ष वाङ्मयातूनही दिसते. म्हणजे पशुप्रमाणे मनुष्यही मोठा झाल्यावर आपल्या आईबरोबर संभोग करत होता तेच सख्ख्या बहीणी भावंडांबाबतही. आजच्या भारतीय समाजात ते पूर्णतः वर्ज्य मानले जाते. मग केवळ आता तसे नाही म्हणून तेव्हा तसे होते यावर विश्वास ठेवायचा नाही का? जसा जसा माणूस आणि समाज पुढे पुढे जात आहेत तसतसे जास्त बंधने आणत आहे. म्हणून मनुस्मृतीत जो ब्राम्हण श्राद्धात मांस खात नाही त्याला पौरोहित्याचा अधिकार नाही असे म्हटलेले असताना आताच्या काळातही पुरोहितवर्ग मांसाहार निषिद्धच मानतो. आजही. मग हा नियम कसा आला? मांसाहाराचा अतिरेक होऊ लागला म्हणूनच सोडले ना? त्यामुळे वादग्रस्त प्रसंगांचे मला कुतूहल वाट॑त नाही. त्याकाळानुसार त्या गोष्टी घडल्या. आणि तेव्हा घडल्या म्हणून तेव्हाचे सामाजिक संदर्भ तसेच्या तसेच आज वापरायची गरज नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हे असे विविध मतप्रवाह असल्याने खरे काय खोटे काय व ते तसे का हे मानवी इतिहासात काय वादग्रस्त विषय. व त्यावर दोन्ही बाजुने आपापले युक्तीवाद. तसेच्या तसे संदर्भ वापरणे अवघडच. गेल्या दोन तीनशे वर्षात इंग्रजांनी आपला इतिहास बिघडवला व भारतीयांचा बुद्धीभेद केला असाही एक प्रवाद आहे. म्हणुन प्रत्येक काळात सगळ्यांचा आपापल्या मतानुसार इतिहास मानण्यावर भर. आजच्या कालानुसार 'पॉलिटीकली करेक्ट' इतिहास हवा आहे! :-)

In reply to by Nile

महाभारत ही देवांची कथा नाही , त्यामुळे यातील पात्रे मानवधर्माला अनुसरुन चांगले, वाईट वर्तन करतात. कर्ण हा जरी कुंतीने त्यागलेला सूर्य पुत्र होता तरी तो दुर्योधनाचा मित्र होता. त्यानी आपल्या मित्रासाठी म्हणून काही गोष्टी केल्या त्या अतिशय निंदनीय होत्या . उदा, द्रौपदीचा अपमान, विराट राजाच्या गायी पळवणे, घोषयात्रेला जाउन पांडवाना हीन दाखवण्याचा प्रयत्न करणे इ. त्याचा इतिहास असा होता कि आपले साध्य प्राप्त करण्यासाठी तो भल्या बुर्‍या मार्गांचा अवलंब करीत असे.. ब्रम्हास्त्र मिळवण्या साठी त्याने ब्राम्हण असल्याचे नाटक केले होते. त्या मुळे कर्णाला जी वागणूक मिळाली त्यात वावगे काहीच नव्हते फक्त दुर्दैव हे की अतिशय उच्च योग्यतेचा माणुस कुसंगती मुळे नाश पावला .

In reply to by Nile

पळवली नाही याचकाच्या रुपात जाउन मागीतली .. आता देवराज इंद्र असला तरी काय झाले ? त्यालाही पुत्र प्रेम आहेच की.

In reply to by मनीषा

अरेच्च्या! अशी लबाडी तिकडच्या बाजुंनी केली की ते व्हिलन, इकडच्या बाजुने केली की ते पुत्रप्रेम??? बरं अश्या माणसासारख्या राग-लोभ असणार्‍यांना देव का म्हणता तुम्ही? त्यांची पुजा का करता? वरच्या प्रतिसादात कर्णाला लबाड म्हणालात, इथे त्याला माहित असुनही(सुर्याने सांगितले होते) तरी त्याने बरे कवच कुंडल दिले?एकिकडे इतका लबाड दुसरीकडे इतका भोळा अन दानशुर! असे कसे ब्वॉ? आपल्या हिरोंनाच जिंकण्यासाठी बनवलेली ही स्टोरी आहे याच्यावर विश्वास का म्हणुन ठेवावा?

