लगेच पुढचा भाग टाका. अन्यथा या प्रांतांची बदली करावी लागेल. बदली कुठं? त्याला दुर्गम भागात काम करणं आवडतं असं दिसतंय, म्हणून ही बदली अत्यंत सुगम भागात करावी लागेल. किंवा साईड पोस्ट द्यावी लागेल. तीच शिक्षा!!!
बाकी प्रांत-पत्रकार नातं भारी रेखाटलंय. जुने दिवस आठवले. त्या गावाची कहाणीही एका जुन्या घडामोडीची आठवण देणारी आहे. हे असेच एक गाव महाराष्ट्रातील दोन महामार्गांवर वसलेल्या एका जिल्हा केंद्रापासून फार तर दहा-बारा मैलावरचं. तिथंही हीच स्थिती. एका आमदारानं आपल्या वाढदिवशी ते गाव दत्तक घेतलं, पुढे वर्षभरात गावाचा रस्ता झाला, पाणी आलं वगैरे. अर्थात, ते नंतर कोलमडलं हा भाग वेगळा.
आता मागचे सगळे भाग वाचायला लागणार...आयच्यान् मी हे प्रांत वगैरे काहीतरी भौगोलिक असेल म्हणून नंतर वाचू म्हटलं होतं.
अधिकार्यां च्या काम करण्याच्या पद्धतीचं वास्तववादी चित्रण वाटतं. सत्य परिस्थितीवर, प्रत्यक्ष आतल्या अनुभवावरून लिहिलं असावं अशी दाट शंका येते आहे. सरकार कामच करत नाही यावर ठाम विश्वास ठेवून असलेल्या जनतेला अशा वास्तववादाचा डोस अजून मिळाला तर बरं होईल.
छान लेखन आहे, घटनांचा वेग योग्य वाटतो. अजून लवकर येऊ द्यात.
...चांगल्या लेखनाचा छान शिडकावा फारा दिवसांनी मिपावर, बरं वाटलं.
राजा साहेबः तुमचं लिखाण आवडतंच, थोडा विस्तृत लिहा प्रत्येक भाग, म्हणजे रसभंग होणार नाही. तुमच्याकडे लिहायला मटेरियल कमी नाही हे स्पष्टच आहे. येऊ द्या पुढचा भाग लवकर, फार वाट पहायला लावू नका.
बॉसी !! आधी का नाही वाचले असे वाटुन गेले ......
फॅन झालो आजपासुन..
"आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही "
हेच आणी अगदी असेच , ईर्शाळ्यापासुन ते पितळखोर्यापर्यंत....
उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल सर्वांचेचे मनापासून आभार. (त्यामुळे पुढचं लिहायला थोडं टेन्शन येतं हा भाग वेगळा, पण वाढलेला उत्साह त्या टेन्शनवर मात करतो!)
@गुरुजी
प्रांत म्हणजे काहीतरी भौगोलिक असं खुद्द प्रांतांनाही ते प्रांत होईपर्यंत वाटत असे असं (विश्वसनीय वगैरे सूत्रांकडून) समजतं ;-)
सरकार कामच करत नाही यावर ठाम विश्वास ठेवून असलेल्या जनतेला अशा वास्तववादाचा डोस अजून मिळाला तर बरं होईल
असा ठाम विश्वास बनायला काय कारणं असावीत तेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
@टुकुल
वेगळा धागा टाकतोय.
@श्रामो
पाप आमचं आणि शिक्षा प्रांतांना? सुगम भागात/ साइड पोस्टिंगला गेल्यावर आम्ही गोष्टी कुणाच्या सांगायच्या? त्या वेताळा (अवलिया फेम) सारखं कायम बिचार्यांना दुर्गम आदिवासी भागात रहावं लागणार, प्रांत याच पोस्टवर, प्रमोशन/ डिमोशन इ. न होता! त्यांचं वयही वाढणार नाही हे वे सां न ल! ;-) आणि काय हो, तुमच्या नोंदी दिसत नाहीत आजकाल. तुमचीच बदली करायची वेळ आलेली दिसते!
लेख सुरू होण्यापूर्वी अनुक्रमणिका आहे. या लेखमालिकेतल्या पुढच्या ५ भागांसह या लेखमालिकेच्या सर्व भागांचे दुवे अनुक्रमणिकेत ड्रॉप डाऊन प्रकारे उपलब्ध आहेत.
प्रतिक्रिया
वाचतोय...
पुढे?
म्हाराजं चांगली चालवली आहे ही
आवडलं.
लगेच
जुने दिवस आठवले. त्या गावाची
वाचतोय .. लवकर लवकर लिहा
मस्त.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
प्रत्येक भाग आवर्जून वाचला आहे..
हा भाग छोटा झाला काय? पुढचा
आयला...
वाचतेय.पुढील भाग लवकर येवु
लवकर येऊ द्या
+१
तुमच लिखाण आवडत आहे आधीपासुन,
अरे वा! 'प्रांत' आले...
बॉसी !! आधी का नाही वाचले असे
उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल
आळ्शांचा राजा
फारच छान
पुढील भाग?
वर अनुक्रमणिका आहे
सर