दुरदेशीचे काका, नमस्कार्स __/\__
बाकी हा प्रश्न नक्की कोणत्या श्रीकृष्णाबद्दल आहे ? द्वारकेच्या, नंदाघरच्या का महाभारतातल्या गीता सांगणार्या ? हे तिनही कॄष्ण वेगवेगळे होते असे बर्याच अभ्यासकांचे मत आहे.
कोणीतरी त्या नानाला पकडून लिहायला लावा रे ह्या धाग्यावर, खुप नविन /उपयुक्त आणि कदाचीत वादग्रस्त माहिती वाचायला मिळेल त्याच्याकडून.
व्हिडीओ पाहीला.
सर्व प्रथम मी जाणकार नाही. पिंक टाकायची हौस म्हणुन दिलेला प्रतिसाद यापलीकडे सदर प्रतिसादाचे मुल्य नाही, नसावे. सहजरावांनी दिलेल्या शीर्षकात सत्य का मिथ्य असा प्रश्न आहे. व्हीडिओ हिस्ट्री ऑर मिथ असा आहे. मिथ आणि मिथ्य या दोन गोष्टी भिन्न आहे. मिथ म्हणजे रुपक, मानीव कथा इत्यादी असा अर्थ होत असावा असं माझं तुटपुंज आंग्लभाषेतील ज्ञानाने आकलन आहे. मिथ्य (योग्य शब्द मिथ्या) म्हणजे जे आहे ते आकलन न होता भ्रमामुळे दुसरे काही आहे असे वाटणे. या अर्थाने श्रीकृष्ण आपल्या समोर ज्या रुपाने येतो ते सत्य नसुन मिथ्या आहे असे अनुमान मी तरी काढलेले आहे.
There is a dual between mythology and history. In India there are many historical facts which have become myths over a period of thousands of centuries as our 'way of life' is very old. There were no records of history kept in those times. History was never officially documented nor was there any necessity felt at that time. The history though which was never documented some how was kept alive from many folklores, many legends that got evolved over a period of time. The lines between the history and mythology have blurred. The epics Ramayana and Mahabharata were actually an earlier attempt in documenting the history in a different form.
राम व कृष्ण हे खरे होऊन गेले की नाही हे कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. पण त्यांची जी चरित्रे वर्णन केली गेली आहेत तीच आज इतकी वर्षे आपल्या समाजाला दिशादर्शक ठरली आहेत असे मला वाटते.
राम हा खरा आदर्श पुरुष आहे पण कलियुगात त्याच्यासारखे वागणे जमणे फारच थोड्यांना शक्य आहे. तसेच कालानुरुप वर्तन असावे असे मानले, तर तसे वागणे योग्यही ठरणार नाही. हल्लीच्या कपटी जगांत कृष्णासारखे वागूनच माणसाचा निभाव लागेल हे बहुसंख्यांना मान्य होईल. प्रसंगी नियम वाकवणे,' नरो वा कुंजरो वा', असे सत्यवचनी माणसाला म्हणायला लावणे आणि सर्व चतुराई करुन देखील न्यायाचीच बाजू उचलून धरणे हे वागणे जास्त प्रॅक्टिकल वाटते.
पेशवे पहिल्यांदा जे म्हणाले होते तेच म्हणतो. लिहा. व्हिडीओ बघूच. पण लिहा. म्हणजे काही चर्चा करता येईल. काहीतरी नवीन समजेल. लिहा.
(त्रिवार आग्रह झालेला आहे!)
परंतु इंट्रेस्टिंग प्रकार असावा. ऐतिहासिक व्यक्तींबद्दल सांगितलेल्या लोककथा, शतकानुशतके चालत आलेल्या कहाण्या ह्या एकाएकी पुरावे वगैरे नाहीत म्हणून रद्दबातल खरेच ठरु शकतात का? त्यातऊन त्या व्यक्तीच मिथ्या आहेत असं होऊ शकतं का? डॉक्यूमेंटरी बघून काही मतप्रदर्शन करेन.
(ब्रजवासी)चतुरंग
मागे एक डिस्कव्हरीवर बघितलेली डॉक्युमेंटरी आठवली. लोककथांमधून उल्लेख असलेला एक मलेशियातील प्राणी, एक आफ्रिकन वनस्पती व एक भारतीय शहर (द्वारका) यांच्या शोधावर ही डॉक्युमेंटरी होती. ह्या तीनही गोष्टी असण्याचे ठोस पुरावे शोधकर्त्याला मिळतात हे आठवते
अशा गोष्टिंवर चर्चा करत नसतात, टाईम्समध्ये वगरै कौल घेतात लोकांचा...
आणी त्यावरुनच निष्कर्ष काढतात ...
इथेच १ कौल काढा, आणी मेजॉरिटीवाल्यानी माय्नॉरिटीवाल्या लोकाना वेडावून दाखवा.