In reply to by Nile

अशी लबाडी तिकडच्या बाजुंनी केली की ते व्हिलन, इकडच्या बाजुने केली की ते पुत्रप्रेम?? आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कार्टं. आपली ती अभिव्यक्ती दुसर्‍याची ती चिखलफेक. आपला तो बुद्धीवाद दुसर्‍याची ती अंधश्रद्धा. :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचं असं मत आहे कि लाक्षागृहात पाण्डवानीच कोणा सहा लोकांना जिवंत जाळले ...राजकारणापाई ...बाकी सीतेवर अविश्वास, लक्ष्मणाचे बायकोला वाऱ्यावर सोडून भावाबरोबर राहणे इ. शी सहमत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण यात एका आदर्श जीवन पद्ध्तीची कथा सांगीतलेली आहे सगळे आदर्श आपल्याला अनुकरणीय आहेत असे नाहीत . काही काल सापेक्ष आहेत. म्हणजे त्या काळी राजकन्यांची स्वयंवरं व्हायची , राजाला एक पेक्षा जास्त विवाह करण्याची अनुमती होती ती आता कालबाह्य आहेत. द्रौपदीच्या इच्छेविरूद्ध तिला पाच लोकांशी लग्नं करायला लावायचं, तेही वस्तू समजून, लाक्षागृहात ६ लोकांना जिवंत जाळणं, इ.इ. कशावरुन इच्छे विरुद्ध ? ती एक राजकारणा साठी केलेली कृती असू शकते . (शिवाजी महाराजां ना ८ राण्या होत्या.) आणि लाक्षागृहात ६ जणांना जाळणं हे ठरलेलं नव्हतं , त्या रात्री पांडवांनी वारणावतातील जत्रेतील देवतेची पुजा करुन सर्व गावकर्‍यांना प्रसाद भोजन दिले, त्या वेळी ही भिल्ल स्त्री तेथे आली ५ मुलां समवेत , आणि त्यांनी भोजना बरोबर मद्य प्राशन केले ( त्या काळी मद्यपान स्त्रीयांनाही निशिद्ध नव्हते) आणि ते सर्व तिथेच झोपले, जर पांडव तिथुन गेले नसते तर पुरोचन ते लाक्षागृह पेटवणारच होता. त्या मुळे तो एक दुर्दैवी अपघात होता असं म्हणता येईल. रामायण, महाभारतामधले खगोलीय संदर्भ उचलून ते लिहीले कधी यांचा काल निश्चित करता येईल. (कसा ते मला विचारू नये.) वास्तव रामायण मधे वर्तकांनी ते खूप विस्तृत पणे सांगीतले आहे.

In reply to by मनीषा

राजकारण? भावाभावांमधील भांडणे मिटवण्यासाठी म्हणा हवे तर...पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी, सुंदर वगैरे होती म्हणून भावाभावात भांडणे लागली असती...ती टाळण्यासाठी तिला ५ जणांची पत्नी म्हणून राहावे लागले... माझ्या मते कुंती हिमालयाच्या जवळील भागातील असावी...अगदी काही (कदाचित १० किंवा कमी )वर्षापर्यंत तिथे बहुपतित्वाची प्रथा होती...हल्लीच एका मराठी पेपरात याबद्दलची बातमी वाचली. बाकी काहीही असले तर हे लोक अस्तित्वात होते हे नक्की.

In reply to by शिल्पा ब

पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी, सुंदर वगैरे होती तसेच ती पांचाल देशाची राजकन्या होती जो कुरुंना तुल्यबळ असा राजा होता. ती एक बुद्धीवान आणि अनेक विद्या पारंगत होती . तिचा पांडवांशी विवाह योगायोगाने झाला नव्हता तर तसे घडावे म्हणून तिने असा पण लावला जो अर्जुनाशिवाय कोणीही जिंकु शकणार नाही .

