Skip to main content

माणसाने मरायचे योग्य वय काय असावे?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 27/08/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1056
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

माणसाने मरायचे योग्य वय काय असावे हा प्रश्न कोणाला विचारावा? १. चित्रगुप्ताला २. डायरेक्ट यमाला ३. डॉक्टरला ४. पायलट/ ड्रायव्हरला ५. जॉर्ज बुश/ ओबामा/ तालिबान वगैरे ६. संपादकांना* * त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात असा काहीजणांचा समज असतो. हे टुकार कौल थांबवा कोणीतरी आता!

In reply to by प्रियाली

हे टुकार कौल थांबवा कोणीतरी आता!
असेच म्हणते. एखाद्याला खरोखरीचा प्रॉब्लेम असेल म्हणून त्या व्यक्तिने धागा काढला. शरीराची, मनाची मरगळ झटकली जाऊन सळसळत्या उत्साहाने काहीतरी करावे असे लोकांनी खरेच चांगले आणि मनापासून प्रतिसाद दिले. आणि त्यानंतर तुम्ही असा पांचट आणि निरर्थक कौल काढत आहात??? गपा आता*. *- © एकषष्ठांश गोरी.

In reply to by मस्त कलंदर

>> *- © एकषष्ठांश गोरी. कुणाच्या एकषष्ठांश ते स्पष्ट न केल्याने कॉरा अवैध मानला जात आहे.

In reply to by मस्त कलंदर

+१ मध्ये मध्ये संपादन फारच वाढले होते आणि आता काहीच नाही....जरा मध्यावर ठेवा कि गाडी..

In reply to by मस्त कलंदर

असेच म्हणते. धागा मरायचं वय आता बहुदा झालंय या धाग्याचं! *- © पाचषष्ठांश गोरी.

In reply to by प्रियाली

>>>>>>>टुकार कौल थांबवा कोणीतरी आता ! असेच म्हणतो. मिपाच्या दर्जाचा कौल कुठे आहे ? तिकडे एक मत टाकून येतो. -दिलीप बिरुटे [हतबल]

जरा एखादं घर तरी शाकारुन होईल म्हणतो मी!!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, कौलाची सोय मिपावर ठेवावी की नको असा एक कौल काढायचा का? ;) ) चतुरंग कौलगुड

In reply to by चतुरंग

सहमत आहे. त्यातून कौलात प्रस्तावकाला म्हणणे मांडण्याची सोय नसल्याने. मटा मधल्या कौलासारखे वाटते. ||कौलाराम फुटणे||

मिपाने मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिलय त्याचा हल्ली काही लोक वाट्टेल तसा दुरुपयोग करु लागली आहेत. आहेना फुकट आणि कसल्या ही पुर्व परवानगी शिवाय टंकता येतयना तर लिहा जे मनात येईल ते. अरे नाही धड बर लिहितायेत तर गप गुमान वाचत बसाना. २-४ प्रतिसाद टाका हवे तर. खफ ची सोय दिली आहे ना. तिकडे करा टीपी. उठसुठ *गल्या *तल्याचे कसले रे कौल आणी चर्चा टाकताय लेको. काय तो कौल? काय ते पर्याय? फाट्यावर मारायच्या लायकीचा ही नाही. मुद्दाम प्रतिसाद देणार नव्हतोच. पण हा चहाटळपणा थांबला पाहिजे.. कुठे तरी निषेध नोंदवला गेलाच पाहिजे. म्हणुन हा प्रतिसाद. निषेध! निषेध!! निषेध!!! त्रिवार निषेध.

सगळे प्रतिसाद वाचले. काय हे ! कौल काढणार्‍या व्यक्तीच्या मनाची पर्वा न करता टंकलेले, किती हे असंवेदनाशील, उर्मट प्रतिसाद! पण, इंटरनेटभाऊ, तुम्ही असे विचित्र प्रतिसाद पाहून नाउमेद मात्र होऊ नका. इथे येत रहा, तुमच्या मनात असलेल्या समस्यांवर/ प्रश्नांवर कौल काढत रहा. मिपाकर तुम्हाला जरुर उपाय सुचवतील. तुम्हांला खूप शुभेच्छा! अवांतरः ठराविक लोकांनी केली तर ती थट्टा आणि सौम्य ह्यूमर आणि बाकीच्यांनी केला तर तो असंवेदनाशीलपणा ठरु शकतो.

@ यशोधरा ताई बघा ना कसे निर्दयी लोक्स असतात.. :( :( पण इंटरनेटभाऊ हा शब्द प्रयोग आवडला! असो. :) @ वेताळ, शाहरुख, विश्रापा, तसे काही नाही.. असो. आपुलकीबद्दल आभारी आहे! :) @ प्रियाली ताई अतिशय मार्मिक प्रतिसाद! :) @ अन्य सर्व :)

In reply to by इंटरनेटस्नेही

LOL! :D हो, हो अगदीच निर्दयी! काय हो, पण तुम्हांला शारिरीक मरण म्हणायचे आहे की आपले स्वत्व गहाण टाकल्याने पत्करावे लागते ते मानसिक मरण?