मी तरी घरच्याच बाळक्रुष्णाला कौल लावून हाच प्रश्न विचारणार आहे!!
>>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष करण्याची पद्धत आली आहे.
अगदी १०० टक्के खरं आहे. म्हणुनच अनेक तथाकथित बुद्धीवादी (!) वाटेल ते करुन हिंदू, सण, संस्कृती, धर्म असे शब्द दिसले की तोंडात बोटं घालुन घालुन ओका-या काढत असतात. आपल्यापेक्षा वेगळा विचार ह्यांना सहनच होत नाही. काय म्हणावं ह्या (अप) प्रवृत्तीला !! सांगा तुम्हीच !!
आपल्या मतांपेक्षा वेगळी मतं लिहीणार्या सगळ्यांना एकजात तोंडात बोटं घालुन घालुन ओका-या काढणारे म्हणायचं हीच का संस्कृती, सहिष्णुता, इ.इ?
आम्ही असंस्कृत, निरीश्वरवादी बरे असा माझा इगो सुखावल्याबद्दल श्री. अवलिया यांचे आभार.
कृष्ण खरोखरच होता की नाही यात मला तरी फारसा रस नाही. कृष्णाने कुरूक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली असे म्हणतात.त्यातील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ वर वेगवेगळ्या लेखकांची मिमांसा वाचून मी माझे मत बनविले आहे. ते १००% अंमलात आणणे खरोखरच कठिण गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे वागणारा माणूस आयुष्यातील कोणतेही तडाखे पचवू शकेल! तेव्हा ’कर्मण्येवाधिकारस्ते’ हे उच्च तत्वज्ञान आहे आणि ते खरोखरच कृष्णाने सांगितले असले तरी किंवा वेदव्यासांनी ते ’कृष्ण’ या काल्पनिक अवतारी पुरूषाच्याकरवी सांगितले असले तरी ते मला भावते आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न नक्कीच असतो. तेव्हा कृष्ण सत्य असला किंवा मिथ्या असला तरी मला तरी फारसा फरक पडत नाही.
म्हणुनच अनेक तथाकथित बुद्धीवादी (!) वाटेल ते करुन हिंदू, सण, संस्कृती, धर्म असे शब्द दिसले की तोंडात बोटं घालुन घालुन ओका-या काढत असतात.
हो मी त्यातलाच एक आहे आणि त्याबद्दल अजिबात वैषम्य मला वाटत नाही. आणि अशा समस्त ’ओकाऱ्या काढणाऱ्यांच्या’ वतीने मी हे इथे लिहित आहे.
तथाकथित सहिष्णू लोकांचे पितळ उघडे पाडायला अगदी सोपे असते.कारण असेच लोक मोठ्या तोंडाने हिंदू संस्कृती सहिष्णू आहे असे म्हणतात पण सण, कर्मकांडांविरूध्द काही बोलले की ’तोंडात बोटं घालुन घालुन ओकाऱ्या काढत असतात’ असे सकस चर्चेत पूर्णपणे अनफिट असलेल्या शब्दांचा वापर करून स्वत:च्या मनाचा गेलेला तोल दाखवून देतात. असा संताप व्यक्त करणे हे मोठ्या सहिष्णूपणाचे लक्षण नाही का?तुम्ही खरोखरच सहिष्णू असाल तर मला तुमचे मत चर्चेतून पटवून द्यायचा प्रयत्न करा किंवा वेडा म्हणून सोडून द्या.असे सकस चर्चेत अनफिट असलेले शब्द वापरून कसे चालेल? नेमके असेच लोक मला लहानपणापासून भेटत गेले आणि त्यातील डबल स्पीक माझ्या ताबडतोब लक्षात आली आणि याचा माझी मते बनण्यात मोठा वाटा आहे.
आपल्यापेक्षा वेगळा विचार ह्यांना सहनच होत नाही.
नाही बुवा मी नाही त्यातला.इतरांनी कितीही सणवार/कर्मकांडे केली तर माझे मत त्याच्या विरूध्द असल्यामुळे मी मिपासारख्या व्यासपीठावर मांडतो.पण याचा अर्थ मला वेगळा विचार सहन होत नाही असा होत नाही. ज्यांना स्वत:च्या घरी असे प्रकार करायचे आहेत त्यांना जरूर करू दे पण रस्त्यावर येऊन लाऊडस्पीकरवरून बोंबा मारून public nuisance करायला लागले तर मात्र त्याला नक्कीच प्रखर विरोध आहे आणि ते नक्कीच सहन होत नाही.