In reply to by मनीषा

आयला, राजकन्या असूनही असे 'पण' लावावे लागायचे? त्यामानाने सुभद्रेच्या काळात बरीच प्रगती झालेली दिसते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष सोडून देणं, सीतेवर अविश्वास इ.इ. गोष्टी आदर्श? रामाने एक चांगला राजा कसा असावा याचा आदर्श घालुन दिला. काही बाबतीत तो चुकला. देवसुद्धा चुक कसा काय करु शकतो बुवा? असा प्रश्न असेल तर एकदम मान्य. देवाने चुक कशी केली? पण देवाने चुका केल्याच्या बर्‍याच गोष्टी पुराणात किंवा तैतिरीय संहितेत मिळतील. देवाला चुका करण्याचा हक्कच नाही जणु या मानसिकतेमधुनच मग पुढे भागवतामधील अवास्तव गोष्टी पुढे आल्या. इथे देव आणि त्याचे अवतार या दोन गोष्टीमधील फरक समजावुन घेतला की कदाचित थोडे पचनी पडेल. चुका करुन सुद्धा त्याने जे असामान्य कार्य केले त्यामुळे तो देव. लक्ष्मणाने बायकोला सोडले यातील केवळ एक बाजु तुम्ही बघता. बायकोवर अन्याय झाला. पण लक्ष्मणाने जे कष्ट सोसले त्याचे काय? भावाच्या प्रेमाखातर त्याने ऐन उमेदीची १४ वर्षे कारण आणि गरज नसताना वनवास भोगला. त्यागाचे याहुन मोठे उदाहरण कुठे असेल तर सांगा. भरताने १४ वर्षे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन राज्यकारभार चालवला. निष्ठेचे आणि निस्वार्थीपणाचे याहुन मोठे उदाहरण कुठे असेल तर तेही सांगा. रामायणात जे जे आदर्श आहे ते ते घेउयात आपण. जे पटत नाही त्यासाठी रामाची स्तुती करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या आसपास पण अशी कित्येक माणसे आपण बघतो जी पुज्यनीय असतात. ती कधीच चुका करत नसतील का? त्यांनी केलेले महान कार्य हे त्यांच्य काही चुकांसमोर असामान्य असेल तर ते वंदनीय ठरायला हरकत नाही. नाही का? मुळात रामाने सीतास्वयंवरातच फाऊल केला होता. धनुष्याला दोरी लावायची तर धनुष्य मोडून त्याने जनकालाच शेंडी लावली. रामाने धनुष्याला दोरी न लावता ते तोडले म्हणुन सीतेला आयुष्यभर लग्नाशिवाय ठेवायला पाहिजे होते का जनकाने?रामाने काय जबरदस्ती केली काय जनकावर? द्रौपदीच्या इच्छेविरूद्ध तिला पाच लोकांशी लग्नं करायला लावायचं, एक मुख्य प्रश्न. तिच्या इच्छेविरुद्ध होते तर तिच्या बापाने विरोध का नाही केला? भावाने युद्ध का नाही केले? मुळात तिचे ५ जणांबरोबर लग्न होणे (तिच्या इच्च्छेविरुद्ध समजुयात आपण) हेच या गोष्टीचे द्योतक आहे की मुळात स्त्रीला त्यावेळेस फारशी किंमत नव्हती. युधिष्ठीराने नंतर तिला पणाला लावुन जणु हे सिद्धच केले. हे सगळे त्यावेळेस बरोबर होते. आजच्या निकषांवर त्या काळातल्या माणसांचे मुल्यमापन करणे कितपत योग्य होइल? लाक्षागृहात ६ लोकांना जिवंत जाळणं, इ.इ. कोणत्या न्यायाने आदर्श? आदर्श नव्हतीच ती गोष्ट. स्वीकरु नयेच आपण. पण मुळात पांडव म्हणजे महाभारताचे नायक नव्हेत. नायक कृष्णच होता. त्याने जे काय केले त्यावर बोलुयात. बाकीच्यांनी केलेल्या चुका मान्य करुन सोडुन देउयात,

In reply to by मृत्युन्जय

रामाने एक चांगला राजा कसा असावा याचा आदर्श घालुन दिला.
रामाचे वडील आदर्श राजा नव्हते काय? गीत रामायणाततरी दशरथ पितासमान राज्यकर्ता असल्याचा उल्लेख आहे. रामायणाची इतर व्हर्जन्स मी वाचलेली नाहीत. चुभूदेघे. भरत चांगला राजा नव्हता का? रामानेही आपलं राज्य भरताला दिलेलं नव्हतं. मला तर भरत हा जास्त महान वाटतो कारण त्याला राज्य करण्याचा अधिकार असूनही तो राजा झाला नाही, पंतप्रधान झाला आणि १४ वर्षांनंतर तो ही अधिकार सोडला. रामाने मात्र पादुका देऊन का होईना आपला क्लेम ठेवला. असो. इतर उदाहरणं सोडून देते आहे. पण मुद्दा असा आहे, आपल्या आजूबाजूलाही प्रशंसनीय, पूजनीय माणसं असतातच असतात. ती माणसंही चुका करतात, अनेकदा आपल्या चुका मान्यही करतात पण म्हणून ती माणसं देव होतात का? व्यवहारात डोकावून पाहिलं तर नाही. गाडगेबाबा संत, अतिशय आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत हे कोणीही मान्य करेल, पण ते देव झाले का, नाही. (त्यांना देव बनवणं हा त्यांचाच मोठा पराभव असेल.) आमचे एक जालमित्र श्री. बिपिन कार्यकर्ते यांचं एक वाक्य आठवलं: कोणीही माणूस काळा किंवा पांढरा नसतो, असतात त्या करड्याच्या वेगवेगळ्या छटा! देवसुद्धा जर करड्यातलाच असेल तर त्याचं वेगळेपण काय आणि नसेल तर नक्की काय जपलं जातंय हे समजून घेण्याची मला फार उत्सुकता आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भरत हा जास्त महान वाटतो कारण त्याला राज्य करण्याचा अधिकार असूनही तो राजा झाला नाही, पंतप्रधान झाला आणि १४ वर्षांनंतर तो ही अधिकार सोडला. रामाने मात्र पादुका देऊन का होईना आपला क्लेम ठेवला. कशावरुन?