वेल् ... मला वाटलं ते लिहीलं
नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत.
पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच.
नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल.
परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का? मी ती खुर्ची लांबून ओढत ओढत आणली होती की कोणी माझ्या क्युबमधे चर्चा करायला आलं तर त्या व्यक्तीला बसायला होईल म्हणून. एनीवे.
याउलट अनुभव. एक सुस्वभावी स्पॅनिश बाई पण ओळखीची झाली आहे. ती तिच्या कामात तरबेज आहे.मला खूप मदत करतेच वर नसत्या काय एकही चौकशी करत नाही. तिच्यात भरपूर नेतृत्व गुण आहेत, संवाद्कौशल्य आहे, प्रेझेंटेबल आहे मुख्य म्हणजे ऑर्गनाइज्ड आहे. बरय आम्ही एकाच गटात जरी भिन्न पातळीवर आहोत.
मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या कामात रहाणारे, कामाशी काम ठेवणारे लोक खूप आवडतात. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. भले त्यांचं नेट्वर्कींग मार खात असेल पण नसते इश्यूज नसतात.
प्रतिक्रिया
कृपया हाच लेख कलादालनात पडलाय
वेल् ... मला वाटलं ते लिहीलं
कलादालनात चुकून पडलय.
ऑफीस ऑफीस.......
नाही नाही चान्स मारायच्या
स्टॉकहोम सिंड्रोम
नीटसं कळलं नाहीये पण समथिंग
कसे काय बॉ
हे असे
ओ स्टॉक होमसिन्ड्रोम वेगळा
मेंटॉर
किडनॅपरच मेंटर आहे असच
पूर्ण पैकी पूर्ण
अय्या, तुम्ही कसं ओळखलं? कसले
छ्या
आम्ही बोर्डात नाही, पण
(विषय दिलेला नाही)
परवा माझ्या क्युबिकलमधून
नाही मीटींग रूम मधे बाहेर
बाकी काही म्हटले तरी
नक्की ऑफिसमधे आहात का शाळेत ?
सहमत
कदाचित तुमचा हा प्रतिसाद
ते झालं.. पण तुम्ही तर काहीच
शिल्पा ब
त्या धाग्यात भंपक असे नेमके
नवीन प्रकल्पावर रुजू झाले
अरे बाबा यू नो. हल्ली त्याना
उद्धृत केलेला उतारा पाहून
मला तरी ऑफीसमधे स्वतःच्या
सगळीकडेच असतात हो असे लोक
छोटेखानी प्रकटन छान..
कशाबद्दल तात्या तुम्ही लिहले आहे?
शुचिच्या मूळ लेखाबद्दल.. का
शुचे तुझे धागे मी नेहमी
मस्तच लेखन.. अस अनुभव आजकाल