आपल्यापेक्षा वेगळा विचार सहन न होण्याचे पहिले चिन्ह आहे ’ओकाऱ्या काढणे’ किंवा तत्सम असभ्य शब्दांचा वापर करणे! माझ्या मिपावरील लेखनात असा असभ्य शब्दप्रयोग मी केला आहे असे दाखवून द्या अन्यथा आपले हे वाक्य मला नाही तर ’ओकाऱ्या काढणाऱ्या’ इतरांना लागू पडते असे वाटते.
अवांतर: मतभेद असले तरी Pain साहेबांविषयी एक आदरच आहे. कारण माझ्या आणि त्यांच्या रक्षाबंधनावरील चर्चेत पराकोटीचे मतभेद होऊनही त्यांनी आपले मुद्दे संयमानेच आणि सभ्य भाषेतच मांडले.
क्लिंटन
ज्याची त्याची......
[संपादक मंडळ किंवा व्यवस्थापक यांना सूचना करण्याचे / त्यांना टोकण्याचे स्वातंत्र्य मला इथे मिळत आले आहे आणि अजूनही मिळते याचा मला आनंद वाटतो. त्याचा गैरवापर मी कधीही केलेला नाही.]
"हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कॄष्ण हरे कॄष्ण कॄष्ण कॄष्ण हरे हरे".
या धाग्यात खगोल प्रेमी मंडळी आपली काही मते सांगु शकतील काय ? :)
झानेश्वरांची समाधी ही संजीवन समाधी आहे. नरसोबाच्या वाडीला सुद्धा अशाच दोन योगी पुरुषांच्या जिवंत समाध्या आहेत्,त्या म्हणजे श्री रामचंद्र योगी आणि श्री गोपाळ स्वामी. (ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी वरुन हे आठवले मला.)
जाता जाता माझे आवडते भजन... :)
http://www.youtube.com/watch?v=Dq0n6XKtPLI
सरस्वती फिल्मस सादर करत आहेत "भगवान कृष्ण इतिहास की .... "
ओमSSSS
अशी सुरूवात पाहिल्यावरच गंमत वाटली..
म्हणजे यांना अशी काही documentary बनवायची असली तरी देवाचे आशिर्वाद लागतात..यातच उत्तर मिळाले..
आता श्रीक्रूष्णाच्या होउन जाण्या न जाण्यावर शंका घेतायेत.
त्यात विशेष असे काहीच नाही. हे कलीयुग आहे. मानवाची बुद्धी "त्याचं" अस्तित्व नाकारण्याकडे प्रव्रुत्त होणे ही नियती आहे. हे चार युगांचे चक्र आहे. त्या त्या युगात ते ते घडणारचं! शेवटी ही सर्व त्या जगन्नियन्त्याची "माया" आहे.
"वसुदेवसूतं देवं कंसचाणूरमर्दनं I
देवकीपरमानन्दं क्रूष्णं वंदे जगद् गुरुमII
जुन्या काळात एखादा राजा होऊन गेला ह्याचा ठोस (फिजिकल) पुरावा म्हणजे नाणी, शिलालेख, कागदपत्रे, भूर्जपत्रे. श्रीकृष्णाचे अस्तित्व दाखवणारे असे काही पुरावे का नाही मिळाले आजपर्यंत?
खापरे, गाडगी, मडकी असेही पुरावे शोधता येतील.
आजही उत्तम कादंबर्यांमधे स्थळांचे, त्या काळातील घटनांचे अचूक वर्णन असते पण मूळ कादंबरी कल्पित असते. जसे दा विंची कोड ह्यात अगदी आज अस्तित्त्वात असणार्या जागा जसे पॅरीस, तिथले म्युझियम वगैरे वर्णन केले आहे पण म्हणून ती कादंबरी इतिहास होऊ शकत नाही. निव्वळ खगोलशास्त्रीय घटना अचूकपणे वर्णन केल्या असतील, जागांची नावे अचूक असतील तर लिहिणार्याचा त्याविषयी अभ्यास उत्तम आहे असे म्हणू. पण त्याने तो इतिहास ठरतो का? नाही.
शिवाजी, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्याशी संबंधित कागदपत्रे, नाणी, शिलालेख असे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे महाभारताची सत्यता पडताळून बघणे म्हणजे अधर्म आहे असे मानू नये.
जर सत्य नसले तर ते एक उत्तम महाकाव्य आहे आणि ते शतकानुशतके भारतीय लोकांच्या हृदयात विराजमान आहे ह्यात शंका नाही.
अर्थात मला स्वतःला कृष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे लवकर मिळावेत आणि तो खरोखरचा महापुरुष होता असे सिद्ध व्हावे असेच वाटते. पण पुरावे मिळेपर्यंत मी तसे मानणार नाही.
हे खूप खूप पूर्वी घडले म्हणून त्याचे पुरावे मिळत नाहीत असेही सांगितले जाते. पण डायनोसॉर्स आणि तत्सम अश्मयुगीन जीव, भूगर्भातल्या घटना ह्या नि:संशय महाभारतापेक्षा जुन्या घटना आहेत आणि त्यांचे पुरावे आजही सापडत आहेत.
मी इतिहासाचा तज्ञ नाही. फक्त त्या व्हिडिओत काय दिलं आहे, त्याविषयी मला काय वाटतं हे लिहितो आहे.
व्हिडिओ बघितला. पहिली बारा ते पंधरा मिनिटं कृष्णा कॉन्शसनेसवाले कृष्णाविषयी सांगतात. हा भाग पाश्चात्यांसाठी तयार केलेला दिसतो. टाळ्य आहे.
इतिहासकारांच्या, व संशोधकांच्या साउंडबायटी आहेत, मध्ये मध्ये उगाच आय कॅंडी म्हणून नाच, मंत्र वगैरे टाकलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग शेवटी आहे - त्यात एक खगोलशास्त्रज्ञ ग्रहगोलांच्या स्थितीवरून तारीख ठरवतो. त्यात निवेदकाचा 'शनिच्या भ्रमणावरून युद्धं प्रेडिक्ट केली जाऊ शकतात' वगैरे भंपकपणा आल्यावर पुढे जाववेना, पण तरी बघितला व्हिडिओ...
मुळात कृष्ण नावाची व्यक्ती होती की नाही हा प्रश्न नसून लोक कृष्णाने केलेल्या ज्या ज्या गोष्टींविषयी विश्वास ठेवतात त्या प्रत्यक्ष एकाच व्यक्तीने केल्या की नाही हा आहे. महत्त्वाच्या प्रश्नाला ही डॉक्युमेंटरी स्पर्शही करत नाही. केवळ कृष्ण नावाचं कोणी होऊन गेलं की नाही यावरच (काहीसा भोंगळ) ऊहापोह करते.
व्हिडिओचं सार खालीलप्रमाणे.
महाभारत झालं, महाभारतात कृष्णाचा उल्लेख आहे म्हणून कृष्ण अस्तित्वात होता.
-सरस्वती होती यावरून सिद्ध होतं की महाभारत घडलं
-कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काही हाडं सापडली.
-ग्रहांच्या परिस्थितीवरून सुमारे 3000 बीसी मध्ये ते घडलं असं एक खगोलशास्त्रज्ञ सांगतो.
-लिव्हिंग ट्रॅडिशन हा शब्द इतक्या वेळा वापरलेला आहे... की त्यातून लोकांचा विश्वास आहे म्हणून कृष्ण अस्तित्वात असावा असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर पुरावे
-150 बीसीला कृष्णाचा शिक्का आहे यावरून कृष्ण नावाची कोणीतरी देवसदृश प्रतिमा अस्तित्वात होती हे सिद्ध होतं.
-द्वारकेच्या जागी पाण्याखाली गेलेलं एक शहर सापडलं.
नदी आहे म्हणून महाभारत घडलं हा संबंध कळला नाही. तसंच हाडं योद्ध्यांची असू शकतील अशा तर्कापलिकडे काहीच नाही. ती नसूही शकतील.
जय मध्ये सांगितलेलं युदध् घडलं असावं हा तर्क मान्य करायला काहीच हरकत नाही. ते ज्याकाळी झालं त्याकाळी कृष्ण नावाचं कोणीतरी होतं यात विशेष काय सांगितलं आहे ते कळलं नाही. पण महाभारतातल्या कृष्णानेच गीता सांगितली असंही सिद्ध होत नाही. हे म्हणजे कोणीतरी घाशीराम कोतवाल नाटकाची मूळ प्रत काही हजार वर्षांनी शोधून नाना फडणवीस होता व तो बाईलवेडा होता असं सिद्ध करण्यासारखं आहे.
महाभारताच्या श्लोकांच्या आधारावरून एक्झॅक्ट आकाश त्यावेळचं उभं करणं, त्यावरून तारखा काढणं हे कितपत रास्त आहे कळत नाही. मुळात तो इतिहास व काव्य याचं मिश्रण आहे. त्यातली वर्णनं कुठच्यातरी एका वर्षाला लागू होतात यावरून काहीच सिद्ध होत नाही. मुळात कथेतलं एक कॅरेक्टर दुसऱ्याला त्या त्या ग्रहीय घटना दुश्चिह्न म्हणून सांगतो. त्यावेळी दुश्चिह्न म्हणून मान्यता पावलेलं काहीही सांगेल. मग ती वर्णनं खरी आहेत (कविकल्पना नाही) हे गृहित धरून ते घडलेलं वर्ष शोधायचं आणि त्यावरून मुळातलं गृहितक सत्य ठरल्याचं सिद्ध करणं हे चक्रीय तर्कट (सर्क्युलर लॉजिक) आहे.
इसवी सनाच्या पाचव्या शतकात जगाची लोकसंख्या १७ कोटी होती फक्त !
संशोधक म्हणतात महाभारत इसवी सनाच्या ५५०० वर्षांपूर्वी होवून गेले
आणि महाभारताचे जाणकार सांगतात कि ४० लाख योध्ये या युद्धात मारले गेले म्हणे :)
कसं शक्य आहे हे, ज्ञात इतिहासानुसार सर्वात मोठा सैन्य हे चंद्रगुप्त याचं होता (सुमारे १० लाख ) आणि त्यानंतर आपल्या लाडक्या औरंगजेबाच :D (९ लाख )
,शेवटी महाभारत एक पुराण आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट फुगवून सांगितली गेलीये ,त्यामुळे यातून इतिहास बाजूला काढणे बरेच अवघड आहे असे वाटते !
कृष्णाजीपंत खरंच होते की नाही माहित नाही, जाणून घ्यायची गरजही नाही. त्यांच्या छान छान गोष्टी ऐकत लहानाच मोठा झालो. कळत न कळत, त्या गोष्टींमधून शिकत गेलो. त्यांच्या नावावर लागलेली भगवद्गीता वाचली. फर थोडी कळली, त्याहूनही फार कमी आचरणात आणता आली, पण जेवढी आचरणात आणता आली त्याचाच खूप फायदा झाला. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे हे नक्की. त्यावरच सध्या फोकस करतोय. त्यामुळे ते खरंच होते की नव्हते वगैरेने काहीही फरक पडत नाही.
खरे बोललात बिपीनदा !!
(सर्वात पहिले ईथे एक लाबंलचक आळस देणारी स्मायली कल्पावी.)
लैच कंटाळा आला आता !!
कोणीतरी 'क्ष' व्यक्तीने 'वाय' पुस्तकात अनंत काळ आधी लिहुन ठेवले आणी म्हणुन मी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवुन त्या व्यक्तीला देवत्व देणार नाही,पण ह्याचा अर्थ असा नाही मी ते कधीही आचरणात आणणार नाही वा दुसर्याला हे सांगत बसेन की बाबा तु ही तसेच कर,जर त्याचा विश्वास आहे (भले तो श्रध्दा असो वा अंधश्रध्दा असो),तर त्याला बदलायला सांगुन काय फायदा ?
धर्म आणी शास्त्र ह्यांची योग्य ती सांगड घातली पाहिजे
धर्म हेच शास्त्र म्हटल्याने जसा अतिरेक होतो तसाच शास्त्र हाच धर्म म्हटल्याने होतोच की
मला सर्वच धर्मातल काही-काही गोष्टी भावतात.ईस्लामध्ये नशाखोरीला हराम म्हणण किंवा बौध्द धम्मा मघील अष्टांग मार्ग, तसच गीतेतलही काही-काही भावतं(मग त्याच्यामुळे आख्ख्या महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथाला मी 'महान' म्हणणार नाही, पण म्हणुन फडतुस ही म्हणणार नाही.).
आता गोष्ट येते पुराव्यांची...
आईने सांगीतले की हा तुझा बाप ? ह्यावर आपण विश्वास ठेवतोच ना की लगेच डिएनए टेस्ट मागतो आणी जरी डिएनए टेस्ट घेतली तर तो बाप आहे की काका हे कस ठरविणार ?विश्वासाच ही तसच आहे तो आपोआप निर्माण होतो, श्रध्दाभावाची ही ऊत्पती तशीच आहे.मानवी स्वभाव आहे तो.माझा एक मुस्लीम मित्र दरवर्षी 'नवरात्र' एकदम कडक पाळतो. बघा,तो मुस्लीम असुन पाळतो आणी मी हिंदु असनही त्याच्या ईतकी कडक पाळु शकत नाही,शेवटी हा भाग आहे ज्याच्या त्याच्या विश्वासाचा
राहिली गोष्ट ह्यावरील चर्चेची(खर तर मुळात ज्या दिशेने चर्चा गेली हाच एक खुप मोठा जोक आहे).
चर्चेत काही लोंकानी दांडियाच्या वेळी होणार्या र्हासाचे ऊदाहरण दिले आहे, मान्य आहे सत्य आहे,पण दोस्तांनो, कधी आस्था वगैरै चॅनेलवर पण बघा.तल्लीन झालेली तरुणाई तिथेही दिसेल आपल्याला.प्रमाण कमी असेल एक वेळ पण श्रध्दावान आहेतच की ते ही एक सत्य आपण नाकारू शकत नाही.
सणावाराबद्दल !!
मालक ,एकमेव हिन्दु राष्ट्र आहे हे.त्यातील लोक्स कित्येक प्रथा बाळ्गुन आहेत,रहातील मुळात सणावाराच्या निमीत्ताने लोक एकत्र येणाल्या विरोध का असावा मला हेच कळत नाही, हल्ली प्रथा पाळताना अतिरेक होतोय हेही खरच पण सगळ्याच ठिकाणी होत नाही.
बाकी असल्या चर्चेसाठी
केवळ अंगाने भारतात रहाणार्या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !!
(च्यायला ? टंकलच का शेवटी !! हातोंकी खुजली बातोसें नही जाती )
केवळ अंगाने भारतात रहाणार्या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !!
हांग आशी ! म्हणुनच आम्हाला सुहासचा प्रतिसाद नेहमी आवडतो.
सुहास आमचा किस्ना आहे..
केवळ अंगाने भारतात रहाणार्या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !!
भिड!! सौ सुनार की एक लोहार की :)
माणसाने अश्रद्ध असणे, नास्तिक असणे अथवा देवाच्या अस्तित्वाचे संयमीत भाषेत पुरावे मागणे ह्या कुठल्याही गोष्टीला आक्षेप नाही किंवा नास्तिक लोकांविषयी राग देखील नाही. मात्र स्वतःला नास्तिक अथवा अश्रद्ध दाखवण्यासाठी राम लक्ष्मणांसारख्यावर जेंव्हा अत्यंत खालच्या भाषेत चिखल उडवला जातो तेंव्हा अशा लोकांची किव मात्र जरुर येते :)
इच्छा नसताना देखील कधी कधी मग अशा लोकांची तुलना ब्रिगेडींशी करायचा ओह आवरत नाही. अर्थात मिपावर सर्वच ह्या शब्दात आपल्या प्रतिक्रीया नोंदवणारे नाहीत ह्याची जाणीव आहेच. क्लिंटन अथव अदिती ज्या शब्दात आणि संयमाने वाद घालतात त्याचा तरी निदान इतर चिखल उडव्यांनी अभ्यास करावा असे वाटते.
असो..
शेवटी ज्याची त्याची जाण समज...
एखाद्याचे मत चुकीचे असेल असे वाटत असेल तर ते तसे आहे असे सांगण्यात काय तोटा? विचारांचा देवाण्घेवाण हे संस्थळाचे उद्दिष्ट नाहीए का?
तर त्याला बदलायला सांगुन काय फायदा ?
दोन भावांचा डीएनए सारखा असतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तसे असेल तर ते (काची स्पेशल केसेस सोडुन) चुक आहे.
केवळ अंगाने भारतात रहाणार्या,चार रिकामटेकड्या नेटमंडुकानी,छटाकभर आंतरजालावर,आक्रस्ताळेपणा करुन जरी धर्म-विरोधाच दळण दळल तरी भारतीय जनमानसात असलेल्या हिंदू, सण, संस्कृती, धर्म वगैरै ची विषयीची भावना तसुभरही कमी होणार नाही हेही तितकेच खरे !!
अनेक रिकामटेकड्या धर्ममार्तंडांनी इंटरनेटावर माजवलेले धर्माचे स्तोम पाहता हा मुर्खपणा थांबवणे कीती महत्त्वाचे आहे हे सुज्ञास सांगावे लागु नये. बाकी आपण चुक असु शकतो हे ज्यांना मान्यच नाही ते दुसर्याचे रिकामटेकडे पण वगैरे मुद्देच काढत बसणार, स्वतः असल्या भाषेत प्रतिसाद लिहणार आणि विरोधकांनी त्याच भाषेत उत्तरे दिली की "चिखलफेकेचे आरोप" करत रडत बसणार हे काही नवे नाही.
अनेक रिकामटेकड्या धर्ममार्तंडांनी इंटरनेटावर माजवलेले धर्माचे स्तोम पाहता हा मुर्खपणा थांबवणे कीती महत्त्वाचे आहे हे सुज्ञास सांगावे लागु नये. बाकी आपण चुक असु शकतो हे ज्यांना मान्यच नाही ते दुसर्याचे रिकामटेकडे पण वगैरे मुद्देच काढत बसणार,
नाईलशी त्रिवार सहमत. (काय साला दिवस आलेत, छ्या: !!! ;) ) ... कोणी हिंदू, कोणी बुद्धिवादी... पण वरचे वाक्य अगदी जेनेरिक का काय म्हणतात तसे असल्याने धर्म कोणताही असो, लागू पडतेच.
जेनेटीक पॅटर्न सारखा असतो. आणि सारखे पॅटर्न असलेल्या २ भावांपासून एका बाईला २ मुले झाली तर कोणाची कशी ही नेमकी कशी ओळखायची? आणि पुढे जाऊन दिलेला डीएनएचाचणीचा पुरावा हा देखील तुम्हाला पाहीजे तसा तुम्ही मिळवलात असे सागून त्याज्य ठरवता येतो.
त्यामुळे त्या बाबतीत आईवर विश्वास ठेवावाच लागतो.
बाकी जेनेटीक सिमिलॅरीटी बद्दल अधिक इथे वाचता येईल.
यावरून एंजल्स एंड डेमोंस चित्रपटाची आठवण झाली.
dan ब्राऊन याने पण यात धर्म विरूध्द शास्त्र अशीच संकल्पना मांडली होती .
त्याच्या यापूर्वीच्या पुस्तकाने (आणि त्यावर निघालेल्या चित्रपटानेही) 'डा विन्ची कोड ' ने तर युरोपा मध्ये चांगलाच गदारोळ उठवला होता.
जवळपास येशू बद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला.
आता हा कृष्णाचा विडीयो रिलीस करणाऱ्या महाशयांचा काय 'मराठी dan Brown' म्हणायचं का ?
पाण्याखाली गेलेलं शहर सापडल्याचे मी आधीही discovery वर पाहिलं होतं...त्याने कदाचित द्वारका होती हे सिद्ध होईल...माझ्या मते कृष्ण वगैरे योद्धे होऊन गेले असावेत... बाकी चमत्कार वगैरे म्हणजे काही योगायोगाच्या घटना फुगवून अथवा काल्पनिक तयार करून महाकाव्यात त्या व्यक्तीला भारदस्तपणा येण्यासाठी घातल्या असाव्यात, जसे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली वगैरे....आता असे काही चमत्कार लिहिल्याने ज्ञानेश्वर झालेच नाही अन ते काल्पनिक होते असे म्हणण्यासारखे आहे.
केवळ एका महाकाव्यात लिहिले आहे म्हणून इतके हजारो वर्षे एखाद्याची "देव" म्हणून पूजा करण्याइतके लोक मूर्ख नाहीत...
राहिली गीता...त्यातील अर्थ समजावून घेऊन जमेल तेवढा चांगलेपणा ठेवावा...आपण काही देव नाही...
काही गोष्टींवर , कठोर बुद्धीवाद बाजूला ठेवून फक्त विश्वास ठेवावा (असं मला वाटतं) ...
उदा. रामायण , महाभारत इ.
कारण यात एका आदर्श जीवन पद्ध्तीची कथा सांगीतलेली आहे .. (कदाचित ती काल्पनिक ही असेल).
सगळे आदर्श प्रत्येकाला अत्मसात करता येत नाहीत .. पण त्याचं अनुसरण करता येतं/ तसा प्रयत्न करता येतो.
"वास्तव रामायण" मधे वर्तकांनी रामायणाची कालनिश्चिती करण्यासाठी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती ग्राह्य धरली आहे ...या माहीतीपटात सुद्धा त्या बद्द्ल थोडी माहीती आहे ... पण त्या मुळे फक्त या कथेची कालनिश्चिती होते. महाभारतकार व्यास महर्षी हे विद्वान होते , त्यांना हे ज्ञान असणारच , त्याचा उपयोग त्यांनी आपल्या कथालेखनात केला असण्याची शक्यता आहे.
यात ग्रीक भारतात आल्यानंतर भारताला लेखन कला अवगत झाली असा एक उल्लेख आहे .. पण महाभारत व्यासांनी सांगीतले आणि गणपतीने लिहून घेतले असे आपण मानतो .
या माहितीपटात श्रीकृष्ण हा सर्वोत्तम देव होता - (अगदी येशु पेक्षाही श्रेष्ठ - येशु हा देवाचा पुत्र आहे, आणि तो देव म्हणजे कृष्ण असे काही भक्तांनी सांगीतले आहे . (याला काय आधार आहे माहीत नाही ) ) हेच सत्य अधोरेखीत केले आहे . आणि ते तर आम्हाला मान्य आहेच.
उदा. रामायण , महाभारत इ.
कारण यात एका आदर्श जीवन पद्ध्तीची कथा सांगीतलेली आहे ..
असहमत. लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष सोडून देणं, सीतेवर अविश्वास इ.इ. गोष्टी आदर्श? मुळात रामाने सीतास्वयंवरातच फाऊल केला होता. धनुष्याला दोरी लावायची तर धनुष्य मोडून त्याने जनकालाच शेंडी लावली.
द्रौपदीच्या इच्छेविरूद्ध तिला पाच लोकांशी लग्नं करायला लावायचं, तेही वस्तू समजून, लाक्षागृहात ६ लोकांना जिवंत जाळणं, इ.इ. कोणत्या न्यायाने आदर्श?
रामायण, महाभारतामधले खगोलीय संदर्भ उचलून ते लिहीले कधी यांचा काल निश्चित करता येईल. (कसा ते मला विचारू नये.)
राजकारण करुन शत्रुला नमवणे? कर्ण वगैरे प्रकरणं म्हणजे आदर्श जीवनपद्धती का?
मला तर बॉलीवुडच्या सिनेमात कसं, आधी सगळं बेस असतं, मग ग्रह फिरतात, तेव्हा दुबला पतला हिरो असतो, व्हिलन एकदम पावरफुल असतात, मंग तो बाय हुक ऑर बाय क्रुक एकेक कर व्हिलनला हरवत जातो वगैरे वगैरे शी फारच साधर्म्य वाटतं ब्वॉ!
द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे , महाभारत व रामायणातील अश्या वादग्रस्त प्रसंगांचे कायम कूतूहल वाटत आले आहे. 'शी बै अच्रट'वाल्या समाजाने हे सगळे कसे काय चालवून घेतले जर ही कथा कादंबरी आहे तर. वाचकांची पत्रेमधे भडीमार करुन प्रकाशकांना आवृत्ती बदलायला लावणे पासुन, प्रकाशकाचे दुकान जाळणे, राजद्रोहाखाली खटला भरणे इ उपाय केले नसतील आपल्या पब्लीकने?
त्यामुळे ही कादंबरी नसुन खरेच असले पाहीजे असे वाटते. कारण खर्या आयुष्यात काय वाट्टेल ते होते. छापील, वाचनीय गोष्टीत कोणी कोणाचे वाट्टेल ते म्हणणे खपवुन घेते का?
अन वाट्टेल ते करणार्या लोकांना तुम्ही बरे सर्वश्रेष्ठ देव म्हणता हो सहज काका!
अहो वाट्टेल ते करणारे खरे असतीलही, त्यांनी वाट्टेल ते केले असेलही, पण मग देवत्व कसं आलं ते सांगा पाहु.
कालच्या कालवणाला दिली फोडणी, घातलं पाणी अन केली पातळ अन वाढली पुढे, असे रोज करीत राहलांत तर आठवड्याने काय उरेल?
म्हणजे आजचे कसाब, मनू शर्मा, छोटा राजन, इ. इ. उद्याचे देव का?
बरं त्या शूर्पणखेशी आधी नस्ते विनोद करणारा आणि नंतर तिला विद्रूप करणारा राम आदर्श कसा काय?
त्याला वाटले तो विनोद करतोय...afterall he is (was ) a man ...
इतर शंकांचे समाधान मला जमणार नाही...एकतर हे लोक मुसलमान..पुढचे लिहिणेच खुंटले..(तरी किती मुसलमान त्यांना देव मानतील हे त्यांचा अल्लाच जाने )
आजचे कसाब मनु शर्मा इत्यादी प्रभुती आजच्या समाजाच्या निकषांवर देखील गुन्हेगार आहेत. पण राम कृष्ण यांचे तसे नव्हते. त्यांनी जे काही केले ते सगळे योग्यच केले असे नाही. पण अयोग्य किंवा न पटणारी कृत्ये खुप कमी आहेत आणि बाकीचे कार्य खुप महान आहे. त्यामुळे ते देव.
प्रतिक्रिया
दुरदेशीचे काका, नमस्कार्स
व्हिडीओ पाहीला. सर्व प्रथम
myth and history
राम -कृष्ण
लिहा!
जागा चुकली
नाही
हाहाहा
वीडिओ बघितला नाही अजून.
एक आठवण
कौल लावा की.....
इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष
>>>इकडे मेजॉरिटीकडे दुर्लक्ष
खरें बोललांस बघ नान्या.
आपल्या मतांपेक्षा वेगळी मतं
मिरचीचा गुणधर्म !!
हिंदु हि धरतीवरील एक अडगळ आहे
प्रतिसाद
मिष्टर थत्ते, ओसीडी?
समज
ओम श्री कृष्णाय नम:
"हरे राम हरे राम राम राम हरे
हॅ हॅ हॅ
नान्या, पुप्या, पर्या,
मिथ
ठोस पुरावा
नक्की काय सांगितलं आहे?
१७ कोटी होती फक्त !
१६६ कोटी २० हजार लोक त्या
कृष्णाजीपंत खरंच होते की नाही
जय हो !!
धर्म विरूध्द शास्त्र !!
केवळ अंगाने भारतात
केवळ अंगाने भारतात
तर त्याला बदलायला सांगुन काय
अनेक रिकामटेकड्या
पण वरचे वाक्य अगदी जेनेरिक का
डिएनए पॅटर्न सारखा असतो. आणि
एंजल्स एंड डेमोंस !
पाण्याखाली गेलेलं शहर
काही गोष्टींवर , कठोर
उदा. रामायण , महाभारत इ. कारण
+१ आणि त्याशिवाय
+२
हॅ हॅ हॅ
त्या काळात त्यांनी वाट्टेल ते
कैतरीच काय?
त्याला वाटले तो विनोद
शुर्पणखेने सीतेला खायची धमकी
आजचे कसाब मनु शर्मा इत्यादी